Rohit R. Bhosale
गडकिल्ले, लेणी तसेच विविध प्राचीन स्थळांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे.
05/12/2025
https://youtu.be/0riicWVawbg?si=RmSy6Ch4DUZKYMcJ
बदलापूर बेलवली येथील ऐतिहासिक गद्धेगळ | Gaddhegal Stone, Badlapur बदलापूर बेलवली येथील ऐतिहासिक गद्धेगळ | Gaddhegal Stone, Badlapurनिसर्ग उद्यान, गणेश चौक, मांजर्ली, बदलापूर (पश्चिम) येथील गद्धेगळ...
निसर्ग उद्यान, गणेश चौक, मांजर्ली, बदलापूर (पश्चिम) येथील गद्धेगळ
या गधेगळाचे मूळ स्थान बदलापूर पूर्वेकडील शिरगाव इथले आहे. शिरगावातील ग्रामदैवताच्या मंदिराबाहेर हा गधेगळ उभारण्यात आला असावा. मात्र, काही कारणांनी किंवा गधेगळाबाबतच्या अंधश्रद्धेमुळे हा गधेगळ शिरगाव नजीकच्या एका शेतात फेकून दिलेल्या स्थितीत आढळला. २०१६मध्ये या शेतात इमारतीचे बांधकाम सुरु झाल्याने हा गधेगळ सुरक्षित राहावा म्हणून निसर्ग उद्यान, गणेश चौक इथे आणण्यात आला. जानेवारी २०१८मध्ये या गधेगळाचे हे स्मारक उभारण्यात आले आहे. या गधेगळाच्या मधल्या मोकळ्या जागेतील लेखन अस्पष्ट झाले आहे किंवा तिथे काही लिहीण्यातही आले नसावे. त्यामुळे या गधेगळाचा ठोस कालावधी आणि तो उभारण्यामागचे कारण सध्या अनुत्तरीत आहे.
मुळगाव बदलापूर येथील खंडोबा टेकडी तथा श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान या छोटेखानी टेकडीचा ट्रेक केला. बदलापूर स्थानका वरून मूळगाव ला जाण्यासाठी काळ्या-पिवळ्या टँक्सी शेअर मिळतात. अंदाजे एक ते दिड किमी चालल्यावर आपण टेकडीच्या पायाथ्याला पोहोचतो. बदलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून १०-१२ किमी अंतरावर असणाऱ्या मूळगाव गावातून या टेकडीकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरु होतात. पूर्वी येथे भेट देण्यासाठी सरळ डोंगरातून वर चढून यावे लागत असे. भाविकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी सोईस्कर व्हावं म्हणून काही वर्षांपूर्वी त्या बांधण्यात आल्या आहेत. टेकडीवर जाण्यासाठी सुस्थितीत अशा ५०० पायऱ्या आहेत. सर्व पायऱ्या चढून वर जाण्यासाठी अंदाजे ३०-४५ मिनिटे वेळ लागू शकतो. आजूबाजूला गर्द झाडी नटलेल्या या डोंगरावरून सुंदर असं बारवी धरण, चंदेरी किल्ला, म्हैसमाळ सुळका, माथेरान डोंगर असा सुंदर नजारा अनुभवायला मिळतो.
28/09/2025
https://rohitrbhosale.blogspot.com/2025/09/blog-post.html
इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा Rohit R. Bhosale, Rohit Bhosale Blog,
26/09/2025
Land Grant
Script Nagari
Language: Marathi mixed with Sanskrit
Provenance : Koprod, Thane District.
Dated : Shaka 1222-1300 CE
This inscription was commissioned by Jaideva who was appointed by Ramadeva to administer Kankan. Ramadeva is mentioned as 'mahamandaleshvara' under Ramachandradeva (Yadava of Devgiri). The inscription records the grant made by jaideva, of a village Supali to Vyavaharika. The boundaries of the donated village are also recorded. The Sun and the Moon depicted on top emphasizes that the grant will be valid until the Sun and the Moon lasts. The ass-curse in the text curses the violator of the grant (in old Marathi) as May your mother be deflied by a donkey. There is pictorial depiction of the same curse where only animal is visible.
