Deva Zinjad

Deva Zinjad

Share

लिहायचं फक्त माणसांची डोकी नांगरण्यासाठी...
माणसं जोडत रहायची. आजन्म विद्यार्थीच...

13/05/2026
13/05/2026

बघा बुवा

13/05/2026

ती पूर्ण रात्र मला अस्वस्थ वाटत होते!!

सर, कालच तुमचे एक भाकर तीन चुली पुस्तक वाचून पूर्ण केले आणि आज लगेच फेसबुक वर तुमची प्रोफाइल दिसली म्हणून हा लेखन प्रपंच.

पुस्तक वाचताना सुरुवातीला मला वाटले ही एक काल्पनिक कादंबरी आहे.क्षमा करा ,मला या पुस्तकाबद्दल सुरुवातीला काही माहीत न्हवते.पण शेवटी जेव्हा कळले की ही वास्तविकतेतली कुणाची संघर्ष गाथा आहे तेव्हा धक्काच बसला.
तुमच्या माऊलीला आणि तुम्हाला त्रिवार वंदन.आणि तुम्ही हे पुस्तकरूपात शब्दबद्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
सुरुवातीला जेव्हा मी ही कादंबरी वाचायला घेतली तेव्हा पारूच्या जन्मापर्यंत थोडे वाचून बाजूला ठेवली.माझ्याने पुढचे वाचलेच जात न्हवते.
ती पूर्ण रात्र मला अस्वस्थ वाटत होते,मी नीट झोपू पण शकले नाही.
नंतर काही दिवसांनी मी परत हातात घेतली,ती पूर्ण झाल्यावरच खाली ठेवली.

एक सुन्न करणारा अनुभव तेवढीच एक जिद्दीची कथा आहे ही.

परत एकदा त्रिवार वंदन

🌿शलाका कुलकर्णी आपटे

आवृत्ती ३१ वी || अभिप्राय क्र. १४३१ | एकूण अभिप्राय ४८७०|| पृष्ठसंख्या ४५०

🌿
9890697098
घरपोच पुस्तकासाठी WhatsApp करावे.🌿

#सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #एकभाकरतीनचुली #देवाझिंजाड #अभिप्राय #पुस्तक #रीडर्सकोम्मुनिटी #साहित्यप्रेमी #मराठी #समीक्षण #कादंबरी #पुस्तक #वाचक ,

(Ek bhakar tin chuli, sagale ulthavun takale pahije, Menduchi mashagat, Deva zinjad, Marathi book, novel, kadanbari, poem)

13/05/2026

नुसतं पास झालो असं म्हटलं तरी ती खुश असायची...
#एकभाकरतीनचुली #रीडर्सकोम्मुनिटी #मायनसशून्य

12/05/2026

.

12/05/2026

मायलेक असेच हसत खेळत राहोत प्रत्येकाचे...

12/05/2026

या चहा प्यायला.

12/05/2026

" वाचायला हवं असं महत्वाचं पुस्तक "

' आठवणींच्या हिंदोळ्यावर ' ह्या चंद्रकांतदादा चव्हाण ह्यांच्या पुस्तकातील प्रत्येक लेख हा तुमच्या आमच्या जगल्या भोगल्याची गोष्ट आहे. त्यातले अनुभव अस्सल आहेत. भूतकाळात मन पाठवून आठवणींची पणती मिणमिणती करण्याचं काम त्यांच्या प्रत्येक लेखानं केलंय. मन गुंतून राहते अशी गोड भाषा हे खरं त्यांच्या प्रत्येक लेखाचं यश आहे असं मला वाटतं.
गावापासून दुरावलेले अनेकजण गावच्या आठवणीत गुंतून पडतात पण तो गुंता सोडवायचा कसा ह्याची जाण प्रत्येकालाच असते असं नाही. मग अश्यावेळी त्यांच्या मदतीला हे हिंदोळे धावून येतात व वाचकाला मनसोक्त झोके देत राहतात. त्या प्रत्येक झोक्यासोबत आपल्याला नवा स्नेहगंध मिळत जातो. प्रत्येक पानासोबत तुमच्या आमच्या मंतरलेल्या क्षणांचे जाते गरगर फिरायला लागते.
चूल, माती, माय, पावसातलं भिजणं, आयुष्याच्या वारीच्या भावगर्भ पाऊलवाटा सगळ्या पुन्हा जिवंत होतात. मग हरवलेलं काहीतरी चांगलं वाईट सापडत चाललंय असं वाटू लागतं. अन् हे अगदी जसच्या तसं अतिशय सुंदर व सोप्प्या भाषेत व शब्दात बांधून आपल्यासमोर मांडण्याची कला चव्हाण ह्यांच्या लेखनशैलीत आपल्याला वाचायला मिळते.
चंद्रकांतदादा ह्यांच्या फेसबुकवरून प्रकाशित होणाऱ्या लिखाणाचा मी चाहता होतो. त्यांच्या लिखाणात नेहमी आपलेपणाचा ओलावा जाणवत असे. कधीतरी त्यांचं लिखाण पुस्तकरूपात पुढे यायला हवं असं मनात आलं होतं अन् काही महिन्यांनी हे पुस्तक माझ्या हातात पडलं. ह्या पुस्तकातल्या प्रत्येक लेखानं अनेक स्मृती जागवून गावगाडा पुन्हा जिवंत तर केलाच परंतु अतिशय आस्थेनं आठवणींचा विठोबा कमरेवर हात ठेवून पानोपानी उभा केला असं मला वाटतं.
चंद्रकांत दादांच्या एकूणच लिखाणाविषयी मी काही भाष्य करावं एवढा मी मोठा नक्कीच नाही. त्यांच्या जीवनाविषयीच्या तत्वचिंतन्मातक लेखनानं त्यांची उंची अधोरेखित झालेली आहे. त्यांची समीक्षा आज अभ्यासाचा विषय होते आहे. अश्या बहुआयामी लेखकाच्या लेखणीला आभाळभर शुभेच्छा ....

