Marathi Association Perth

Marathi Association Perth

Share

The Marathi Association Perth is a non-profit organization, established on 13 July 2017.

01/05/2026
19/03/2026

बुकिंगसाठी click the link below:

https://shorturl.at/ekuHG

11/03/2026

*छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा* 💐

राजे,
आज आपली तरुण पीढी छोट्या मोठ्या आव्हानांना, आयुष्यातील चढ- उतारांना सामोरं जाताना निराश होतेय, डिप्रेस्ड होतेय कारण तुमचा खरा आदर्श घ्यायला आम्ही कुठेतरी कमी पडतोय.

तुम्ही दोन वर्षांचे असताना आपल्या मातोश्री महाराणी सईबाई आपणांस सोडुन गेल्या, त्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य असंख्य आव्हानांना, मुघलांना, पोर्तुगीज आणि इंग्रजांना आणि इतर अनेक स्वराज्याच्या अंतर्भाह्य गनिमांना सामोरं जाण्यात गेलं. छोट्या मोठ्या अशा एक नव्हे दोन नव्हे तर ११८ लढाया आपण स्वराज्यासाठी लढलात आणि जिंकलात. जेव्हा मरण समोर आलं तेव्हाही आपण त्याच स्वाभिमानानं त्याला सामोरं गेलात आणि मराठी बाणा काय असतो याची आम्हाला शिकवण देऊन गेलात.. तुमच्या मरणानंतरही कटकारस्थानं झाली. तुम्हाला बदनाम केलं गेलं हे आम्ही कधीही विसरु शकत नाही.

तुम्ही आम्हा सर्व मावळयांना आदर्श जगण्याचा मार्ग दाखवलात त्याबद्दल आमच्या सर्व येणाऱ्या पिढ्या तुमच्या ऋणी असतील.

आज तुमचा बलिदान दिन. न हारता न झुकता शौर्य, विध्वत्ता, आचरण, नैतिकता एवढचं नव्हे तर साक्षात मृत्यूवर विजय मिळवलेल्या आपल्या राजांना मराठी असोसिएशन पर्थ परिवाराच्या वतीने पुनश्च मानाचा मुजरा...

*छत्रपती संभाजी महाराज की..जय..*

💐💐💐💐

08/03/2026

*आज महिला दिन..*

समाज, कुटुंब आणि विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने, जिद्दीने आणि संवेदनशीलतेने प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना मनःपूर्वक सलाम.

तुमची ताकद, स्वप्नं आणि यश समाजाला अधिक सक्षम आणि सुंदर बनवत राहो, हीच शुभेच्छा.

*मराठी असोसिएशन पर्थ च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Perth?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Perth, WA