Studio 77

Studio 77

Share

It's a team of photographers who primarily does candid Wedding, baby shots, fashion and glamour photo shoot

Candid Wedding Photography ~ Pre Wedding Shoots ~ Candid Wedding Videography ~ Event ~ Potraits ...

Photos from Studio 77's post 19/08/2024

फोटोग्राफी हा विषय खोल आहे ...

सर्वसाधारण पणे आपण पाहतो कि हल्ली सोशियल मीडिया हा आपल्या रोजच्या जगण्यातला अन्न वस्त्र निवारा ह्या नंतर अती गरजेचा विषय झाला आहे, म्हणजे बघा एकवेळेस जेवण नसेल तरी चालेल पण मोबाईल आणि पीसी ला नेट हवं का तर सोशियल मीडिया ....

हल्ली कोणताही सोशियल मीडिया बघा तिथे सगळ्यात पाहिलं तुम्हाला दिसतील ते फोटोस, फोटोस शिवाय सोशियल मीडिया म्हणजे आत्म्या शिवाय शरीर ...

म्हणून फोटोग्राफी हि फक्त कलेपुर्ती मर्यादित राहिलेली नाही तर फोटोग्राफी मध्ये करियर म्हणून बऱ्याच संधी दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत, साधं हॉटेल्स मधल्या जेवणाच्या फूड फोटोग्राफी पासून, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील प्रोडक्ट फोटोग्राफी, लग्न व तत्सम समारंभ ह्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी विविध संधी उपलब्ध आहेत, मोठमोठया कंपन्यांचे वेब प्रोफाईल्स साठी लागणारे फोटोस, कपड्यांच्या जाहिरातींसाठी लागणारे फोटोस, सिनेमा कक्षेत्रातील फोटोग्राफी, गव्हर्मेंट सेक्टर मध्येसुद्धा बऱ्याच ठिकाणी फोटोग्राफीसाठी संधी आहेत, मोठमोठ्या कंपन्यांचे इव्हेंट्स म्हणा अश्या कित्येक संधी आणि त्या संधी मधून बरेच करियर ओरियंटेड जॉब्स आणि व्यवसाय सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध होत आहे ते आपण सगळ्यांनी ज्यांना आवड आहे त्यांनी आत्मसात करायला हवं आणि ह्याकडे करियर म्हणून पाहणं जमायला हवं पण म्हणजे तो करतो म्हणून मी पण त्यात उडी मारतो आणि काही वर्ष्यांनी घेतलेलं साहित्य भंगार मध्ये काढतो हे असं होता कामा नये...

हे खुप छान, मान सन्मान मिळवून देणारं आणि सफेद कॉलर क्षेत्र आहे पण मेहेनतही तितकीच आहे, कधी कधी तर असं होतं कि घरचे सण सणवार म्हणा किंव्हा फॅमिलीला वेळ देणं बाजूलाच राहिलं पण उपाशीपोटी सुद्धा काम करणारे लोक मी पहिले आहेत...

ह्या क्षेत्रात फेम आहे पण फेम चा गेम वेळेवर समजला पाहिजे...

हे सगळं चांगलं आसुन सुद्धा फोटोग्राफीला हा एक व्यवसाय आहे म्हणून शासन दरबारी किंव्हा इतर ठिकाणी ओळख मिळालेली नाही हि खंत आहे, तुम्ही कोणताही फॉर्म भरायला जा त्या फॉर्म मध्ये फोटोग्राफी हा ऑपश्न कधीच मिळत नाही किंव्हा बँक सुद्धा फोटोग्राफर्स ना कामासाठी कर्ज देताना तुमचा व्यवसाय हा आम्ही व्यवसाय म्हणून ग्राह्य धरत नाही असं सरळ सरळ सांगतात, कमाल आहे ना म्हणजे बँक सुद्दा एखादं गृह कर्ज कुणाला द्यायचं असेल तर व्यावसायिक फोटोग्राफर्स ला अपॉईंट करून त्यांच्याकरवी त्या प्रॉपर्टीचे फोटो काढून घेतात पण त्यांच्याच व्यसवसायाला व्यावसाय म्हणून उल्लेख करताना ह्यांचं ज्ञान कुठे पाणी पितं देव जाणे ...

असो तर आज हे एवढं सगळं लिहिण्याचा प्रपंच म्हणजे आज जागतिक फोटोग्राफी दिन आहे, काहींसाठी हा नॉर्मल एक दिवस असु शकतो पण जी मंडळी ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाचा दिवस आहे

आपल्या सगळ्यांना " जागतिक फोटोग्राफी दिनाच्या " खुप खुप शुभेच्छा ...

