Dr Hedgewar Hospital

Welcome to the official Dr. Hedgewar Hospital page. Dr. Hedgewar Hospital is a
public charitable hospital located in Aurangabad, Maharashtra.

Photos from Dr Hedgewar Hospital's post 21/06/2024

आज आपल्या रुग्णालयात 21 जून, 10 वा अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून योग थेरपी ओपीडी चे उद्घाटन डॉ राजश्री रत्नपारखे (सीईओ) व डॉ. रंजना देशमुख (सिनियर कन्सल्टंट) मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आनंद फाटक सर, डॉ. सुधीर देशपांडे सर, डॉ. रेणू चौहान मॅडम, डॉ. नीरज इनामदार सर, डॉ. सीमा कुलकर्णी मॅडम, डॉ. आदित्य वैद्य, मेनेजर्स व कर्मचारी उपस्थित होते.
हि योग थेरपी ओपीडी सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते ३ यावेळेत मेडिसिन ओपीडी च्या कॅम्पस मध्ये सुरू असेल. ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णासाठी शनिवारी व रविवारी सकाळी ६.३० ते ८ वाजेदरम्यान योगवर्ग घेतल्या जाईल.

21/06/2024
20/06/2024

१० व्या जागतिक योग दिनानिमित्त डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये २१ जून २०२४ रोजी योग थेरपी ओ पी डी सुरू करण्यात येत आहे. या ओ पी डी ची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते ३ च्या दरम्यान असणार आहे. या वेळेत योगतज्ञ डॉ. प्रशांत देशमुख ( योग थेरपी कन्सल्टंट) उपलब्ध असतील.
योगोपाचार करण्यासाठी सकाळी ६.३० ते ८ दरम्यान उपचार वर्ग डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये घेण्यात येतील.
वर्गात प्रवेश घेण्यासाठी योग थेरपी ओ पी डी मध्ये दाखविणे गरजेचे आहे. सुरवातीच्या काळात ही सेवा रुग्णालय प्रशासनाने अल्प दरात उपलब्ध करून दिली आहे.
योग थेरपी ओ पी डी मध्ये मुख्यत: जीवनशैली संबंधित मुलांचे, तरुणांचे, महिलांचे व वयस्क व्यक्तीच्या आजाराबाबत योग थेरेपी मार्गदर्शन व उपचार केले जातील.

21/04/2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान डॉ हेडगेवार रुग्णालय गेली 34 वर्षे सामाजिक बांधिलकी जपत योगदान देत आहे.डॉ हेडगेवार रुग्णालयाच्या सोबतीनेच 80 सेवा वस्त्या आणि 900 गावात विविध सामाजिक विषयात काम करून वंचित अपेक्षित समाजाच्या उत्थाना साठी 85 पेक्षा अधिक प्रकल्प राबवित आहे.आता संस्थेचे श्री रामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या नावाने वैद्यकीय महाविद्यालय ही येत आहे.या सर्व सेवा ईथुन पुढे अधिक लोकाभिमुख,अधिक लोकोपयुक्त होतील हे नक्की. उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण तर दिले जाईलच शिवाय गरजु ,असहाय्य रुग्णांच्या साठी अधिक ठोस सुविधा दिल्या जातील.त्यातील एक पाऊल म्हणून डॉ हेडगेवार रुग्णालयात एक महिना चालेल असे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.गरजूंना लाभ मिळावा या साठी ही फे बु पोस्ट.अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.

20/04/2024

डॉ. हेडगेवार रुग्णालयातील प्रसिद्ध Spine Surgeon डॉ. सिद्धेश्वर ठोसर यांच्याबद्दल रुग्णांनी व्यक्त केलेला त्यांचा अनुभव - कंबरेच्या चौथ्या-पाचव्या मनक्यात दबलेल्या नसेचे ऑपरेशन झाल्यानंतर- स्वतः पेशंट चा अनुभव!!

