Channel B
प्रतिबिंब जनमानाचं ! Channel B Is Leading News Channel In Kolhapur District
आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ११-०९-२०२६
11/09/2026
🟪 *७ / १२ बातमीपत्र - ११-०९-२०२६*
https://youtu.be/N2iMrJsaMeg
🔵 *विरेंद्र मंडलिक युवा मंचच्यावतीनं कागल नगरपालिका क्षेत्रात गणराया ऍवार्ड स्पर्धेचं आयोजन, विरेंद्र मंडलिक यांची पत्रकार परिषदेत माहिती, गोकुळची निवडणूक महायुतीतर्फे लढणार असल्याचं प्रतिपादन*
https://youtu.be/Ed9c0ao4YgM
🔵 *करवीर तालुक्यातील महे गावात हिराबाई कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १२५ वृक्षांचं रोपण*
https://youtu.be/yu9CcXymGX0
🔵 *शाहुवाडी तालुक्यातील पिशवी गावातील गणेश विसर्जन होणार्या जागेची केली स्वच्छता, रणझुंझार शिवछत्रपती क्रीडा मंडळाचा उपक्रम*
https://youtu.be/9-banEFqsJw
🔵 *सापांविषयी भीती नको तर वैज्ञानिक दृष्टिकोन हवा, शाहूवाडी-पन्हाळ्यातील चार शाळांमध्ये झाला सापांविषयी माहिती आणि जागृतीपर उपक्रम*
https://youtu.be/n4uRFvyStsM
🔵 *नव्या युगातील आव्हानं समर्थपणे पेलणारी नवी पिढी निर्माण करणं हेच शिक्षकाचं खरं कौशल्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. बाबुराव सागावकर यांचे उद्गार, शाहुवाडीत झाला गुणवंत शिक्षक गौरव समारंभ*
https://youtu.be/dStyGlctLSM
🔵 *करवीर तालुक्यातील कोगे इथं श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ६२ वा जन्माष्टमी दीपोत्सव आणि ३४ वा दत्तमूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्सव मोठ्या उत्साहात पार*
https://youtu.be/lV-_WlG6h14
🔵 *विद्यार्थ्यांनी मोठी ध्येयं ठेवून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, डॉ. पी. आर. भोसले यांचं आवाहन, संजीवन इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदवी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात*
https://youtu.be/XpUOnhEtshA
🔵 *गगनबावड्यात ७६ टक्के ग्राहकांना बसवलेत स्मार्ट मीटर, सोलर स्मार्ट स्कीममध्ये सहभागी होण्याचं महावितरणचं आवाहन*
https://youtu.be/iyDXEmBFCdw
🔵 *शिरोळ दत्त साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार*
https://youtu.be/pP8om7fp2Bk
🔵 *लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळा समृद्ध करण्याचं सतीश वाबळे यांचं आवाहन, भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत राबवलं मुक्काम पोस्ट मराठी शाळा अभियान*
https://youtu.be/28NbU_6qqD4
*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻
भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत राबवलं मुक्काम पोस्ट मराठी शाळा अभियान लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळा समृद्ध करण्याचं सतीश वाबळे यांचं आवा...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत.
सलग सुट्ट्यांच्या तोंडावर संप पुकारल्याने बँक ग्राहकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.
आजच्या संपानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
त्यानंतर सोमवारी पुन्हा संप असून, मंगळवारी गणेश चतुर्थीची सुट्टी आहे.
त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका सलग पाच दिवस बंद राहणार असल्याने रोख व्यवहार आणि इतर बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी जनमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच जातीच्या रकान्यात ओबीसींची स्वतंत्र नोंद करावी, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने केली.
ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल मातंग समाजाचे नेते रमेश कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला.
या वक्तव्याचा रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
रमेश कदम यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या प्रकरणाची दखल घेऊन रमेश कदम यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कोल्हापूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या लॉजिंगवर महापालिका आणि अग्निशमन विभागाने संयुक्त कारवाई केली.
व्यवसाय परवाना न घेताच लॉजिंगचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात आली.
संयुक्त पथकाने पाहणी करून विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील केली.
शहरातील अशा अनधिकृत व्यवसायांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मोठ्या कर्जदारांना ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) आणि हेअरकटची सुविधा दिली जाते, मग सर्वसामान्य कर्जदारांसाठी न्याय्य ओटीएस का नाही? असा सवाल महाराष्ट्र लोकाधिकार समितीने उपस्थित केला.
आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू न शकणारे नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ११ जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाच वेळी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
कर्जबाधित सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी न्याय्य ओटीएस योजना लागू करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.
शासन आणि बँकिंग व्यवस्थेने सर्वसामान्य कर्जदारांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली.
प्रलंबित लाभार्थ्यांना मंजूर निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून लाभार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपाचा कोल्हापूर जिल्ह्यातही मोठा परिणाम झाला.
जिल्ह्यातील तब्बल ३६० बँक शाखा बंद राहिल्याने बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या.
या संपामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेसमोर जोरदार निदर्शने केली.
विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बहिरेश्वर यात्रेदरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या साऊंड सिस्टीम आज मूळ मालकांना परत करण्यात आल्या.
कारवाईनंतर संबंधित साऊंड सिस्टीम पोलिसांच्या ताब्यात होत्या.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या साऊंड सिस्टीम संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.
साऊंड सिस्टीम परत मिळाल्यानंतर मूळ मालकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी पोलिसांच्या कारवाईबाबत आणि साऊंड सिस्टीम परत मिळाल्याबाबत मालकांनी आपली भूमिका मांडली.
्वरYatra ्वर
Address
CTS No. 446 3rd Floor, Kailash Tower, Assembly Road, Station Road Corner, Assembly Rd, New Shahupuri
Kolhapur
416003