Kalamba Misal
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalamba Misal, Fast food restaurant, kalamba ringroad, kalamba , kolhapur, Kolhapur.
06/04/2025
आज (चैत्र शुद्ध नवमी – ६ एप्रिल) श्रीराम नवमी...
प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. हजारो वर्षांपूर्वी त्रेता युगात आजच्याच दिवशी दुपारी अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला होता. श्रीराम हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार होत.
मातृपितृभक्त, एकवचनी, महापराक्रमी, एकबाणी, चारित्र्यवान, तत्त्वनिष्ठ, न्यायनिपुण, सज्जनांचा आदर करणारा, प्रजेवर आत्यंतिक स्नेह असा अनमोल सद्गुणांचा समुच्चय असल्याने श्रीरामांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ मानले जाते. रावणासारख्या अनेक जुलमी राक्षसांचा वध करून श्रीरामांनी पृथ्वी भयमुक्त केली. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत राज्याला ‘रामराज्य’ म्हटले गेले. त्यांच्या ठायी असलेल्या अलौकिक गुणांमुळेच त्यांना ईश्वरस्वरूप मानले गेले आहे.
प्रभू श्रीरामांना भक्तिभावपूर्वक नमन. भाविकांना रामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
जय श्रीराम... श्रीराम जय राम जय जयराम...
#श्रीराम #श्रीरामप्रभू #श्रीरामनवमी #पवित्र_दिवस #अयोध्या #प्रणाम
30/03/2025
आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - ३० मार्च) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...
गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. या दिवशी मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. पुराणानुसार, ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले. प्रभू रामचंद्रांनी रावणराज्य संपवून याच दिवशी सीतामाता आणि लक्ष्मणासह अयोध्येत प्रवेश केला. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासियांनी गुढ्या, तोरणे उभारली होती.
गुढीपाडवा हा साडेतीन अत्युत्तम मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते, जी विजय आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते. प्रात:काळी लोक ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाऊन आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात करतात. घरांना तोरण लावले जाते, रांगोळी काढली जाते, नवीन वस्त्र परिधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. आजच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन मराठी वर्षानिमित्त मंगलमय शुभेच्छा...
#गुढीपाडवा #चैत्रप्रतिपदा #शालिवाहन_संवत्सर #समृद्धी #शुभेच्छा
27/03/2025
"Stay Connected with Good Taste – Kalamba Misal!"
Kalamba Misal is not just food; it's an experience of authentic flavors, rich spices, and unforgettable taste! Every bite is a perfect blend of tradition and taste, keeping you coming back for more. Whether you love it spicy, crispy, or perfectly balanced, our misal is made to satisfy your cravings.
🔥 Authentic Taste | 🌶 Perfect Spice | 🍛 Unmatched Flavor
Stay connected with the real taste of Maharashtra – Stay connected with Kalamba Misal!
Suvarna Bhoomi Colony,
Kalamba, Kolhapur-416007 (Near Kalamba Jail. Near Sonu Hotel)
Contact - 91 95795 87676
…
17/03/2025
मिसळीचा तिखटपणा आणि आठवणींची गोडी मिळून बनतो एक अपूर्व अनुभव! 😍 तुम्ही कधीही विसरू शकणार नाही अशी झणझणीत चव आणि त्या सोबत येणाऱ्या खास क्षणांसाठी, चला... मिसळच्या ताटात आठवणींची मेजवानी सजवूया! 🍽️✨
सुवर्ण भूमी कॉलनी,
कळंबा, कोल्हापूर-416007 (कळंबा कारागृहाजवळ. सोनू हॉटेलजवळ)
संपर्क - 91 95795 87676
#कळंबा_मिसळ #कळंबा #कोल्हापूर
13/03/2025
आज (१३ मार्च) होळी पौर्णिमा...
होळी हा पवित्र सण देशभरात सर्वधर्मीय लोकांकडून उत्साहाने साजरा केला जातो. अनेक राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील पौणिमेला साजरा होणारा हा सण. याला ‘शिमगा’ असेही म्हणतात. होळीमध्ये वाईट गोष्टींचे दहन करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, अशी परंपरा महाराष्ट्रात आहे. तर उत्तर भारतात या दिवशी रंगपंचमी खेळण्याची परंपरा आहे.
होळी साजरा करण्याच्या परंपरेलाही पौराणिक कथेचा आधार आहे. राक्षसांचा राजा हिरण्यकशिपूने श्री विष्णूची भक्ती करणाऱ्या आपल्या पुत्राला – प्रल्हादाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र श्रीविष्णूंनी त्याला वाचवले. अखेर हिरण्यकशिपूने बहीण - ‘होलिका’ जिला अग्नीपासून भय नाही, असा वर होता, तिला प्रल्हादास मारण्यास पाठवले. तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून चितेत प्रवेश केला. विष्णूकृपेने प्रल्हाद वाचला मात्र, वरदानाचा दुरुपयोग केल्याने होलिकेचाच जळून मृत्यू झाला. तेव्हापासून अग्नीमध्ये वाईट गोष्टींचे दहन करून चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी ‘होळी’ हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली, असे मानले जाते.
