BookVishwa.com

BookVishwa.com

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BookVishwa.com, Book shop, Ground Floor, Below House of Printers, Bajirao Road, Opp BSNL Office, 1936 Sadashiv Peth, .

दुर्मिळ ग्रंथांपासून ते आधुनिक उत्कृष्ट साहित्यापर्यंत, आमचा संग्रह वाचक आणि साहित्यप्रेमींसाठी खास आहे. अशी पुस्तके ज्यांचा प्रत्येक पुस्तकप्रेमी शोध घेतो असतो..
मराठी भाषांतील साहित्यिक रत्नांची ओळख करून घ्यायची असेल तर आमच्याकडे सहज मिळेल..

Photos from BookVishwa.com's post 03/06/2026

तुकोबांचा पंथ सर्वमान्य व कार्यक्षम झाला. सनातन धर्मातच जगू व वाढू शकला. याचे कारण एकच आणि ते म्हणजे तुकोबांनी पंथाच्या अगर सांप्रदायाच्या श्रेष्ठाश्रेष्ठतेच्या व भेदाभेदाच्या भांडणांत न शिरता, आहे त्याच स्वधर्मात, सुलभ आणि सर्वास व सर्रास मोकळे असणाऱ्या व सहज पचनी पडणाऱ्या साधनमार्गाचे महत्त्व जनतेत ठसविले, सामान्य जनाप्रमाणेच थोर संतांना इतकेच नव्हे तर सुधारणावादी नेत्यांनाही तुकोबांचा साधनमार्ग आज शेकडो वर्षांनंतरही पुरोगामी वाटला. हेच त्यांच्या अमर कीर्तीचे व महतीचे मुख्य कारण होय. तुकोबांनी आपल्या या श्रेष्ठ ज्ञानाचा ज्या गीताशास्त्रावर पाया रचला ती गीता त्यांस सापडताच ज्या शब्दात त्यांनी जनताजनार्दनास अर्पण केली त्याच शब्दांत त्यांच्या ज्या गीतानुवादाचा सांप्रत विसर पडला आहे, तो आज तीनशे वर्षांनी जनताजनार्दनास प्रेमभावाने सादर करीत आहे: “परि ईश्वराकरितां। मज सांपडली गीता ॥१०॥ तिच्या संगें अंगिकार केला तरी द्यावा थार ॥११॥” - वा.सी.बेंद्रे

02/06/2026

कोंबडीपालनाचे संपूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या मराठीतील दोन पुस्तकांचा संच घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..

१. कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शक
कुक्कुटपालन हा शेतीपूरक उद्योगांपैकी एक उद्योग आहे. आता व्यावासायिकदृष्ट्या कुक्कुटपालनाकडे स्वतंत्रपणे पाहिले जात आहे. ब्रीडर पक्ष्यांची माहिती, अंड्याची उबवणूक, कोंबड्यांचं आरोग्य नियोजन, लसीकरण याविषयी सविस्तर माहिती देणारं हे पुस्तक. या व्यवसायातील धोके, विविध रोग, बाजारपेठेतील स्पर्धायाविषयी परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.
डॉ. वसंत हिंगणे । पाने : २६४ । किंमत : ४९०/-

२. सोन्याची अंडी देणारी पोल्ट्री
शेतीचा जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा पोल्ट्री आता भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग बनला आहे. कमी भांडवली गुंतवणूक करून, कमीत कमी काळात जास्तीत जास्त फायदा करून देणारा हा व्यवसाय आहे. या व्यवसायाची गुंतवणूक, धोके आणि संधी यांविषयी सोप्या भाषेत माहिती देणारं हे उपयुक्त पुस्तक.
नयना निर्गुण । पाने : १०० । किंमत : १९०/-

२ पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई । आकार : ६.५ x ९.५

एकुण किंमत : ६८०/- + कुरिअर १९/-
एकुण ६९९/- मध्ये कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
पार्सल हातात मिळाल्यावर पैसे द्यावे.
===
हा संच घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी : https://bookvishwa.com/product/kukkutpalan2b/

01/06/2026

शिवरायांच्या १०१ किल्ल्यांवरील कॉफिटेबल पुस्तक
पुस्तकाची वैशिष्ट्ये
- अप्रतिम प्रकाशचित्रे, नकाशे आणि आराखडे । संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी.
- छत्रपती शिवाजी महाराजांची ९ अप्रतिम पेंटिंग्स.
- महाराष्ट्रातील एकुण महत्वाच्या १०१ गडकिल्ल्यांचा संदर्भपूर्ण इतिहास, भूगोल, नकाशे आणि छायाचित्रे यांची अप्रतिम मांडणी.
- सर्व ३१६ पाने । इंम्पोर्टेड आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई
- मोठा आकार ( १५ इंच * १० इंच ) । हार्ड बाऊंड पुस्तक । वजन १.८ किलो
- गडकिल्ल्यांची अतिशय देखणी तब्बल ४१६ छायाचित्रं, ४१ पेंटिंग्स, २१ रेखाचित्रे, आणि १०१ गडकोटांचा महत्वपूर्ण एकत्र नकाशा.
- दुर्गतज्ञ गिरिश टकले आणि भगवान चिले यांची प्रस्तावना.

