Rajeev Rajan Lad Trust
This Trust was formed in the fond memory of the twins Rajeev and Rajan Lad, after their untimely death in their twenties.
While working with Kushthrog Nivaran Samiti's old age home, Mrs. Meeratai Lad sincerely felt the need to start some activity for the physically dependent people barring the age. 'Rajeev Rajan Adhar Ghar' is situated on the land of Kushthrog Nivaran Samiti at the village Wakadi-Nere near Panvel, about 45kms from Mumbai. The persons admitted here are looked after through thick and thin and are
not
26/03/2025
जागतिक महिला दिन कार्यक्रम
दिनांक: १०.०३.२०२५ ठिकाण : राजीव रजन लाड ट्रस्ट खैरेवाडी
वेळ: ११ ते १
आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांचे पहिली माझी ओवी ग....हे गीत रूपाली ताई यांनी म्हणले. मा. विनय घोटगे सर मा. सुमेधा घोटगे मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन मा. डॉ .सुधाताई कोठारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपालीताई यांनी केले.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना रूपालीताई यांनी सांगितले.
ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ खेडच्या उपाध्यक्ष सुजाता ताई पिंगळे यांनी संघाची रचना संस्थेची माहिती व त्यांनी केलेल्या विविध कामांची माहिती सर्व महिलांना सांगितली.
कविताताई गलांडे यांनी संघ सेवा या विषयी महिलांना मार्गदर्शन केले.
प्रियांका ताई फडतरे यांनी बचत गट संकल्पना गट विभाग संघ याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
रोहिणी ताई चव्हाण यांनी उपस्थित महिलांना स्री जन्मावर आधारित मार्गदर्शन केले.
मा.कैलास सर यांनी व्यवसाय संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले.
मनीषाताई घोगरे जुन्नर समुपदेशन केंद्र समुपदेशक यांनी उपस्थित महिलांना समुपदेशन केंद्राची माहिती दिली.
खैरेवाडी च्या ग्रामपंचायत सदस्य रोहिणी ताई खैरे यांनी गटामध्ये येऊन काय फायदा होतो यावर अनुभव कथन व्यक्त केले.
जयश्रीताई काळोखे यांनी गटाचे महत्त्व व फायदे यावर अनुभव कथन केले.
माननीय गंगा ताई बुके यांनी महिलांना काय गरज आहे हे गरज शोधण्यासाठी मार्गदर्शन केले व प्रशिक्षण घेण्यासाठी कोण महिला तयार आहेत ते जाणून घेतले. व प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. सुंदरताई गोडसे यांनी प्रशिक्षणासाठी महिलांना बोलवण्याची जबाबदारी घेतली. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी प्रशिक्षण घेण्याचे ठरले. मार्च महिन्यात २२ तारीख ला हे प्रशिक्षण घेण्यात येईल. असे सर्वानुमते ठरले. मा विष्णू प्रभु देसाई सर यांनी कार्यक्रमासंदर्भात आपले मत व्यक्त केले. व यापुढे महिलांना कशाची गरज आहे यावर चर्चा केली
माननीय डॉक्टर सुधाताई यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे शब्दरूपी सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा व संघाच्या पदाधिकाऱ्यांचाही शब्दरूपी सन्मान करण्यात आला. रूपाली ताई यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर फीडबॅक सेशन झाले. त्यामध्ये सर्वांनी कार्यक्रमाविषयी आपापली मते मांडली. मा. सचिन भागवत सर व दीपा भागवत मॅडम यांचे आभार मानण्यात आले.
14/02/2025
To make the aadhar ghar self sustainable!!
14/02/2025
Aadhar Ghar receives plenty of water supply from the village canal with extreme efforts and support by the sarpanch Mr. Dipak Khaire. This will considerably reduce the water crisis in the village. Rajeev Rajan Lad Trust is truly indebted to Mr. Khaire and the entire Khairewadi village.
