YC KMC College Library
learning
28/02/2026
यशवंतराव चव्हाण ( के. एम सी) कॉलेज कोल्हापूर, ग्रंथालय विभागातील कर्मचारी श्री. प्रकाश रामचंद्र टिपुगडे, हे दि 28 फेब्रुवारी रोजी ग्रंथालय परिचर म्हणून सेवानिवृत्त झाले. कॉलेजमध्ये 35 वर्षे हून अधिक सेवा त्यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बी. एन. उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने श्री प्रकाश टिपुगडे व सौ सुषमा टिपुगडे व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, डॉ. जी. पी. माळी, विनायक मेस्त्री, जी. आर. हराळे, डॉ अमित रेडेकर, प्रा. पी. डी. तोरस्कर, डॉ. बी एम पाटील, डॉ सयाजीराव गायकवाड, डॉ. विकास नाईक आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल, प्रा .आर. आर. मांगले यांनी केले तर आभार डॉ संजय कांबळे यांनी मानले. डॉ. युवराज मोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व प्रकाश टिपुगडे यांचे परिवारातील सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
27/02/2026
दैनिक तरुण भारत दिनांक.27/2/2026
26/02/2026
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि भौगोलिक पर्यावरण कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर:
यशवंतराव चव्हाण ( के एम सी) कॉलेज, भूगोल विभाग,
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (सामाजिक बांधिलकी विभाग) व लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशन गर्जन यांचे वतीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि भौगोलिक पर्यावरण या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन दि 26 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून मा. सुहास वायंगणकर , जेष्ठ पर्यावरण तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यावरण दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे असा विचार व्यक्त केला. प्राचार्य डाॅ. बी. एन. उलपे यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण रक्षणाचे महत्व विशद केले. भूगोल विभाग प्रमुख डाॅ. जे. एम. शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर व लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई यांनी या कार्यशाळेस सहाय्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ युवराज मोटे यांनी केले तर आभार डॉ. संजय कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. आर आर मांगले, प्रा. पी. डी. तोरसकर, प्रा. एस एम शेख, डाॅ. अरूण पौडमल, प्रा ए. डी. मुडे, डाॅ .प्रशांत नागावकर , डॉ किरण भोसले,
डाॅ बी. एम. पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
20/02/2026
कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेज, कोल्हापूर. कॉमर्स विभागाच्या वतीने आज बुधवार दिनांक 18/02/2026 रोजी "Career opportunities in computerised accounting" या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रिसोर्स पर्सन म्हणून श्री विकास काशीद, संचालक वक्रतुंट कॉम्प्यूटर्स, कोल्हापूर लाभले. कॉम्प्युटर अकाउंटिंग मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या संधी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कॉमर्स विभागप्रमुख डॉ. बी.एम.पाटील, प्रा. महेश डांगे, प्रा. निकिता उरुणकर, प्रा. ज्योती तरोडे, डॉ. समीना जमादार, डॉ. रोहित बारशिंगे, डॉ. सयाजीराव गायकवाड आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
05/02/2026
*यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.)कॉलेज मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
*कॉलेजमध्ये मज्जा मस्ती बरोबरच करिअर घडवणे अत्यंत महत्त्वाचे* - मा. अनिल देशमुख
कोल्हापूर महानगरपालिकेचे
यशवंतराव चव्हाण केएमसी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे मा.अनिल देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे यांच्या हस्ते यशस्वी विदयार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांनी मजा मस्ती बरोबरच जीवनामध्ये करिअर घडविणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले. प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खेळाडूंना यश मिळवायचे असेल अथक परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे मत मांडले. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रमही सादर करण्यात आला. विदयार्थ्यांनी आपली कला सादर केली.यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे यांनी केले. यावेळी कॅप्टन डॉ. अमित रेडेकर, प्रा. पी.डी.तोरस्कर, प्रा.ए.डी मुडे, डॉ.राम पोवार यांनी तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सयाजीराव गायकवाड व प्रा.के.डी.झिटे यांनी केले तर आभार डॉ.राम पवार यांनी मानले.
05/02/2026
*कॉलेजमध्ये मज्जा मस्ती बरोबरच करिअर घडवणे अत्यंत महत्त्वाचे* - मा. अनिल देशमुख
कोल्हापूर महानगरपालिकेचे
यशवंतराव चव्हाण केएमसी महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे मा.अनिल देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांनी मजा मस्ती बरोबरच जीवनामध्ये करिअर घडविणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले. प्राचार्य डॉ बाबासाहेब उलपे यांनी आपल्या मार्गदर्शन पण भाषणात खेळाडूंना यश मिळवायचे असेल तर परिश्रमाशिवाय यश नाही असे सांगितले व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे यांनी केले. यावेळी कॅप्टन डॉ. अमित पुं रेडेकर, प्रा. पी.डी.तोरस्कर, प्रा.ए.डी मुडे, डॉ.राम पोवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सयाजी गायकवाड व प्रा.के.डी.झिटे यांनी केले तर आभार डॉ.राम पवार यांनी मानले.
