Pitu Rane

Pitu Rane

Share

�Muѕíc Addíctєd…
�Gym Lover �
��Phøťöhøłïç�

13/12/2025

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५। दिवस पाचवा

#हिवाळीअधिवेशन२०२५

Photos from Ravindra Chavan's post 13/12/2025
13/12/2025

महाराष्ट्राच्या सागरी विकासाची नवी दिशा!

राज्याच्या सागरी विकासाच्या दृष्टीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठे शिपयार्ड आता महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश आदरणीय देवेंद्रजींनी दिले आहेत.

या प्रकल्पामुळे जहाजबांधणी क्षेत्रासोबतच बंदरविकास आणि लॉजिस्टिक्स उद्योगालाही मोठी गती मिळेल. तसेच या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

राज्यातील सागरी उद्योगाचा हा नवा अध्याय महाराष्ट्राला देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उभारी देईल, ज्यामुळे येत्या काळात आपला महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करेल.

13/12/2025

मुंबई गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाला चालना

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-महायुती सरकारने मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

या निर्णयांमध्ये प्रामुख्याने 'पागडीमुक्त मुंबई' हे ध्येय साध्य करण्यासाठी पागडी इमारतींच्या सुयोग्य व न्याय्य पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाईल, ज्याद्वारे भाडेकरू व घरमालकांचे हक्क जपले जातील.

शहरातील सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारित भोगवटा अभय योजना' लागू केली जाईल, ज्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र (OC) नसलेल्या १० लाखांहून अधिक नागरिकांना आता कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागणार नाही.

याव्यतिरिक्त, कापड गिरण्यांच्या जमिनीवरील रखडलेल्या चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी नियमावलीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनाच्या जागेवरील सुमारे २५ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन उद्यानापासून ५ किमी परिसरात करण्यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे.

या दूरदृष्टीमुळे लाखो मुंबईकरांना सुरक्षित, आधुनिक आणि मालकीहक्काच्या घरांचा लाभ मिळून त्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल.

13/12/2025
Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Mumbai
Thane