17/01/2025
राजीव-रजन लाड ट्रस्ट संचलित निरामय आधार घर वृद्धाश्रम
साहित्यिकाच्या नजरेतून साकारलेलं एक आगळं वेगळं संक्रमण
१४ जानेवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खैरेवाडी, कान्हूर मेसाई, ता. शिरुर येथील 'राजीव-रजन लाड ट्रस्ट' संचलित 'निरामय आधार घर' या वृद्धाश्रमास भेट देण्याचा योग आला.
मुंबई येथील 'मिराताई लाड' यांनी त्यांच्या मुला-मुलीच्या स्मरणार्थ सेवाभावाने तीन एकराच्या रानात स्थापलेल्या त्या ग्रामीण निसर्गरम्य स्वयंपूर्ण, सर्वसुविधायुक्त आश्रमास भेट देऊन कृतकृत्य झाल्याचा अनुभव मिळाला.
माझे मित्र सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आदरणीय 'श्री. सिद्धार्थ चव्हाण साहेब' यांच्या योगाने ही अपूर्व संधी मला मिळाली. धन्यवाद सर!
त्यांच्याच संपर्कातून रांजणगाव महागणपती येथील शिक्षण संस्थाचालक सन्मा. श्री. विकास शेळके व त्यांचे कुटुंबीय तसेच शिक्रापूर येथील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक सन्मा. श्री. कर्पे व त्यांचे कुटुंबीय, अध्यापिका सौ. स्मिता परदेशी व कुटुंबीय, तसेच 'चैतन्य महिला व बालविकास' या संस्थेच्या प्रतिनिधी मंगल काळे, सुजाता पिंगळे व निलोफर इनामदार तसेच सौ. चव्हाण व अन्य असे सुमारे पन्नास जणांनी या अपूर्व भेटीचा आनंदानुभव घेतला. यात वीस बालकांचा समावेश होता.
ही केवळ स्नेहभेट नव्हती, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांचं ते एक गेट टुगेदर असल्याची अनुभुती आली.
सुरुवातीला संस्थेचे संचालक 'श्री, विनय व सौ सुमेधाताई घोटगे' दाम्पत्यानं मान्यवरांचं प्रवेशद्वारावर स्मितवदनाने स्वागत केलं. तदनंतर चहापान करता ओळखी-पाळखी झाल्या. सणाचं औचित्य साधून परिसरात मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृक्षारोपण करण्यात आलं.
त्यानंतर एका छोटेखानी समारंभाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी प्रास्ताविकाद्वारे 'श्री. विष्णु प्रभुदेसाई' यांनी 'निरामय आधार घर' वृद्धाश्रमाच्या स्थापनेचा इतिसास, संकल्पना व कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.
आश्रमाचे व्यवस्थापक श्री. सचिन भागवत यांनी त्यांच्या कथनातून व्यसनमुक्ती विषयाला स्पर्श करीत मी दारुच्या व्यसनातून कसा सावरलो याचा आश्चर्यकारक अनुभव कथन केला. त्यानंतर आश्रमातील निवासी 'श्री. मधुकर खटखटे' काकांनी मी एवढ्या दूरवर का आणि कसा आलो सांगत आज आनंदी जीवन जगत असल्याची ग्वाही दिली.
मान्यवरांपैकी 'सौ. स्मिता परदेशी' यांनी 'हंबरुनी वासराले' गाण्याद्वारे चिंतन करीत उपस्थितांना शुभेच्छा प्रदान केल्या.
चैतन्य महिला व बालविकास संस्थेच्या प्रतिनिधी 'सौ. मंगल काळे' यांनी महिला सबलीकरण व उत्कर्षासाठी त्यांची संस्था करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला व भविष्यात आश्रम परिसरात बचत गटांच्या माध्यमातून विस्ताराचे आश्वासन दिले.
सेवानिवृत्त प्राचार्य विजय जोरी यांनी त्यांच्या 'आक्का, तस्मैश्री... तांबे बाई या कादंबऱ्या व अन्य साहित्यांबाबत आढावा घेत उपस्थितांना प्रती स्नेहभेट केल्या.
