Terav
Terav is located on hill top,7 km away from chiplun and 2.5 km from Mumbai Goa Highway.Shree Bhawani Aai Waghjai Temple is situated in a beautiful village.
01/05/2026
*अभिनंदन! अभिनंदन!! टेरवची सुकन्या सोनिया हिचे मनःपूर्वक अभिनंदन!*
तळेवाडी, टेरवचे सुपुत्र डॉक्टर नितीन यशवंतराव कदम यांची कन्या आणि ऍडव्होकेट यशवंतराव बाबुराव कदम यांची नात, कुमारी सोनिया हिने अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी मधून एम.एस. ( मास्टर्स) पदवी उत्तम गुण मिळवून प्राप्त केली त्या बद्दल तिचे व तिच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक:-
जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, टेरव.
ग्रामपंचायत टेरव
03/10/2024
|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||
शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर !
आजपासून सुरू होणाऱ्या घटस्थापना आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा ! आपणा सर्वांना सुखी, समृद्ध, निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना !
21/09/2024
आग्रहाचे निमंत्रण
*श्री क्षेत्र टेरव येथे भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन*
टेरव नवरात्रोत्सव २०२३
12/09/2023
सस्नेह निमंत्रण
*श्री क्षेत्र टेरव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.*. परमेश्वराचे ठायी चित्त स्थिर होण्यास भजन, कीर्तन, हरिपाठ या सारखे अन्य साधन नाही. भजन कीर्तनामुळे दिवसेनदिवस श्रद्धा बळकट होऊन भक्तांचे मन हरिनामात रमू लागते व संसाराची झळ कमी होऊन मन प्रसन्न राहते व खऱ्या सुखाचे अनुभव येवू लागतात असे संताचे सांगणे आहे.
म्हणूनच रूढी- परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात पौष शु. पंचमी शके १९४४ *मंगळवार दिनांक २७ डिसेंबर २०२२* रोजी सकाळी घटस्थापना करून विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताहाच्या या आनंद सोहळ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ व त्या नंतर नामांकित किर्तनकारांच्या किर्तनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्रौ हरी जागर करण्यात येईल. हरिनाम सप्ताहच्या या कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ-भाविक आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण करणार आहेत.
सप्ताहाची सांगता पौष शु. (द्वादशी) *मंगळवार दिनांक ३ जानेवारी, २०२३* रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनाने करण्यात येईल, तसेच दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत हंडी फोडून काला करण्यात येईल व घट हालवून विधीवत पूजा करून वीणा उतरविला जाईल. काल्याचे कीर्तन झाल्यावर दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत *महाप्रसादाचे* आयोजन करण्यात येणार आहे. तरी वरील हरिनाम सप्ताहात होणाऱ्या भजन, कीर्तन, हरिपाठ तसेच महप्रसादास आपल्या *इच्छेनुसार यथाशक्ती* सहकार्याची अपेक्षा आहे. या बाबत देवस्थानचे खजिनदार श्री राजेन्द्र प्रभाकरराव कदम ( 9834220464) किंवा मंदिर व्यवस्थापन समिती यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. *आर्थिक सहभाग ऐच्छिक असला तरी आपली उपस्थिती मात्र प्रार्थनीय आहे.* अखंड हरिनाम सप्ताहात जात - पात, गरीब - श्रीमंत असा भेदभाव न करता फक्त आणि फक्त भक्तिभाव जपला जातो आणि हाच भक्तीभाव प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जा देत असतो, त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे ही काळजी गरज आहे असे मत अनेक कीर्तनकार मांडत असतात.
तरी सर्व ग्रामस्थ, भाविक, बंधू-भगिनीनी या उत्सवात सहभागी होऊन नामज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. *निमंत्रक:- ग्रामस्थ, श्री क्षेत्र टेरव.*
15/12/2022
*_जनआक्रोश आंदोलन_*
*जनआक्रोश आंदोलन संकल्पना-*
आपण सगळे नवीन वर्ष, शिमगा,उन्हाळी सुट्टी,गणेशोत्सव,दिवाळीकरीता गावी जात असतो.या कालावधीत मागील 12 वर्षांपासून आपण खड्यातुन रस्ता शोधत गाडी चालवत आहोत.