या दिवसांमध्ये गव्हाचे पीक तयार होते. त्यामुळे होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या आणि नारळ भाजण्याची प्रथा आहे. होळीमध्ये दुर्भावना, दुर्वासना, समस्या, दारिद्र्य यांचे दहन होवो. सद्विचार, प्रेम, शांती भावनेचा प्रसार होवो, अशी प्रार्थना...
होळी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
#होळी #होळीपौर्णिमा #शिमगा #शुभेच्छा
08/03/2025
International Women’s Day (March 8th)
celebrates women's achievements in social, economic, political, and cultural spheres. It honours their contributions and highlights the ongoing fight for gender equality, empowerment, and human rights. While progress has been made, challenges like the gender pay gap, workplace bias, and discrimination remain. This day serves as a call to action to create a world where every woman can thrive without barriers.
26/02/2025
आज (२६ फेब्रुवारी) महाशिवरात्र...
महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. या दिवशी भक्त शिवलिंगावर बेलपत्र, जल, दूध आणि भस्म अर्पण करून "ॐ नमः शिवाय" चा जप करतात. या दिवशी उपवास, जागरण आणि ध्यान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
भगवान शंकर हे करुणेचे आणि शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मरणाने आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते. त्यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो!
ॐ नमः शिवाय... हर हर महादेव..!
#महाशिवरात्री #शिवतत्त्व ः_शिवाय #प्रणाम
22/02/2025
एकदा जर कळंबा मिसळची चव चाखली तर प्रत्येकवेळी इथे आल्याशिवाय राहणार नाही .
सुवर्ण भूमी कॉलनी,
कळंबा, कोल्हापूर-416007 (कळंबा कारागृहाजवळ, सोनू हॉटेलजवळ)
संपर्क - 91 95795 87676
#कळंबा_मिसळ #कळंबा #कोल्हापूर
19/02/2025
आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती...
ज्यांचे नाव घेताच अंगात स्फुरण चढते अशा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज अपूर्व उत्साहात साजरी होत आहे. शिवाजी महाराज हे उत्तुंग व आदरणीय व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या कर्तृत्वाचे, गुणांचे, पराक्रमाचे वर्णन करणे महाकठीण काम आहे.
आदरणीय शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. बालपणापासून जिजामाता यांनी केलेले सुसंस्कार शिवरायांचे जीवन व व्यक्तिमत्त्व घडविण्यात कारणीभूत ठरले. एतद्देशियांचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे जिजामातांचे स्वप्न शिवाजी महाराजांनी जिवलग सवंगड्यांच्या साथीने आणि अनेक मावळ्यांच्या साहाय्याने पूर्ण केले. या ‘शिवगाथे’तील अनेक घटना स्फूर्तिदायी आहेत. स्वत: आघाडीवर राहून शत्रूचा मुकाबला करणे, दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी दाखवून स्वराज्याचा विस्तार करणे, स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले तरी आपले जीवन सार्थकी लागेल, अशी भावना मावळ्यांमध्ये निर्माण करणे यात शिवरायांचे अलौकिक कौशल्य दिसून येते.
स्वत: चारित्र्यसंपन्न राहणे, व्यसनापासून दूर राहणे, स्त्रिया, साधू-संत आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान, रयतेची काळजी घेणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आदर्शवत पैलू आहेत. शिवरायांनी आपल्या अमोल सद्गुणांच्या आणि पराक्रमाच्या जोरावर सतराव्या शतकात जो देदीप्यमान इतिहास घडवला तो केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, जगाला प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शतश: प्रणाम आणि मानाचा मुजरा...
जय भवानी... जय शिवाजी...
#छत्रपती_शिवाजीमहाराज #जिजामाता #शहाजीराजे #शिवनेरी #शिवजयंती #प्रणाम #मानाचा_मुजरा
17/02/2025
कळंबा मिसळ आहे खास कारण यात आहे स्पेशल सहा महत्वाचे घटक ...
अस्सल कोल्हापुरी
वारसा
झणझणीत
प्रेम
चव
शान
सुवर्ण भूमी कॉलनी,
कळंबा, कोल्हापूर-416007 (कळंबा कारागृहाजवळ, सोनू हॉटेलजवळ)
संपर्क - 91 95795 87676
#कळंबा_मिसळ #कळंबा #कोल्हापूर
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Website
Address
Kalamba Ringroad, Kalamba , Kolhapur
Kolhapur
416007