Reflection Foundation
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Reflection Foundation, Community Service, Benkarwasti, Pune.
06/08/2026
पालकत्वाची पुस्तके सहज कुठे मिळतील?", मुलांना काय आणि कसे खेळवायचे?...
पालकांच्या याच नेहमीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी 'पालक शाळा' आयोजित पालक बालक संवाद केंद्र आणि 'वाचू आनंदें' कट्टा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सहभागी झालेल्या सर्व पालक आणि बालमित्रांचे खूप खूप आभार.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम १५ ऑगस्ट पासून दर रविवारी घेण्यात येणार आहे. यात पालक व बालमित्रांनी सहभागी व्हावे.
04/08/2026
01/08/2026
पालकांची पुस्तकं आणि मुलांचे खेळ
अनेक वेळा पालकत्वासंबंधीची पुस्तकं वाचावीशी वाटतात, पण ती सहज कुठे मिळतील?... मुलांबरोबर खेळायचे काय आणि त्यांना आपण तरी किती खेळवायचे?.. असे प्रश्न बऱ्याच वेळेला पालकांना पडतात. या प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे या वेळची पालक शाळा...
पालकत्वाची पुस्तकं आणि बौद्धिक विकासासाठी मुलांनी, पालकांनी खेळावयाचे खेळ व साधने यांची एकत्रित माहिती घेऊया पालक शाळेच्या पालक बालक संवाद केंद्र येथे..
वाचनाची आवड आपल्याबरोबर मुलांमध्ये रुजविण्यासाठी वाचू आनदे कट्टयावर मुलांना घेऊन नक्की या...
रविवार २ ऑगस्ट सायं. ४ वाजता
स्थानः पालक बालक संवाद केंद्र, श्रीराम नगर प्लॉट नंबर 21 एकविरा हॉस्पिटल समोर (आकाशवाणी चौक बारामती बालाजी मंदिराच्या मागे), जळगाव
पालक शाळा | दूरध्वनीः ८४ ८५ ८४ ९३ ३६
(मुलांच्या सर्वांगीण विकासात सहयोगी बनू इच्छिणाऱ्या आई बाबांचा समूह)
29/07/2026
Team Reflection Foundation wishes Happy Gurupurnima to everyone. आपण सगळे आयुष्यभर शिष्य असतो आणि सतत शिकत राहतो. शिक्षण ही कधी ही ना संपणारी प्रक्रिया आहे आणि आपण अनेक लोकांकडून काही ना काही शिकत असतो. त्या सर्व लोकांना जे काही ना काही शिकवून गेले आहेत किंवा शिकवत आहेत त्या सर्वांना गुरू पूर्णिमा च्या शुभेच्छा🙏
11/07/2026
Reflection Foundation has been actively conducting year long "Personality Development" program for 8th to 12th grade students. Under this program, we cover topics which are essential in shaping child's personality and future. Last year we conducted this program in two schools: Huzurpaga and Shivaji School. After receiving positive and encouraging response from students, this year we are going to run this program in 8 schools. This leap is huge and very important for us. Follow our page and we will keep you posted with updates about this program.
29/06/2026
दिनांक *१३-६-२०२६ शनिवार, अजिंक्य देडगे हायस्कूल* नांदेड फाटा येथे शिक्षक प्रशिक्षण रिफ्लेक्शन फाऊंडेशन तर्फे घेण्यात आले. यात
🔹शिक्षक कसा असावा
🔹 प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडे बघायला हवे.
🔹मुलांशी संवाद
🔹तणावाची कारणे, परीणाम, व व्यवस्थापन
🔹वेळेचे व्यवस्थापन
🔹Team Work
या मुद्यावर सत्र घेतले.
या प्रशिक्षणात शाळेतील २० शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता. उपक्रमात सहभाग नोंदविला.
सत्राच्या समारोपला शाळेचे अध्यक्ष अजिंक्य देडगे, शाळेच्या सेक्रेटरी, मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.
रिफ्लेक्शन फाऊंडेशन कडून हे सत्र अश्विनी पंडित व शिवानी कुलकर्णी यांनी घेतले.
