Vaibhav Films

Vaibhav Films

Share

Vaibhav Films is an Marathi entertainment company established by Subhash Hilage.Produced two films "

31/12/2020

घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!

नविन वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!!!

Mobile uploads 25/06/2014

# नृत्य दिग्दर्शक प्रकाश हिलगे यांचे निधन

कोल्हापूर / प्रतिनिधी :

आझाद गल्ली, बिंदू चौक येथील नृत्य दिग्दर्शक प्रकाश महादेव हिलगे (वय ५९) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते अविवाहित होते. शालेय वयात संगीत मेळा, अंकित मेळ्यामध्ये काम करून आपल्या कलेला प्रकाश हिलगे यांनी प्रारंभ केला. आपल्या बंधूसह त्यांनी वैभव कलादरबारची स्थापना केली. त्यांच्या माहेरची पाहुणी या चित्रपटाला तीन पारितोषिके मिळाली.

नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी धुमधडाका, दे दणादण, एक गाव बारा भानगडी, काळूबाईच्या नावानं चांगभलं, दोस्त माझा मस्त अशा चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केले. त्यांना कला पंढरीनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी साता जन्माचा सोबती, अवघाची संसार, हळदी-कुंकू, अखंड सौभाग्यवती, कुलवंताची सून, सौभाग्यदान, बलिदान, अपमानाचा सूड, रूप थोराचे गण चोराचे, भाचीचा मळा, मामाची सून, कुंकू लावून जा अशी १४0 ते २00 हृदयस्पश्री विनोदी नाटके लिहिली. महाराष्ट्रात प्रथमच चॅलेंजिंग थाळी व समई नृत्य करणारा पहिला कलाकार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. त्यांना संस्कार भारतीकडून मानचिन्ह, मानपत्र, सांगलीच्या लोककला विभागाकडून कलेचे शिलेदार म्हणून मानचिन्ह मिळाले. अपना महोत्सव, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांत त्यांनी कार्यक्रम सादर केले व तेथे त्यांना पुरस्कारही मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी दहा हजार स्टेज शो केले आहेत. कृणाल कॅसेटसाठी बर्‍याच नाटकांच्या व्हिडीओचे दिग्दर्शनही त्यांना केले.३८ वर्षे ते वैभव म्युझिकल कॉमेडी नाईटमध्ये कार्यरत होते. त्यांनी अनेक कलाकारांना नृत्य शिकवले. त्यात अशोक सराफ, कै. लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले आदींचा समावेश आहे. त्यांच्या पश्‍चात २ भाऊ, ४ बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. २५) पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

Photos 03/05/2013
Want your business to be the top-listed Media Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Shivaji Road Near Heera Panna Mobile
Kolhapur