PravarAyu

PravarAyu

Share

Dr. Prajakta Shinde
BAMS, MD Yoga (Gold Medalist)
Dr. Sumit Salunke
BAMS, MD (YOGA)
Integrative health with Ayurveda and Yoga
#Ayurveda #Yoga

22/09/2025

नवरात्री विशेष: स्त्रियांसाठी ऑनलाईन आरोग्य कार्यशाळा
22सप्टेंबर - 1 ऑक्टोबर
रोज सकाळी 7-8 | ऑनलाईन
Dm for more details.
❤️

21/09/2025

*नवरात्री विशेष – ९ दिवसांची स्त्रियांसाठी सर्वांगीण आरोग्य कार्यशाळा*

दिनांक: *२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर*(ऑनलाईन)
*वेळ* - सकाळी 7- 8
शुल्क - फक्त 299/-

या नवरात्रीला, आम्ही आपल्या मैत्रिणींसाठी ऑनलाइन आरोग्य कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये आपण आयुर्वेद व योग आपल्या आयुष्यात कसा अमलात आणून निरोगी राहू शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. दररोज वेगळा विषय घेऊन आपले प्रश्न आम्ही निरसन करू.

दररोजचे विषय खालीलप्रमाणे:

*दिवस१* : आपल्या आरोग्याचा पाया तयार करा - निरोगी राहण्यासाठी आयुर्वेद व योगाचे सोपे उपाय
*दिवस२*: आपले मन मजबूत करा - तणाव कमी करण्यासाठी काही टिप्स
*दिवस३*: नैसर्गिकरित्या संप्रेरके (हार्मोन) संतुलित करा
*दिवस४* : आपली पचनशक्ती वाढवा - पचनशक्ती व त्या संदर्भात विकार यांचे उपाय
*दिवस५* : गरोदरपण आणि मातृत्वाची काळजी
*दिवस६*: जीवनशैलीच्या विकारांवर मात - लठ्ठपणा आणि मधुमेह
*दिवस७* : थायरॉईड अणि pcod नैसर्गिकरित्या सुधारा
*दिवस८*: नैसर्गिक सौंदर्य उजळा - निरोगी त्वचेसाठी आयुर्वेद व योग
*दिवस९* : आनंददायी वृद्धत्व - Menopause व perimenopausal changes यासाठी आयुर्वेद व योग.

कृपया खालील फॉर्म भरून आपली नोंदणी करा.
https://forms.gle/K2DdzL8t2UcnCQvNA

आपल्या मैत्रिणींना, बहिणी सगळ्यांना हे नक्की share करा, म्हणजे सगळ्यांना याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

21/09/2025

डॉ. प्राजक्ता शिंदे साळुंके यांच्या ‘नवरात्र विशेष महिला आरोग्य कार्यशाळे’मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे!.

नवरात्रीच्या या मंगलमय पर्वात आपण देवीचा जागर करतो, पण स्वतःच्या आरोग्याचा जागर करायला विसरतो. चला तर, या वेळी आपल्या आरोग्यालाच प्राधान्य देऊया. तुमच्या व्यस्त दिनचर्येतून फक्त एक तास स्वतःसाठी काढूया आणि तुमच्या जेवणात व राहणीमानात सोपे आणि वैज्ञानिक बदल कसे करायचे हे शिकूया. यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्हीही आनंदी आणि प्रसन्न राहील.

ही कार्यशाळा म्हणजे तुमच्या आरोग्याच्या प्रवासाची पहिली पायरी आहे. यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरा. हा फॉर्म भरल्यावर तुमची सामान्य माहिती मला मिळेल आणि त्यातून मी कार्यशाळा तुमच्या गरजांनुसार अधिक प्रभावीपणे तयार करू शकेन.