मणक्याचे आजार आणि शस्त्रक्रिया म्हणजे प्रचंड वेदना, महिनोन महिने अंथरुणावर पडून राहणे, पायातील ताकद कमी होणे , कालांतराने पुन्हा दुसऱ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाणे, असे अनेक समज गैरसमज रुग्णांच्या मनावर राज्य करताना दिसतात. वस्तुस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे! आज मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पहिल्याच दिवशी चालू - फिरू शकतो, मोजक्याच दिवसात सर्व कामे पहिल्यासारखी करू शकतो. एवढेच नव्हे तर सूक्ष्मदर्शक यंत्राच्या / दुर्बिणीच्या वापरामुळे मज्जारज्जूच्या नसेला धक्का लागणे ही गोष्ट आजकाल केवळ दुरापास्त आहे. अशा अत्याधुनिक उपकरणांमुळे ही शस्त्रक्रिया आता अत्यंत सुरक्षित व दीर्घकाळासाठी यशस्वी होते.

14/04/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

07/04/2024

जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे - "My Health My Right". यावर्षी आपण स्वतः च्या आरोग्याच्या हक्काबाबत माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूयात.

01/04/2024

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी मूत्रपिंडाच्या आरोग्यावर आयोजित करण्यात आलेल्या CME चां सर्व डॉक्टरांनी लाभ घ्यावा. नोदणी आवश्यक.

Photos from Dr Hedgewar Hospital's post 14/03/2024

जागतिक किडनी दिनानिमित्त डॉ हेडगेवार रुग्णालयामध्ये किडनी आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तसेच येथे दिलेल्या माहितीचा उपयोग आपल्या किडनी च्या उत्तम आरोग्यासाठी करावा. आपल्या मार्गदर्शनासाठी रुग्णालयातील Nephrology विभाग सतत कार्यरत आहे.

08/03/2024

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Photos from Dr Hedgewar Hospital's post 23/02/2024
19/02/2024

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

16/02/2024

दिनांक ८ मार्च २०२४- जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. हेडगेवार रुग्णालयामधील स्त्रीरोग विभागामार्फत सर्व महिलांसाठी बाह्यरुग्ण विभागात विशेष सवलतीच्या दरात तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा दिनांक ८ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान नोंदणी करून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा खाली दिलेल्या आहेत.

09/02/2024

https://www.facebook.com/spmesmandal/live_videos/

दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जालना येथे होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे लाईव्ह पाहण्यासाठी वरील लिंक आहे. जालना व्यतिरिक्त (संभाजीनगर शहर ग्रामीण, विभाग, प्रांत) येथील शुभचिंतकांना जॉईन होण्यासाठीच ही लिंक आहे. जालन्यातील लोकांनी समक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही अपेक्षा विनंती.

01/02/2024

शिबिरार्थी च्या प्रतिक्रिया....

Photos from Dr Hedgewar Hospital's post 01/02/2024

नमस्कार.
रामजन्मभूमीच्या यशाने २०२४ची सुरुवात झाली आहे. Medicine विभागातर्फे २०२२-२३ असा जो मधुमेह प्रशिक्षण वर्ग झाला, त्याच्या लाभार्थी असलेल्या काही जणांच्या प्रतिक्रिया आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. २७ जानेवारी रोजी पुन्हा नवीन बॅचची सुरवात झाली आहे. आपल्याकडे रूजू झालेले नवीन फिजिशियन डॉ. कपिल नवपुते यांचा या सत्रातील सक्रीय सहभाग हे या वेळच्या सत्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या वेळी आम्ही जो विषय घेतला आणि जो रोल प्ले सादर केला, तो पण इथे मुद्दाम शेअर करत आहे. डॉ. बेला निंभोरकर आणि H.O. डॉ. अश्विनी यांनी हा रोल प्ले केला.
सेवाव्रती काका काकूंच्या सहभागाशिवाय या उपक्रमाचे सातत्य अशक्य आहे.
सर्वांना या निमित्ताने अशी विनंती की सर्व मधुमेही रुग्णांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे.

26/01/2024

निःशुल्क प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्या.

26/01/2024

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Photos from Dr Hedgewar Hospital's post 25/01/2024

डॉ. हेडगेवार रुग्णालयातील मेडिसिन विभागामार्फत २०२२ पासून दर महिन्याला 'मधुमेह प्रशिक्षण वर्गाचे ' यशस्वीपणे आयोजन केल्या जाते. या वर्गात मधुमेहाशी निगडित विविध विषयांवर मधुमेह तज्ञाबरोबरच आहार तज्ञ, डोळ्यांचे तज्ञ, किडनी विकार तज्ञ अशा विविध तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळते तसेच विविध शंकांचे सुद्धा निरसन केल्या जाते.

