Z.P.Teachers Kolhapur

Z.P.Teachers Kolhapur

Share

जि.प.प्राथमिक शिक्षकाना आपल्या उपक्र?

दैनंदिन आध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कप्पेबंद व साचेबंद वाटांनी न जाता शिक्षण क्षेत्रातील कालानुरूप गरज लक्षात घेऊन ग्रामीण जिल्हा परिषद शाळेत नव- नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाले आहे .घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक व्हावी, अध्ययन अध्यापनात रंजकता यावी, खडू फळाविरहित ओझ्याविना शिक्षण, तसेच ग्रामीण विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा, ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून; अत्याध

27/07/2015

अब्दुल कलाम यांचा अल्प परिचय -
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर
जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म ऑक्टोबर १५,
१९३१, तमिळनाडूत झाला.
२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ दरम्यान हे भारताचे अकरावे
राष्ट्रपती कार्यकाळ
होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे
राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.
कलाम यांचं अखेरचं ट्विट-
Going to Shillong.. to take course on Livable
Planet earth at iim. With and
Sharma.
— APJ Abdul Kalam () July
27, 2015
त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून
धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत होते.
डॉ. कलाम यांनी आपलं शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला
पूर्ण केलं. लहान वयातच वडिलांचं छत्र गमावल्याने डॉ.
कलाम गावात वर्तमानपत्रं विकून, तसंच अन्य लहान मोठी
कामं करून पैसे कमवीत आणि घरी मदत करीत. त्यांचं
बालपण खूप कष्टात गेलं. शाळेत असताना गणिताची
त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली इथं
सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झालं. तिथं बी.एस्सी.
झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही
त्यांच्याकडे नव्हते. बहिणीनं स्वतःचे दागिने गहाण ठेवून
त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा
पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध
संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे
प्रशिक्षण घेतलं.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी(DRDO)संबंध
आला.
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो)
क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग
व्हेईकल)च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी
पंतप्रधान असताना भारतानं क्षेपणास्त्र विकासाचा
एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम
पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रं तयार करण्याची त्यांची
जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन
संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३
या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात
विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी
सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी
सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या
'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर
असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या
वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला
त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील
'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम
यांचं जगभरातून कौतुक झालं. पंतप्रधानांचे वैज्ञानिक
सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या
दृष्टीनं त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली.
त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि
डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.
(मेन बॅटल टँक) रणगाडा आणि लाइट काँबॅट एअरक्राफ्ट
(एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार
पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनानं खूप
संवेदनशील आणि साधे होते. त्यांना रुद्रवीणा
वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत
सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' आणि १९९८ मध्ये
'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान
केला. डॉ. कलाम हे अविवाहित होते आणि पूर्ण
शाकाहारी होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित
भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत
व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य
जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही
राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे
युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.
देशातील सर्वोच्च सन्मान -
भारत सरकारनं 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' आणि १९९७ मध्ये
'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान
केला.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

Gurumitra 22/06/2015

Gurumitra Gurumitra ia an educational website. This website is useful for student as well as teacher. Connect with me on facebook and twitter. Please, like 'Gurumitra' page on facebook.

07/04/2015

Marathi video tutorials www.zpguruji.com

मुख्य For all teachers in zilha parishad .

DnyanSankalp Infotech - Home 10/04/2014

http://www.dnyansankalp.com/index.html

DnyanSankalp Infotech - Home Computers have brought about a revolution across all industries. They have changed the face of society. They are no longer specialized tools to be used by specially trained people. They are ubiquitous and used in almost every sphere of life. Computers are the best means for storage and management of...

Photos 05/03/2014

आज माझ्या वर्गाला आमच्या जिल्ह्याचे CEO मा.डा.विजय सूर्यवंशी यांनी अचानक भेट दिली.मुलींनी विचारलेल्या प्रश्नाची अचक उत्तरे दिली.मराठी हिदी आणि इंग्रजीतून संभाषण ऍकून साहेबांनी Good,Very Good अशा कमेंट दिल्या.हऍकून माझ्यापेक्षा मुलीच जास्त खूष झाल्या.
काम चांगले केल्याची पोहॉच पावती मिळाली.

Photos 11/02/2014

आजपासून 104 हा क्रमांक रक्त पुरवठा क्रमांक असेल.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही सेवा सुरु केली आहे.
या क्रमांकावर फोन केल्यास 40 किमी पर्यंत गरजवंताला
एका तासाच्या आत आवश्यक रक्तचा पुरवठा केला जाईल.
हा सन्देश जास्तीत जास्त शेयर करा.
या सुविधेची माहिती द्या, एखाद्याचे प्राण वाचवा..

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : मुख्यमंत्री – Live Kolhapur | Latest News From... 09/01/2014

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : मुख्यमंत्री – Live Kolhapur | Latest News From... सातारा : शिक्षकांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल अशैक्षणिक काम कमी करण्याबाबतही आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १५ वे त्रैवार्षिक महाअधिवेशन पाचगणी येथे झाले. या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्...

THE NEW GUIDE: आपल्या मुलांसाठी ५ शैक्षणिक APPS 02/01/2014

THE NEW GUIDE: आपल्या मुलांसाठी ५ शैक्षणिक APPS HERE YOU FIND NEW INFORMATION OF APPS, WEBSITE,TRICKS,NEW IDEAS, FOR STUDENT,TEACHER,PARENTS AND PEOPLE WHO RELATE WITH EDUCATION....

Photos 05/11/2013

शाळेतील प्रार्थना शिक्षकांना सक्तीची नाही : उच्च न्यायालय

कोल्हापूर : शाळेत नियमित होणार्‍या परिपाठात तासाला म्हटल्या जाणार्‍या प्रार्थना स्वत:च्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात आहेत, असे एखाद्या शिक्षकाला वाटत असेल तर त्या शिक्षकाला अशा प्रार्थनेच्यावेळी हात जोडून उभे राहण्याची सक्ती करता ...
सविस्तर वाचा: " ठळक बातम्या" मध्ये त्यासाठी क्लिक करा.
http://www.livekolhapur.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95/

10/10/2013

बालकांचा शिक्षणाचा हक्क गीत ....
RTE ANTHEM ... RTE गीत ..
BY MINISTRY OF HUMAN RESOURCES & DEVELOPMENT..

10/10/2013
Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


जिल्हा परिषद कोल्हापूर
Kolhapur
416103