Angel Tattoo Studio
Tattoo Artist
हा माझ्या चुलत बहिणीचा मुलगा,त्या अर्थाने मी त्याची मावशी आहे 😁आमच्या दोघात फक्त आठ दिवसांचे अंतर त्यामुळे मावशी या नात्यापेक्षा मैत्रीचे नातेच कायम जवळचे वाटले. आमच्या गप्पा इतक्या रमायच्या की उन्हाळ्याच्या सुट्ट्याची या भेटीसाठी आतुरतेने वाट पहात असू.सगळे एकत्र आलो की मग ते दोन महिने कसे पटकन निघून जात.चुलत बहिणीही सख्या बहिणीसारख्याच वाटायच्या उलट त्यांचीचं जास्त वाट पाहिली जायची🤗पुढे माझे लग्न झाले आणि ही भेट जवळपास बंदच झाली.सुदैवाने पुन्हा पुण्यातचं भेटलो आणि पुन्हा गप्पा,एकमेकांना सगळी गुपित सांगणे चालू झाले. त्यातच त्यानें प्राचीबद्दल सांगितले.पुढे घरातून विरोध स्विकारून ही अनुरूप जोडी विवाह बंधनात अडकली.प्राची अतिशय मनमिळाऊ आणि गोड मुलगी. तिच्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. टॅटूसाठी तिचा msg आला. खुप दिवसांपासून टॅटू काढायचा आहे म्हणाली पण तुझ्याकडून काढण्यासाठी थांबलो आहोत.इतका विश्वास प्रेम पाहून फार समाधान वाटले 😍माझ्या स्टुडिओपासून ते जवळपास 50 ते 55 किलोमीटरचे अंतर पार करत ते त्यांच्या गोड बच्चूला घेऊन आले.आणि या जोडीला शोभेल असा टॅटू त्यांनी काढून घेतला🤗खरोखर टॅटूमुळे दुरावलेली कित्येक जिवलग पुन्हा संपर्कात येत आहेत.नवीन माणसं जोडली जात आहेत.मला जे हवे होतें ते साध्य होतेय अजून काय हवे? असो, तर या जोडीचा हा टॅटू तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
Pune