' आठवणींच्या हिंदोळ्यावर ' ह्या पुस्तकातील एका लेखातील हा थोडासा भाग खास आपल्यासाठी.
असेच इतर लेख वाचण्यासाठी आपल्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं...

- देवा झिंजाड

' विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगात माणसांच्या जीवनाचे आयाम बदलले. भौतिक सुखांनी ओंजळी रित्या केल्याने आयुष्य समृद्ध वगैरे झालं. हे सगळं नाकारण्याचं कोणतंही कारण नाही. पण तरीही जगणं सुंदर करणाऱ्या आठवणी हाच सुखाचा वास्तव प्रवास असल्याचं अनेकांना वाटतं. आणि त्यांच्यापुरतं तरी ते खरं असतं. बदलणाऱ्या काळाच्या प्रवाहांनी अनेकांच्या जगण्यात संपन्नता आणली असेलही. पण त्यापासून थोडं अंतरावर उभं राहून आपण आपल्याला एकदातरी पाहावसं वाटतं का? स्वतःच स्वतःला किमान एकदा तरी तपासून घेता येत का? असेल अन् अथवा नसेल. पण नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात विसावलेल्या आठवणींना कधीतरी आपलेपणाचा ओलावा लाभतो आस्थेचे एकेक अंकुर स्मृतींच्या डहाळ्यांवर डोकावू लागतात.

जीवनप्रवासातील काही पाने उलटून शोधताना लहानपणातील माझा मी कुठेतरी संकोचून उभा असलेला दिसतो. परिस्थितीशरण जगणं आपलं म्हणणारा आणि त्यातही आपलं ओंजळभर विश्व शोधणारा. परिस्थितीने भलेही अनुकूल दान पदरी घातले नसेल. सुखाच्या रंगांची मुक्त उधळण आयुष्यात नसेल झाली. पण स्वतःच स्वतःला कोरून पाहताना जगण्यातील आठवणींचे एकेक कंगोरे कळू लागतात अन् त्यांनी पदरी पेरलेली श्रीमंती भौतिक सुखांनी दारी उभ्या केलेल्या समृद्धीपेक्षा खूप मोठी असल्याचं प्रत्ययास येतं. मनःपटलावर आजही त्या स्मृतींची सुखद गोंदणनक्षी साकारते. जगण्याला जोडणारा प्रत्येक बिंदू अन् त्यांना सांधणाऱ्या रेषा आयुष्य सजवत राहतात.

काळाच्या गणिताची समीकरणं सोडवत जातांना उत्तराच्या छोट्याशा ठिपक्याजवळ येऊन पोहचल्यावर माझा मी दिसतो; अगदी बिंदूमात्र, तरीही आपल्या केंद्रस्थानी असंख्य रेषा सामाऊन घेणारा. त्या लहानशा बिंदूला सिंधू होण्याचे स्वप्न देणाऱ्या अनेक गोष्टी समोर उभ्या राहतात. लहानसं का असेना, पण जगण्याला मोठं करणारं गाव आठवणीत चैतन्य घेऊन आजही उभं आहे. भलेतर माझ्या गावाला कुठलाही देदीप्यमान वारसा नसेल. कोणीही लिहिलेला गौरवशाली इतिहास नसेल. जमिनीच्या ज्या लहानशा तुकड्यावर ते वसले, तोच त्याचा भूगोल. गावाचा इतिहास भलेही कोणी घडवला नसेल; पण गावाने आमच्या जगण्याचा इतिहास घडवला. स्वतःचा ओंजळभर भूगोल उभा करण्याइतपत सक्षम बनवले. '

- चंद्रकांत चव्हाण

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Pune