मी रुपेश दर्गे दिवाळीसुट्टीनिमित्त गावी दुचाकीवर जाण्याचा योग आला आणि या कालावधीत खड्यात रस्ता पाहून मनात कुठेतरी हळहळ निर्माण झाली. आपल्यासारख्या धरधाकट व्यक्तीला एवढा त्रास होत असेल तर गावी वैदकीय उपचाराची उणीव असल्याने एखाद्या आजारी व्यक्तीला मुंबईत हलवावी लागते त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल,आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची अवस्था किती बिकट होत असेल आणि हे सगळं आपण तरुण उघड्या डोळ्याने पाहतोय हे पटण्यायोग्य न्हवत. मग सुरुवात झाली ती SOCIAL MEDIA चा वापर करून 10000 कोकणकरांना एकत्र आणण्याची.
मुंबई गोवा महामार्ग जखम असल्याने त्यावर शासनाकडून वेळोवेळी मलमपट्टी करण्यात येते पण पुन्हा ती जखम मोठी होते हे सर्वाना माहिती होत आणि या जखमेवर जालीम उपाय म्हणून सुचली ती जनआक्रोश आंदोलन संकल्पना...
*जनआक्रोश आंदोलन कशासाठी-*
1) 2010 ते 2022 12 वर्ष उलटूनही महाराष्ट्रातुन जाणारा 471 किलोमीटरचा महामार्ग बनायला 12 वर्ष लागतात मात्र 74 किलोमीटर रस्ता पूर्ण करून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होत असेल तर आमच्या महामार्गाला एवढा वेळ का?
2)कोकणात एकजूट नसल्याने सरकार कोकणी माणसांचा गैरवापर करून घेत आहे आणि हा गैरवापर थांबून कोकणकरांना दबाव यंत्रणा बनवायची असेल तर सगळे हेवे दावे,राग,दोष, पक्ष विसरून कोकणकर म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे.
3)मागील 10 वर्षात 3000 कोकणकर अपघातात दगावले.कोणाच्या पोटचा गोळा गेला तर कोणाचा कर्ता कमावता गेला. कोणाची माय माऊली गेली.जेव्हा आपला हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हाच या 3000 कोकणकरांना खरी श्रद्धांजली राहील.
4) कोकणात अद्यापही मोठे सर्व सुविधांसहित एखादा सुसज्ज दवाखाना नाही त्यामुळे मुंबईशिवाय पर्याय नाही त्यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीला मुंबईला आणायला किमान रस्ता असणं गरजेचे आहे पण तो रस्ताच नसल्याने माझा कोकणकर जिवाला मुकतोय मग यासाठीच आपल जनआक्रोश आहे.
5) स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली यामध्ये कोकणाचा रस्ता बनवायला 12 वर्ष गेली. बनविण्यात येणारा रस्ता जर का आताच व्यवस्थित न बनवता फक्त मलमपट्टी लावली तर कोकणकरांना पुन्हा 50 वर्ष वाट पाहावी लागेल, हे अस न व्हावं रस्त्याला 10 वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशा पद्धतीत रोड असावं यासाठी आपल जनआक्रोश आंदोलन.
6) 471 किलोमीटर रस्ता बनवण सोडून टोल नाके वसुलीकरिता उभे राहिले हे टोल 471 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत नाही तो पर्यंत चालु होऊ न देणे यासाठी जनआक्रोश आंदोलन.
7) एखाद्या घरातील कर्ता कमावता या मुंबई महामार्ग अपघातात मृत्यूमुखी पडला असेल किंवा या खड्यांमुळे एक जरी कोकणकर यापूढे जिवाला मुकला तर शासनाकडून नाही तर संबंधित ठेकेदाराकडून 10 लाख भरपाई मिळावी या तरतुदीसाठी जनआक्रोश
8) अपूर्ण महामार्ग असल्याने घडलेल्या अपघात क्षेत्रातील जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी, तहसीलदार,जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी जनआक्रोश.