05/08/2024

गेली जवळ जवळ २० ते २२ वर्ष झाली लग्न किंव्हा तत्सम इव्हेंट्स शूट करतोय, कित्येक वेगवेगळ्या पद्धतींचे सोहळे, रीती, रूढी, परंपरा, चाली रीती फार फार जवळून अनुभवायला मिळाल्या, सुरुवातीच्या काळात जेंव्हा फोटोग्राफी करायला सुरुवात केली तेंव्हा अश्या इव्हेंट्स मध्ये फारसा रस वाटंत न्हवता कारण फेम न्हवतं पण मग फेम आणि पैसा ह्यांचं गणित घालता येत नाही कधी कधी, ह्या उपर कलाकार म्हणून तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत न्हवता मग हळू हळू इकडे वाळलो आणि ह्यात काय मज्जा आणि सुख आहे ते आपसूकच उमगायला लागलं, असे सोहळे शूट करताना घाई हा आमच्या राशीला पुजलेला शनीच जणू पण मग अश्या वेळेस आपलं कौशल्य आणि अनुभव ह्याच्या जोरावर बऱ्याचदा बॅटिंग करावी लागते आणि त्यातून मग असे काही शॉट्स आपल्या हातून लागतात कि ते पाहतच रहावे, मला वैयक्तिक कृष्णधवल ( ब्लॅक अँड व्हाईट ) फोटोस काढायला आणि पाहायला खूप आवडतात, अर्थात ह्यसाठी लाईट्स चं गणित उत्तम जमायला हवं, मी कृष्णधवल ( ब्लॅक अँड व्हाईट ) फोटोस पोस्ट करण्याची एक सिरीज सुरु करतोय, फ्रिक्वेन्सी किती असेल हे सांगता येत नाही पण जसा वेळ मिळेल तसं पोस्ट करत जाईन, आज दिवसही चांगला आहे म्हणून सुरुवात करूया म्हणतोय, सोबत एक फोटो जोडतोय कसा वाटला नक्की सांगा.

टीप : फोटो फुल्ल स्क्रीन करून पाहा.

Photos from Studio 77's post 06/03/2022

Wanted to be your special forever .... ❤️

In frame : ❤️

Shoot on : D750 with 24-70mm

Photos from Studio 77's post 10/11/2021

Romance is the glamour which turns the dust of everyday life into a golden haze ....

Prewedding Photo Shoot
Chinamy ❤ Akaknsha

Artist : Santosh Narvekar
Book Now +91 9664212412
Email id : [email protected]
©Copyright are reserved.
Studio 77
Follow Us page
https://www.facebook.com/Studio77nx

Follow Us Instagram
https://www.instagram.com/studio77mumbai/

31/10/2021

Support each other to grow together ..

must watch this ...

07/07/2021

Window ... ❤️

shoot By Santosh Narvekar For Studio 77

Thanks To Yogesh Gawade

Shashikant Narvekar Rakesh Kharat

Photoartist भाई Talk with Narvekar Brothers & Sachin Bhor in Hindi हिंदी 28/06/2021

मित्रांनो आम्हा नार्वेकर बंधूंचा आपल्याला सविनय नमस्कार,

आम्ही तिघे आणि स्टोरी ऑफ स्टुडिओ ७७ ( प्रि - वेडिंग फोटोज व माहिती )

आम्ही नेहमीच इथे असलेल्या कलाकार मित्रांची कामं बघून- बघून,अनुभवातून शिकत समजत आलो आहोत आणि त्याचा उपयोग करून आमची कला - काम उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अश्यातच आम्हाला आमची कला - आमचं काम तुमच्या समोर मांडण्याची एक संधी फोटोआरटीओ स्कूल ऑफ फोटोग्राफी ह्यांच्या माध्यमातून मिळत आहे त्यासाठी आम्ही सचिन भोर सरांचे आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो ३० जून २०२१ ह्या तारखेला सायंकाळी ठीक ६ वाजता खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून आमच्या सोबत या, धन्यवाद.

Thanks Sachin Bhor sir, Mahesh Subhash Bhor sir And PHOTOARTiO - School of Photography Art

Photoartist भाई Talk with Narvekar Brothers & Sachin Bhor in Hindi हिंदी We are really happy to share with you all an inspirational story & work of Photoartist Brothers from Bhandup, Mumbai in BHAI Talk where Sachin Bhor is going ...

05/06/2021

शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलीकडले ...

Wedding Treasure Siddhesh ❤ Mayuri

Film By Santosh Narvekar
Shoot & Edit By : Sushant

**a

Want your business to be the top-listed Event Planning Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sn. Santosh77@gmail. Com
Mumbai
400078

Opening Hours

Monday 9am - 9:30pm
Tuesday 9am - 9:40pm
Wednesday 9am - 9:39pm
Thursday 9am - 9:30pm
Friday 9am - 9:30pm
Saturday 9am - 9:30pm
Sunday 9am - 9:30pm