Promotions

Promotions

Share

"

09/08/2025

Looking for an Aggabatti manuacturere.

What app
081491 08897

12/07/2025

Products Available for Reselling.
Call us on
081491 08897

24/06/2025

23/06/2025
19/06/2025

आर्यभट्ट स्कॉलरशिप परीक्षेच्या शैक्षणिक कामासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्यांकरीता *प्रतिनिधी* नेमने आहे. आकर्षक व्यवसायिक संधी.

📣 शैक्षणिक कामासाठी प्रतिनिधी हवे आहेत!

🔹 पदाचे नाव: शैक्षणिक प्रतिनिधी (Representative)
🔹 कामाचे स्वरूप:
• संस्थेचे प्रतिनिधित्व करणे
• विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांशी संवाद साधणे.
• संस्थेच्या उपक्रमांची माहिती पोहोचवणे
• प्रचार व जनसंपर्क
🔹 पात्रता:
• किमान १२वी उत्तीर्ण (पदवीधरांना प्राधान्य)
• संवादकौशल्य असावे
• शिक्षणप्रेमी आणि सकारात्मक दृष्टीकोन असावा
🔹 संस्थेचे नाव : आर्यभट्ट परीक्षा केंद्र, ज्योतिर्गमय शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
📞 संपर्क: 9923280982

exams

19/06/2025

१९८४ साल. मुंबईतील एका साध्या फळविक्रेत्याचा मुलगा — रघुनंदन कामत — आपल्या छोट्याशा स्वप्नासाठी उभा राहतो. त्याच्याकडे होते केवळ ३.५ लाख रुपये आणि इच्छा होती खरी फळं वापरून आइस्क्रीम तयार करण्याची. बाजारात असलेल्या कृत्रिम फ्लेवर्सच्या आइस्क्रीमपासून वेगळा काहीतरी द्यायचं होतं. त्यामुळे त्याने सुरूवात केली "नॅचरल्स आइस्क्रीम"ची — जुहूच्या छोट्याशा दुकानात फक्त पाच फ्लेवर्ससह.

तेव्हा ना मोठे जाहिरातबाजार, ना सेलिब्रिटींचा प्रचार. कामत यांना फक्त एक गोष्ट हवी होती — दर्जा. त्यांचं लक्ष नेहमी फळांच्या दर्जावर, चव व ताजेपणावर केंद्रित असे. त्यांनी आपल्या वडिलांच्या फळव्यवसायातून शिकलेलं ज्ञान आणि अनुभव आइस्क्रीममध्ये उतरवलं. लोकांना ती खरी चव लागली. हळूहळू लोक आपोआप येऊ लागले, लोकांनीच लोकांना सांगितलं. 'वर्ड ऑफ माउथ' हीच त्यांची खरी ब्रँड स्ट्रॅटेजी ठरली.

नॅचरल्सचं यश हे त्यांच्या स्पष्ट धोरणात होतं — कोणतीही गोष्ट कृत्रिम नको, कोणताही शॉर्टकट नको. कामत यांनी कधीही क्वालिटीशी तडजोड केली नाही. वर्षानुवर्षं त्यांनी आपल्या उत्पादनाला एका विशिष्ट दर्जात टिकवून ठेवलं. नवे फ्लेवर्स तयार करताना ते स्थानिक फळांचा विचार करत — जसं की सीताफळ, आम्रस, लिची, जांभूळ. त्यामुळे त्यांच्या आइस्क्रीमला एक खास भारतीय ओळख मिळाली.

आज नॅचरल्सकडे १०० पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत आणि त्यांचा व्यवसाय ४०० कोटींपेक्षा अधिक झाला आहे. पण तरीही त्यांनी आपल्या मूळ मूल्यांना कधीही सोडलं नाही. ग्राहकांशी प्रामाणिक राहणं, दर्जावर विश्वास ठेवणं आणि सतत नाविन्य करत राहणं — या त्रिसूत्रीवर नॅचरल्सचा ब्रँड उभा आहे.

रघुनंदन कामत यांची ही कहाणी आपल्याला शिकवते की, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि दर्जावर असलेली निष्ठा या गोष्टींमुळे कुठलाही छोटा व्यवसाय एक मोठं साम्राज्य बनू शकतो. जाहिरात किंवा मोठा बजेट नसतानाही, केवळ गुणवत्तेच्या जोरावर एक ब्रँड संपूर्ण देशात पोहोचू शकतो.

