Jotiba Innovations -Event Management
We provide all event-related services.
12/04/2025
आज (चैत्र पौर्णिमा- १२ एप्रिल) श्री जोतिबा देवाची यात्रा...
आज चैत्र पौर्णिमा... असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस... पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील डोंगर श्री जोतिबाच्या वास्तव्याने पुनित झाला आहे.
जोतिबा हे बद्रिकेदारचेच रूप आहे. वास्तविक जोतिबा यात्रेचा मुख्य हेतू म्हणजे देवी यमाई (रेणुका) आणि महर्षी जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा आनंद सोहळा... या यात्रेसाठी लाखो भाविक जोतिबा डोंगर येथे येतात.
आजच्या मुख्य दिवशी पहाटे श्री जोतिबा देवास शासकीय महाअभिषेक होतो. सकाळी देवाची षोडशोपचार पूजा केली जाते. दुपारी दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेस प्रारंभ होतो. सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आरती होऊन देवाची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते. सातच्या सुमारास यमाई मंदिरासमोर सदरेवर ही पालखी विराजमान होते. यानंतर जगदग्नीचे स्वरूप-कट्यारीसोबत श्री यमाईदेवीचा विवाह सोहळा होतो. यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणेनंतर पालखी सदरेवर विराजमान होते.
भक्तवत्सल श्री जोतिबा देवास भक्तिपूर्वक प्रणाम... जोतिबाच्या नावानं चांगभलं... भाविकांचे हार्दिक स्वागत...
#श्रीजोतिबा #श्रीकेदारनाथ #श्रीयमाई #चैत्र यात्रा
16/02/2025
आजपासून (१६ फेब्रुवारी) श्री जोतिबा खेट्यास प्रारंभ...
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील डोंगरावरून दख्खनचा राजा श्री जोतिबा असंख्य भक्तांवर कृपेचा वर्षाव करतो. माघ पौर्णिमा झाल्यानंतरच्या पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भाविक पायी चालत येतात, त्यास 'जोतिबाचे खेटे घालणं' असे म्हणतात. आजपासून खेट्यास प्रारंभ होत आहे. प्रत्येक रविवारी देवाचे दर्शन घेणे आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणे अशी परंपरा आहे.
जोतिबा हे दक्षिणेतील दैत्यांचा संहार करून अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे हिमालयात जायला निघाले. करवीर निवासिनी माता अंबाबाईच्या विनंतीवरून त्यांनी करवीर क्षेत्रात वाडीरत्नागिरी डोंगरावर वास्तव्य करण्याचे मान्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे रक्षण देवाने करावे, अशी विनवणी करीत भाविक हे खेटे घालत असतात.
श्री जोतिबा देवाची कृपा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना. खेट्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे मन:पूर्वक स्वागत...
#श्री_क्षेत्र_जोतिबा #दख्खनचा_राजा_जोतिबा #वंदन #खेटेप्रारंभ #भाविकांचे_स्वागत
01/05/2024
आज (१ मे) महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन...
आजचा दिवस मराठी जनांच्या अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी १९६० साली ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. थोर संत, वीर, नेते, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षक, शेतीतज्ज्ञ, समाजसेवक यांची ही भूमी. या सर्वांनी महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र अस्तित्वात यायला १३ वर्षांचा काळ गेला. मराठी जनांना केंद्र सरकारशी कडवा संघर्ष करावा लागला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांवर सरकारने गोळीबार केला, त्यामध्ये १०६ जण हुतात्मा झाले. आजच्या दिवशी त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते.
सर्व महाराष्ट्रीय जनांना ‘महाराष्ट्र दिना’च्या मन:पूर्वक शुभेच्छा...
दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. कामगारांचा सन्मान व्हावा, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने १ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' साजरा केला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) अमेरिकेत १ मे १८८९ रोजी साजरा करण्यात आला, तर भारतात १ मे १९२३ रोजी श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने चेन्नई येथे हा दिन साजरा केला.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने देशविकासात असलेले कामगारांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवू या, त्यांचा सन्मान करू या.
