Shobha Banshetti
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shobha Banshetti, Politician, Shukrawar Peth, Behind Ajoba Ganapati Mandir, Solapur.
20/11/2025
The hero of Akkalkot
Kailaswaasi Sridramappa Patil
Bhawpurn Shraddhanjali
14/11/2025
.
( प्रा अशोक निंबर्गी सरांनी लिहीलेला अप्पांच्या जीवनावरचा लेख )
स्व. सिद्रामप्पा पाटील पुढच्या पिढीला" फॅन्टसी" वाटावी असा जीवनप्रवास ! अक्कलकोटचे माजी आमदार श्री. सिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी कळली त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक समर्थकांची मनं हेलावून गेली, एखादी व्यक्ती किती हरहुन्नरी, अद्भूत असु शकते याचे जातिवंत उदाहरण म्हणजे स्व. सिद्रामप्पा पाटील, एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अंगभूत गुणवैशिष्टयाने लाखो जनसामान्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान होणारा हा लोकनेता ! मी ज्या अप्पांना पाहील त्यांचा राजकीय जीवनप्रवास पंचायत समिती सभापती पासून सुरु झाला ते जि.प सदस्य, जि.प. विषय समिती सभापती, जि प. उपाध्यक्ष असा करता करता त्यांच्या कर्तृत्वाला विधानभवन शिळ घालू लागली आणि त्या दिशेने अप्पांनी वाटचाल सुरू केली, या वाटचालीत अप्पानां अनेक वेळा अपयश आले परंतु स्व. गोपिनाथजी मुंडे आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने अप्पांच्या आमदारकीच्या स्वप्नांची अखेर पुर्ती झाली, अक्कलकोट तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाचे अप्पा केंद्रबिंदू होते, जिल्हा मध्यवर्ती बँक, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती असेल अशा अनेक सहकारी संस्थांवर अप्पानी नेतृत्व केले, अस काय वैशिष्टय होतं या अस्सल ग्रामिण नेतृत्वात..... पांढरा शुभ्र धोतर, कडक स्टार्चचा नेहरू शर्ट तेवढाच कडक स्टार्चची गांधी टोपी, पारदर्शक नेहरू शर्टातून दिसणारा त्यांचा आवडता रिव्हालव्हर पाहीलं की सामान्य माणूस त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा आणि ते बोलायला लागले की त्यांच्या प्रेमात पडायचा अशा करिश्माई व्यक्तिमत्वाचा नेता ! आजकाल एखाद्या नेत्याच्या तोंडी एखादा शब्द वावगा गेला की सोशल मीडिया पासून प्रिंट, इलेक्ट्रानिक्स मिडीयात रान उठते परंतु अप्पा भाषणाला उथे राहिले की हातात आलेला माईक जणू गारुड्याची पुंगी व्हायची आणि समोरची जनता नागासारखी डुलायची याची अनुभुती आम्ही हजारो वेळा घेतलं आहे, अप्पांच्या भाषणातली शिवीला ही त्यांच्या चाहत्यांनी ओवी इतकाच प्रतिसाद दिला, समोर असलेल्या जनसमुदायाला नेमकं काय अपेक्षित आहे ते अचूक ओळखून त्यांच्याशी संवाद साधण्याची विलक्षण हतोटी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण समाजकारणात फक्त अप्पानांच जमली, त्यांच्या सहवासात त्यांच्या मैफिलीत बसलेला माणूस त्यांच्या विनोद बुद्धीची नेहमीच प्रत्यंतर घेत आला आहे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल साहेब अप्पांच्या सोबतच्या परदेश प्रवासातील अनेक विनोदी किस्से सांगताना ' नेक टाय आणि बॅक टाय' याचा जो किस्सा सांगितला तो त्या काळात अनेक वर्तमानपत्रात खूप गाजला होता याच प्रवासाला जाताना मुंबईच्या त्यावेळच्या व्ही.