Shefali Vaidya Fans

Shefali Vaidya Fans

Share

Shefali Vaidya is a Pune-based right wing freelance writer, newspaper columnist, and media personality. She is a Mass Communications master’s degree holder.

She is a multilingual author who writes in Marathi, English, Konkani, and Spanish, among others.

26/02/2024

Har Ghar Savarkar

12/11/2023

दिनांक : 12.11.2023

कृपया प्रसिद्धीसाठी

आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा !

देशप्रेमी बांधवांकडून भ्याड आक्रमणाचा निषेध तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली !

पुणे - हमास या आतंकवादी संघटनेकडून 7 ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर आक्रमण करण्यात आले. या भ्याड आक्रमणाचा निषेध करण्यासाठी, तसेच या आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 11 नोव्हेंबर या दिवशी पुणे येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 'हर घर सावरकर' समिती आणि 'भारत इस्रायल मैत्री मंच' यांच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा वीर सावरकर स्मारक येथे चालू होऊन टिळक रस्ता येथील 'न्यू इंग्लिश स्कूल' येथे यात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत इस्रायलला पाठींबा दर्शवला. भारत इस्रायल मैत्री मंचचे श्री. रणजीत नातू, श्री. विद्याधर नारगोलकर, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, विराट हिंदुस्थान संगमचे जगदीश शेट्टी, इस्रायली नागरिक अदेलीया पेनकर, विश्व हिंदू परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना, यांच्यासह ३०० देशप्रेमी बांधव सहभागी झाले होते.
इस्रायल हे आतंकवादाचा प्रतिशोध घेत आहे. आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी यावेळी व्यक्त केले. हमास या आतंकवादी संघटनेच्या आक्रमणापासून आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे असे हर घर सावरकर समितीचे देवव्रत बापट यांनी सांगितले. हमास मधील मदरशांतून मुलांना इस्रायली नागरिकांना मारण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे वास्तव इस्रायली नागरिक ससून फणसपुरकर यांनी उघडकीस केले. तसेच जग विरोधात असल्याचे चित्र असतांना भारतातून समर्थन मिळणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत इस्रायली नागरिक अदेलीया पेनकर यांनी व्यक्त केले. हमासच्या आतंकवादी आक्रमणाचा प्रत्येक भारतीयाने निषेध करायला हवा असे हिंदु जनजागृती समितीच्या कु.क्रांती पेटकर यांनी सांगितले.
या पदयात्रेला भारतात राहणारे इस्रायली बांधवही सहभागी झाले होते.

07/11/2023

Shefali Vaidya Fans Shefali Vaidya is a Pune-based right wing freelance writer, newspaper columnist, and media personality. She is a Mass Communications master’s degree holder. She is a multilingual author who writes in Marathi, English, Konkani, and Spanish, among others.

23/10/2023

निःशुल्क वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा - आयोजक - हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन

मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभलेल्या 'हर घर सावरकर समिती' च्या वतीने वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सावरकरांचे कार्य, विचार आणि साहित्य यांची प्राथमिक ओळख असलेल्या तसेच वक्तृत्वाची आवड असलेल्या वय वर्षे २५ ते ४० मधील कोणत्याही व्यक्तीसाठी ही वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा असणार आहे.
तीन ऑनलाईन सत्रे व दोन दिवस निवासी, असे याचे स्वरूप असून, निवासी कार्यशाळा दिनांक ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.

सहभाग घेणाऱ्यांना मिळणार:
◼ नि:शुल्क निवासी वक्ता प्रशिक्षण
◼ स्थानिक पातळीवर वक्ता बनण्याची संधी
◼ मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र.
◼ तीर्थक्षेत्र अंदमान येथे जाण्याची संधी
◼ अन्य आकर्षक बक्षिसे.

इच्छुक उमेदवारांची खालील प्रमाणे त्रिस्तरीय पात्रता फेरी असणार आहे.

◼ प्रथम फेरी: गुगल फॉर्म भरावयाचा.
◼ द्वितीय फेरी: गूगल फॉर्म योग्य रित्या भरलेल्या उमेदवारांची मर्यादित वेळेत प्रश्नोत्तरांची ऑनलाईन चाचणी असेल.
◼ तिसरी व अंतिम फेरी: उमेदवारांनी WhatsApp वर व्हिडिओद्वारे स्वतःचे ३ (तीन) मिनिटांचे भाषण पाठवावयाचे आहे.

तिन्ही फेरीतून उत्तीर्ण झालेले उमेदवार या कार्यशाळेसाठी पात्र ठरवले जातील.

◼ ही संपूर्ण कार्यशाळा नि:शुल्क आहे.
◼ उत्तीर्ण उमेदवारांची पुण्यातील निवासाची आणि भोजनाची व्यवस्था 'हर घर सावरकर' समितीतर्फे करण्यात येईल.
◼ तसेच पुणे शहराबाहेरील उत्तीर्ण उमेदवारांना प्रवास भत्ताही 'हर घर सावरकर' समितीतर्फे देण्यात येईल.
◼ कार्यशाळेत सर्वोत्तम सादरीकरण करणाऱ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, सावरकर साहित्य व रोख रकमेची बक्षिसे देण्यात येतील.

'हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन' यांच्यावतीने जे अनेक उपक्रम आत्तापर्यंत राबविण्यात आले, त्यात -
एप्रिल २०२३ मध्ये महाराष्ट्रभरातील सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्र व संस्थांची शिखर परिषद, ठाणे येथे संपन्न झाली.

दिनांक २१ मे २०२३ रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातून सावरकर विचारांचे दर्शन घडविणारी आरास स्पर्धा घेण्यात आली.

वर्षभर सुरू राहणाऱ्या हर घर सावरकर या अभियानांतर्गत पुढील उपक्रम , सावरकर हा विषय केंद्रस्थानी ठेवून वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आवश्यक गुगल फॉर्म 'हर घर सावरकर समिती' च्या https://www.facebook.com/HarGharSavarkar या फेसबुक पेजवर दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळेचे नियम व अटी तेथे उपलब्ध असतील
अशी माहिती समितीचे पदाधिकारी श्री अनंत पणशीकर व श्री रोहन अंबिके यांनी दिली.
तसेच अधिक माहितीसाठी
श्री यशवंत अकोलकर (९४२२००४६५३) व श्री प्रशांत चव्हाण (९०२८०९४३८६) यांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Shrimant Bajirao Peshwa Lalkari 18/08/2023

https://youtu.be/lY7jfIeYZjQ

Shrimant Bajirao Peshwa Lalkari On the occasion of Shrimant Bajirao Peshwa Sainik School this Lalkari was developed.Credits :Mr. Pravin Joshi and Mr. Devavrat [email protected]

HarGharSavarkar - 26 Feb to 28 May 2023 15/11/2022

जय हिंद

HarGharSavarkar - 26 Feb to 28 May 2023 In this video, we'll be celebrating the birth anniversary of HarGharSavarkar, the founder of the Indian independence movement.From February 26th to May 28th ...

17/10/2022

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shaniwar Wada
Pune
411030