Proscenium Art Association Kolhapur
Proscenium Art Association is an association of young artists with different specializations specially in theatre.
Proscenium believes in cultural exchange which works for enhancing the theatre movement with some different manner. .
11/07/2023
शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोसिनियम आर्ट असोसिएशन आयोजित "इंशाअल्लाह" ह्या अभिराम भडकमकर लिखित कादंबरी च्या अभिवाचनाचा कार्यक्रम शाहू स्मारक भवन, मिनी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे घेण्यात आला.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्री. अभिराम भडकमकर ह्यांचे बालपण कोल्हापूरमध्ये गेले. आज ते एक यशस्वी लेखक दिग्दर्शन व अभिनेते आहेत. इंशाअल्लाह ह्या कादंबरीमध्ये कोल्हापुरातील मोहोल्याची गोष्ट आहे. कोल्हापुरी बागवानी भाषेचा गोडवा त्यात आहे. कोणत्याही वैचारिक कट्टरतेला बळी न पडता माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाची जाण करून देणारी अशी ही कादंबरी. तसेच मुस्लिम समाजाकडे फक्त वोट बँक म्हणून न पाहता एक समाज म्हणून त्याच्या अंतरंगाचे दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.
अश्या या कादंबरीचे अभिवाचन ज्येष्ठ अभिनेत्री मा. स्वाती चिटणीस, मा. सचिन सुरेश, मा. प्रसाद माळी, मा. सलीम मुल्ला व मा. अभिराम भडकमकर यांनी केले. कादंबरी जितकी अर्थपूर्ण आहे तितकेच रसपूर्ण अभिवाचन झाले. अभिवाचनानंतर मुक्त चर्चा देखील झाली. यावेळी दर्जेदार प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विचारमंथन झाले.
प्रोसेनियम आर्ट असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन या सर्व दिग्गज कलाकारांनी कोल्हापुरात सादरीकरण केले, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार! या कार्यक्रमासाठी कोल्हापूरातील विविध नाट्य संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोहोल्यातील नागरिकांनीही व तमाम प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रतीक ट्रेडर्स, मुक्ता फर्निचर, हॉटेल शांतीदूत, अश्वमेध मीडिया, कोल्हापुरी मिसळ, इंडोकाऊंट ह्या सर्वांनी प्रायोजकत्व स्वीकारले त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.
असे वेगवेगळे उपक्रम आम्ही आपल्या सर्वांसाठी सातत्याने घेऊन येत राहू. आपलं प्रेम व आपला प्रतिसाद आमच्यावर असाच अबाधित असावा हीच अपेक्षा!
Avdhut Joshi Shreyash Mohite Satyajeet Salokhe Pratik Takawadekar Pratik traders kolhapurAshwamedh media Kolhapuri misal pav
27/04/2023
कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षक हो...
'इन्शाअल्लाह' कादंबरीचे अभिवाचन आणि चर्चा...
उद्याच शुक्रवार, 28 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता, शाहू स्मारक, मिनी हॉल, कोल्हापूर येथे
नक्की या!
अभिवाचनानंतर सर्व कलाकारांशी थेट चर्चा
भावांनो नुस्ता काटाकिररर...........नाही तर डोस्क्यात जाळ असा कार्यक्रम आहे.
यायला लागतय.......
२८ एप्रिल २०२३
वेळ - सायं. ६ वाजता
स्थळ - शाहु स्मारक मिनी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर.
यो रमजान ईद को तुमना ईदी मिली क्या नई?
हामी आईं तुम्हारे वास्तिर ईदी लेको..... आओ तुमी बी......
इंशाअल्लाह......
कऊ - २८ एप्रिल २०२३
कत्ते बजे - मगरीब का ६ बजे
कहा - शाहु स्मारक मिनी हॉल, मुस्लिम बोर्डिंग के नजिक, दसरा चौक
ज्येष्ठ अभिनेत्री मा. स्वाती चिटणीस येताहेत आपल्या कोल्हापुरात.... तुम्ही येताय ना... 'इंशाअल्लाह' कादंबरी अभिवाचन व चर्चा कार्यक्रमास
दि.- २८ एप्रिल २०२३
वेळ- सायं. ६:३० वा.