टी स्टेशनवर एका अज्ञात इसमाने गोळीबार केला अप्पा त्यातून बचावलेच परंतु त्याही परिस्थितीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तिचा पाठलाग केला, पंचायत समिती सभापती असताना ध्वजारोहण करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण त्याही परिस्थितीत विचलीत न होता त्यांनी त्याचा प्रतिकार करून ध्वजवंदनाचे राष्ट्रीय कार्य पूर्ण केले, यातून त्यांच्या व्यक्तिवातील निडरपणा स्पष्ट दिसून आला म्हणून तर या लोकनेत्याला अक्कलकोटची जनता " पोलादी पुरुष" म्हणुन ओळखत होती, अप्पा वरून कणखर असले तरी अंतरंगी फणसा प्रमाणे मृदु होते, त्यांच्या व्यक्तित्वाला हळवेपणा फार कमी लोकांना अनुभवता आला, अप्पांचे एक बंधु त्यांच्या सोबत सावली सारखे असायचे सोलापूरच्या घरात अप्पांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला व्हरांड्यात दक्ष असलेल्या त्यांच्या भावाच्या पारखी नजरेतून जावे लागायचे अशा या भावाच्या अकस्मिक मृत्युने गलबलून गेलेल्या अप्पानां किती लोकांनी पाहिलं असेल ? त्यांची कन्या माजी महापौर सौ. शोभाताई बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी गंभीर आजाराने रुग्णशय्येवर झुंजत असताना लेकीच्या कुंकवासाठी व्यथित होऊन वाडीया हॉस्पिटलच्या प्रांगणात सतरंजी टाकून तिळ तिळ तुटणारा बाप किती लोकांनी अनुभवला असेल ? अप्पांची किती गुणवैशिष्टये सांगावी, अप्पांचे राजकारणातील अनेक निर्णय चुकले असतील परंतु आपल्या मनाला पटते तो निर्णय घेण्याचा धाडस फक्त अप्पांमध्ये दिसुन आला, जसे अप्पाना राजकारणात यश मिळाले तसेच यश त्यांच्या मुलांनी मिळवले संजय पाटील पंचायत समिती सभापती झाले, शिवानंद पाटील जि.प. सदस्य पासुन समिती सभापती झाले इतकेच नव्हे तर मुलगी सौ. शोभाताई बनशेट्टी सोलापूर शहराची महापौर तर मुलागा शिवानंद पाटील सोलापूर जिल्हा परिषदेचा हंगामी अध्यक्ष झाल्याचं अप्पांनी अनुभवल ! स्व. अप्पा म्हणजे एक मुलखा वेगळं रसायन त्यांच्या आयुष्यात त्यांनी कोणतीही गोष्ट लपवली नाही त्यांच जीवन म्हणजे एक" खुली किताब" म्हणता येईल आयुष्य जगताना त्यांनी ना दोस्ती करताना मिलावट केली ना दुश्मनी करताना मिलावट केलं जे कांहीं केलं ते खुल्या दिलानं केलं ! त्यामुळं त्यांच व्यक्तित्व जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहचलं ! त्यांनी जेवढी इस्टेट कमविली त्याच्या 3 पट इस्टेटी एवढी पैशांची मदत त्यांच्या 28 गावातील लोकांना वाटली अनेक दिग्गज त्यांच्या मुळे दिग्गज झाले आपल्या अस्सल गावरान ढंगातील मराठी आणि कन्नड मिश्रीत भाषण किंवा संभाषण करताना दोन वाक्यात किमान दोन शिवी मिक्स करीत लोकांच्या मनावर गारुड करणारा वक्ता या जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा होणे नाही ! अप्पांच भाषण चालू असताना आता अप्पा पुढं काय बोलतील त्याचा काय परिणाम होईल म्हणून जीव टांगणीला लागेलेले नेते जसे बघितले तसेच अप्पांचे भाषण संपूच नये म्हणून अपेक्षा करणारे त्यांचे श्रोते देखील मी पाहिलो आहे ,वर वर्णिलेला अप्पांचा जीवन प्रवास हा कांही अंश आहे पूर्ण जीवनपट जेंव्हा उलगडला जाईल तेंव्हा पुढच्या पिढीला ही एक " दंतकथा" वाटेल असा प्रवास आहे, सर्वसामान्य जनतेच्या हुदयसिंहासनावर राज्य करणारा हा लोकनेता आपल्यात नाही ही कल्पना देखील करवत नाही, ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही स्व. सिद्रामप्पा पाटील यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर आणि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना !🙏🙏
प्रा. अशोक निंबर्गी (सर)
06/10/2025
सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट चे प्रमुख श्री. चंद्रशेखर कळमणकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार माणिक चौकातील मानाचा आजोबा गणपती मंदिरात करण्यात आला.
श्री. चंद्रशेखर कळमणकर यांचा मानाचा आजोबा गणपती मंदिराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असुन गणपती मंदिर बांधण्याच्या सुरवाती पासून त्यांनी सहभाग घेतला आहे. श्रध्दानंद समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे.
साधं राहणीमान उच्च विचारसरणी असलेले चंद्रशेखर कळमणकर हे या वयात देखील चतुर्थी ला सकाळी पासून रात्री चतुर्थी ची आरती संपल्यानंतरच घरी जातात . अशा मनाने तरूण व्यक्ती चा वाढदिवस श्रीशैल बनशेट्टी यांच्या हस्ते व भा.ज.पा. शहर अध्यक्षा सौ. रोहिणी ताई तडवळकर त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट शहर अध्यक्ष श्री महेश धाराशिवकर यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी राहुल तमशेट्टी, राजाभाऊ चौधरी, कैरमकोंडा, संजय स्वामी, नरेंद्र शिंदे, संजय कपडेकर, मल्लू अण्णा चडचणकर, वैजनाथ दादा स्वामी, राजू जवळे, विजयकुमार सरसंबे, अतुल डोके, राजेंद्र कानडे, आप्पा आलद, शिवानंद निंगदळ्ळी, महेश वजीरकर, शिवयोगी बनशेट्टी, आनंद कळमणकर, बंटी बेळमकर, धाराशिवकर,
सुनील सोनटक्के, मोहन सोनटक्के
21/08/2025
*https://youtu.be/hNudehSyiHA?si=d6Ayp4y3YnLQzf4F*
बनशेट्टी आप्पा प्रतिष्ठानचा उपक्रम... भाविकांना महाप्रसादाचं केले वाटप... | VIRSHIV SABALE TRUST बनशेट्टी आप्पा प्रतिष्ठानचा उपक्रम... भाविकांना महाप्रसादाचं केले वाटप...
29/07/2025
सोलापुरच्या विकासाचे कर्मयोगी माजी महापौर व नगराध्यक्ष लिंगैक्य विश्वनाथ ( आप्पा ) बनशेट्टी
यांच्या जयंतीनिमित्त आप्पांचा सोलापुरच्या जडणघडणीत असलेला महत्वाच्या योगदानावर विशेष प्रकशझोत.
आप्पांचा जन्म २९ जुलै १९१३ साली कसब्यातील हब्बुंच्या वाड्यात झाला . अगदी प्रतिकुल परिस्थितीत आप्पांनी आपल्या वडिलांचा परंपरागत व्यवसाय मधला मारुतीच्या रस्त्यावर बसुन वनौषधी विक्री करायचे. कालांतराने आप्पांनी अपार मेहनतीने मधला मारुती परिसरात वनौषधीचे दुकान चालु केले. अशा रीतीने संसाराचा गाडा हाकत आप्पांनी राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्रातील अकरा वेळा निवडून येणारे नगराध्यक्ष व महापौर झालेले एकमेव व्यक्तिमत्व अशी त्यांची इतिहासात नोंद आहे.