हा वर्ग दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी रुग्णालयातील सभागृहात आयोजित केल्या जातो व हा वर्ग नि:शुल्क असतो.

या महिन्यातील वर्ग दी. २७ जानेवारी, शनिवार रोजी सकाळी ९ वाजता रुग्णालयातील दामू अण्णा दाते हॉल मध्ये आयोजित केला आहे.

संपर्कासाठी फोन नंबर - 9422205657; 9420934706

या महिन्यातील वर्गाचा विषय आहे - "मधुमेह समाज व वास्तव"

ईच्छुक व्यक्तींनी सहभागी होण्यासाठी वरील फोन नंबर वर संपर्क साधावा.

22/01/2024

सर्व भारतीयांचे आराध्य दैवत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

15/01/2024

मकर संक्रांतीच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

06/01/2024

आज स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू व भगिनींना शुभेच्छा!

Want your practice to be the top-listed Clinic in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

डॉ. हेडगेवार रुग्णालयातील प्रसिद्ध Spine Surgeon डॉ. सिद्धेश्वर ठोसर यांच्याबद्दल रुग्णांनी व्यक्त केलेला त्यांचा अनुभव ...
शिबिरार्थी च्या प्रतिक्रिया....
#EquipmentUpgradationIn line with our aim to keep improving the quality of service we provide, BAVP's Dr. Hedgewar Hospi...
Preventive aspects and early diagnosis of Retinopathy of Prematurity (ROP)
World Chronic Obstructive Pulmonary Disease Day
World Diabetes Day
World Osteoporosis Day
Take care of your eyes.
Our journey started in 1989 with BAVP's Dr. Hedgewar Hospital (DHR). What began as 10-bed hospital has grown into a mult...
World Mental Health Day
Dr. Hedgewar Hospital Celebrating World Patient Safety Day Event...

Telephone

Address


Dr. Hedgewar Rugnalaya Near Gajanand Maharaj Mandir, Jawahar Colony Road, Garkheda
Aurangabad
431005

Other Aurangabad clinics (show all)
Vishwa Ayurved Chikitsalaya Vishwa Ayurved Chikitsalaya
Aurangabad, 431005

#ayurveda #agnikarma #viddhakarma

Indurkar Hematology Centre Indurkar Hematology Centre
Aurangabad, 431001

Dr. Jayant Indurkar Hematology Treatment Center is one of the best, most respected treatment centers

Dr. Atul Deshpande Proctologist Dr. Atul Deshpande Proctologist
Aurangabad, 431001

I am consulting proctologist working at Prestige hospital since last 25 years have operated more th

Chintamani Medical Bidkin Chintamani Medical Bidkin
KothimbireNagar Bidkin
Aurangabad, 431105

Chintamani Medical & General Stores Bidkin

Xpert Diagnostix Xpert Diagnostix
Aurangabad, 431005

All Care Homoeopathic Clinic - Dr Mmeggha Sherkar All Care Homoeopathic Clinic - Dr Mmeggha Sherkar
Shop No 2, Near Akashwani Center Akashwani Signal, Jalna Road
Aurangabad, 431001

One Steps Toward Healthy Life 💯

Metropolis Labs Metropolis Labs
Kranti Chowk, Station Road, Opposite Hotel Manor
Aurangabad, 431001

Rays Medical Devices Rays Medical Devices
Aurangabad, 431005

Dr sarang Deshmukh -gastroenterologist Dr sarang Deshmukh -gastroenterologist
Aurangabad, 431005

liver and Gastro care

Al-Kahf-DarushShifa Al-Kahf-DarushShifa
Opp Izhan Hall, Aziz Colony Naregaon
Aurangabad, 431001

----AL-KAHF-DARUSH-SHIFA-CLINIC----- Unani ayurvedic Herbal and cupping therapy --------------

MEDI - ARTS  Hospital MEDI - ARTS Hospital
Pundalik Nagar Main Road & Garkheda Road
Aurangabad, 431009

Obstetric gynaecology and Infertility hospital.Has a sonography , icu ,pathology lab,medical store f