dla.llp
Didactics Learning Assistance
23/07/2023
आपलं काम आणि आपल्या DLA संस्थेला आज 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या तीन वर्षात आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केलेत. आपण सर्वांनी या कामाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. कामात व्यस्त असल्यामुळे Meme सोडून इतर post बनवायला वेळ नाहीये. तसं हे तीन वर्षाचं काम म्हणजे छोटीशी सुरवातच आहे. कामाची परिणामकारकता वाढवत नेण्याचं ध्येय आहे. अशीच साथ राहूदे.
#फक्त_सुशिक्षित_नाही_तर_सुजाण_बनुया
- सूरज उर्मिला सुनिल (संचालक, Didactics Learning Assistance)
04/07/2023
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळ वृत्तपत्राने आपल्या कामाची दखल घेतली.
21/04/2023
नावनोंदणीचे शेवटचे 5 दिवस...
08/04/2023
जीवनउपयोगी शिक्षण म्हणजे Curiosity Camp!!!
आजच नावनोंदणी करा!
#फक्त_सुशिक्षित_नाही_तर_सुजाण_बनुया
16/03/2023
14/03/2023
आज इस्लामपूरच्या YC कॉलेजमध्ये Pi Day (3-14) निमित्त 'आपल्या सभोवतालचे गणित' या विषयावर व्याख्यान दिले. #गणितप्रेमी म्हणून हा दिवस माझ्यासाठी एक सणच होता. त्यामुळे कॉलेजकडून आमंत्रण आल्यावर खूपच खुश झालो होतो. आधीचे तीन-चार दिवस याची तयारी करून, खास नटून-थटून कार्यक्रमासाठी गेलो होतो.
नेहमीच्या शाळकरी विद्यार्थ्यांपेक्षा कॉलेजमध्ये बोलत असल्याने आजचा अनुभव वेगळा होता. आपल्या आजूबाजूला कुठं गणित असतं, गणिताचा खऱ्या आयुष्यात काय उपयोग होतो, निसर्ग सुंदर बनवण्यात गणिताची काय भूमिका आहे, गणिती कौशल्ये याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राष्ट्रागीत आणि Maths salute ने कार्यक्रमाची सुरवात झाली. Pi, fibonacci series, sine wave, वैज्ञानिक दृष्टिकोन यांबद्दल माझा अभ्यास या व्याख्यानातून मांडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. मेघा जाधव मॅडम, संतोष पाटील सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. गणितज्ञ रामानुजन आणि वैज्ञानिक सी व्ही रमन यांचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली. विद्यार्थिनी गायत्री जाधव आणि ऋतिका पाटील यांनी निवेदन केले. शैलजा पाटील मॅडम यांनी आभार मानले.
- सूरज उर्मिला सुनिल (मार्च 14, 2023)
24/12/2022
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित केलेल्या 'रामानुजन इंटरस्कुल कॉम्पिटिशन' स्पर्धेची अंतिम फेरी 22 डिसेंबर या दिवशी पार पडली. स्पर्धेसाठी सातारा, सांगली व इस्लामपूर येथील 8 संघांच्या 40 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. या सर्वांनी स्पर्धेचा आनंद घेत गणित दिन साजरा केला.
गणिताचे सामान्य जीवनातील महत्व कळावे व या विषयामध्ये रुची निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले गेले. वाळवा तालुका इंजिनिअर्स असोसिएशन, सुगत लर्निंग सेंटर आणि डायडॅक्टिक्स लर्निंग असिस्टंस या संस्थांनी स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण दिवस प्रश्नमंजुषा, सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, प्रकल्प, अशा विविध स्परूपांनी गणितातील अनेक पैलू सांगणारे प्रश्न मांडले गेले. यामध्ये पुढील संघांनी विजेतेपद पटकावले.
प्रथम क्रमांक: अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कुल, सांगलीचे
अद्वैत कुलकर्णी, ध्रुव ताकवडे, नितीश जाधव, निखिल आर्वे, शुभंकर पोळ
द्वितीय क्रमांक: कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय, इस्लामपूरचे नेहा आंबी, वैभवी खांबे, शर्वी पाटील, गौरी पाटील, मृदुला पाटील.
तृतीय क्रमांक: अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, साताराचे विश्वराज पवार, सिद्धार्थ फाळके, प्रथमेश कदम, प्रथमेश कदम, शिवम ढाणे, अथर्व पवार
ही स्पर्धा इस्लामपूरातील संभूआप्पा बुवाफन मठ येथे पार पडली. स्पर्धेचे सूत्रसंचालन व प्रश्नामंजूषेची रचना दीप जोशी, सोनम पोवार, सूरज उर्मिला सुनिल आणि सुमित वाघमारे यांनी केले. वाळवा इंजिनिअर्सच्या इंजि. सुनिल तवटे, इंजि. महेश मोरे, इंजि. सुनिल पाटील आणि इंजि. सत्यजित पाटील यांनी स्पर्धेचे नियोजन केले. मठाधिपती मिलिंद महाराज यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
18/12/2022
From the great response of 41 teams, we've managed to select 8 teams for the final round!
