Basic Activity Centre For Science And Solar Education
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Basic Activity Centre For Science And Solar Education, Education Website, Dombivli.
23/04/2024
विज्ञान खेळणी कार्यशाळा
02/11/2023
https://www.youtube.com/live/7Ho-W-OTMeQ?si=TJhiQ7Wszbap_X24
Today's program link 👇
SAKHI SAHYADRI Live Dt. 02.11.2023 SAKHI SAHYADRI Live Dt. 02.11.2023
01/11/2023
सौरऊर्जा वापर वेगाने वाढवणे ही काळाची गरज आहे. अजूनही 90 - 95 टक्के कुटुंबांमध्ये पारंपरिक इंधन वापरले जात आहे. सौरऊर्जा हा त्या इंधनांना पर्याय होऊ शकेल का? सर्वाना वापरता येणे शक्य आहे का? पावसाळ्यात काय करायचे? आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाचा फायदा आहे का? समाजातील समज/ गैरसमज असे अनेक प्रश्न आणि उत्तरे घेउन येत आहोत वरील कार्यक्रमात👆.
तेव्हा नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनला पाठवण्यासाठी जरूर पाठवा.
24/10/2023
Happy Dasara🌹🌹
10/09/2023
BASSE in collaboration with Don Bosco high School, kalyan was organized a workshop on "Making Science Toys" by Abhay Yawalkar on 9th september 2023. We received an overwhelming response from students and Science faculty.
27/08/2023
Finally.....Offline sessions starting in Dombivli !!
27/08/2023
मूलभूत कृतीशील विज्ञान आणि सौर ऊर्जा केंद्राच्या फिरत्या आणि ऑनलाईनला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर डोंबिवलीत ऑफलाईन केंद्र सुरु केलं आहे . विद्द्यार्थ्यांमध्ये मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, प्रयोगातून कृतिशील विज्ञान शिक्षण घेउन कौशल्य विकास व्हावा आणि दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करता यावा हे उद्दिष्ट समोर ठेवून अनेक उपक्रमांची आखणी केलेली आहे. या उपक्रमांचा फायदा होमीभाभा बालवैज्ञानिक, NMMS, NTS यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये होत आहे.
उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी https://basse.co.in/ संकेतस्थाळाला जरूर भेट द्या.
केंद्राचा पत्ता : 1, शंकर स्मृती, सुभाष रोड, RBL बँकेच्या शेजारी, डोंबिवली, पश्चिम.
संपर्क क्र. 098927 39798, 9869065547
15/05/2023
https://youtube.com/watch?v=OB_hVs0pFZU&feature=share
जी 20: ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या मुंबईतील बैठकीचं महत्व जाणून घेवूया! बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा.आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला .....
06/05/2023
"स्वयंपाक घरातील उपकरणे आणि इंधन बचत" या विषयावरील सह्याद्री दूरदर्शन वरील कार्यक्रमाची लिंक 👇
SAKHI SAHYADRI 04.05.2023 SAKHI SAHYADRI 04.05.2023
03/05/2023
शाश्वत विकासासाठी गृहिणींकडून स्वयंपाक घरात होऊ शकते हजारॊरुपयांची आणि राष्ट्रीय संपत्तीची बचत.
01/03/2022
*योग कार्यशाळा*
विद्यार्थी आणि पालक
सर्वाना नमस्कार
*मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा केंद्र, डोंबिवली* आयोजित योग कार्यशाळा
🗓️कधी : गुरुवार दिनांक 3 मार्च ते 10 मार्च
⏰वेळ : सायं 5 ते 6
शास्त्रशुद्ध पद्धतीने होणाऱ्या या वर्गात 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी आणि पालक सहभागी होऊ शकतील. अभ्यास करताना एकाग्रता, उत्तम आरोग्य आणि व्यायाम यांची सांगड घालणारा हा वर्ग असेल.
हे *वर्ग निःशुल्क* असून फक्त मुलांनी यात सातत्य ठेवावे आणि लॉकडाऊन काळात झालेले शारीरिक आणि मानसिक नुकसान भरून काढावे इतकेच ध्येय यामागे आहे. इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी आणि आपल्या जवळील नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे ही इच्छा. नोंदणी आवश्यक.
नोंदणीसाठी संपर्क
9892739798, 8422972628
01/03/2022
डॉ वसंतराव गोवारीकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनास सुरुवात करून दिली ती 1987 साली.
त्यावेळी ते भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख होते.सातत्याने 35 वर्ष विज्ञान दिन संपूर्ण देशभर साजरा करताना खूप आनंद होत आहे. साडेतीन दशकातील एकूण 33 विज्ञान दिन मला अनुभवता आले. काही वेळा तर एकाच दिवशी 2/3 कार्यक्रमांना मला मार्गदर्शक अतिथी म्हणून जाण्याची संधी विज्ञान प्रेमींनी दिली. यात शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था आणि प्रसार माध्यमांचा समावेश आहे. यातील काही शाळांमधून वारंवार बोलावणे तर असतेच परंतु या शाळा, संस्थांमध्ये निरनिराळे उपक्रम करून तेथे विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आजमितीला त्या संस्था विज्ञान दिन साजरा करण्याचे सातत्य टिकवून आहेत. याचे समाधान पैशात ही विकत घेता येणार नाही हे निश्चित. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा, प्रयोग सत्र, विज्ञान खेळणी कार्यशाळा, व्याख्याने, भित्तीपत्रक स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा होताना आज आपण पाहत आहोत. ही जमेची मोठी बाजू म्हणावी लागेल. जस जसा काळ जाईल तसतसे यात नावीन्यताही येईल. आता विज्ञान दिनाचा हा वृक्ष मोठा झालेला आहे. त्यावेळी संपूर्ण समाजापर्यंत विज्ञान कसे पोहचू शकेल यावर मेहनत घ्यावी लागेल. प्रदर्शन, भित्तीपत्रके हे समाजप्रबोधनाचे माध्यमे आहेत. या माध्यमांचा पारंपरिक पद्धतीने आपण वापर करतच आहोत. पण याबरोबरच कृतिशील उपक्रम अधिक प्रभावी ठरतील आणि ठरत आहेत हे निश्चित. रोजच्या वापरात येणारे विज्ञान समाजाला कसे उपयोगी आहे, त्यातून आर्थिक फायदा, वेळेची बचत, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि उद्या येणाऱ्या समस्यावर उपाय यावर भर द्यावा लागेल. विज्ञान वास्तवाला धरून असते, त्यातून फक्त आणि फक्त सत्यता ते समाजा समोर आणत असते. डॉ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे संशोधन आजही पदार्थाचा दर्जा तपासण्यासाठी उपयोगी ठरत आहे. कॅन्सर सारख्या आजारात गाठींचे स्वरूप बघण्यासाठी रमण यांचे संशोधन उपयोगी ठरत आहे.
यावर्षीचा विज्ञान दिन त्रिदल एजुकेशन सोसायटी ची पाटील बालमंदिर माध्यमिक शाळेत साजरा केला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुलांनी कमीत कमी वेळात प्रतिकृती तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे सर्व प्रतिकृती कार्यरत होत्या आणि ते पाहताना मुलांमधील आत्मविश्वास दिसत होता. याच ध्यासाने विज्ञान रुजलं तर देशात एक उत्तम वैज्ञानिक वातावरण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. यातूनच भावी पिढीला वैज्ञानिक मार्गाचा विस्तार करत आपले ध्येय गाठता येईल.
अभय यावलकर
विज्ञान अभ्यासक आणि प्रसारक.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Dombivli
421201
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 9pm |