Bookshelf

Bookshelf

Share

Reading is truly amazing and as a book lover nothing pleases you more than a great book! Watch Bookshelf channel on Youtube to know what to read next.

Watch interesting book reviews, trivia & stories around the books and much more!!

23/04/2021

BOOKSHELF SEASON 3 - Coming Soon
तुम्हा सर्व वाचक-प्रेक्षकांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!
आज 'बुकशेल्फ'चा चौथा वर्धापनदिन. तुम्ही आतापर्यंत आमच्या पुस्तकविषयक प्रयत्नांना जो पाठिंबा दर्शवला, तो यापुढेदेखील कायम ठेवावा!
आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 'बुकशेल्फ'चे पर्व तिसरे!
यंदाच्या पावसाळ्यात!
STAY TUNED!
- टीम बुकशेल्फ

04/12/2020

यंदाच्या 'थिंक पॉझिटीव्ह'च्या दिवाळी अंकामध्ये 'राग' या मुलभूत भावनेचे पदर उलगडून दाखवण्यात आले आहेत. मोठ्या व्यक्ती असोत किंवा लहान मुले; त्यांना येणारा राग, त्यामागील कारण, रागाचे व्यवस्थापन याबाबत अभ्यासकांनी लिहिलेले लेख अंकात आहेत. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची विशेष मुलाखत तर विविध कलाकारांसोबत रागाविषयी साधलेला संवाद, चित्रपटातील-सोशल मीडियावरील राग आणि राग कसा हाताळायचा याबाबतचे लेखन, यामुळे 'थिंक पॉझिटीव्ह'चा दिवाळी अंक विशेष झाला आहे. 'बुकशेल्फ'ने या अंकाची करुन दिलेली ही दोन मिनिटांची ओळख!.
#दिवाळी #दिवाळी_अंक #थिंक_पॉझिटीव्ह #बुकशेल्फ

25/11/2020

यंदाच्या 'मीडिया वॉच' या दिवाळी अंकात 'मनोरंजनाच्या बदलत्या दुनियेचे अंतरंग' आणि 'मी आणि माझं एकटेपण' हे दोन कालसुसंगत विषय मांडले आहेत. सुरेश द्वादशीवार, प्रवीण बर्दापूरकर, मिथिला सुभाष, अरविंद पाटकर, अरुणा सबाने, श्याम मानव, मंगेश सपकाळ, संजय आवटे, मुक्ता चैतन्य अशा मान्यवरांनी लेखन असलेला हा वाचनीय अंक घरपोच मिळू शकतो. (संपर्क क्रमांक व्हिडीओच्या अखेरीस!)
या दिवाळी अंकाची 'बुकशेल्फ'ने सादर केलेली ही दोन मिनिटांची झलक!
#बुकशेल्फ #दिवाळी #दिवाळी_अंक #मीडिया_वॉच
Avinash Dudhe

19/11/2020

'आंतरभारती' मासिकाचा यंदाचा दिवाळी अंक 'सेक्युलॅरिझम' या महत्त्वाच्या विषयावर आधारलेला आहे. तब्बल 40 विचारवंत, लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मविचार, इस्लाम आणि सेक्युलॅरिझम, बुद्धीझम आणि सेक्युलॅरिझम, उर्दू शायरीतील देव देवता अशा विविध विषयांच्या आधारे 'सेक्युलॅरिझम'ची केलेली चिकित्सा वाचनीय व उद्बोधक आहे. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित केलेल्या या अंकाचे अंतरंग 'बुकशेल्फ'ने सादर केलेल्या या 2 मिनिटांच्या व्हिडीओतून जाणून घ्या.
#बुकशेल्फ #दिवाळी #दिवाळी_अंक #आंतरभारती

17/11/2020

'जगण्यातली सकारात्मकता' हा विषय घेऊन 'मनोकल्प'चा दिवाळी अंक बाजारात दाखल झाला आहे. सकारात्मक दृष्टीकोन देणाऱ्या मुलाखती, समाजचित्रणात्मक कथा, विविध विषयांचे विश्लेषण करणारे अभ्यासपूर्ण लेख अशा साहित्याने नटलेला हा अंक मूळातूनच वाचनीय झाला आहे. या अंकाचा 'बुकशेल्फ'ने सादर केलेला हा दोन मिनिटांचा परिचय.
- टीम बुकशेल्फ

12/11/2020

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी संपादित 'संवादसेतू' या दिवाळी अंकाचं यंदाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यातील 'एकांताचे शोधपर्व' हा खास विभाग. त्यामधून कवी गुलजार, महेश एलकुंचवार, प्रभाकर कोलते, मेधा पाटकर, सानिया अशसी मान्यवर मंडळी वाचकांना भेटणार आहेत. महत्त्वपूर्ण आणि रोचक अशा विषय-कथा अणि लेखांनी सजलेल्या या वैविध्यपूर्ण अंकाची 'बुकशेल्फ'ने सादर केलेली दोन मिनिटांची धावती झलक जरुर पाहा.
#बुकशेल्फ #दिवाळी #दिवाळी_अंक #संवादसेतू

10/11/2020

इस्लामपूरवरून प्रकाशित होणारा 'प्रतिभा' हा दिवाळी अंक यावर्षी 'मला प्रभावित करून गेलेलं पुस्तक' या विषयाभोवती मांडला गेला आहे! उत्तम लेख, कथा, कविता आणि जोडीला अन्वर हुसेन यांची रेखाटने यांनी सजलेल्या या दिवाळी अंकाचं अंतरंग जाणून घ्या केवळ 2 मिनिटांत..
#बुकशेल्फ #दिवाळी #दिवाळी_अंक

08/11/2020

आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पुलंचा जन्मदिवस! त्यानिमित्त त्यांना 'टीम बुकशेल्फ'तर्फे विनम्र अभिवादन!
'बुकशेल्फ'ने पुलंच्या स्मृतिदिनी म्हणजे १२ जूनला 'विनोदापलीकडचे पुलं' हा व्हिडिओ सादर केला होता, त्याला तुम्हां सर्वांचा अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला! अशा प्रकारचा समग्र आढावा दुर्मीळ असल्याचं आणि त्या व्हिडिओतून काही नवीन गोष्टी समजल्याचं अनेकांनी आवर्जून कळवलं. तशा प्रतिक्रियांमुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला!!
पुलंच्या साहित्याविषयी वेगळ्या स्वरुपाचा आणखी एक व्हिडिओ त्यांच्या जन्मदिनानिमित्त 'बुकशेल्फ'वर सादर करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, पुलंच्या साहित्याचा आणि त्याअनुषंगाने या नव्या व्हिडिओचा आवाकादेखील मोठा असल्याने हे काम करायला आम्हांला आणखी वेळ लागणार आहे. 'जे करायचं ते उत्तमच' हा आमचा ध्यास असल्याने आम्ही सर्वार्थाने चांगला व्हिडिओ तयार करूनच तो यथावकाश सादर करू.
तोपर्यंत 'विनोदापलीकडचे पुलं' या व्हिडिओच्या पुनर्भेटीचा आनंद घ्यावा, ही विनंती!
- टीम बुकशेल्फ
#पुलदेशपांडे #पुलंचंसाहित्य

Want your business to be the top-listed Media Company in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Mumbai
400060