Best In Dombivli
Suppliment used and trusted by Dombivlikars for Classified advertisements of Businesses and Services
01/04/2023
पहिल्या ग्राहक भेटीला मिळालेल्या जोरदार प्रतिसादा नंतर आता 1 व 2 एप्रिल रोजी पुष्प दुसरे.आधीच्या पेक्षा वेगळे स्टॉल. नक्की भेट द्या व आपल्या लोकांचा उत्साह वाढवा.आपली रोजची घरातली खरेदी आपल्या लोकांच्या कडून करा.नक्की भेट द्या .डोंबिवलीत ज्या प्रकारे परप्रांतीय रस्त्यावर बसून आपली हक्काची जागा समजून व्यवसाय करतात त्याच प्रकारे हे आपले मराठी उद्योजक तर ठरवून दिलेल्या ठिकणी व इतर नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन व्यवसाय करणार आहेत. आता आपलं पण कर्तव्य आहे की आपण अशा ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्य करायला हवं. तर नक्की भेट द्या या दोन दिवसात व या आगळ्या वेगळ्या आठवडी बाजाराला सहकार्य करा.
14/03/2023
मराठी माणूस व्यवसायात कमी पडतो, मराठी माणूसच मराठी माणसाला मदत करत नाही वगैरे गोष्टी आता हळू हळू पुसल्या जात आहेत. डोंबिवलीतील लघु उद्योजकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला डोंबिवली ब्राम्हण उद्योजक बिझनेस ग्रुप ही या बदलाची नांदी आहे. हे सर्व उद्योजक सचोटीने व्यवसाय करतायत.
प्रामाणिकपणाच्या जोरावर आपला व्यवसाय उभा करतायत.
आता हे उद्योजक खास आपल्या सगळ्यांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी टिळक नगर विद्यामंदिर, टिळक नगर, डोंबिवली पूर्व येथे 'ग्राहक भेट' निमित्त भेटणार आहेत. डोंबिवली ब्राम्हण उद्योजक संस्था आयोजित या ग्राहक भेटी मध्ये सर्व मराठी उद्योजकांचा समावेश असणार आहे.
दैनंदिन वापराच्या वाण सामानापासून ते लग्नासाठी साडी अशी मनसोक्त शॉपिंग आपल्याला करता येईल. शिवाय शॉपिंग झाल्यावर खाऊचा स्टॉल सुद्धा आहेच.
दर १५ दिवसांनी आपल्यासाठी ही खरेदीची पर्वणी असणार आहे. तर लघु उद्योजकांना मदत म्हणून आणि आपली शॉपिंगची आवड साजरी करण्यासाठी भेटूया महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी टिळक नगर शाळेत.
१८ आणि १९ मार्चला ज्यांच्यासोबत खरेदीला जायचं आहे, त्यांना लगेच हा मेसेज फॉरवर्ड करा.
आपल्या आयुष्यात आपल्या जगण्याचं ध्येय नक्की समजल तर त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते आणि अंतिम ध्येयपूर्ती होतेच.
मग ते ध्येय व्यवसायाशी संबंधित असो अथवा वैयक्तिक जीवनाशी,
तसेच त्यासाठी कोणतीही वयाची अट नाही, फक्तं ध्येय ठरवणे गरजेचे आहे.
याचंच टेक्निक शिकण्यासाठी तसेच आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी, आपली स्वप्न आणि आपली ध्येय यातील नेमका फरक जाणून घेण्यासाठी चैतन्य फाऊंडेशन घेऊन येत आहे.
एक अनोखी कार्यशाळा Set Goal, Set Life
मर्यादित जागा असल्याने आजच आपल नाव नोंदवा आणि ध्येय पूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.
तारीख: २५ डिसेंबर २०२२
वेळ : सायं. ४ ते ६
प्रवेश फी : ₹५००/-
फक्त
Gpay no 9769121077
अधिक माहितीसाठी संपर्क 9819127777
https://forms.gle/htDXW2BRBAScxeeb9
21/11/2022
कुत्र्याचं पाळणा घर डोंबिवली मध्ये चालू झालं आहे.एका महिला उद्योजिकेने एक स्वप्न बघितलं आणि त्या साठी मेहनत घेऊन काम केलं.नक्की बघा त्यांचा हा प्रवास
Goshta Swapnanchi EP - 1 | Foot Prints | Meenal Godbole माझा मित्रपक्षशीर्षक वाचून पुलं च्या शत्रूपक्षाची आठवण झाली असेल ना रादर व्हायलाच हवी म्हणून हे शीर्षक (शेवटी आम...