एकुण किंमत : ९९९/- मधेच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
कुरिअर खर्च : ०/- ( मूळ कुरिअर खर्च रु. १५१/- )

30/05/2026

शेळीपालन व्यवसायाचे संपूर्ण मार्गदर्शन करणारी २ मराठी पुस्तके कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..

१. शेळीपालन : तंत्र आणि व्यवस्थापन
शेळीपालन हा शेतीचा एक जोडधंदा आहे. शेळ्यांच्या जाती, त्यांची निवड, आहार, आजार, त्यावर उपचार, लसीकरण या बाबी साध्या आणि सोप्या शब्दांत या पुस्तकातून समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फायदेशीर शेतीपालन करण्यात शेतकऱ्यांना या पुस्तकाची मदत होईल.
डॉ. तेजस शेंडे । पाने : १५२ । किंमत : २४०/-

२. शेळीपालन : एक ’एटीएम’
शेळ्यांच्या उपयुक्त जाती, शेळ्यांची निवड व व्यवस्थापन, गाभण शेळ्यांची घ्यावयाची काळजी, शेळ्यांच्या वाढीसाठी सकस आहार व पालाखाद्य, रोग व प्रतिबंधात्मक उपाययोजना, शेळ्यांसाठी लसीकरण व जंतनाशक, शेळीपालनासाठी सरकारी योजना, शेळ्यांसाठी विमा योजना, शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन याविषयी माहिती देणारे पुस्तक.
संगीता भापकर । पाने : १३४ । किंमत : २४०/-

२ पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई । आकार : ६.५ x ९.५

एकुण किंमत : ४८०/- + कुरिअर ५०/-
एकुण ५३०/- मध्ये कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
पुस्तकांचे पार्सल हातात मिळाल्यावर पैसे द्यावे.
===
हा संच घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी : https://bookvishwa.com/product/shelipalan2b/

29/05/2026

डाळिंब शेती - लागवड, खते, प्रक्रिया, कीडव्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शन - मराठीतील ३ पुस्तकांचा संच घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..

१. डाळिंब शेती
डाळिंब पीक कोणत्या मोसमात घ्यावे इथपासून ते बाजारपेठेपर्यंतच्या सर्व नियमांची माहिती सोप्या भाषेत पोहचवणारं पुस्तक. या पुस्तकात लागवडीयोग्य जमीन, खतं आणि त्याचं व्यवस्थापन, खोड किड्याचं व्यवस्थापन, आंतरपिके आदी घटकांवर मार्गदर्शन केलं आहे.
विजय दुधाळे । किंमत : १९०/- । पाने : १०२

२. सेंद्रिय व बायोडायनामिक पध्दतीने डाळिंबावरील कीडरोगांचे व्यवस्थापन
विषमुक्त, शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी एकात्मिक शेतीचा वापर कसा करावा, डाळिंबावरील कीडरोगांचे सेंद्रिय व बायोडायनॅमिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तक.
दिलीपराव बारवडकर । किंमत : १९९/- । पाने : १२८

३. सेंद्रिय व बायोडायनामिक पध्दतीची शाश्वत डाळिंब शेती
भरघोस उत्पन्न देणारे सेंद्रिय व बायोडायनामिक पध्दतीने डाळिंब पीक कसे घेता येईल, याबद्दल मार्गदर्शन करणारे पुस्तक.
दिलीपराव बारवडकर । किंमत : १७०/- । पाने : १०४

३ पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई । आकार : ६.५ x ९.५

एकुण किंमत : ५६९/- + कुरिअर ४०/-
एकुण ५९९/- मध्ये कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
पुस्तकांचे पार्सल हातात मिळाल्यावर पैसे द्यावे.
===
हा संच घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी :
https://bookvishwa.com/product/dalimb-3b/

28/05/2026

स्पेस ट्रॅव्हल आणि फ्युचरटेक । अच्युत गोडबोले लिखित नवीन प्रकाशित २ पुस्तकांचा संच घरपोहोच

