Abhay Tendulkar

Abhay Tendulkar

Share

Social Worker | Vice President Kolhapur Youth Foundation, Kolhapur |
भाजपा शक्ति

01/04/2026

आज (चैत्र पौर्णिमा - १ एप्रिल) श्री जोतिबा देवाची यात्रा...

आज चैत्र पौर्णिमा... असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस... पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील डोंगर श्री जोतिबाच्या वास्तव्याने पुनित झाला आहे. जोतिबा हे बद्रिकेदाराचेच रूप आहे. वास्तविक, जोतिबा यात्रेचा मुख्य हेतू म्हणजे, देवी यमाई (रेणुका) आणि महर्षी जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा आनंद सोहळा... या यात्रेसाठी लाखो भाविक जोतिबा डोंगर येथे येतात.

आजच्या मुख्य दिवशी पहाटे श्री जोतिबा देवास शासकीय महाअभिषेक होतो. सकाळी देवाची षोडशोपचार पूजा केली जाते. दुपारी दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेस प्रारंभ होतो. सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आरती होऊन देवाची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते. सातच्या सुमारास यमाई मंदिरासमोर सदरेवर ही पालखी विराजमान होते. यानंतर जगदग्नीचे स्वरूप-कट्यारीसोबत श्री यमाईदेवीचा विवाह सोहळा होतो. यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणेनंतर पालखी सदरेवर विराजमान होते.

भक्तवत्सल श्री जोतिबा देवास भक्तिपूर्वक प्रणाम...
जोतिबाच्या नावानं चांगभलं... भाविकांचे हार्दिक स्वागत...

#श्रीजोतिबा #श्रीकेदारनाथ #श्रीयमाई #चैत्रयात्रा

31/03/2026

*आज भगवान महावीर जयंती...*

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील कुंडलपूरच्या राजघराण्यात इ. स. पूर्व ५९९ साली झाला, असे जैन धर्मीय मानतात. भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली.

भगवान महावीर यांचा जन्म अशा काळात झाला, जेव्हा हिंसाचार, पशुबळी, जातीय भेदभाव शिगेला पोहोचला होता. यातूनच त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सांसारिक मोह आणि राजवैभवाचा त्याग केला होता. १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, असेही मानले जाते. भगवान महावीरांनी मानवाच्या उन्नतीसाठी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्त्वांविषयी सांगितले.

सत्य आणि अहिंसा हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. अपरिग्रह म्हणजेच विषय किंवा वस्तूची आसक्ती न राहिल्याने माणूस ऐहिक आकर्षणाचा त्याग करून अध्यात्माच्या मार्गावर अखंड चालतो. ब्रह्मचर्य पाळणाऱ्या व्यक्तीला आपल्या इंद्रियांवर सहज नियंत्रण मिळते. या पंच तत्त्वांमुळे व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.

भगवान महावीरांना जयंतीनिमित्त शतश: नमन...

#भगवान_महावीर #जैन_धर्म #२४वे_तीर्थंकर #जयंती #प्रणाम #पंचतत्त्वे

27/03/2026

*आज (चैत्र शु. ९, २७ मार्च) श्री रामदास जयंती...*

भारताच्या इतिहासात अनेक संत-महात्म्यांनी समाजप्रबोधन आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले आहे. अशाच थोर संतांमध्ये रामदास स्वामी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर... त्यांचा जन्म चैत्र शु. नवमी, ९ फेबुवारी १६०८ रोजी जांब (ता. परतूर, जि. जालना) येथे झाला.

ते केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर महान समाजसुधारक, संघटक आणि राष्ट्रप्रेमी संत होते. त्यांनी अविवाहित राहून समाज प्रबोधन, दासबोध ग्रंथनिर्मिती, मनाचे श्लोक, देवांच्या आरत्या, हनुमान स्तोत्र रचून लोकशिक्षण व धर्मसंस्थापनेचे कार्य केले. समर्थांनी पाहिले की, त्या काळातील समाज गुलामगिरीत आणि नैराश्यात होता. त्यांनी समाजाला नवीन चेतना देण्यासाठी आणि तरुणांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हनुमान उपासना आणि व्यायामशाळा (आखाडा संप्रदाय) सुरू केले. अनेक गावांमध्ये श्री हनुमानाची मंदिरे उभारली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी शिवरायांना 'निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु' अशा शब्दांत गौरवले. त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि समाजातील अन्यायकारक प्रथांना विरोध केला.. त्यांनी सध्याच्या सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर १६८१ साली समाधी घेतली. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकामध्येही त्यांचे हजारो भक्त आहेत

समर्थ रामदास स्वामींना जयंतीनिमित्त विनम्र प्रणाम...
जय जय रघुवीर समर्थ !