#महाराष्ट्र #महाराष्ट्र_राज्य_स्थापना_दिन #महाराष्ट्रीय #शुभेच्छा #कामगार #आंतरराष्ट्रीय_कामगार_दिन #शुभेच्छा
23/04/2024
आज (२३ एप्रिल) श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा...
आज चैत्र पौर्णिमा... असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत आणि श्री भैरवनाथ, श्री केदारनाथ या नावाने ओळखला जाणारा दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस... पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील डोंगर श्री जोतिबाच्या वास्तव्याने पुनित झाला आहे.
जोतिबा हे बद्रिकेदारचेच रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी व १२ सूर्याचे तेज यांचा तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा किंवा केदारनाथ असे मानले जाते. वास्तविक जोतिबा यात्रेचा मुख्य हेतू म्हणजे देवी यमाई (रेणुका) आणि महर्षी जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा आनंद सोहळा... या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांतून लाखो भाविक जोतिबा डोंगर येथे येतात.
आजच्या मुख्य दिवशी पहाटे श्री जोतिबा देवास शासकीय महाअभिषेक होतो. सकाळी देवाची षोडशोपचार पूजा केली जाते. दुपारी दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेस प्रारंभ होतो. सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आरती होऊन देवाची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते. सातच्या सुमारास यमाई मंदिरासमोर सदरेवर ही पालखी विराजमान होते. यानंतर जगदग्नीचे स्वरूप-कट्यारीसोबत श्री यमाईदेवीचा विवाह सोहळा होतो. यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणेनंतर पालखी सदरेवर विराजमान होते. श्री कालभैरवाच्या मंदिरात सर्व सासनकाठी मानकऱ्यांना मानाचे विडे दिले जातात. तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते.
भक्तवत्सल श्री जोतिबा देवास भक्तिपूर्वक प्रणाम... जोतिबाच्या नावानं चांगभलं... भाविकांचे हार्दिक स्वागत...
#श्रीजोतिबा #श्रीकेदारनाथ #श्रीयमाई #चैत्र यात्रा #चांगभलं
17/04/2024
आज (चैत्र शुद्ध नवमी – १७ एप्रिल) श्रीराम नवमी...
आज श्रीराम नवमी... हजारो वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. श्रीराम हे श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानले जातात.
प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. मातृपितृभक्त, एकवचनी, महापराक्रमी, विनयशील, बंधुप्रेमी, एकबाणी, चारित्र्यवान, तत्त्वनिष्ठ, न्यायनिपुण, ऋषी-मुनी, सज्जनांचा आदर करणारा, प्रजेवर आत्यंतिक स्नेह करणारा असा हा राजा... रावणासारख्या अनेक क्रूर आणि जुलमी राक्षसांचा, दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन करून श्रीरामांनी पृथ्वी भयमुक्त केली. त्यांच्या राज्यात समस्त प्रजा सुखी, समाधानी होती. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत राज्याला ‘रामराज्य’ म्हटले गेले.
प्रभू रामचंद्रांच्या ठायी असलेल्या अनेक अलौकिक गुणांमुळेच त्यांना ईश्वरस्वरूप मानले जाते. त्यांच्या नामाचे स्मरण, चिंतन करण्यात अनेक भक्त धन्यता मानतात. संपूर्ण जगात त्यांना आदर्श मानले जाते. म्हणूनच हजारो वर्षे लोटूनही त्यांच्या नामाचा महिमा अबाधित आहे.
यंदाची रामनवमी खूपच उत्साहात साजरी होणार आहे. कारण सुमारे ५०० वर्षांनंतर याच वर्षी श्रीरामांची मूर्ती अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठित झाली आहे. समस्त हिंदूचे स्वप्न साकार झाले आहे. आपणही रामजन्माच्या सोहळ्यात रंगून जाऊ या, प्रभू श्रीरामांना भक्तिभावपूर्वक नमन करू या. समस्त भाविकांना रामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
जय श्रीराम... श्रीराम जय राम जय जयराम...