१. स्पेस ट्रॅव्हल
आज आपण चंद्रावरच काय; पण त्याही पलीकडे जाण्याची तयारी करतो आहोत. अंतराळात फक्त जाऊन परत येण्याचाच नाही, तर तिथे मानवीवस्ती करून राहण्याच्या दिशेनं पावलं पडताहेत. मानवी स्वप्नं सत्यात उतरण्याच्या या प्रवासाचा भूतमोहिमांचा आढावा घेणारं पुस्तक म्हणजे स्पेस ट्रॅव्हल.
पाने : ३२२ । किंमत : ४००/-

२. फ्युचरटेक
मेंदूशास्त्रापासून भविष्यातल्या उपचारपद्धतींपर्यंत, भविष्यातली घरं-शहरं, प्रवास आणि अंतराळापर्यंत, एआयपासून नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत.. भविष्यातले औषधोपचार, स्मार्ट सिटीज, स्पेस टुरिझम, परग्रहावरील वस्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्चुअल रिअॅलिटी, नॅनो टेक्नोलॉजी, बायो कॉम्प्युटर्स, क्वांटम कॉम्प्युटर्स, सेन्सर्स, लाय फाय, सायबर वॉर, होलोग्राम अशा भविष्याला आकार देऊ शकणाऱ्या निवडक तंत्रज्ञानांचा आढावा घेणारं पुस्तक - 'फ्युचरटेक'
पाने : २८८ । किंमत : ३५०/-

लेखक : अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर
पेपरबॅक पुस्तके । कमी वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई

एकुण किंमत : ७५०/- + कुरिअर खर्च ०/-
घरपोहोच किंमत : ७५०/- कॅश ऑन डिलिव्हरीसह
पार्सल हातात मिळाल्यावर पैसे देऊ शकता.
===
हा संच घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी :
https://bookvishwa.com/product/space-future/

27/05/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १४ शिलेदारांवरील १४ पुस्तकांचा संच - कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच

महाराष्ट्र म्हणजे शिलेदारांनी स्वतःचे रक्त सांडून पवित्र केलेली भूमी ! दिलेल्या शब्दासाठी आणि वाहिलेल्या निष्टेसाठी जीवाची बाजी लावत, एकनिष्ठ होऊन लढणारा शिलेदार ! अशाच काही शुर शिलेदारांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा वाहिल्या ! आपले संपूर्ण जगणे आणि मरणे त्यासाठीच ! अशा शुर आणि थोर शिलेदारांनी केलेल्या कार्याची ओळख आपल्या मुलांना व्हायला हवी या हेतुने महाराजांच्या १४ शिलेदारांवरील गोष्टीस्वरुप आणि प्रेरणादायी चरित्रांचा संच मराठी उपलब्ध आहे.
१. बहिर्जी नाईक । लेखक : मीनाक्षी वैद्य । पाने : १०४ । किंमत : १२०/-
२. तानाजी मालुसरे । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ९० । किंमत : १२०/-
३. नेताजी पालकर । लेखक : प्रभाकर भावे । पाने : १२८ । किंमत : १५०/-
४. कान्होजी जेधे । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ९६ । किंमत : १२०/-
५. जिवा महाला । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ६४ । किंमत : ६०/-
६. मुरारबाजी देशपांडे । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ६४ । किंमत : ८०/-
७. फिरंगोजी नरसाळे । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ८० । किंमत : १००/-
८. बाजीप्रभू देशपांडे । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ६४ । किंमत : ८०/-
९. प्रतापराव गुजर । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ६४ । किंमत : ८०/-
१०. हंबीरराव मोहिते । लेखक : मीनाक्षी वैद्य । पाने : ९६ । किंमत : १२०/-
११. बाळाजी आवजी चिटणीस । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ८० । किंमत : १००/-
१२. दादोजी कोंडदेव । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ८६ । किंमत : १००/-
१३. मदारी मेहेत्तर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद । लेखक : प्रभाकर भावे । पाने : ८० । किंमत : १००/-
१४. वीर शिवाजी काशिद । लेखक : डॉ. पी. एस. जगताप । पाने : ६५ । किंमत : १००/-

पेपरबॅक पुस्तक । कमी वजनाच्या पेपरवर छपाई । एकुण पाने : ११६१ । एकुण वजन १.५ किलो
एकुण किंमत : १४६०/- + कुरिअर खर्च : ६९/-
घरपोहोच किंमत : १४९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह..
पुस्तकांचे पार्सल हातात मिळाल्यावर पैसे देऊ शकता.