#समर्थरामदास #आध्यात्मिकगुरु #जयंती #प्रणाम

26/03/2026

*आज (चैत्र शुद्ध नवमी – २६ मार्च) श्रीराम नवमी...*

प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. हजारो वर्षांपूर्वी त्रेता युगात आजच्याच दिवशी दुपारी अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला होता. श्रीराम हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार होत. मातृपितृभक्त, एकवचनी, महापराक्रमी, एकबाणी, चारित्र्यवान, तत्त्वनिष्ठ, न्यायनिपुण, सज्जनांचा आदर करणारा, प्रजेवर आत्यंतिक स्नेह करणारा राजा अशा अनमोल सद्गुणांचा समुच्चय असल्याने श्रीरामांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ मानले जाते.

रावणासारख्या अनेक जुलमी राक्षसांचा वध करून श्रीरामांनी पृथ्वी भयमुक्त केली. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत राज्याला ‘रामराज्य’ म्हटले गेले. त्यांच्या ठायी असलेल्या अलौकिक गुणांमुळेच त्यांना ईश्वरस्वरूप मानले गेले आहे.

प्रभू श्रीरामांना भक्तिभावपूर्वक नमन. भाविकांना रामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
जय श्रीराम... श्रीराम जय राम जय जयराम...

#श्रीराम #श्रीरामप्रभू #श्रीरामनवमी #पवित्र_दिवस #अयोध्या #प्रणाम

23/03/2026

आज (२३ मार्च) शहीद दिन...

स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिले. अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र लढ्याचा मार्ग पत्करला. मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, खुदिराम बोस यांच्याबरोबर भगतसिंग, शिवराम राजगुरु आणि सुखदेव थापर यांची नावे घ्यावी लागतील. लाहोर जेलमध्ये २३ मार्च १९३१ रोजी या तिघांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात २३ मार्च हा दिवस 'शहीद दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

भगतसिंग व सुखदेव हे पंजाबमध्ये, तर राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील खेड (सध्याचे राजगुरुनगर) येथे जन्मलेले. जालियानवाला बाग हत्याकांड, लाला लजपतराय यांचेवरील प्राणघातक लाठीहल्ला याचा सूड घेण्यासाठी या तिघांनीही ब्रिटिश अधिकारी स्कॉट याला ठार मारण्याचा कट रचला. प्रत्यक्षात त्याच्याऐवजी साँडर्स तावडीत सापडल्याने गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. हे तिघेही फरार झाले. नंतर मात्र त्यांना अटक झाली.

कोर्टाने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत हे तिघेही फासावर चढले. या क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण ठेवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्यांना विनम्र अभिवादन...

#भगतसिंग #राजगुरू #सुखदेव #महान_क्रांतिकारक #शहीद_दिन #अभिवादन

22/03/2026

*आज (२२ मार्च) जागतिक जल दिन...*

सर्व सजीवांसाठी, वृक्षांसाठी, सृष्टीसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचे महत्त्व, त्याची उपयुक्तता, जलसाठ्यांचे संवर्धन, संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा ‘जागतिक जल दिन’ (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१३ पासून हा दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व अनियमित निसर्गचक्रामुळे कुठे अतिवृष्टी, कुठे भीषण दुष्काळ पडत आहे. पाण्याच्या असमतोलाचे चटके अनेक राष्ट्रांना सोसावे लागत आहेत. पृथ्वीवर ७२ टक्के पाणी असले, तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे. देशातील प्रत्येक गाव, शहरातील नागरिकांनी सर्व जलस्रोत जपण्याचे, संवर्धनाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.

पाणी वाचवू या, सृष्टीचे रक्षण करू या...

#जागतिक_जल_दिन #जलस्रोत_संवर्धन #पाणी_हेच_जीवन #पाणी_वाचवा

21/03/2026

*आज (२१ मार्च) जागतिक वन दिन...*

वने, जंगलांचा मानवी जीवनाशी असलेला थेट संबंध, प्राचीन औषध प्रणाली, जैवविविधता याबाबत जनतेमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी, जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने २०१२ पासून ‘२१ मार्च’ हा दिवस ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. पहिला जागतिक वन दिन २०१३ साली साजरा करण्यात आला.