*जनआक्रोश आंदोलनाची जनजागृती कशी करावी-*
1)यासाठी गावागावात आणि वाडीवाडीत प्रत्येकाने पुढाकार घेऊन स्वतः संयोजक बनून लोकांच्या भेटी घेणे जेणेकरून शेवटचा व्यक्ती संपर्कात येईल.
2)आपण मुंबईत राहतो त्याठिकाणी अजूनही 20-25 कोकणकर राहत असतील त्यांना एकत्र जमवून जनआक्रोश आंदोलनबद्दल माहिती देणे.
3)मुंबईतील प्रत्येक विभाग /वॉर्डनुसार ज्याला जमेल तिथे स्वतः आयोजक/संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारून कोकणकरांना जनआक्रोशबाबत माहिती देणे.
4) आपल्या ओळखीतील मंडळ/संघटना/प्रतिष्ठान असतील त्यांना भेटी देणे
5) रेल्वेत प्रवास करताना आपल्या कोकणासाठी न लाजता जास्तीत जास्त जनआक्रोशबाबत प्रचार व प्रसार करणे.
6)रेल्वेस्टेशनला प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून एखादा 2X2 फूट साईझचा बॅनर घेऊन सही मोहीम राबविणे व वयक्तिक भेट घेऊन जनआक्रोशबाबत माहिती देणे.
7) वाहन चालक मालक संघटनानी स्वतःहून पुढाकार घेऊन सभा चालु करून जनआक्रोशबाबत माहिती देणे.
8)जिल्हा,तालुका,विभाग नुसार प्रत्येकाने आपआपल्या लेव्हलला सभा घेऊन जनआक्रोशबाबत माहिती देणे.
9)कोकण रेल्वेत प्रवाश्यांसोबत जनआक्रोश बाबत चर्चा करून त्यांचा यामध्ये सहभाग नोंदविणे.
10)ज्याला जमेल त्या पद्धतीने आपल्या चौकात, मुंबई गोवा हायवे लगत बॅनर लावणे.
11) या सर्व कामांसाठी कमिटी बनतील तेव्हा बनतील परंतु तत्पूर्वी आपण सगळ्यांनी वरील गोष्टींसाठी प्रयत्न करून झालेल्या भेटीबाबत ग्रुपवर माहिती सह फोटो शेअर करणे तसेच स्वतःच्या फेसबुक अकाउंटला माहिती प्रसारित करणे जेणेकरून लोकांचा उत्साह वाढेल.
12) आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रडायला नाही तर लढायला शिकवलं आहे आणि आपण सगळे जनआक्रोशमध्ये सामील होण गरजेचं आहे. लढाई म्हणजे काठ्या-लाठ्या, तलवारी घेऊन लढायचा नाही तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या संविधानाद्वारेच लढायचा आहे.जेणेकरून कोणताही कोकणकर कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही.
जनआक्रोश कशासाठी? त्याची संकल्पना काय? जनजागृती कशी करावी याबाबत सर्व माहिती आहे. आपण सगळेच कामाला लागलोय पण आतापासूनच अगदी जोमाने कामाला लागा ही आपणांस विनंती.
चला सर्व कोकणकरांनी निर्धार करूया...
एक लाख कोकणकरांना जनआक्रोश आंदोलनात सामील करूया.
*जनआक्रोश आंदोलनात सामील होण्यासाठी
संपर्क करा*
❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
एक कोकणकर
Adv स्मिता कदम
🙏🏻
11/12/2022
04/10/2022
नववी माळ
#नवरात्रोत्सव२०२२
#भवानीमाता
03/10/2022
आठवी माळ 🙏
#नवरात्रोत्सव२०२२
#भवानीमाता
#आईवाघजाई
#अष्टमी
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the place of worship
Telephone
Website
Address
Terav, Taluka Chiplun, Dist. Ratnagiri
Chiplun
415605