स्थळ - शाहु स्मारक, मिनी हॉल, कोल्हापूर.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त आपल्या कोल्हापूरचे लेखक मा. अभिराम भडकमकर घेऊन येत आहेत बहुचर्चित असलेली त्याची कादंबरी *इंशाअल्लाह* कादंबरीचे अभिवाचन आणि चर्चा असा कार्यक्रम...........
नक्की या.......
वाट पाहतोय....
13/04/2023
प्रोसिनियम आर्ट असोसिएशन, कोल्हापूर आयोजित 'इंशाअल्लाह' या अभिराम भडकमकर लिखित कादंबरीमधील निवडक भागांचे अभिवाचन व चर्चा.
सादरकर्ते -
अभिराम भडकमकर
प्रसाद माळी
सलीम मुल्ला
सचिन सुरेश आणि
स्वाती चिटणीस
तसेच यावेळी संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते, कोल्हापूरचे सुपुत्र लेखक मा. अभिराम भडकमकर यांचा नागरी सत्कार संपन्न होणार आहे.
स्थळ - शाहु स्मारक मिनी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर.
वेळ - २८ एप्रिल २०२३ सायंकाळी ६ वाजता.
सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, ही विनंती!
06/02/2022
मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि एक प्रतिभाशाली व्यक्तीमत्त्व असलेल्या व आपल्या सर्वांचा अभिमान असलेल्या भारतरत्न लता मंगेशकरजी आज अनंतात विलीन झाल्यात.
प्रोसेनिअम आर्ट असोसिएशन तर्फे त्यांना शतशः अभिवादन....!!!
लतादीदी! तुमचा मधुर आवाज सदैव अमर राहील....
05/11/2021
आज ५ नोव्हेंबर.. #मराठी_रंगभूमी_दिन
तत्कालीन सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हेंबर १८४३ साली सांगली येथे 'सीता स्वयंवर' ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला..
मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले.
१७८ वर्षाची ही रंगभूमीची परंपरा.. आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात, जोपासली जात आहे. ह्या १७८ वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वांचं अभिनंदन आणि मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#मराठीरंगभूमीदिन
#सीतास्वयंवर
#विष्णुदासभावे #बालगंधर्व
#मराठीनाटक
20/09/2021
सोनाली नवांगुळ यांचे भाषांतरासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारबद्दल प्रोसेनिअम आर्ट असोसिएशनकडून कौतुक!
नुकताच साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार सोनाली नवांगुळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी मूळ तमिळ भाषेतील बंडखोर लेखिका सलमा यांच्या कादंबरीचे मराठी भाषेत 'मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने भाषांतर केले आहे.
या पुरस्काराबद्दल प्रोसेनिअम आर्ट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष मा. अवधूत जोशी, उपाध्यक्ष मा. महेश जाधव, सचिव श्रेयश मोहिते, सत्यजित साळोखे आणि सलीम मुल्ला यांनी सोनाली यांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले.
समस्त कोल्हापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. सोनाली यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Sonali Navangul
19/09/2021
आज कोप्रा मंच आयोजित 'इन्शाअल्लाह' या प्रसिद्ध कादंबरीबाबत लेखक अभिराम भडकमकर यांची अमृता धायरकर आणि राज काझी यांनी घेतलेली मुलाखत व यासोबत इन्शाअल्लाह कादंबरीतील काही निवडक भागांचे सलीम मुल्ला, उत्तरा बावकर आणि विक्रम गोखले यांनी केलेल्या अभिवाचनाचा आस्वाद घेतला.
वेगळा आशय आणि वेगळा अनुभव घेण्यासाठी आपणही हा कार्यक्रम नक्की पहा.
आपलं तिकीट बुक करा
17 सप्टेंबरपासून पुढे 5 दिवस हा कार्यक्रम पाहता येईल !
तिकीट केवळ 100 ₹
तिकिटांसाठी लिंक ....
https://www.ticketkhidakee.com/inshaallah
'इन्शाअल्लाह'
Abhiram Damodar Bhadkamkar
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the establishment
Telephone
Website
Address
224, A-Ward, Mandap Bol, Near Rankala Tower
Kolhapur
416012