#श्रीराम #श्रीरामप्रभू #श्रीरामनवमी #पवित्रदिवस #अयोध्या #प्रणाम
25/02/2024
आजपासून (२५ फेब्रुवारी) श्री जोतिबा खेट्यास प्रारंभ...
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील डोंगरावर वास्तव्य केलेला दख्खनचा राजा श्री जोतिबा हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान. माघ पौर्णिमा झाल्यानंतरच्या पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भाविक पायी चालत येतात, त्यास 'जोतिबाचे खेटे घालणं' असे म्हणतात. प्रत्येक रविवारी देवाचे दर्शन घेणे आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणे अशी परंपरा आहे.
जोतिबा अर्थात केदारनाथ हे उत्तरेहून दक्षिणेला आले होते. दक्षिणेतील दैत्यांचा संहार करुन अवतारकार्य पूर्ण झाल्यानंतर ते हिमालयात जायला निघाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवी त्या वेळी अनवाणीच धावत वाडी रत्नागिरीपर्यंत गेली आणि तिने श्री जोतिबा देवांना करवीर क्षेत्रात थांबण्याची विनंती केली. तिच्या विनंतीमुळे देव जोतिबा या डोंगरावर विराजमान झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. देवीच्या कृतीचे अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे रक्षण देवाने करावे, अशी विनवणी करीत भाविक हे खेटे घालत असतात.
वेगवेगळ्या देवतांच्या नावांच्या जयघोषात डोंगराच्या पायथ्याशी खेट्यांना सुरुवात होते. मंदिरात या वेळी सकाळी विविध विधी आणि स्तोत्रपठण होते. दहाच्या सुमारास जोतिबा देवाची अलंकारिक महापूजा बांधण्यात येते. त्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास मंदिरात धुपारती होते. भाविकांकडून मंदिराच्या शिखरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण सुरू असते. रात्री पालखी सोहळा पार पडतो.
श्री जोतिबा देवाची कृपा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना. देवाच्या खेट्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे मन:पूर्वक स्वागत...
#श्रीक्षेत्रजोतिबा #दख्खनचाराजाजोतिबा #खेटेप्रारंभ #प्रणाम #भाविकांचे_स्वागत
15/08/2023
आज (१५ ऑगस्ट) देशाचा स्वातंत्र्यदिन...
आज देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून या विशाल देशाला मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांच्यासह सर्वसामान्य जनतेने जो लढा दिला, त्याग केला, प्राणांचे बलिदान केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्यामुळेच १५ ऑगस्ट १९४७ या दिवसाचे महत्त्व अनमोल आहे. स्वातंत्र्याची गोड फळे चाखत असताना स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी केलेल्या सर्वांच्या त्यागाचे स्मरण ठेवू या. देश सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी, सामर्थ्यशाली बनविण्यासाठी कटिबद्ध राहू या.
सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
05/04/2023
दख्खनचा राजा, श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज 5 एप्रिल मुख्य दिवस.
यात्रेसाठी येणाऱ्या असंख्य भाविकांचे सहर्ष स्वागत...
चांगभलं...
#चांगभलं
17/04/2022
श्री महालक्ष्मी रथोत्सनिमित्त सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत..🙏
#महालक्ष्मीमंदिर #शक्तिपीठ #श्रीमहालक्ष्मीरथोत्सव #कोल्हापूर #भाविकांचे सहर्ष स्वागत.
16/04/2022
दख्खनचा राजा, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्री जोतिबा देवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत...🙏
21/10/2021
बिज़नेस कोणताही असो, आम्ही त्याचा ब्रँड करतो !! 🤩
तुमच्या बिज़नेसच प्रमोशन करायचे आहे ?
डिजिटल प्रोमोशनसाठी आम्ही आहोत...!
📲अधिक माहितीसाठी -8788102596
11/09/2021
सीए अमित सर आणि प्राजक्ता मॅडम यांच्या साखरपुडा समारंभाचे स्टेज डेकोरेशन जोतिबा इव्हेंट तर्फे करण्यात आले होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Kolhapur