Dr. Chetan Narake
Entrepreneur | Thai Trade Advisor | Cooperative - Public figure | Director Gokul Milk |
Dr. Chetan Arun Narake served as the Chief Financial Officer, Strategic Finance Expert and managed a business of 5 Billion USD (Rupees 41,000 Crores). He is an accomplished finance professional, entrepreneur, progressive politician, lecturer and public advocate for education and is considered one of the dynamic economist in Asia.
17/05/2026
वारणा खोऱ्याचे धडाकेबाज नेतृत्व, सामान्य जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
पन्हाळा–शाहूवाडी आणि वारणा खोऱ्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे “वारणेचा वाघ” अशी ओळख असलेले स्व. यशवंतदादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे लोकनेते होते. गरीब, शेतकरी, कामगार आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. कोणत्याही सामान्य माणसाच्या घरी जाऊन प्रेमाने जुणका-भाकर खाणारे आणि त्यांची कामे स्वतः उभी राहून मार्गी लावणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
मुंबई विधानसभेत यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना स्व. यशवंतदादा आमदार म्हणून सभागृह गाजवत होते. त्यांची आक्रमक शैली, अभ्यासू मांडणी आणि विकासासाठीची तळमळ यामुळे त्यांचा दबदबा संपूर्ण राज्यात जाणवत होता. त्यांनी पन्हाळा–शाहूवाडी परिसरात धरणे, रस्ते आणि विविध विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीला नवी दिशा दिली.
जनतेशी नाळ घट्ट जोडून ठेवणारे हे नेतृत्व आजही हजारो कार्यकर्त्यांच्या स्मरणात जिवंत आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव अनेकांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर पडला. अरुण नरके यांच्या राजकीय वाटचालीतही स्व. यशवंतदादांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. नरके साहेबांच्या नेतृत्वाला बळ देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
कामाचा धडाका, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि सामान्य माणसावर असलेले अपार प्रेम यामुळे स्व. यशवंतदादा आजही जनतेच्या हृदयात अढळ स्थान राखून आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!
डॉ. चेतन अरुण नरके
(संचालक, गोकुळ)
16/05/2026
कोल्हापूरातील शास्त्रीनगर मैदानावर छत्रपती वॉरियर्स मंडळ यांच्यावतीने “छत्रपती वॉरियर्स प्रीमियर लीग पाचगाव २०२६” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थित युवा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती वॉरियर्स मंडळाने विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांना खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ सातत्याने कार्यरत आहे. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
युवकांनी खेळातून शिस्त, संगभावना, नेतृत्व गुण आणि सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करावा. नुकतीच महाराष्ट्र व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर माझी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रात व्हेटरन्स क्रिकेट अधिक व्यापक करण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे मत व्यक्त केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक सामने सादर केले. मैदानावर खेळाडूंसह प्रेक्षकांचाही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला.
शुद्ध पनीर ओळखा आणि आरोग्य जपा!
आजकाल मार्केटमध्ये दुधापासून बनवलेल्या खऱ्या पनीर ऐवजी वनस्पती तेल आणि पावडरपासून बनवलेले 'अॅनालॉग पनीर' (Analoaue Paneer) मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तरी पनीर घेताना त्याची गुणवत्ता तपासा आणि भेसळयुक्त पनीरपासून स्वतःला आणि कुटुंबाला दूर ठेवा...
सतर्क राहा! जागरूक राहा
04/05/2026
दुग्ध व्यवसायात 'खरे पनीर' आणि 'चीज अॅनालॉग' यामधील फरक स्पष्ट करण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्या करिता महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.
अनेक ठिकाणी स्वस्त पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या चीज अॅनालॉगला पनीर म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे. पण आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या मेनू, बिल किंवा डिस्प्लेवर स्पष्टपणे नमूद करावे लागणार आहे की वापरलेला पदार्थ 'पनीर' आहे की 'चीज अॅनालॉग'. यामुळे ग्राहकांना योग्य माहिती मिळेल आणि ते योग्य खाद्यपदार्थाची निवड करू शकतील.
यामुळे ग्राहकांचे आरोग्य आणि आर्थिक हित सुरक्षित राहणार आहे. तसेच, या निर्णयामुळे दुग्ध व्यवसायालाही चालना मिळणार असून खऱ्या पनीरची मागणी वाढल्यास दूध उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल.
दुग्ध व्यवसायामध्ये विम्याचे महत्त्व !
दुग्ध व्यवसाय हा निसर्ग, प्राणी आरोग्य, बाजारातील चढ-उतार आणि अनपेक्षित घटनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. अशा परिस्थितीत विमा हा शेतकऱ्यांसाठी आणि दुग्ध व्यवसायिकांसाठी एक मजबूत आर्थिक संरक्षण कवच ठरतो.
02/05/2026
इयत्ता बारावी (HSC Board) परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
उन्हाळ्यात जनावरांची अशी काळजी घ्यावी...
12/04/2026
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
असंख्य गाणी आणि कोट्यवधी रसिकांच्या हृदयात आपली अमिट छाप सोडणाऱ्या आशाताई यांचे निधन झाल्याची वार्ता अत्यंत दुःखद आहे. ही भारतीय संगीतासाठी कधीही न भरून निघणारी पोकळी आहे.
त्यांनी आपल्या गायकीने प्रेम, वेदना, आनंद, विरह अशा प्रत्येक भावनेला स्वर दिला आणि संगीताला एक नवी ओळख दिली. त्यांची गाणी सदैव आम्हा रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
12/04/2026
विधानपरिषद काँग्रेस गटनेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री, आमदार मा. सतेज पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!!
आपणांस उत्तम आरोग्य, आनंदी जीवन लाभो ही, श्री आई अंबाबाई चरणी प्रार्थना!!
Satej D. Patil
गोकुळ दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी..!
संपूर्ण देशभरात केवळ दोन ठिकाणी उपलब्ध असलेली पॅरामेट्रिक विमा योजना आता आपल्या गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाचा संचालक या नात्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेऊन ही योजना अमलात आणल्याचा मला आनंद आहे.
या योजनेमुळे नैसर्गिक परिस्थितीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार असून, त्यांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षिततेचा आधार मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे विचार...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Shivaji Peth
Kolhapur
416012