Ajit Patil

Ajit Patil

Share

शिवसेना जिल्हा उप-प्रमुख

Photos from Ajit Patil 's post 09/03/2026

जिद्द, मेहनत आणि देशासाठी खेळण्याची भावना असेल तर विजय अटळ असतो… आणि आज पुन्हा एकदा ते सिद्ध झाले! 🇮🇳🏆

भारतीय संघाने अप्रतिम खेळ, एकजूट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

प्रत्येक खेळाडूने दिलेला संघर्ष, प्रत्येक क्षणातील थरार आणि शेवटी तिरंग्याचा अभिमानाने फडकणारा क्षण… हे दृश्य प्रत्येक भारतीयासाठी अविस्मरणीय आहे.

ही फक्त एक ट्रॉफी नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा विजय आहे.
मनापासून अभिनंदन टीम इंडिया!

भारताचा तिरंगा पुन्हा एकदा जगाच्या शिखरावर! 🇮🇳🔥

"Proud moment for every Indian.”

08/03/2026

स्त्री ही शक्ती, संस्कार आणि प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. घर, समाज आणि राष्ट्र घडविण्यात महिलांचे योगदान अनमोल आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या कर्तृत्वाला, त्यागाला आणि सामर्थ्याला मानाचा मुजरा..!

#महिलादिन

Photos from Ajit Patil 's post 03/03/2026

शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी मा. अरुण जाधव यांची निवड करण्यात आली.

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.प्रकाश आबिटकर साहेब, खासदार श्री.धैर्यशील माने, माजी खासदार श्री.संजय दादा मंडलिक, आमदार श्री.चंद्रदीप नरके साहेब, आमदार श्री.राजेंद्र यड्रावकर, के.डी.सी.सी बँकेचे संचालक श्री. अर्जुन आबिटकर सर, जिल्हाप्रमुख श्री.रवींद्र माने, जिल्हाप्रमुख श्री.विजय बलुगडे, तसेच शिवसेनेचे सर्व नूतन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

तसेच सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे सर्व नव निर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी हे नेतृत्व निश्चितच नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

03/03/2026

धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

या पावन दिवशी सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि प्रगतीचे रंग भरले जावोत.
समाजात सौहार्द आणि ऐक्य वृद्धिंगत होवो, हीच सदिच्छा..!

27/02/2026

“मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा, परंपरेचा वारसा आणि स्वाभिमानाची ओळख आहे.
ज्ञान, साहित्य आणि विचारांच्या माध्यमातून समाज घडवणाऱ्या या समृद्ध भाषेला मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आपली भाषा, आपला अभिमान,
मराठीचा गौरव सदैव उंच राहो!”

19/02/2026

शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. जालंदर पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भोगावती खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आणि प्रखरपणे लढणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला, संघर्ष केला आणि अनेक प्रश्न मार्गी लावले ही त्यांची जिद्द आणि बांधिलकी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श आहे.

मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आज ते संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठामपणे लढत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

पुन्हा एकदा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

Photos from Ajit Patil 's post 19/02/2026

आज मतदारसंघातील काही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.प्रकाश अबिटकर साहेब यांची भेट घेतली. विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून काम आटोपल्यानंतर काही क्षण निवांत संवाद साधण्याची संधी मिळाली.

दोन दिवसांपूर्वी गडचिरोली दौऱ्यावरून परत आल्याचे सांगताना साहेबांनी तेथील अनुभव अतिशय भावनिक शब्दांत मांडले. विशेषतः डॉक्टर आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला दिलेली भेट, तसेच संपूर्ण जंगल परिसराने वेढलेला गडचिरोली जिल्हा हे सर्व पाहताना मिळालेला वेगळाच अनुभव त्यांनी आवर्जून सांगितला. दुर्गम भागातही आरोग्यसेवा आणि मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या कार्याबद्दल त्यांनी विशेष उल्लेख केला.

त्या दौऱ्यातील काही क्षण, तेथील परिस्थिती आणि लोकांशी साधलेला संवाद याविषयी बोलताना त्यांच्या शब्दांतून संवेदनशीलता आणि बांधिलकी स्पष्ट जाणवत होती. अशा भेटी केवळ औपचारिक नसतात, तर जनतेशी आणि सेवाभावाशी असलेल्या नात्याची जाणीव करून देणाऱ्या असतात, हे पुन्हा एकदा जाणवलं.

19/02/2026

आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचे चिरंजीव युवा नेते मा.देवराज नरके यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..!

"देवराज तुझ्या कार्याला यश, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा."

18/02/2026

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे, न्यायप्रिय व दूरदृष्टीचे नेतृत्व देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर जनतेच्या कल्याणासाठी झटणारे आदर्श शासक होते. त्यांच्या शौर्य, नीती आणि स्वाभिमानातून आजही प्रेरणा मिळते.

Photos from Ajit Patil 's post 17/02/2026

कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, कुंभी कासारी परिसराचे भाग्यविधाते आदरणीय स्वर्गीय डी. सी. नरके (अण्णा) यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त कुंभी कासारी सहकारी कारखाना परिसरात अण्णांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे कारखाना हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले होते. तसेच शेतकरी सांस्कृतिक भवन येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून अण्णांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रदीप नरके साहेब, मा.अजित नरके साहेब तसेच कुंभी समूहातील सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व स्वर्गीय अण्णांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15/02/2026

महाशिवरात्रीच्या पावन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

09/02/2026

“महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Kolhapur
Kolhapur