Champavatee Patra

Champavatee Patra

Share

मराठवाड्यातील सर्वात जुने अग्रणी दैनिक

16/04/2026

📍 मुंबई

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत खळबळ उडवून दिली आहे. कॉल डिटेल्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट मोठे असून यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26793

#चंपावतीपत्र #नागपूर #परळी #देवेंद्रफडणवीस #महानिर्मिती #ऊर्जासुरक्षा #महाराष्ट्र #आजचीबातमी

16/04/2026

📍 बीड

भूसंपादन मावेजासाठी ५४ कोटींचा निधी मंजूर.
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26792

#चंपावतीपत्र

16/04/2026

📍 मुंबई

“ठाकरेची तिसरी पिढी शिवसेनेचे नेतृत्व करणार?”
राजकारणात आता ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वाची चर्चा रंगू लागली आहे.
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याचे संकेत.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26791

#चंपावतीपत्र

16/04/2026

📍 बीड

गेवराई तालुक्यातील मादळमोह आणि जहारवाडी येथील लघु-पाटबंधारे तलावांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची लूट सुरू आहे. या अवैध पाणी उपशामुळे आगामी काळात ३५ हजार नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26790

#चंपावतीपत्र #बीड #गेवराई #पाणीटंचाई #महाराष्ट्र #आजचीबातमी

16/04/2026

📍 केज

केज पोलिसांनी हॉटेल न्यू शिवनेरी परिसरात धडक कारवाई करत अवैध दारू साठा जप्त केला.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26789

#चंपावतीपत्र #बीडन्यूज

15/04/2026

📍 बीड

कौशल्यवर्धन प्रकल्पाला गती मिळाल्याने रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26739

#चंपावतीपत्र #बीड

15/04/2026

📍 बीड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अल्पोपहार व थंड पाणी वाटप

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26738

#चंपावतीपत्र #जयभीम #बीड

15/04/2026

📍 अंबाजोगाई

रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मजुराच्या घरावर हल्ला करत चोरी केली. ४ लाखांची रोकड सह दागिने लंपास.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26735

#चंपावतीपत्र #बीड

15/04/2026

📍 बीड

१७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप!

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26734

#चंपावतीपत्र #संप #महाराष्ट्र

15/04/2026

📍 बीड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये अभूतपूर्व गर्दी उसळली. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26733

#चंपावतीपत्र #जयभीम #आंबेडकरजयंती #बीड #महाराष्ट्र

14/04/2026

📍 गेवराई

गेवराई तालुक्यातील रामनगर तांडा येथे गायरान जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात अर्जुन साहेबराव माळी यांचा मृत्यू झाला होता. जमिनीचा बांध कोरल्याच्या कारणावरून हा वाद विकोपाला गेला होता. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि पसार झालेल्या आरोपींना अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26670

#चंपावतीपत्र #गेवराई #बीड #महाराष्ट्रपोलीस #क्राईमबातम्या

14/04/2026

📍 केज

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयास्पद परिस्थितीमुळे हा केवळ अपघात आहे की घातपात, याबाबत जनमानसात शंका निर्माण झाली आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले आहे.

📰 संपूर्ण बातमी वाचा
👉 https://epaper.champavateepatra.in/clip/26668

#चंपावतीपत्र #बीड #केज #मराठीबातम्या #महाराष्ट्र #आजचीबातमी

Want your business to be the top-listed Media Company in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Sahyog Nagar, Jalna Road
Bhir
431122