प्राचीन काळापासून अनेक ऋषी व मुनींनी वृक्ष लागवडीचे मह्त्त्व सांगितले आहे. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोडीवर बंदी घातली होती. कालांतराने आपण वनांचे महत्त्व जाणण्यात कमी पडलो आहोत, हे वास्तव आहे.

देशातील वन व्यवस्थापन चळवळ व्यापक करून वनांचे संरक्षण आणि संवर्धन करू या. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अथक प्रयत्न करू या. जीवसृष्टी जगवायची असेल तर ते झाडे जगवू या.

#जंगले_वने #जागतिक_वन_दिन ंरक्षण

21/03/2026

*आज (२१ मार्च) 'ईद-उल-फित्र' म्हणजेच रमजान ईद...*

रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वांत मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे, दान करणे. म्हणूनच रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रूपात दान केले जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये १२ महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे. हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. ह्याच महिन्यात त्यांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ म्हणून ‘अल्लाह’चे दर्शन झाले.

रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना आहे. भूतकाळातील तक्रारी आणि पापे विसरून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. मुस्लिमांची मुख्य पाच कर्तव्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रमजान महिन्यात दररोज उपवास (रोजा) करणे. या महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयानंतर काहीही खात किंवा पीत नाहीत. सूर्यास्तानंतर रोजा सोडला जातो. त्यानंतर अन्न-पाण्याचे सेवन केले जाते. तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन वर्ज्य आणि पाप मानले जाते. आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया, छोट्या मुला-मुलींना उपवासापासून सूट आहे. रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. या वेळी मिठाई आणि शीरखुर्मा आवर्जून दिला जातो.

एकमेकांतील बंधुतेची भावना दृढ करण्याचा, माणुसकी जपण्याचा संदेश देणाऱ्या ‘रमजान ईद’निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

19/03/2026

*आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - १९ मार्च) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...*

गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. या दिवशी मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. पुराणानुसार, ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी सीतामाता आणि लक्ष्मणासह अयोध्येत प्रवेश केला. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासियांनी गुढ्या, तोरणे उभारली होती.

गुढीपाडवा हा साडेतीन अत्युत्तम मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते, जी विजय आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. प्रात:काळी लोक ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाऊन आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात करतात. घरांना तोरण लावले जाते, रांगोळी काढली जाते, नवीन वस्त्र परिधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. आजच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षानिमित्त मंगलमय शुभेच्छा...

#गुढीपाडवा #चैत्रप्रतिपदा #शालिवाहन_संवत्सर #समृद्धी #शुभेच्छा

15/03/2026

*आज (१५ मार्च) जागतिक ग्राहक हक्क दिन...*

ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी, खरेदीवेळी कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख करून घ्यावी, ऑनलाईन खरेदी करताना जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो.

१५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी संसदेत केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षितता, माहिती, निवड आणि प्रतिनिधित्व हे हक्क प्रदान केले. त्यानंतर ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाकडे पाठपुरावा करून मूलभूत गरजा पुरविणे, तक्रार निवारण, ग्राहक शिक्षण आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नये, वस्तू खरेदी करताना बिल घेणे, सोने खरेदीवेळी हॉलमार्ककडे लक्ष देणे, डबाबंद खाद्यपदार्थांची व्यवस्थित पाहणी करणे, वस्तूची एक्सपायरी डेट तपासणे, पेट्रोल पंपावर ‘शून्य’ आकडा पाहून नंतरच पेट्रोल भरणे, ऑनलाईन खरेदी सावधपणे करणे, अशी दक्षता ग्राहकांनी घेणे आवश्यक आहे. हेच सुजाण ग्राहकाचे लक्षण आहे.

#ग्राहकहित #जागतिक_ग्राहक_हक्क_दिन #ग्राहकजागृती

14/03/2026

भारतीय जनता पार्टी को.म.न.पा. गटनेते,
नगरसेवक मा.श्री.मुरलीधर जाधव साहेब
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! 💐

12/03/2026

आपल्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या हितासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Plot No 116 Salokhe Nagar Kalamba Road Kolhapur
Kolhapur
416007