05/02/2026
आज दिनांक ५/०२/२०२६ रोजी आपल्या यशवंतराव चव्हाण (केएमसी) महाविद्यालयांमध्ये *विविध गुणदर्शन* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे हे होते. तसेच ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक डॉ. अमित रेडकर यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पी. डी. तोरस्कर यांनी केले तसेच या कार्यक्रमप्रसंगी सन्माननीय प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा मनापासून आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. बी. एम. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ .सयाजी गायकवाड, प्रा. कुमुदिनी झिटे व प्रा. मयुरी तिकोडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती सदस्य व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सांस्कृतिक समिती प्रमुख
04/02/2026
कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेज, कोल्हापूर. कॉमर्स विभागाच्या वतीने आज बुधवार दिनांक 04/02/2026 रोजी "MBA Entrance Exam" या विषयावर गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रिसोर्स पर्सन म्हणून डॉ. माणिक पाटील, एम.बी.ए डिपार्टमेंट, डी.आर.के कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर लाभले. MBA Entrance Exam ची पूर्वतयारी, आणि एम.बी.ए विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एन.उलपे, कॉमर्स विभागप्रमुख डॉ. बी. एम. पाटील, प्रा. पूजा खोपकर, प्रा. निकिता उरुणकर, प्रा. ज्योती तरोडे, डॉ. समीना जमादार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. महेश वि.डांगे यांनी मानले.
25/01/2026
भारतीय लोकशाही व मतदान जागरूकतेवर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार संपन्न
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज, कोल्हापूर आणि एमजीएसएमचे दादासाहेब डॉ. सुरेशजी पाटील कॉलेज, चोपडा येथील राज्यशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता “भारतीय लोकशाही आणि मतदान जागरूकता” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या वेबिनारसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील राज्यशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. रविंद्र भानगे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “सध्याच्या काळात लोकशाही व मतदानाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाले असून मतदारांमध्ये राजकीय जागृती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.”
यावेळी यशवंतराव चव्हाण केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे यांनी भारतातील निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात एमजीएसएमचे दादासाहेब डॉ. सुरेशजी पाटील कॉलेज, चोपडा येथील प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी भारतीय निवडणुकांमध्ये उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजय कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन धुर्वे यांनी करून दिला, तर उपस्थित मान्यवर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे आभार डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी मानले. वेबिनारला प्रा. अनिल मुडे विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग यांचे मार्गदर्शन लाभले.
या ऑनलाईन एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनारला विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
25/01/2026
दैनिक सकाळ दिनांक.25/01/2026
24/01/2026
के एम सी कॉलेज येथे भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने या विषयावर कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर,
कोल्हापूर महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज येथे शिवाजी विद्यापीठ, न्यू. कॉलेज कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "भारतीय अर्थव्यवस्था: संधी आणि आव्हाने" या विषयावर कार्य शाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाट्न प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. राजकुमार वाईंगडे यांनी बिजभाषनपर विचार मांडले. भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने कशी वाटचाल करत आहे, त्याचे विभिन्न पैलू त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात प्रा. पी. एम. सोरटे यांनी ' जागतिकीकरण व उदारीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम' यावर आपले विचार मांडले. तर तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ. एम. बी. देसाई यांनी 'कृषी, उद्योगिक व सेवा क्षेत्रातील संधी व आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. पी. डी. तोरस्कर, यांनी केले तर पाहुण्याची ओळख अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ग्रंथपाल प्रा. आर. आर. मांगले यांनी केले. अर्थशास्त्र विभागातील प्रा. संतोष पाटील, डॉ. रोहित बारसिंग, डॉ. समिना जमादार, प्रा. कुंदनसिंग राजपूत आणि डॉ. सोहेल मुजावर यांनी नियोजन केले. महाविद्यालयातील विविध विभागातील डॉ. एस. टी. धुर्वे, डॉ. एस. पी. कांबळे, डॉ. जे. एम. शिवणकर, डॉ. पी. पी. नागावकर, प्रा. एस. एम. शेख व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. समीना जमादार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. दिनकर कबीर यांनी मांडले. राष्ट्रगीताने या कार्यशाळेची सांगता झाली.
13/01/2026
*यशवंतराव चव्हाण (केएमसी) महाविद्यालयामध्ये पारंपरिक वेशभूषादिन उत्साहात साजरा*
कोल्हापूर महानगरपालिका संचालित यशवंतराव चव्हाण (केएमसी) महाविद्यालय कोल्हापूर येथे दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी पारंपारिक वेशभूषादिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी विविध पारंपरिक वेषामध्ये आले होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, डॉ बाबासाहेब उलपे यांनी भूषविले. कार्यक्रम प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पी. डी. तोरस्कर यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषादिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक कॅप्टन डॉ. अमित रेडकर तसेच महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. आर आर मांगले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. कुमुदिनी झिटे यांनी मानले.
महाविद्यालयाचे सन्माननीय. प्राचार्य, डॉ बाबासाहेब उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्तम रित्या संपन्न झाला.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
2032 A Ward Gangavesh Dhotre Lane
Kolhapur
416012