Tech

Tech

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tech, Business Center, Nashik.

boAt BassHeads 225 In-Ear Super Extra Bass Headphones (Black) 04/03/2018

http://amzn.to/2teXM7N

Rs 599

boAt BassHeads 225 In-Ear Super Extra Bass Headphones (Black) boAt BassHeads 225 polished metal earphones are designed to give you an experience which no other brand can match. It has an incredible sonic clarity with "Super Extra Bass". It is not a plastic earphone - It is polished metal. With tangle free flat cables, you are expected to be hassle free. As ...

SanDisk Cruzer Blade SDCZ50-016G-135 16GB USB 2.0 Pen Drive 04/03/2018

http://amzn.to/2oQ7Sqf

399rs only

SanDisk Cruzer Blade SDCZ50-016G-135 16GB USB 2.0 Pen Drive Description for Higadget SanDisk Cruzer Blade SDCZ50-016G-135 16GB USB 2.0 Pen DriveSize name:16GBProduct DescriptionThe Higadget SanDisk 16GB Cruzer Blade USB Flash Drive from Higadget is a compact, portable USB flash drive. It allows you to carry and transfer files on the go like photos, videos...

Photos 26/06/2016

छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांना १४२ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन

Photos 22/06/2016

रेणुका 'भाभी'नं दिली सलमानच्या सणसणीत कानाखाली!

मुंबई : 'हम आपके है कौन' या चित्रपटातील सलमानच्या 'भाभी'ची भूमिका निभावणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं आपल्या सिनेमातील 'देवर'च्या सणसणीत कानाखाली लगावलीय.

सलमान खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आणि वादात अडकलाय तो त्याच्या सोशल मीडियावर केलेल्या 'रेप' संबंधित कमेंटमुळे... त्याची हीच कमेंट त्याच्या 'भाभी'ला म्हणजेच रेणुकालाही रुचलेली नाही.

ट्विटरवरच सलमानच्या सणसणीत कानाखाली लगावताना रेणुकानं सलमानला अगोदर माणूस बनण्याचा सल्ला दिलाय.

'अभिनय करताना एखाद्या कलाकाराची त्याला संमती असते... शिवाय या कामाचे त्याला पैसेही मिळतात... पण, बलात्कारात मात्र पीडितेची संमती नसते... बलात्कार पीडित व्यक्तीला त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते... अगोदर माणूस बना प्लीज!' असं ट्विट रेणुकानं केलंय.

Photos 21/06/2016

दहीहंडीसाठी थरांची मर्यादा नको, राज्य सरकार जाणार कोर्टात
मुंबई – 21 जून : दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा आणण्यात येऊ नये, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडीसंबधीचे नियम शिथिल करण्यासाठी सरकार हायकोर्टात गोविंदा मंडळांची बाजू मांडणार आहे. दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा नसावी आणि दहीहंडी फोडताना 12 वर्षीय मुलांना सहभागी होता यावं, यासाठी सरकार कोर्टात बाजू मांडणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्रासमोर दहीहंडी आणि गणेशात्सव मंडळांची बाजू मांडली.

दहीहंडी उत्सवात 18 वर्ष वयाची अट पूर्ण करणार्‍या मुलांनाच सहभागी होता यावं असं मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत. तसंच 20 फुटांपेक्षा दहीहंडीची उंची नसावी असे निर्बंध घातले होते. ही अटक शिथिल करुन 12 वर्षांवरील मुलांनी यात सहभागी होऊ द्यावे. तसंच गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकार यांची बाजू मांडून पोलीस आणि महापालिकेने त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. शेलार यांची मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी मूर्तीकारांच्या मंडपांना परवानगी देण्यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना केल्या.

दरम्यान, दहीहंडी फोडताना लहान मुलांचा समावेश करू नये तसंच 20 फुटांपेक्षा अधिक थर लावू नयेत, असे आदेश यापूर्वी मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले होते. या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी कोर्टाने राज्य सरकार आणि दहीहंडी समितीचे अध्यक्ष आशीष शेलार यांना नोटीस बजावली होती.

Photos 08/06/2016

कामत समर्थनार्थ मुंबई काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामा देणार ?

08 जून : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. माजी खासदार गुरुदास कामत यांना समर्थन देण्यासाठी पालिकेतील काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. महापौर स्नेहल अंबेकर यांच्याकडे उद्या हे सर्व नगरसेवक आपला राजीनामा पाठवणार असल्याचही बोललं जातं आहे.

संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कामत गटाला डावलण्यात येत होते. सोमवारी कामत यांनीही पक्षाचा त्याग करत राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केल्याने कामत समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. त्यापैकी 25 नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 27 होईल त्यामुंळ पालिकेतली अनेक समिकरणहीं बदलणार आहेत.

त्यामुळे मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट पक्षाला घातक ठरण्याचे संकेत आहेत. पालिका तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

Photos 08/06/2016

अंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन

वॉशिंग्टन : परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.

सुनीता विलीयम्सला जेव्हा भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की मोदी सर्वात पहिले माझ्या वडिलांना भेटले. मोदींनी आम्हाला भारतात येण्याचे आमंत्रणही दिले. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत सुनीता या असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. मोदींनी आम्हाला दिलेले निमंत्रण ही आमच्याकरिता सन्मानाची गोष्ट आहे असे विलीयम्सनी सांगितले. त्याचबरोबर अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रात अमेरिका- भारतसोबत काम करायलाही आवडेल अशी इच्छा विलीयम्सनी व्यक्त केली. .