04/11/2022
आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्येंत पोहोचावा असं कोणाला वाटत नाही ? प्रत्येक व्यावसायिकाला वाटतं. पण कसा पाहोचवता येईल याबद्दल माहिती नसते किंवा माहिती असली तरी पैशांअभावी ते करता येत नाही.
व्यावसायिकांच्या याच समस्येवर उपाय म्हणून चैतन्य फाऊंडेशन घेऊन येत आहे एक नवी कोरी युट्युब मालिका गोष्ट स्वप्नांची.
मुख्य प्रायोजक हॉटेल शिदोरी या मालिकेतील मुख्य पात्र असणार आहेत समाजातील सर्व स्तरातील व्यावसायिक. त्यांच्या मुलाखतीतून आपण स्वप्न प्रत्यक्षात कशी साकारली जातात हे अनुभवणार आहोत. नव्याने उभ्या राहत असलेल्या व्यावसायिकांसाठी मदतीचा हात पुढे करणे आणि अधिकाधिक लोकांना त्यांची ओळख करून देणे हा या मालिकेमागचा आमचा हेतू आहे. प्रत्त्येक शनिवारी आपण नवनव्या व्यावसायिकांना भेटणार आहोत. त्यांच्या स्वप्नांच्या तलावात आपण विहार करून येणार आहोत. यातून ओंजळभर प्रेरणा मिळाली तरी आयुष्यभर पुरेल इतकी असणार आहे.
यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला तुम्ही सबस्क्राईब करालच. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या मालिकेत सहभागी होण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. तुमच्या ओळखीतील जास्तीत जास्त व्यावसायिकांना ही पोस्ट फॉरवर्ड करा. या मालिकेसाठी सध्या कोणतही शुल्क नाही.
भेटूया.गोष्ट स्वप्नांची मध्ये. लवकरच!
BID YouTube Channel Link
https://www.youtube.com/channel/UCj05YxAUdXWCGn7r2TG7xJA
चैतन्य फाऊंडेशन
7045077752
8291996323
20/09/2022
ओंकार मित्रमंडळ ,सारस्वत कॉलनी आणि चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री निमित्त डोंबिवली मध्ये सारस्वत कॉलनी येथे आम्ही शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2022 ते रविवार दि.2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 एक मोठं प्रदर्शन आयोजित करत आहोत. ज्या संस्थेबरोबर आम्ही हे प्रदर्शन करणार आहोत त्यांचे 150 पेक्षा जास्त कार्यक्रते मदतीला असणार आहेत.डोंबिवली स्टेशन पासून मोठी होर्डिंग व संपूर्ण सारस्वत कॉलनी फडके रोड, पेंडसे नगर व ठाकुर्ली मध्ये प्रत्येक घरात याची जाहिरात जाणार आहे. पार्टिशन असलेले 2 मीटर बाय 2 मीटर चे स्टॉल असणार आहेत.24 तास 3 सिक्युरिटी गार्ड असणार आहेत. भरपूर लाईट व पंखे असणार आहेत.स्टॉल च्या आत ट्यूब असणार आहे. स्टॉल च भाडं 3 दिवसांना 4000.00 असणार आहे.
आजच डेट नक्की करून ठेवा.
एका प्रकारातील तीन स्टॉल असतील.एकूण स्टॉल 40
16/09/2022
ओंकार मित्रमंडळ ,सारस्वत कॉलनी आणि चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री निमित्त डोंबिवली मध्ये सारस्वत कॉलनी येथे आम्ही शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2022 ते रविवार दि.2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 एक मोठं प्रदर्शन आयोजित करत आहोत.ज्या संस्थे बरोबर आम्ही हे प्रदर्शन करणार आहोत त्यांचे 150 पेक्षा जास्त कार्यक्रते मदतीला असणार आहेत.डोंबिवली स्टेशन पासून मोठी होर्डिंग व संपूर्ण सारस्वत कॉलनी फडके रोड,पेंडसे नगर व ठाकुर्ली मध्ये प्रत्येक घरात याची जाहिरात जाणार आहे. पार्टिशन असलेले 2 मीटर बाय 2 मीटर चे स्टॉल असणार आहेत.24 तास 3 सिक्युरिटी गार्ड असणार आहेत. भरपूर लाईट व पंखे असणार आहेत.स्टॉल च्या आत ट्यूब असणार आहे. स्टॉल च भाडं 3 दिवसांना 4000.00 असणार आहे
आजच डेट नक्की करून ठेवा.