प्रमुख अतिथी श्री. सिद्धार्थ चव्हाण साहेबांनी मकर संक्रांतीचं महत्व विषद करीत त्या शुभदिनाच्या विशेष भेटीचं प्रयोजन सांगत सणासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
समारंभाच्या अखेरिला 'श्री विनय घोटगे' यांनी आभार प्रदर्शन करीत तिळगुळ देऊन समारंभाचा गोड शेवट केला.
समारंभपश्चात आश्रम पाहिला, वृद्धांशी संवाद साधला, आणि शेवटी सणानिमित्त अन्नपूर्णा ताईंनी बनवलेल्या गुळपोळीचा यथेच्छ आस्वाद घेतला.
खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा गोष्टींमध्ये दिवस कसा सरला ते कळलंच नाही. यानिमित्ताने छान संक्रमण झालं. निघताना मात्र भेट अपूर्ण राहिल्याची खंत वैखरीवर आलीच, तेव्हा 'पुन्हा या' म्हणत आश्रमवासियांनी भावपूर्ण निरोप दिला.
एक सांगायचं राहिलंच, हा केवळ वृद्धाश्रम नाही, तर जीवनाचा उत्तरकाळ निरामय, स्वछंदी आणि आनंदी करण्याचा निसर्ग सानिध्यात झाडा-झुडपांत शेत-रानात वसलेला हा खराखुरा वानप्रस्थाश्रम आहे. गरजूंपर्यंत ही माहिती जरुर पोहचवा आणि एकवार या आश्रमास जरुर भेट द्या.
प्रा. विजयकुमार तुकाराम जोरी
सेनि प्राचार्य, व्हीपीएस, लोणावळा, 976616768
लेखक... मर्मबंधातली ठेव आक्का (हृदयस्पर्शी कादंबरी) व तस्मैश्री... तांबे बाई (भावस्पर्शी कादंबरी)
07/02/2024
Late Mrs. Meeratai Sitaram Lad was a pioneer in starting the Rajeev Rajan Lad Trust, Kushtarog Nivaran Samiti and Aadhar Ghar at Shantivan, Panvel. She passed away on 29th January 2024 due to old age.
She will always be an inspiration to all of us and will remain with us through her work!
Please do join us as we perform her 12th day ceremony, ved pooja and upasana at Shantivan on 9th February 2024 at 11:30am.
With Warm Regards,
- Rajeev Rajan Aadhar Ghar, Kushtarog Nivaran Samiti, Shantivan, Nere, Panvel.
- Aadhar Ghar, Rajeev Rajan Lad Trust, Khairewadi, Pune.
26/10/2023
राजीव-रजन लाड ट्रस्ट व डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संशोधन केंद्र.
राजीव-रजन लाड ट्रस्ट, खैरेवाडी व डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संशोधन केंद्र यांनी दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी कै. शंकरराव बाजीराव डावखरे माध्यमिक विद्यालय हिवरे-पिंपळे येथे आरोग्य कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्प मध्ये 464 विद्यार्थी-विद्यार्थिनींचीआरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. यावेळी 30 वैद्यकीय अधिकारी व इतर सहाय्यक यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राजीव-रजन लाड ट्रस्टचे विश्वस्त, हितचिंतक, स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
20/08/2023
*शिक्रापूर येथील पिंपळे खालसा - हिवरे कुंभार या गावातील स्वातंत्र्य सेनानी कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय येथे "भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे" हे व्याख्यान संपन्न*
शनिवार दि.१९.८.२०२३ रोजी या विद्यालयात श्री. अविनाश हळबे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम "राजीव रजन लाड ट्रस्ट" तर्फे आयोजित करण्यात आला होता.
श्री. अविनाश हळबे यांनी या व्याख्यानात स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी देशातील संपूर्णपणे प्रतिकूल असलेली परिस्थिती कथन करून पुढील ७५ वर्षा मध्ये भारतीय संविधान, लोकशाही पद्धती, शासन, अन्नधान्य, साक्षरता व शिक्षण, शेती, दूध, अणुशक्ती विकास, महासंगणकाची निर्मिती, वैद्यकीय सेवा यामध्ये भारताने केलेल्या प्रगतीचा देदीप्यमान इतिहास मांडला.