फॉर्म भरताना कोणतीही अडचण आल्यास, तुम्ही बिनधास्त संपर्क करू शकता किंवा घरातील तरुण व्यक्तीची मदत घेऊ शकता.

https://forms.gle/K2DdzL8t2UcnCQvNA

संपर्क: 7019544431

Photos from PravarAyu's post 19/09/2025

*नवरात्री विशेष – ९ दिवसांची स्त्रियांसाठी सर्वांगीण आरोग्य कार्यशाळा*

📅 दिनांक: *२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर*(ऑनलाईन)

दररोजच्या व्यस्त जीवनात, इतरांची काळजी घेत असताना आपण स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं मात्र विसरून जातो.
यासाठीच, या नवरात्रीला, मी प्राजक्ता शिंदे आपल्या मैत्रिणींसाठी ऑनलाइन आरोग्य कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये आपण 9 दिवस
आयुर्वेद व योगाच्या माध्यमातून स्त्रियांचे आरोग्य, सौंदर्य व सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी सोपे, सहज व घरगुती उपाय बघणार आहोत.

चला तर मग, हे आपल्या आई, बहीण, मैत्रीण सगळ्यांना पाठवूया व या कार्यशाळेसाठी लवकरात लवकर नोंदणी करूया.

अधिक माहितीसाठी संपर्क - 7019544431

👩🏻‍⚕️ आयोजन: *डॉ. प्राजक्ता शिंदे* BAMS, MD Yoga (Gold medalist)

20/08/2025

Suvarna prashan

13/08/2025

🌿 शिरोधारा – तणावमुक्त जीवनासाठी आयुर्वेदिक स्पर्श 🧘‍♂️

शिरोधारा हा आयुर्वेदातील पंचकर्माचा एक खास उपचार आहे.
यामध्ये औषधी तेलाचा सातत्यपूर्ण प्रवाह कपाळावर टाकला जातो,
जो मेंदूला शांत करतो, तणाव कमी करतो आणि मनाला देते गाढ शांती.

✅ तणाव, चिंता, डोकेदुखी
✅ निद्रानाश व थकवा
✅ एकाग्रतेचा अभाव

यावर नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय – शिरोधारा
मन, शरीर आणि आत्म्याची एकत्रित विश्रांती 🌺

Online Appointment 13/08/2025

Online Appointment

Online Appointment Visit the post for more.

01/05/2025

The inauguration of Pravar Ayu Clinic was successfully held on the auspicious occasion of Akshaya Tritiya. I am sincerely grateful for the warm wishes, blessings, and support received from all of you on this special day. The energy derived from your blessings will surely serve as an inspiration in protecting and improving the health of each individual — I have complete faith in this....

The inauguration of Pravar Ayu Clinic. The inauguration of Pravar Ayu Clinic was successfully held on the auspicious occasion of Akshaya Tritiya. I am sincerely grateful for the warm wishes, blessings, and support received from all of y…

01/05/2025

प्रवर आयु क्लिनिक चा शुभारंभ अक्षय तृतीय या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. या शुभप्रसंगी आपल्याकडून मिळालेल्या प्रेमळ शुभेच्छा, आशीर्वाद आणि पाठिंब्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे. Youtube Video आपल्या या आशीर्वादातून मिळणारी ऊर्जा, प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण आणि सुधारणा यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रवर आयु क्लिनिक हे आयुर्वेद, योग आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा समन्वय साधून, सामान्य नागरिक आणि रुग्ण यांना योग्य सल्ला व चिकित्सा देण्यासाठी नेहमीच आपल्यासोबत उभं राहील. आपले प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा असेच कायम सोबत राहोत, हीच प्रार्थना.पुनश्च – मन:पूर्वक धन्यवाद!

प्रवर आयु क्लिनिक चा शुभारंभ प्रवर आयु क्लिनिक चा शुभारंभ अक्षय तृतीय या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. या शुभप्रसंगी आपल्याकडून मिळालेल्या प्र.....

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Nigdi?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pravar Ayu Clinic, Dhruv Darshan Apartment, Sector 26, Near Akurdi Railway Station
Nigdi
411044