Sham Saner

Sham Saner

Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)

19/02/2025

जागतिक कीर्तीचे लोककल्याणकारी, रयतेचे राजे, महाराष्ट्र आणि संपुर्ण भारताचे आराध्यदैवत, स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांनां त्रिवार मानाचा मुजरा.....!
शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा......

#छत्रपतिशिवाजीमहाराज #जयंती
#छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती

25/01/2025
25/12/2024

भारताचे माजी पंतप्रधान, प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन....💐

िहारी_वाजपेयी

25/12/2024

भगवान येशू ख्रिस्तांनी जगाला प्रेम, सत्य, दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केलं. भगवान येशूंच्या जन्मदिनानिमित्तानं साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो. ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Photos from Sham Saner's post 24/12/2024

लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते मा. राहुल जी गांधी, व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी परभणी येथे जाऊन आज मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. या भेटीपूर्वी सूर्यवंशी कुटुंबातील सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करून एकूण घटनाक्रम जाणून घेतला.

परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आयोजित आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला अटक करण्यात आली होती, न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, सोमनाथच्या मृत्यूला पोलीस यंत्रणा कारणीभूत आहे असा आरोप त्याच्या आईने केला आहे,

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे त्यातूनच परभणी, बीड सारख्या घटना वारंवार घडत आहेत. पिढीत कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आणि राज्यातील परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत काँग्रेस यापुढे लढा सुरूच ठेवणार असल्याचे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

19/11/2024

भैय्यासाहेब उत्कर्ष विश्वासराव पाटील यांचं आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले , त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो हीच भगवंता चरणी प्रार्थना .
भावपूर्ण श्रद्धांजली 💐

18/11/2024

सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शिंदखेडाच्या नागरिकांनी मला जे सहकार्य केले त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असेच प्रेम नेहमी माझ्या पाठीशी राहुद्या...

Photos from Sham Saner's post 18/11/2024

#भव्य बाईक रॅली संपन्न..
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद..!🏍️🏍️🏍️🛺

आज सोमवार,दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी भव्य प्रतिसाद दिला.जागोजागी होणारी पुष्पवृष्टी, वाद्यांचा गजर, पावलोपावली आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आबालवृद्ध, माताभगिनींनी केले औक्षण आणि सोबत चालणारी पाऊले ऑटो-रिक्षाची शंखनादाकडून विजयाकडे चाललेली वाटचाल दर्शवत आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या मनात आदर, आपुलकी आणि विश्वास आहे, याचा प्रत्यय या रॅलीच्यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवता आला. आपल्या प्रेम, आशीर्वाद आणि साथीबद्दल जनता जनार्दनाचे खूप खूप आभार!
२० तारखेला ऑटो रिक्षा 🛺 चिन्हासमोरील बटन दाबून शामदादांना  मोठे मताधिक्य मिळवून द्यावे, असे सर्वांना आवाहन आहे.
         
विकासाचा अनु.क्र. 11
निशाणी:-🛺 ऑटो रिक्षा

🛺🛺🛺🛺विकासाची बुलंद निशाणी म्हणजे आपली ऑटो रिक्षा 🛺🛺🛺🛺

लोकप्रिय अपक्ष उमेदवार
        अ.क्र.11. शामकांत रघुनाथ सनेर
#हक्काचीरिक्षा
#सच्चेनेतृत्व #श्यामदादासोबतजनतेचा_आशीर्वाद
#परिवर्तन #शिंदखेडातालुका #परिवर्तनाचीवाटचाल #शिंदखेडा #शामकांतसनेर
#विकासाचीशपथ #विकसनशीलगाव #जनतेचा_हक्क_शामसनेर

Photos from Sham Saner's post 08/11/2024

मेथी गावात दणदणीत जाहिर सभा झाली!

आज मेथी गावात लोकांशी थेट बोलताना जो अनुभव आला, तो सांगणं कठीण आहे. तुमचं प्रेम आणि उत्साह बघून खूप आनंद झाला. या सभेत सामील होऊन, गावाच्या हक्काच्या विकासावर तुमच्याशी चर्चा करायला खूप छान वाटलं.

या सभेला उपस्थित राहून आपला उत्साह वाढवणारे सर्व मान्यवर नेते – मा. नाथ तुकाराम माळी, मा.आ. रामकृष्ण तात्या पाटील, अँड. एकनाथ भावसार, हेमराज पाटील, बापू महाजन, निंबा दाजी पाटील, प्रकाश माळी, सखाराम भाऊ माळी, रवींद्र माळी, सदाशिव तात्या, बापू काळु, देगाव रणजीत पाटील, बुरा पाटील, उन्मेश वाडिले, आणि ज्ञानेश्वर पाटील आणि दादाभाई कापुरे यांचे खूप खूप आभार!

आम्ही रिक्षा ह्या चिन्हावर विश्वास ठेवतो – जसं रिक्षा गावाच्या गल्लीत-गल्लीत पोहोचते, तसंच आम्ही तुमच्यासोबत गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवणार आहोत.

आम्ही जो वादा करतो, तो नक्की पूर्ण करणार आहोत. तुमचं प्रेम आणि पाठिंबा मिळाला की, गावाला खूप पुढं नेऊ शकतो. चला, एकत्र काम करूया आणि शाम सनेर यांच्या नेतृत्वात गावाचा विकास करूया!
#विकासाचीशपथ #मेथीगाव #जाहिरसभा #गावविकास #नेतृत्व #समाजसेवा #विकसनशीलगाव

Category

Telephone

Address


Dhule

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sham Saner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Dhule.