Surendra Pathare
PMC CORPORATOR | Social Worker | Mechanical Engineer | Businessman
Committed to the betterment of my people.
31/05/2026
राज्यकारभारात न्याय, समाजकारणात संवेदनशीलता आणि लोककल्याणात दूरदृष्टी यांचा अद्वितीय संगम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय.
सत्ता ही जनतेच्या कल्याणासाठी असते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. कर्तृत्व, लोकाभिमुखता व आदर्श नेतृत्वाचा दीपस्तंभ असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
पाणीपुरवठा संदर्भातील महत्त्वाची सूचना
लष्कर ते खराडी दरम्यानची १००० मिमी जलवाहिनी मुंढवा पुलाजवळ फुटल्यामुळे उद्या सकाळी ८:०० वाजल्यापासून दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
यामुळे दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, शंकर नगर, पंढरी नगर, गणपती सोसायटी, बोराटे वस्ती, थिटे नगर, प्रभाग क्र. ३ धर्म नगर, धनलक्ष्मी सोसायटी, बॉम्बे सॅपर्स सोसायटी आणि सागर पार्क या भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील.
नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून प्रशासनास सहकार्य करावे.
28/05/2026
जाज्वल्य राष्ट्रभक्ती, क्रांतिकारक विचार आणि अखंड स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर... देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत त्यांनी आपल्या विचारांनी आणि लेखणीने राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवली. पराक्रमी क्रांतिकारक, साहित्यिक आणि दूरदर्शी विचारवंत म्हणून त्यांचे योगदान भारतीय इतिहासात सदैव अजरामर राहील.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
28/05/2026
आज बकरी ईद व त्यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना खूप शुभेच्छा!
27/05/2026
पुणे–शिरूर उन्नत महामार्ग प्रकल्प हा पूर्व पुणे, शिरूर तसेच अहिल्यानगर आणि मराठवाडा परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. वाढती वाहतूक, नागरिकांचा प्रवासातील वेळ आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येत असलेला हा देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्ग प्रकल्पांपैकी एक आहे.
या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. तसेच व्यापार, उद्योग, रोजगार आणि दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्ग आणि दुमजली उड्डाणपूल यामुळे भविष्यातील आधुनिक व सक्षम वाहतूक व्यवस्थेचा मजबूत पाया तयार होणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ करण्यासाठी तसेच विकासाची गती अधिक वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हाच विकासाचा खरा उद्देश आहे.
27/05/2026
विकासाला वेग व कामाला परिणामकारकता देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला निरोगी व सुदृढ आरोग्य तसेच दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
आपल्या कार्यशील नेतृत्वातून देशात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेली प्रगती व विकासकामांचा वेग हा निश्चितच उल्लेखनीय आहे. आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासाचा हा प्रवास अधिक सक्षम होत असून प्रगतीचा हा आलेख असाच अधिक उंचावत राहो.
Nitin Gadkari
27/05/2026
संघर्षाच्या कठीण वाटेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी अखंड विश्वासाने उभ्या राहिलेल्या माता रमाई म्हणजे त्याग, संयम व समर्पणाच्या तेजस्वी प्रतीक होत्या.
रमाईंनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारप्रवासाला मायेचा व धैर्याचा आधार दिला. त्यांच्या शांत त्यागामागेच सामाजिक परिवर्तनाच्या महासंग्रामाला मिळालेली शक्ती दडलेली होती.
समाज परिवर्तनाच्या इतिहासात रमाईंचे योगदान हे शब्दांपलीकडचे आहे.
आज पुण्यतिथीनिमित्त माता रमाई आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!
आपल्या इंद्रगर्जना प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकात सहभागी होत आपली संस्कृती जोपासूयात.
खराडीसह वाघोली परिसरातही पथकाच्या माध्यमातून नव्या ढोल-ताशा प्रेमी वादकांसाठी सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
नाव नोंदणीसाठी QR Code स्कॅन करा किंवा खाली दिलेल्या लिंकला भेट देऊन फॉर्म भरा.
फॉर्म लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeke8WjWZTHJp7Ufq_1cLTcOnqjsam7tCUXn_CJy9vZyJaXng/viewform
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
शुभम पठारे: 8408992122
26/05/2026
कला, साहित्य, विज्ञान, उद्योग, सामाजिक कार्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देत देशाची ओळख जागतिक स्तरावर अधिक उंचावणाऱ्या सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपण आपल्या कार्यकर्तृत्वातून मेहनत, निष्ठा, सर्जनशीलता व समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा आदर्श निर्माण केला आहे.
देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आपल्या कार्यातून अनेकांना नवी दिशा देणाऱ्या सर्व मान्यवरांचा हा गौरव संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.
26/05/2026
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ उपक्रमांतर्गत पुणे येथे आयोजित भाजपा पुणे शहराच्या दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती दर्शवली.
पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि समाजाशी अधिक प्रभावी संवाद कसा साधायचा याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष मा. श्री. धीरजजी घाटे त्याचबरोबर इतर प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा पद्धतीच्या विशेष प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनेला निश्चितच बळ मिळते.
BJP Pune City
Chandrakant Patil
Madhuri Misal
BJP Maharashtra
Dheeraj Ghate
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Royal Infra Mundhwa/Kharadi Road, Tukaram Nagar, Kharadi
Pune
411014