एका प्रकारातील तीन स्टॉल असतील.एकूण स्टॉल 40
14/09/2022
१५० मराठी उद्योजकांनी चालवलेला अखंड 'उद्योगयज्ञ'.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डोंबिवली ब्राह्मण उद्योजक समूहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 20-25 म्हणता म्हणता पंधरवड्यात एकदा होणाऱ्या संमेलनाला 70-80+ लोकं उपस्थित होऊ लागले. आपला व्यवसाय इतरांसमोर प्रदर्शित करू लागले (ह्यामध्ये घरगुती व्यवसायांपासून ते अगदी बांधकाम व्यवसायिक, हॉटेल व्यावसायिक सुद्धा आहेत). सगळ्यांचे सोंग आणता येते हो फक्त पैशाचे नाही, मध्यम-लघु उद्योजक मोठ्या संख्येने स्वयंप्रेरणेने सहभाग करू लागले कारण 'डोंबिवली ब्राह्मण उद्योजक' समूहामुळे त्यांना तेवढा फायदा व्यवसायात झाला.
ह्यासागळ्याची पुढची पायरी म्हणून, 'डोंबिवली ब्राह्मण उद्योजक' समूहाने नवरात्री आणि दसऱ्या निमित्ताने दिनांक १७-१८ सप्टेंबर ,२०२२ रोजी डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'सर्वेश हॉल' मध्ये प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला.
गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, दसरा दिवाळी निमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू, live food stalls (ते कोणासाठी खास आकर्षण आहेत हे सांगायची गरज नाही) , सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रदर्शनाचे वैविध्य हे इथे असलेल्या स्टॉल्स मध्ये आहे कारण बाकी स्टॉल्स व्यतिरिक्त वैयक्तिक सेवा (Driving trainer, Insurance, Port Folio Manager, Life Coach) ह्या बरोबरच जर तुमचा स्वतः चा व्यवसाय असेल तर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांपासून ते त्याची जाहिरात करणाऱ्या व्यवसायिकांचे स्टॉल्स ह्या प्रदर्शनात आहेत. म्हणून तर मी शिर्षकच दिलय
१५०+ उद्योजकांचा अखंड उद्योगयज्ञ.
चला तर मग, नक्की भेटूया
१७-१८ सप्टेंबर, २०२२
स्थळ :- सर्वेश हॉल, डोंबिवली पूर्व.
तिथे आपल्या मदती साठी, अधिक माहिती साठी डोंबिवली ब्राह्मण उद्योजक असतीलच.
नक्की या.
वाट बघतोय.
डोंबिवली ब्राह्मण उद्योजक.
08/09/2022
🔸 डोंबिवली ब्राह्मण उद्योजक 🔸
आयोजीत
खास दसरा व येणाऱ्या दीपावली च्या निमित्ताने खास प्रदर्शन व ग्राहकपेठ
शेवटचे फक्त 9 स्टॉल शिल्लक
🔸तारीख- शनिवार दि.17 सप्टेंबर ला सायंकाळी 5 ते रात्री 9
व
रविवार दि.18 सप्टेंबर ला सकाळी 10 ते रात्री 9
🔸ठिकाण- सर्वेश हॉल ,डोंबिवली पूर्व
🔸 stall रेंट ₹2800
🔸 Gpay no
सौ.निवेदिता जांभेकर
+91 90043 50836
🔸 सूचना व नियम
1) अर्धे पैसे भरल्या शिवाय स्टॉल नक्की होणार नाही
2) उर्वरित रक्कम प्रदर्शनाच्या आधी 5 दिवस भरावी
3) पेमेंट केल्या नंतर कृपया रिसीट वर उल्लेख असलेल्या कुठल्याही नंबर वर व्हाट्स अप करा
4) प्रत्येक टेबल ला टेबल कव्हर असेल
5) प्रत्येक स्टॉल ला वारा लागेल अशी फॅन ची सुविधा असेल
6) प्रदर्शनाची जाहिरात म्हणून 5 फूट बाय 3 फुटांचे 20 फ्लेक्स डोंबिवली पूर्व व पश्चिम येथे लावण्यात येतील तसेच
7) 10 हजार पांप्लेट चे पेपर मधून वाटप करण्यात येईल
8) एकदा बुक केलेला स्टॉल काही मोठं कारण असेल तरच रद्द केला जाईल
9) प्रत्येक स्टॉल धारकाला त्याची जाहिरात करून देण्यात येईल.
10) ज्यांना स्टॉल घेयचा आहे त्यांनी लवकर बुकिंग करा मग व्हाट्स अप गृप मध्ये घेतलं जाईल
11) आपल्या गृप मधील जास्तीत जास्त उद्योजकांनी प्रदर्शनात भाग घ्या . आपल्या बिझिनेस ची जाहिरात करायची संधी सोडू नका
संपर्क -
सौ.निवेदिता जांभेकर
+91 90043 50836
सौ.पल्लवी गोखले
+919167377057
सौ.दीप्ती भिडे
+91 98198 19726
02/09/2022
ब्राह्मण उद्योजक डोंबिवली आयोजित खास येणारा नवरात्री उत्सव व दसरा या निमित्ताने आयोजित ग्राहकपेठ. भरपूर जाहिरात आणि त्या मुळे येणार भरपूर ग्राहक हेच खास आकर्षण. लकी ड्रॉ, करावके म्युझिक ही अजून काही आकर्षण. दसरा त्या नंतर येणारी दिवाळी या मोठ्या सणांच्या आधी नवीन ग्राहक आपल्या बिझिनेस साठी मिळवा आणि आपला व्यवसाय वाढवा. हे प्रदर्शन एक 150 उद्योजकानचा गृप आयोजित करतोय त्या मुळे गर्दी तर नक्की होणार आहेच.आज पर्यँत 40 स्टॉल बुक झाले आहेत. शेवटचे 20 स्टॉल शिल्लक आपण तर नक्की सहभागी व्हा आणि आपल्या ओळखीत सुद्धा जे उद्योजक स्टॉल लावतात त्यांच्या पर्यन्त याची माहिती पोचवा.
स्टॉल भाडे फक्त 2800.00 (L शेप स्टॉल)
अधिक माहिती साठी संपर्क जाहिराती मध्ये आहेच.
20/08/2022
🔸 *डोंबिवली ब्राह्मण उद्योजक* 🔸
आयोजीत
*खास दसरा व येणाऱ्या दीपावली च्या निमित्ताने खास प्रदर्शन व ग्राहकपेठ*
🔸तारीख- शनिवार दि.17 सप्टेंबर ला सायंकाळी 5 ते रात्री 9
व
रविवार दि.18 सप्टेंबर ला सकाळी 10 ते रात्री 9
🔸ठिकाण- सर्वेश हॉल ,डोंबिवली पूर्व
🔸स्टॉल रेंट ₹2800.00
🔸 *Gpay no*
सौ.निवेदिता जांभेकर
+91 90043 50836
🔸 *सूचना व नियम*
1) अर्धे पैसे भरल्या शिवाय स्टॉल नक्की होणार नाही
2) उर्वरित रक्कम प्रदर्शनाच्या आधी 5 दिवस भरावी
3) पेमेंट केल्या नंतर कृपया रिसीट वर उल्लेख असलेल्या कुठल्याही नंबर वर व्हाट्स अप करा
4) प्रत्येक टेबल ला टेबल कव्हर असेल
5) प्रत्येक स्टॉल ला वारा लागेल अशी फॅन ची सुविधा असेल
6) प्रदर्शनाची जाहिरात म्हणून 5 फूट बाय 3 फुटांचे 20 फ्लेक्स डोंबिवली पूर्व व पश्चिम येथे लावण्यात येतील तसेच
7) 10 हजार पांप्लेट चे पेपर मधून वाटप करण्यात येईल
😎 एकदा बुक केलेला स्टॉल काही मोठं कारण असेल तरच रद्द केला जाईल
9) प्रत्येक स्टॉल धारकाला त्याची जाहिरात करून देण्यात येईल.
10) ज्यांना स्टॉल घेयचा आहे त्यांनी लवकर बुकिंग करा मग व्हाट्स अप गृप मध्ये घेतलं जाईल
11) आपल्या गृप मधील जास्तीत जास्त उद्योजकांनी प्रदर्शनात भाग घ्या . आपल्या बिझिनेस ची जाहिरात करायची संधी सोडू नका
संपर्क -
सौ.निवेदिता जांभेकर
+91 90043 50836
सौ.पल्लवी गोखले
+919167377057
सौ.दीप्ती भिडे
+91 98198 19726
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Mumbai
421201