Vaishali Bankar
Ex Mayor, Corporator Pune
The promise is to build a city that is green, clean, prosperous and inclusive, where each and every citizen can realize their hopes and aspirations.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साह वाढवण्यासाठी शाळा पुन्हा सुरू झाल्या.
पुणे महापालिकेच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व खाऊचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले.
14/06/2026
पाणी कपात आणि नियोजनाबाबत प्रभागातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती…📢
१५ जूनपासून आपल्या पुणे शहरात पाणी कपात लागू होत आहे. या काळात आपल्या प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे.
05/06/2026
आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठक्कर विहार इन्क्लूज येथे पुणे महानगरपालिका यांच्या वतीने आज लक्ष्मी कॉलनी खासदार स्वर्गीय विठ्ठलराव तुपे उद्यानाच्या मागील बाजूला कॅनॉलवर तसेच शहीद हेमंत करकरे उद्यान या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी ५० झाडे लावून ते जिवंत ठेवण्यासंबंधी व पर्यावरण संरक्षण करण्यासंबंधात शपथ घेतली. या कार्यक्रमाला हडपसर मुंढवा क्षत्रिय कार्यालयाचे अध्यक्ष मामासाहेब तुपे सहाय्यक आयुक्त धुमाळ साहेब, मा.नगरसेवक सुनिल दादा बनकर, नगरसेवक आबासाहेब तुपे, नगरसेवक नितीन दादा गावडे, नगरसेवक दादासाहेब कोद्रे, ठक्कर विहार सोसायटीचे चेअरमन निकम साहेब, कर्नल थोरात साहेब, कर्नल नीलिमा मॅडम, कर्नल शिरोडकर साहेब, गार्डनचे गायकवाड साहेब त्याप्रमाणे एस आय, डी एस आय व लक्ष्मी कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
आमच्या कडे नेहमी आपल घर समजून येणारे दादा आता परत कधीच नाही येणार 💔
अजितदादा आपल्यातून जाऊन तब्बल चार महिने झाले, पण अजूनही मन मानायला तयार नाही की दादा आता आपल्यात नाहीत.
23/05/2026
आदरणीय श्री.प्रशांतदादा जगताप Prashant Sudamrao Jagtap यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा !
23/05/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार Sunetra Ajit Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पुणे शहरातील बारामती हॉस्टेल येथे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या.
यावेळी उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी, सूचना व मनोगत शांतपणे ऐकून घेत त्यांनी संवाद साधला. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी अशा बैठका निश्चितच दिशादर्शक ठरतात.
या बैठकीत संघटन मजबुती, पक्ष विस्तार तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सुनेत्रावहिनींनी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने आणि समन्वयाने काम करण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले.
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी #पुणे
19/05/2026
पुण्यनगरीच्या माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, उंदड आयु आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अनेकानेक सदिच्छा !
14/05/2026
अन्यायाच्या विरोधात लढण्याची, उदात्त हेतूच्या रक्षणार्थ समर्पणाची प्रेरणा देणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती...
छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आजही स्वराज्यातील प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी गाथा आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. एकाच वेळी ५-५ आघाड्यांवर विजय मिळवणारे रणधुरंधर, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी “बुधभूषण” हा संस्कृत ग्रंथ रचणारे प्रकांडपंडित म्हणून छत्रपती संभाजी महाराज म्हणून यांनी अवघ्या विश्वात लौकिक मिळवला.
स्वराज्याला लाभलेल्या या महान नेतृत्वाला, छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
#छत्रपतीसंभाजीमहाराज #स्वराज्यरक्षक #शंभूराजे #जयंती
10/05/2026
आई...
आपण मोठे होत जातो, तसं आयुष्य आपल्याला अनेक नाती दाखवतं.
पण प्रत्येक नात्यामागे निस्वार्थ प्रेम म्हणजे काय, हे शिकवणारी एकच व्यक्ती असते; ती म्हणजे आई.
ती आपल्या मुलांसाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवते, रात्रभर जागूनही सकाळी हसत उभी राहते, आपण हरलो तर धीर देते आणि जिंकलो तर शांतपणे डोळ्यांत आनंद साठवते…
जगातील प्रत्येक आईला जागतिक मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
#आई
08/05/2026
लोकप्रिय आमदार तथा पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा. सुनिल अण्णा टिंगरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐
Sunil Tingre
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Hadapsar
411028