त्याचवेळी आर्लिंगटन सिमेट्री येथे मोदींनी कल्पना चावला यांना श्रद्धांजली व्हायली आणि कल्पनाच्या कुटुंबालाही भेट दिली. तेव्हा सुनीता विलीयम्सने सांगितले की कल्पना चावला या एक महान अंतराळवीर होत्या आणि माझी तिच्यासोबत खूप चांगली मैत्रीही होती.

07/06/2016

ग्रामसेवक आणि सरपंचाला लाच घेताना रंगेहात अटक
Tuesday, 07 June 2016 21:52

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंचाला लाच घेताना अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. सरपंच शिवशंकर फाळके आणि ग्रावसेवक किशोर पुंडे अशी या लाचखोऱ्यांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या बांधकामाचे 1 लाख 51 हजार 531 रुपयांचे बिल बाकी होते. या बांधकामाचे बिल काढण्यासाठी या दोघांनी 32 हजारांची लाच मागितली होती.

ढाणकी येथील ग्रामपंचायत कार्यालयातच या दोघांना लाच घेताना अटक करण्यात आली.

Photos 07/06/2016

पोलीस दाम्पत्याने एव्हरेस्ट सर करून रचला इतिहास

07 जून :
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या राठोड दाम्पत्याने आज (मंगळवारी) एक नवा इतिहास रचला आहे. ते माऊंट एव्हरेस्ट सर करणारं पहिलं भारतीय पोलीस दाम्पत्य ठरलं आहे.

महाराष्ट्र पोलिसात असलेल्या तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड यांनी सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं. दोघंही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.

राठोड दाम्पत्याने 23 मे रोजी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत सर केला. पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून माऊण्ट एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले भारतीय दाम्पत्य आणि पोलीस कर्मचारी जोडी बनली आहेत. या कामगिरीमुळे त्यांनी भारतासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

‘ऍडव्हेंचर कपल’ या नावाने प्रसिद्ध असणारे राठोड दाम्पत्य 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघं 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एकत्र एव्हरेस्ट शिखर गाठण्याचं त्यांचं स्वप्न होतं. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती.

या 30 वर्षीय जोडप्याने ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखरावरही त्यांनी यशस्वीपणे पाऊल ठेवलं असून स्काय डायव्हिंग सारख्या काही खेळातही ते सहभागी झाले आहेत. राठोड दाम्पत्याला साहसी खेळांची आवड आहे. सन 2015 मध्ये नेपाळ भूकंपामुळे अपूर्ण राहिलेले एव्हरेस्ट चढाईचे त्यांचे स्वप्न यावर्षी पूर्ण झाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील एका पोलिसाने एव्हरेस्ट सर केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या नव्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

Photos 07/06/2016

बियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी

Tuesday, June 7, 2016 -

नाशिक : बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय.

नाशिकच्या मखमलाबाद शिवारातील शेतीची मशागत करणारा हा आहे तरूण शेतकरी सचिन जगझाप. गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरड्या पडलेल्या जमिनीचा दाह थो़ड़याच दिवसांत पडणाऱ्या पावसाने कमी होईल. पुन्हा एकदा शेतीत भरघोस उत्पादन येईल असा विश्वास सर्वच शेतकरी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामांना गती आलीय. कुठे मशागत तर कुठे तण, कचरा निवडणी केली जातेय. तर काही ठिकाणी आहे त्या पिकांची काळजी घेण्यासाठी, वादळ वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

एकीकडे शेतकऱ्याची मान्सूनपूर्व तयारी सुरू असताना प्रशासनही तयारीत गुंतलंय. पावसाळ्याच्या दिवसांत दरवर्षी खत आणि बियाणांची साठेबाजी केली जाते. त्यावर अंकूष ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसलीय. साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

मागील वर्षापासून चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातली भीषण पाणी टंचाई जाणवतेय. त्यामुळे आता धुंवाधार पावसाची आवश्यकता आहे. बळीराजाची प्रतिक्षा आता लवकर संपावी आणि लवकरात लवकर वरूणराजा बरसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Photos 07/06/2016

अमेरिकेकडून अतिप्राचीन भारतीय वास्तूंचा ठेवा परत

Tuesday, June 7, 2016

वॉशिंग्टन : पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वित्झर्लंडमधून अमेरिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसला भेट दिली.
या भेटीत भारतातून तस्करी करून आणलेल्या 200 दुर्मिळ मूर्ती भारताला परत करण्यात आल्या. या मूर्तीला चेन्नईच्या शिलाँग मंदिरातून चोरण्यात आले होते.
या दुर्मिळ मूर्तींमध्ये ब्रांझच्या गणपती मूर्तींसोबतच जैन धर्मियांच्या बाहुबालीच्या मूर्तींचा समावेश आहे. यातील अनेक मूर्ती या दोन हजार वर्षे प्राचीन आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल अमेरिकन प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, ”काही या मूर्तींचे मूल्य पैशांच्या स्वरूपात मोजत असतील, मात्र आमच्यासाठी हा संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे.” या मूर्तींची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर भारताकडे त्याचे हस्तांतर होईल, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले.

Photos 07/06/2016

काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचा राजकारणातून संन्यास

07 जून : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेलं गुरूदास कामत यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे निवेदनच कामत यांनी प्रसिद्ध केलं आहे.

’10 दिवसांपूवच् मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं गुरुदास कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे.

गुरूदास कामत यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुरूदास कामत यांची राजकीय कारकीर्द

– 1984 – 2009 – सलग पाच वेळा लोकसभेवर

– 2009 – 2011 – केंद्रात मंत्रिपद

– 2014 – लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून पराभव

– 2014 ते 2016 – पक्षात फारसे सक्रिय दिसले नाहीत

– 2016 – राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय

Want your business to be the top-listed Business in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Nashik
422009