Konkan

Konkan

Share

Konkan is a great place for tourism, traveling in Konkan can bring happiness and excitement in your life.

Come and enjoy the beauty of the Konkan coast, the roaring waterfalls, the diverse nature, the forts that witness the Swarajya and the delicacies.

13/08/2022
09/04/2022

Prraful Chavan Dial To Travel

03/06/2021

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा मानला जातो. सिंधुदुर्गाची बोली भाषा मालवणी आहे. अगोदर रत्नागिरी जिल्ह्यात हा मोडला जात होता. १ मे, इ.स. १९८१ साली याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा कोकणातील स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सिंधुदुर्गाची लोकसंख्या सुमारे ८,४८,८६८ (२०११) आहे . हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे ज्या मध्ये सर्वाधिक असे ३८ किल्ले आहेत, ज्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि भुईकोट अशा प्रकरच्या किल्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा भला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट हि या जिल्हातील प्रमुख मासेमारी बंदरे आहेत.

सिंधुदुर्ग मध्ये ग्रामीण जीवन अनुभवता येते. मुख्य रोजगार शेती हा असून तांदुळ, नारळ, कोकम, आंबा आणि काजू हि पिके घेतली जातात; आणि किनारपट्टी भागात मोठया प्रमाणात मासेमारी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हा तालुका लाकडी खेळणी बनविण्याच्या व्यवसायासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

निसर्ग सौंदर्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९९९ साली महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

प्रेक्षणीय स्थळे:
तेरेखोल किल्ला, आंबोली - थंड हवेचे ठिकाण, सावंतवाडी - राजवाडा, निवती, भोगवे, संत राऊळ महाराज मठ - कुडाळ, पाट तलाव (पाट), देवबाग, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला, जय गणेश मंदिर - मालवण, चिवला समुद्र किनारा, रॉक गार्डन, आचरा समुद्र किनारा, आचरा खाडी(बॅकवाटर), कुणकेश्वर मंदिर, देवगड किल्ला व दीपगृह, धामापूर तलाव, पुरळ, मिठबांव, तारामुंबरी, सावडाव धबधबा, आणि विजयदुर्ग किल्ला.

भौगोलिक माहिती:
सिंधुदुर्ग जिल्ह्याला शुक, कर्ली, गडनदी, तेरेखोल, आचरा, तिल्लीरी, आणि देवगड ह्या नद्या लाभलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाच्या चतुःसीमेला पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्व दिशेला कोल्हापूर जिल्हा, दक्षिण दिशेला गोवा राज्य आणि उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे. या मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला व्यावसायिक क्षेत्रचा दर्जा पण येतो.

जर कोणाला माहिती अपुरी वाटली असेल किंवा कोणाकडे अजून माहिती असेल तर आम्हला कॉमेंट मध्ये पुरवावी अशी विनंती.

आम्हाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

28/05/2021
21/05/2021
17/05/2021
Want your business to be the top-listed Travel Agency in Chiplun?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Chiplun
415605