26/11/2022
_चला, 'राष्ट्रीय गणित दिन' साजरा करूया!_
*"Ramanujan Inter School Competition"*
*वर्ष चौथे*
🎲🧩🎰🧮📈📊🃏🕑
📏 या स्पर्धेसाठी शाळेचा 5 विद्यार्थ्यांचा संघ सहभागी होईल.
📏 या स्पर्धेची Stage 1 इस्लामपूर, सातारा आणि सांगली या शहरांत होणार आहे.
📏 त्यातून निवड झालेल्या संघांची दुसरी stage इस्लामपूर शहरात होईल.
📏 स्पर्धेमध्ये गणिती कोडी, खेळ, डोक्याला चालना देणारे प्रश्न असतील.
📏 इयत्ता: 7वी, 8वी आणि 9वी (सातवीचे 2, आठवीचे 2 आणि नववीचा 1 असे विद्यार्थी या संघामध्ये असतील.)
📏 एक शाळा 'पाच विद्यार्थ्यांचा एक' अशा जास्तीतजास्त 3 संघांची नोंदणी करू शकते.
📏 *प्रवेश फी: ₹400/- (₹80 प्रति विद्यार्थी)*
🗓️ *तारीख:*
Stage 1 (Selection Round): 17 डिसेंबर
Stage 2 (Final Round): 22 डिसेंबर
नावनोंदणीची अंतिम तारीख: 10 Dec 2021
🔢➕➖➗✖️♾️
*नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी:*
*www.dlallpofficial.wixsite.com/dlallp*
● याच वेबसाईटवर मागच्या वर्षीचा Stage 1 चा पेपर मिळेल.
● विद्यार्थ्यांनी शाळेची परवानगी घेऊनच हा form भरावा.
📞 *Contact us:*
सूरज: 9423395097
सुमित: 8421027310
*आयोजक:*
वाळवा तालुका इंजिनिअर्स असोसिएशन,
Sugat Learning Centre
Didactics Learning Assistance
02/11/2022
गणित कार्यशाळा सत्र क्रं. 23, 24, 25
मराठी विज्ञान परिषदेतर्फे पुणे शहरात विनय रमा रघुनाथ सरांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 दिवसात ही सत्रे घेतली.
1. 25 ते 60 वयोगटातील विज्ञान प्रसारकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये गणिताचा भाग आम्ही सांभाळला. हे सर्व शिक्षकमित्र त्यांच्या शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी हे सत्र पोचवतील.
2. AISSMS महाविद्यालतील NSS Volunteers साठी सत्र घेतले. हे सर्वजण NSS ने दत्तक घेतलेल्या गावामध्ये हे सत्र पोचवतील.
3. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या 'विज्ञान व्याख्यानमाला पुष्प ९४वे' लहानांपासून मोठ्यांपर्यंत जमलेल्या सर्वांसोबत 'गणिती प्रयोग' केले.
तीनही सत्रांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारा शिक्षकवर्ग भेटला.
या कार्यशाळेचा हेतू 'गणित जमणे' हा नसून 'गणिताची भीती जाणे' हा असतो. इथे आम्ही शिक्षक म्हणून न जाता #गणितप्रेमी म्हणून जातो आणि परीक्षेत मार्क्स पाडण्याच्या क्लुप्त्या न सांगता गणिताचा सामान्य जीवनातील उपयोग सांगण्यावर भर देतो.
- सूरज उर्मिला सुनिल (2-11-2022)
#फक्त_सुशिक्षित_नाही_तर_सुजाण_बनुया
23/10/2022
14/10/2022
मोहीम क्रं 2
नक्की सहभागी व्हा!
प्लॉगिंग चे फायदे:
1) Jogging पेक्षा जास्त calories चा वापर होतो.
2) पाठ, दंड, कंबरेचा व्यायाम होतो.
3) मानसिक आरोग्य सुधारते.
4) स्वतःबद्दल आदर निर्माण होतो.
टीप: हे समाजकार्य नाही. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा कचरा मातीत न जाऊ देणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. हेच आपण plogging च्या माध्यमातून साध्य करत आहोत.
#विवेकाचा_आवाज_बुलंद_करुया
#फक्त_सुशिक्षित_नाही_तर_सुजाण_बनुया
आयोजक:
RIT NSS विवेक वाहिनी
Didactics Learning Assistance
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Islampur