Aangan
'Angan' is place for those children's who has lot of potential for future but there is no source of success. so we can try to give them some chance.
13/08/2023
शिक्षक व स्वयंसेवक हवेत
सामाजिक कामात मदतीसाठी
आम्हाला पैसे नको, देणगी नको
शिकवायला आणि मदतीला माणसं हवी आहेत.
मागील 8-10 वर्षापासून पुण्याच्या पूर्व भागात वस्ती पातळी वरील मुलांना रोज संध्याकाळी 1 तास आम्ही शिकवण्याचे काम आम्ही नियमितपणे करत आहोत.
या कामात आम्हाला मदतीची गरज आहे.
इच्छुक असल्यास कृपया संपर्क साधावा.
समता प्रतिष्ठान, पुणे
[email protected]
[email protected]
7720045273
धन्यवाद !!
02/08/2023
1 ऑगस्ट 2023 च्य निमित्ताने..
लो. सा. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंती निमित्त विविध विधायक उपक्रमांनी जयंती साजरी केली.
शालेय साहित्य वाटप मा. पल्लविताई जावळे ( नगरसेविका ), श्री. शेखर जावळे ( सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या कडून करण्यात आले.
विद्यार्थी विविध गुण दर्शन,
अण्णाभाऊ वर आधारित नाट्य वाचन
स्थानिक पालक आणि अभ्यासीकेतील विद्यार्थि यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच पर्वती पायथा येथील लो. अण्णा भाऊ साठे अभ्यासिका ( स्पर्धा परीक्षा केंद्र ) येथील कार्यक्रमात
डॉ. उज्वलाताई हतांगळे यांच्या सोबत
सहभागी होण्याची संधी मिळाली.
'जागर समतेचा'
29/11/2021
विद्न्यान केंद्र भेट ..
भटकंती, अभ्यास आणि मनोरंजनही
आंगण अभ्यासिका प्रकल्प
समता प्रतिष्ठान, पुणे
10/11/2021
गोष्ट .. गोष्ट .. गोष्ट
मोबाईल वेडाच्या या जमान्यात पुन्हा नव्याने गोष्ट ऐकण्याची गम्मत अनुभवली.
समता प्रतिष्ठान, संचालित आंगण अभ्यासिकेतील मुलांसाठी श्री. श्रीधर कुलकर्णी यांचा गोष्टींचा कार्यक्रम घेण्यात आला. याचेच हे काही निवडक क्षण..
07/11/2021
दिवाळी आमची निराळी
बद्दल एक बोलकी प्रतिक्रिया ..
फराळ कसा पूर्ण हवा..तसाच समाजही..माझी दिवाळी अपूर्ण राहिली असती जर काल मी या गोडं माणसांना भेटले नसते तर... दोन कर्मयोगी संस्था एक शिक्षणापासून वंचित मुलांच्या शिक्षणावर काम करणारी आणि दुसरी तृतीयपंथीय लोकांसाठी काम करणारी, यांना भेटण्याचा योग आला ...औचित्य होते संवाद घडवण्याचे, लहान मुलांचे समाजाच्या दुर्लक्षित घटकांशी...मला Sandeep Prakash More यांनी आमंत्रित केले होते...आशेचा किरण असा की मला आता दोन्ही संस्थांसोबत काम करता येईल आणि मानसिक स्वास्थ्य हा सगळ्यांचा हक्क आहे याची जाणिव दूरवर पसरवता येईल...शेवटी जे पेराल ते उगवेल ! ती फुगेवाल्याची गोष्ट आठवतीये का??? फुग्यांचे रंग काहीही असो पण रंगामुळे फुगा उडत नसतो तर फुग्यांमधील हवेमुळे फुगा उंच उडतो...मग माणसं दिसण्यावरुन किंवा त्यांच्या लिंग भिन्नतेवरुन ठरवणं कसं बरं चालेल????कारण आपण सगळे आपल्यामध्ये वसलेल्या आत्म प्रेरणेमुळे अस्तित्वात आहोत आणि अस्तित्वात सदैव राहू....
डॉ भक्ती वारे
MD Homeopath and certified counsellor , Trainer.
18/11/2020
दिवाळी फराळ, खेळणी आणि खाऊ भेट
आपल्यातील काही क्षण त्यांच्या सोबत असताना असे उजळून जातात..
न्यू व्हिजन रेन्बो होम मधील मुलींना समता प्रतिष्ठान कडून छोटीशी भेट..
15/10/2020
#वाचन_प्रेरणा_दिन
वाचाल तरच वाचाल..
12/10/2020
तळजाई टेकडी ..
रविवार असा आनंदाचा
25/12/2019
मस्ती की पाठशाला..
अपनी तो पाठशाला..
ख्रिसमस सुट्टी ..
सकाळी तळजाई टेकडीवर
भटकंती, चढाई, खेळ आणि मज्जा
Color full workshop
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Pune