एक गोष्ट लक्षात ठेवा — जेव्हा उत्पादन खरं असतं, तेव्हा ब्रँड आपोआप बोलू लागतो.



#मराठीentrepreneur

04/04/2025

यशाच्या पायरीवरचा संघर्ष... Brand बनण्यापूर्वी, तो 12 वर्षांचा मुलगा हॉटेलात टेबल पुसायचा.

के.आर. भास्कर यांचा गरिबीच्या वाटेवरून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंतचा प्रवास हा एक असामान्य धैर्यगाथा आहे.

शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या भास्करांनी लहानपणापासून कष्टाची सवय केली. बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये टेबल पुसणे, भांडी घासणे, पुढे वेटर, नृत्य शिक्षक, पानटपरी चालक... त्यांनी अशी अनेक वेगवेगळी कामं केली, कुठेच स्थैर्य नसले, तरीही हार न मानणारी त्यांची जिद्द जागीच होती.

23 व्या वर्षी, एक दृष्याने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली.
एका कुटुंबाच्या पुरणपोळ्या बनवण्याच्या उत्कट प्रेमात त्यांना स्वतःचे भविष्य दिसले. “ते कुटुंब पुरणपोळ्यांना जणू जीव देऊन बनवत होते. त्यांचा तो अथक उत्साह पाहून माझ्या मनात एक विचार ठासला – ‘हा स्वादच जगाला दाखवायचा!’ मग मी स्वतःची रेसिपी शोधली, आणि एका सायकलीवर स्वप्नं बांधून मुंबईच्या रस्त्यावर उतरलो...”
— भास्कर, HT च्या मुलाखतीत

सुरुवातीचा संघर्ष:
फक्त एक सायकल आणि मनात भरलेलं स्वप्न घेऊन त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर पुरणपोळी विकायला सुरुवात केली. दिवसभराचे अविश्रांत परिश्रम, कमी उत्पन्न, सतत नकार... पण त्यांच्या नरम, स्वादिष्ट पुरणपोळ्यांनी हळूहळू ग्राहकांचं मन जिंकायला सुरुवात केली. कमवलेला प्रत्येक रुपया व्यवसायात पुन्हा गुंतवला. एक छोटासा स्टॉल, मग दुकान, आणि मग एका छोट्या साम्राज्याची निर्मिती!

आज “पुरणपोळी घर”:
-17 शाखा
-10+ Franchises
-दरमहा ₹18 कोटी उलाढाल

कर्नाटक ते महाराष्ट्रभर, त्यांच्या व्यवसायात आता 24 प्रकारच्या पारंपरिक-शुद्ध पुरणपोळ्या आणि 400 हून अधिक घरगुती पदार्थांचा मेजवानी मिळतात!

29/03/2025

दिग्विजय सिंग: एक तरुण चॉकलेट व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास

कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात, दिग्विजय सिंग यांनी 16 व्या वर्षीच नवीन गोष्टी शोधण्याचा उत्साह दाखवला. चॉकलेटची आवड असल्यामुळे, त्यांनी ते बनवण्याची प्रक्रिया शिकण्यास सुरुवात केली. त्यांचा चुलत भाऊ महावीर सिंग यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे, त्यांनी ठोस योजना नसतानाही हा प्रवास आत्मविश्वासाने सुरू केला. युट्यूब ट्युटोरियल्स आणि सततच्या प्रयोगांमधून त्यांनी स्वतःच चॉकलेट बनवण्याची कला आत्मसात केली. सुरुवातीला स्वतःच्या बचतीतून व्यवसाय उभा केला आणि ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्याची प्रेरणा मिळाली.

2021 मध्ये, दिग्विजय यांनी देशी फळांच्या विलुप्ततेवर आधारित एक लेख वाचला, ज्याने त्यांना विचार करायला भाग पाडले. बाजारात मुख्यत्वे प्रचलित फळांवर आधारित उत्पादनांचा बोलबाला असताना, त्यांनी देशी फळांपासून बनवलेल्या अनोख्या फ्लेवर्सची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. हेच वर्ष होते जेव्हा त्यांनी आपल्या आर्टिसनल चॉकलेट ब्रँड ‘सरम’ ची स्थापना केली.

सरमच्या प्रवासाची सुरुवात दिल्लीतील एका कार शोरूमच्या मालकाकडून 1000 ऑर्डर्सने झाली. आज दिग्विजय सिंग, केवळ 19 व्या वर्षी, स्वतः शिकलेल्या कौशल्याच्या जोरावर चॉकलेट व्यवसायातील यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यांनी देशभरातील ग्राहकांना 2 टनांहून अधिक चॉकलेट्स विकले आहेत. त्यांचा ब्रँड सरम दिल्ली, बेंगळुरू, उदयपूर, आणि जयपूरसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकप्रिय झाला आहे.