आप्पां नगराध्यक्ष व महापौर असताना औज सोलापुर आणि उजनी सोलापुर पाण्याची पाईपलाईन , पार्क स्टेडियम,पार्क चौकातील वीर सावरकर जलतरण तलाव बांधणे ही कामे आप्पांनी पुर्ण करुन घेतली.
महापौर असताना छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व महानगरपालिकेसमोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवायचा होता तेंव्हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिल्पकार मुंबईतील शाम सारंग यांना पुतळा बनवायचे काम देण्यात आले.
त्यावेळेसच तुळजापूर नगरपालिकेनेही छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवण्याचं काम शिल्पकार शाम सारंग यांना देण्यात दीलं होतं! सध्याचा सोलापुरच्या छत्रपती शिवाजीमहाराज चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आम्ही बनवायला सांगितलंय आणि तो आम्ही तुळजापूर ला घेऊन जाणारच असा हट्ट तुळजापूरच्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी धरला! पण आप्पांना महाराजांचा भारदस्त रुबाबदार पुतळा कशाही परिस्थितीत सोलापुरलाच आणायचा होता ! महाराजांचा जाज्वल्य इतिहास या अश्वारूढ पुतळ्यासमोर उभा राहिल्यावर पुढच्या पिढ्यांना आठवावा यासाठी आप्पांनी कौशल्य चातुर्यांने महाराजांचा तोच अश्वारूढ पुतळा अखेर सोलापुरातच आणून विराजमान केला त्याचा एक रोमांचकारी इतिहास आहे!
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महानगरपालिकेसमोर उभा करण्याचा प्रस्ताव आप्पांच्या कारकिर्दीतच मांडला व ठरावही करुन पूर्णत्वास नेला.
शहरातीलच नाही तर महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळाना अनेक अडचणींचा सामना करावं लागत असे. त्यावेळी प्रशासन व सार्वजनिक मंडळात समन्वय असावं यादृष्टीने आप्पांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची संकल्पना राबविली या मंडळातील अनेक कार्यकर्ते आमदार खासदार नगरसेवक झाले आणि आजतागायत हे कार्य सुरु आहे.
पुर्वी गणेशोत्सव काळात उत्सव मिरवणुकांना मशीदींसमोर ,पोलिस चौक्यांसमोर व शासकीय इमारती समोरून जाताना वाद्ये वाजविण्यास मनाई असे त्या विरोधात त्याकाळी आप्पांनी सोलापुरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र करुन प्रशासनाला ही बंदी हटविण्यासाठी रेटा लावला अखेर प्रशासनाने ही बंदी उठवली.
सोलापुरातीलच नव्हे तर भारतातील पहिला असलेला मानाचा आजोबा गणपती ज्याचा आदर्श घेऊन संपुर्ण भारतात गणेशोत्सव सुरु झाला! उत्सव काळात फक्त दहाच दिवस नाही तर वर्षभर आजोबा गणपती चे दर्शन घेता यावे यासाठी आजोबा गणपतीचे मंदिर लिंगैक्य विश्वनाथ आप्पा बनशेट्टींनी जागा घेऊन शुक्रवार पेठेत बांधले.
सोलापुरच्या जडणघडणीत विकासाचे कर्मयोगी माजी महापौर लिंगैक्य विश्वनाथ ( आप्पा ) बनशेट्टी यांचे मोलाचे योगदान आहे आज त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!
29/07/2025
कै. विश्वनाथअप्पा बनशेट्टी
जयंती दिन विनम्र अभिवादन
(नागपंचमी)
13/07/2025
हार्दिक अभिनंदन सरजी
20/06/2025
सिध्देश्वर देवस्थान चे विश्वस्त व आजोबा गणपती ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांचे आज शुक्रवार रोजी दुःखद निधन झाले मृतात्म्यास चिरशांती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
12/04/2025
७ चिरंजीवी पैकी एक असलेले महाबली महाज्ञानी महाबुद्धी श्री हनुमान जे अमर आहेत त्यांची जयंती की जन्मदिवस व जन्मोत्सव !!!!
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Address
Solapur
413002