Maharashtra forts explore

Maharashtra forts explore

Share

hey guys Maharashtra forts explore and history , video & photos

29/09/2021

Maharashtra

Photos from Maharashtra forts explore's post 28/07/2021

किल्ले राजगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी
गडांचा राजा, राजियांचा गड
राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.
शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.

पोहोचण्याच्या वाटा :१) गुप्त दरवाजाने राजगड :-
पुणे - राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

२) पाली दरवाज्याने राजगड:-
पुणे - वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे "पाबे" या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायर्‍याची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

३) गुंजवणे दरवाज्याने राजगङ :-
पुणे - वेल्हे या हमरस्त्यावरील "मार्गासनी" या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.

४) अळु दरवाज्याने राजगड:-
भुतोंडे मार्गे आळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.

५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची:-
गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माचीवर येते.
_______ तुमचं आव

27/07/2021

वर्षाऋतूंतील दर्शन विराट असतं भावतालचं पोपटी लावण्य पाहून काळ्याकभिन्न पत्थरालाही अशावेळी पाझर फुटलेला असतो..इथं घटकाभर बसावं समोर पसरलेलं हिरवगार सौंदर्य न्याहाळावं अथांग त्याच साम्राज्य हिरव्या माहेरी आलेल्या हळदीच्या उन्हात अगदी मानमुरात न्हाऊन घ्याव अश्या ह्या सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्यात डोके वर काढत “कलावंतीण” आपले उत्तुंग अस्तित्व दाखवून देत आहे.या सह्याद्री आणि दुर्गांनी मानवी पराक्रमाचे स्वामिनिष्ठेचे आणि स्वर्थ त्यागाचे अतिउच्च क्षण पाहिले आहेत एका अत्यंत गौरवास्पद अशा परंपरेचा स्पर्श या गिरिदुर्गाच्या सहवासामुळे आपल्याला होतो नागमोडी वळण घेत खणलेल्या पायऱ्या पाहून त्या अनामिक स्थापत्यकराचे कौतुक केल्याशिवाय एकही भटका प्रवासी निशब्द राहत नाही 😍💯


________ तुमचं आवडतं पेज ____________
______ .forts.explor________
●|| शिवराय मनामनात शिवविचार घराघरात ||●
_______________________________________
पेजवर येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील
प्रत्येक मराठी माणसाचं मनापासून स्वागत ❣️
पोस्ट आवडल्या तर like-share करा !......................................................................
✔ most follows : MaMaharashtra forts exploreoMaharashtra forts explorexMaharashtra forts explore

27/07/2021

राजं तुम्ही इतिहास च असा रचून गेलात की नावं सुद्धा ऐकलं तरी रक्त सळसळायला लागतं ! शिवराय असे शक्तीदाता😍🙏

______ .forts.explor _________
●|| शिवराय मनामनात शिवविचार घराघरात ||●
लाखो मराठी बांधवाना जोडण्याचा संकल्प 💚
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा !
➡️➡️➡️ .forts.explor ⬅️⬅️⬅️
______________________________________
पेजवर येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील
प्रत्येक मराठी माणसाचं मनापासून स्वागत ❣️
पोस्ट आवडल्या तर like-share करा !.............................................................

Photos from Maharashtra forts explore's post 26/07/2021

पावसाच्या रिमझिम धारांनी न्हाऊन निघालेला लोहगड ! दिसायला जरी रुद्र असला तरी चढाईला फार न दमवणारा ! अनेक शतकानंतर आजही सुस्थितीत अभिमानाने खडा असलेला लोहगड ! लोहगडी गेलं म्हणजे नकळतच पाऊले शेजारील विसापूर आणि भाजे लेणी कडेही वळतात अनेक पाहण्यासारखी ठिकाणे लोहगडाच्या आजूबाजूला आहेत पण त्यात उठून दिसतो तो म्हणजे लोहगडच ! सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गडाला एकदा नक्की भेट द्या !

________ तुमचं आवडतं पेज ____________
______ .forts.explor _________
●|| शिवराय मनामनात शिवविचार घराघरात ||●
_______________________________________
पेजवर येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील
प्रत्येक मराठी माणसाचं मनापासून स्वागत ❣️
पोस्ट आवडल्या तर like-share करा !......................................................................
✔ most follows : .forts.explor
___________

Want your organization to be the top-listed Government Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Kolhapur
416003