याबरोबरच अमेरीकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी विरोध, असहकार आणि अडवणूक केली असूनही अण्वस्त्र निर्मिती, अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये जगाच्या तोडीस तोड केलेली प्रगती विशद केली.
आज भारत जगातल्या 193 देशांमध्ये सर्व क्षेत्रात पहिल्या पाच क्रमांकात पोहोचला असून सन 2047 मध्ये भारत जगात प्रथम क्रमांका पोहोचेल हे स्वामी विवेकानंदांचे भाकित सत्यात उतरेल हा विश्वासही व्यक्त केला.
10/04/2022
राजीव - रजन लाड ट्रस्ट संचालित निरामय आधारघर खैरेवाडी, शिक्रापूर, पुणे-नगर रोड येथे २३-मार्च-२०२२ रोजी बायोगॅस निर्मितीचे एक सयंत्र बसविण्यात आले, पुणे येथील बेकऑफ ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक सह्हायातून चक्राकार लाईफ सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, महर्षीनगर पुणे ह्या संस्थेमार्फत सदर सयंत्र बसविण्याचे काम करण्यात आले. हे सयंत्र बसविण्यासाठी ५ फूट X १० फूट एवढी जागा वापरण्यात आली आहे. ह्या सयंत्रातून १० किलो ओला कचरा वापरला जाऊ शकतो. ह्या संयंत्राद्वारे मिळणारा जैविक गॅस/वायू भोजनगृहासाठी वापरण्यात येईल, त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल तसेच LPG गॅसचा वापर कमी होईल व खर्चात बचत होईल. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.
02/04/2022
निरामय आधारघर, राजीव - रजन लाड ट्रस्ट, मु. पो. खैरेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे. यांच्या सौजन्याने, दर गुरुवारी सकाळी ११.०० ते १२:३० या वेळेत अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस या संस्थेतर्फे मीटिंग आयोजित केली जाते.
दारू हे एक व्यसन नसून तो एक आजार आहे असा विचार संघटना मानते.
ज्यांना दारूचे व्यसन सोडण्याची मनापासून इच्छा आहे त्यांच्यासाठी काम करणारी, अल्कोहोलिक ॲनॉनिमस ही जागतिक स्तरावर काम करणारी संघटना/संस्था आहे.
ही संस्था कोणतीही आर्थिक वर्गणी आकारत नाही. संघटनेचे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे प्रत्येक मद्यपी दारूपासून पूर्णपणे मुक्त झाला पाहिजे.
27/03/2022
कै. श्री सिताराम लाड व त्यांच्या पत्नी सौ. मीराताई लाड ह्या दांपत्याने त्यांच्या जुळ्या मुलांच्या स्मरणार्थ १९८४ साली ‘राजीव-रजन लाड ट्रस्ट’ची स्थापना केली. ह्या ट्रस्टच्या अंतर्गत १९९६ साली मुंबईपासून ४५ किमी. अंतरावर पनवेलजवळ ‘नेरे’ ह्या गावी ‘राजीव-रजन आधारघर’ हा प्रकल्प सुरु करण्यात आला. समाजातील मध्यमवर्गीय, गरजू, विकलांग लोकांसाठी येथे सेवा देण्यात येते. नेरे येथे आजमितीस ५५ ते ६० निवासी ह्या सेवेचा लाभ घेत आहेत.
ह्याच ट्रस्टतर्फे पुण्याजवळ, पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर गावाजवळील ‘खैरेवाडी’ ह्या खेड्यामध्ये ‘निरामय आधारघर’ हा प्रकल्प २०१३ साली सुरु करण्यात आला. तेथे सध्या १२ निवासी राहत आहेत.
ह्या सर्व विकलांग निवासींची त्यांच्या आयुष्य-अखेरीपर्यंत काळजी घेतली जाते.
खैरेवाडीच्या जवळपास असणाऱ्या ४ ते ५ खेड्यांमध्ये दर शनिवारी वैद्यकीय सेवा पुरविली जाते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Mumbai