_______________
भूमिदान
भाषा : संस्कृत मिश्रित मराठी
लिपी : नागरी
स्थान: कोपराड, जिल्हा ठाणे
शके १२२२ / इ.स. १३००
यादव रामचंद्रदेवाच्या कारकिर्दीतील या शिलालेखात त्याचा महामंडलेश्वर, सकल सैन्याधिपती रामदेव याने कोकण भागाची व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी जाईदेवाने व्यावहारिकास ' सुपली ' गावाचे दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखात गावाच्या सीमांचा निर्देश केलेला असून, सूर्य व चंद्र असे पर्यंत हे दानशासन कायम राहिल असे सूर्य चंद्राच्या कोरीव शिल्पावरून सूचित केले आहे. दानशासनावर कोरलेले गाढव मात्र शासनाच्या आज्ञेचे भंग करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या आईचा उल्लेख असलेले शापवचन स्पष्ट करते. शिलालेखातही हे शापवचन आढळते.
✍️ Rohit R. Bhosale
31/08/2025
मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा संगम होतो अशी दिशा अर्थात 'क्षितिज' होय. त्याने आपल्या प्रकाशाने समस्त धरणी व्यापून टाकली. ज्या दिशेने तो प्रकाशला त्यास उगवतीची दिशा असे म्हटले जाते. उगवतीकडून निघालेला हा मैत्रीचा सूर्य हा हळूहळू अंधारी बाजू मैत्रीरुपी प्रकाशाने लक्ख करण्या जसा जसा जात राहिला तसं तसा मागे काळोख पसरायला लागला, असा समज तत्कालीन प्रकाशात न्हाऊन निघालेल्या लोकांचा होऊ लागला. यातूनच उगवती व मावळतीच्या दिशेचा लोकांचा संघर्ष सुरू झाला. यातूनच या दोघांसहित, दोनाचे चार, चाराचे आठ असे समूह वाढतच जाऊन आपआपली मानव धर्माची अर्थात मैत्रीची व्याख्या करू लागले. या विविध व्याख्येच्या विसंगतीतून त्या विविध समूहात संघर्ष वाढू लागला आणि हा संघर्षाचे लोण क्षितीजावर मोठ्या प्रमाणावर उमटले. या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा केवळ आणि केवळ आजचे विज्ञान देऊ शकते. यासाठी खरे तर सर्वांनी मैत्रीने सोबत येत याचे उत्तर शोधायला हवे. किती दिवस जुन्या मळलेल्या आणि मळून मळून खड्डे भरलेली पायवाट तुडवणार आहोत. ती वाट सोडून देऊन नवी वाट चोखाळावी व ती असल्यास त्यावर चालावे असे नाही का वाटतं?
#धर्म #मैत्री
✍️ रोहित रा. भोसले
02/08/2025
दैनिक बहुजन सौरभ, दि. ०२ ऑगस्ट २०२५, पृष्ठ क्र. ३
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र, ड प्रभाग समिती कार्यालय, क.डों.म.पा., कल्याण पूर्व
केवळ कल्याणच नाही तर पर्यायाने महाराष्ट्र व भारतातील नागरिकांनी भेट द्यावे असे महामानवाच्या विचाराचे ज्ञानकेंद्र...
🔝 💙 💙🌍🙏💯
बीड खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड येथील अपरिचित लेणी...
कसे जाल ??
मध्य रेल्वेच्या कर्जत - खोपोली स्थानकाच्या दरम्यान येणाऱ्या केळवली अथवा डोळवली रेल्वे स्थानकावर उतरून बीड खुर्द या गावी पोहोचावे. सदर स्थानकावर उतरून दहा सीटर अथवा ऑटो रिक्षा माध्यम उपलब्ध आहेत. (वाहनांची संख्या मर्यादित असल्याने परतीच्या प्रवासासाठी येणाऱ्या गाडी वाहकाचा संपर्क क्रमांक घेतला तर उत्तम)
गावात आल्यावर छ. शिवाजी महाराज स्मारक येथून पाण्याची टाकीचा रस्ता विचारणे. पाण्याच्या टाकी येथून ट्रेक सुरु केला असता अवघ्या १५ मिनिटांत हा ट्रेक करत लेणी पर्यंत पोहोचता येईल.
टीप : सध्या उन्हाळ्याच्या दिवसात ट्रेक दरम्यान व्यक्तिपरत्वे मुबलक पाणी तसेच सुखा खाऊ बाळगणे. गावात दुकाने असल्याने छोटी मोठी व्यवस्था होऊ शकते.
धन्यवाद.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Kalyan
03/08/2025