The Better India च्या अहवालानुसार, सरमने आतापर्यंत 1 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. दिग्विजय सिंग यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणांना मार्गदर्शन करणारा ठरतो. चॉकलेटप्रेमींना अनोख्या फ्लेवर्सची मेजवानी देत, त्यांनी उद्योगजगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

16/03/2025

Lahori Zeera ची कहाणी भारतीय पारंपरिक चव आणि उद्योजकतेच्या यशाचं उत्तम उदाहरण आहे. तीन मावस भाऊ – सौरभ मुंजाल, सौरभ भुतना आणि निखिल दोडा – यांनी 2017 मध्ये एक सोप्पा पण हटके विचार केला. जिरा आणि सेंधव मिठावर आधारित घरगुती पेयाला व्यावसायिक रूप देण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. Fatehgarh, Punjab येथून सुरू झालेल्या Archian Foods Pvt. Ltd. च्या प्रवासात आज Lahori Zeera भारतभर लोकप्रिय झालं आहे.

Lahori Zeera ची मूळ संकल्पना भारतीय स्वयंपाकघर आणि स्ट्रीट फूडमधून घेतली गेली. जिरा पचनासाठी उत्तम मानला जातो, आणि सेंधव मीठ हे आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बाजारात केमिकलयुक्त कोल्ड ड्रिंक्सना एक आरोग्यदायी पर्याय म्हणून हे पेय सहजच स्वीकारलं गेलं. उत्पादनाला जबरदस्त मागणी वाढल्याने कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये Lahori Nimbu, Lahori Kacha Aam आणि Lahori Shikanji यांसारखी नवी पेयं समाविष्ट केली.

कंपनीच्या वाढीचा वेग प्रचंड आहे. FY22 मध्ये कंपनीचा महसूल ₹250 कोटी होता, जो FY24 मध्ये ₹312 कोटी पर्यंत पोहोचला, आणि वार्षिक 47.2% वाढ नोंदवण्यात आली. नफ्याच्या बाबतीतही कंपनीने मोठी झेप घेतली आहे – FY23 मध्ये ₹7.6 कोटी नफा होता, जो FY24 मध्ये ₹22.5 कोटी झाला.

Punjab मधील Rupnagar येथे अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारण्यात आलं असून, कंपनी दिवसाला 2 दशलक्ष (20 लाख) बाटल्या तयार करत आहे. यशामुळे अनेक गुंतवणूकदारांची नजर Lahori Zeera वर पडली आहे, आणि Motilal Oswal कडून ₹400-450 कोटींची गुंतवणूक मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. CEO सौरभ मुंजाल यांच्या मते, 2025 मध्ये कंपनीचा महसूल ₹500 कोटी ओलांडण्याचा कंपनीचा मानस आहे, आणि पुढील काही वर्षांत ₹1000 कोटींहून अधिक टर्नओव्हर गाठण्याचा त्यांचा निर्धार आहे.

Lahori Zeera च्या यशामागे केवळ उत्पादनाची गुणवत्ता नाही, तर भारतीय पारंपरिक चवींना जागतिक दर्जाचं पॅकेजिंग आणि मार्केटिंग देण्याचा दृष्टिकोन आहे. आज Coca-Cola आणि Pepsi सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करत Lahori Zeera एक स्वदेशी ब्रँड म्हणून उभा राहिला आहे. भारतात पारंपरिक पेयांकडे झुकणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याने, कंपनीची आगामी वाटचाल आणखी तेजीत होण्याची शक्यता आहे.


# innovation

13/03/2025

प्रोडयुसर पाहिजे.

उत्कृष्ट आणि हटके कथानक. साध्या कथानकात रंगविलेले कल्पनिक प्रसंग.... सामाजिक समस्या , मानवी जीवन, धर्म-पुराण, खुमासदार प्रसंग, विज्ञान,नवविचार आणि प्रेरणादायी.... भावनिक, रोमांटिक, कल्पकतेने ठासून भरलेली निर्मिती.
*Its big budget project.*
If any producer wish to make something outstanding product, please contact me for story narration.

Prashant Girjapure
9702483039.

12/03/2025

With GheBharari Exhibitions – I just got recognized as one of their top fans! 🎉

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm