Javalkar Insurance Service
Insurance Sell & Service
21/10/2022
19/07/2021
आयुर्विमा: कुटुंबाचा खरा आधार!
अन्न,वस्त्र,निवारा या मानसाच्या मुख्य गरजा आहेत; पण कुटुंब म्हटले की याशिवाय आरोग्य,शिक्षण, मुलांचे भवितव्य व कुटुंबातील सर्वांच्या सर्व गरजा भागविन्याची जवाबदारी कुटुंबप्रमुखावर येते, व तो विणातक्रार नव्हे तर आनंदाने पूर्ण करत असतो आणि पुढ़िल कित्येक वर्षे (निवृत्त वयापर्यंत) ही जबाबदारी पेलण्याची त्याची मानसिकता असते.त्यात चढ़ उतार ही असतात. पण.....
कुटुंबप्रमुखाचा अचानक अकाली मृत्यु झाला किंवा त्याला कायमचे अपंगत्व आले तर मात्र असे कुटुंब संकटात येते. असे संकट कोणावरही येऊ नये असेच आपल्याला वाटते; परंतु सध्याच्या कोरोना सारख्या महामारीत , धकाधकीच्या व अनिश्चिततेच्या वातावरण मध्ये असा प्रसंग कुटुंबावर येणारच नाही,असे ठामपने सांगता येत नाही. असा कठीण प्रसंग कुटुंबावर आला तर पूढ़े काय? अशा प्रसंगी खर्च व जवाबदारी थांबत नाहीत, असलेली बचत संपायला लागते. असलेल्या मालमत्तेला सुध्दा हात घालन्याची वेळ येतेे. प्रसंगी राहते घर विकावे लागते आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आल्याचे समाजात अनेक उदाहरण आहेत... 😭
यावर पर्याय म्हणून आयुर्विमा (Life insurance) फार मोठी जवाबदारी पार पाडू शकतो. कुटुंबातील कमावत्या व्यक्तिच्या आयुष्यावर घेतलेला आयुर्विमा अशा संकट प्रसंगी एकदम मोठा होउन मदतीला धावुन येतो आणि त्या तुलनेत आयुर्विमा चा हफ्ता खुपच छोटा असतो.म्हणून कमावत्या काळात ज्या ज्या जवाबदारी पार पाडायच्या आहेत आणि ज्या अनिवार्य आहेत, म्हणजेच मुलांचे शिक्षण-विवाह कार्य-करियरची सुरवात-निवृत्त होण्याची (वृद्धापकाळ) तरतूद, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी इ. गोष्टी आयुर्विम्याद्वारे एकदम सोप्या पद्धतीने पार पाड़ता येतात..
सुदैवाने अकाली मृत्यू आला नाही तरीही वृद्धापकाळ निश्चितच आहे.. दोन्हीपैकी एक प्रत्येकाच्या जीवनात आहेच! मृत्यु आणि वृद्धापकाळ या जीवन नावाच्या नाण्याची दोन बाजू आहेत.त्यासाठी आयुर्विमा द्वारे केलेली बचत कधिच वाया जात नाही, उपयोगी पड़ते च. इतर कोणत्याही माध्यमातून केलेली बचत (एफडी, शेअर्स, रियल इस्टेट, म्युचल फंड) यांचे सुद्धा आयुर्विमाने रक्षण होते...
कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणसाठी आयुर्विमा शिवाय दूसरा मार्ग नाही... 🙏
Click here to claim your Sponsored Listing.