वरील पुस्तकसंच घरपोहोच मागवण्यासाठी व्हाट्सअप / कॉल करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा संचाची ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी येथे जा
https://bookvishwa.com/product/shiledar-set-14b/

26/05/2026

आयुर्वेद सर्वांसाठी - प्रसिध्द वैद्य खडीवाले लिखित आयुर्वेद विषयावरील ३ मराठी पुस्तकांचा संच घरपोहोच

आयुर्वेद भूषण आणि राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार प्राप्त नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेद विषयातील प्रसिध्द लेखक म्हणजेच वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले. २०० हून अधिक विविध प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती / औषधे शोधणारे, १५० हून अधिक ग्रंथसंपदा लिहिणारे वैद्य खडीवाले यांची राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय गुरु म्हणून निवड केली होती. आयुर्वेदाच्या संशोधन आणि लोकप्रियतेसाठी त्यांनी "वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन" संस्थेची स्थापना केली, अनेक आयुर्वेद तज्ञ तयार केले, जनकल्याण रक्तपेढी आणि नेत्रपेढी उभारली आहे. या आयुर्वेद पंडिताने सर्वसामान्यांसाठी लिहिलेली ’आयुर्वेद सर्वांसाठी’ विषयावरील पुढिल ३ पुस्तके संच स्वरुपात आहेत.

१. संपूर्ण आरोग्यवर्धिनी
या पुस्तकात एकुण १३० आजारांची लक्षणे, कारणे आणि त्यावर केले जाणारे आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत. मधुमेह, खोकला, पोटदुखी, दमा, ताप, ब्लडप्रेशर, मूतखडा, त्वचाविकार, तोंड येणे यांसारख्या अनेक आजारांचा समावेश या पुस्तकांत आहे.
पाने : २५० । किंमत : २००/-

२. आयुर्वेदिक वनौषधी
या पुस्तकांत २०१ औषधी वनस्पतींची माहिती मिळते तसेच या वनस्पतींचे गुणधर्म, वर्णन, वैशिष्ठ्ये देखील उपलब्ध आहेत. ठराविक वनस्पतींचा आयुर्वेदातील श्लोक दिलेला आहे. आपल्या आसपास असलेल्या अनेक वनस्पती यात मिळतील आणि त्यांचे गुणधर्म वाचुन नक्किच आश्चर्य होते.
पाने : २५० । किंमत : २००/-

३. घरगुती आयुर्वेदिक उपचार
या पुस्तकात ५७ असे आजार दिले आहेत ज्यांचा उपचार आपण डॉक्टरांकडे न जाता घरच्याघरी देखील करु शकतो.
पाने : ७४ । किंमत : १००/-

तीन पुस्तकांचा संच । पेपरबॅक पुस्तके
सर्व मराठी प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.

एकुण किंमत : ५००/- + कुरिअर खर्च : ५०/-
घरपोहोच किंमत : ५५०/- कॅश ऑन डिलिव्हरीसह
पार्सल हातात मिळाल्यावर पैसे देऊ शकता.
==
हा ३ पुस्तकांचा संच घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी : https://bookvishwa.com/product/vaidya-khadiwale-3b/

25/05/2026

श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवीन प्रकाशित चरित्र - ब्रह्मांडनायक - पुस्तक कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण 'ब्रह्मांडनायक' म्हणून ओळखतात. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असे आशीर्वचन देणार्‍या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे. जगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल.

लेखक : प्रा. डॉ. यशवंत पाटील | पाने : ५७० | पेपरबॅक बांधणी । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई | वजन : ८०० ग्रॅम

किंमत : ६९९/- + कुरिअर ५१/-
एकुण : ७५०/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
===
पुस्तक घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व, पुणे 8999505011
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी :
https://bookvishwa.com/product/brahmandnayak/

02/08/2025

भारतीय संविधानाने अधोरेखित केलेली लोकशाही अद्याप भारतात पूर्णपणे लागू झालेली नाही. भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे देशात खऱ्या लोकशाहीऐवजी पक्षशाही प्रस्थापित झालेली आहे. लोकशाहीच्या बुरख्याआड पार्टीशाही बोकाळली आहे. पक्षांच्या हिताला पोषक ठरणाऱ्या निर्णयांना आणि विकासकामांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे देशात विकासाऐवजी मतांच्या राजकारणाला चालना मिळाली आहे. संविधानात नमूद केलेल्या तरतुदी आणि प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया यामध्ये मोठा विरोधाभास आहे. उमेदवाराच्या पात्रता, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेपेक्षा पक्षाची विचारसरणी आणि निष्ठा महत्त्वाची मानली जाते, आणि ही समस्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये आढळते. याच धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकत "पार्टीलेस इंडिया" या चळवळीचे सह-संस्थापक डॉ. सचिन पेठकर देशभरात जनजागृती करत आहेत.
https://youtu.be/_RnSZ6u6dDM

Telephone