29/06/2026
25/6/2026 रोजी पी जोग शाळा चिंचवड येथे सकाळी 10 ते 11 या वेळात आणि गोलांडे शाळेत 4 ते 5 ह्या वेळेत व्यक्तिमत्व विकास या प्रकल्पा अंतर्गत 2026-2027 या शैक्षणिक वर्षातील पहिले सेशन झाले.
आज रिफ्लेक्शन फाउंडेशन ची माहिती व वर्षभरात आपण कोणते सेशन घेणार आहोत ते सांगून pre test फॉर्म भरून घेतले.
शाळेतील शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन घेण्यात आले. पुढे दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेगवेगळ्या विषयांवर सेशन घेण्यात येणार आहे. आजचे सेशन प्राजक्ता सहस्त्रबुद्धे व विदुला पेंडसे यांनी घेतले.
शाळेतील विद्यार्थी संख्या 84 होती
15/05/2026
मानसिक आरोग्य क्षेत्रातील बाप माणूस आज
आपल्यातून निघून गेला अत्यंत दुःखद घटना
नाडकर्णी सरांनी समाजाला मानसिक आरोग्य कडे पहाण्याची एक नवी दृष्टी दिली,
रिफ्लेक्शन फाऊंडेशन कडून भावपूर्ण श्रद्धांजली !
नरसापुरसारख्या घटनांवर समाजाची भूमिका — केवळ सरकार पुरेसे नाही
काल घडलेल्या नरसापुर प्रकरणामुळे जनक्षोभ उसळलेला दिसतो. अशा घटना घडल्या की समाजात संताप निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि सरकारने यावर ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. मात्र, हा प्रश्न फक्त आजचा नाही. यापूर्वीही मालेगाव, कलकत्ता यांसारख्या प्रकरणांमुळे विशेषतः तरुण मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढलेली आहे.
पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे — या घटनांसाठी केवळ सरकार आणि पोलीसच जबाबदार आहेत का?
वास्तविक पाहता, समाजाची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे. आज समाजात “मला काय त्याचं?” ही भूमिका वाढताना दिसते. अन्याय आपल्या कुटुंबाबाहेर घडत असेल, तर आपण दुर्लक्ष करतो. हीच उदासीनता अशा गुन्ह्यांना खतपाणी घालते.
पूर्वी समाजात एक प्रकारचा सामाजिक धाक होता. चुकीचे कृत्य केल्यास समाजाकडून निषेध, बहिष्कार किंवा दबाव येईल, ही जाणीव लोकांमध्ये होती. आज मात्र तो सामाजिक दबाव कमी झाल्यामुळे केवळ कायद्याच्या भीतीवर समाज चालत आहे. आणि हे स्पष्ट आहे की केवळ कायद्याच्या धाकाने असे प्रश्न पूर्णपणे सुटत नाहीत.
यासाठी समाजाने स्वतःकडे अंतर्मुख होण्याची गरज आहे:
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो का?
अन्याय दिसल्यास आपण आवाज उठवतो का?
गरज पडल्यास संबंधित यंत्रणांपर्यंत तक्रार पोहोचवतो का?
आजच्या घडीला तरुण मुली प्रचंड भीतीच्या वातावरणात जगत आहेत. अनेक सत्रांमध्ये हे जाणवते की त्यांना सतत भीती वाटते — “अशा घटना वाढल्या तर आमचे शिक्षण थांबेल का?”, “आम्हाला बाहेर पडता येईल का?”
जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुन्हा एकदा स्त्रियांना घरात बसवण्याची वेळ येऊ शकते — आणि हे समाजासाठी अत्यंत घातक ठरेल.
म्हणूनच, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.
समाजातील मोठ्यांनी लहानांना संरक्षण देणे ही केवळ जबाबदारी नाही, तर त्यांचा हक्क आहे.
पूर्वी “एक मूल हे संपूर्ण कुटुंब, गल्ली आणि गावाचे असते” अशी भावना होती. आज मात्र मुलांकडे केवळ आई-वडिलांची ‘खासगी मालमत्ता’ म्हणून पाहिले जाते. इतर कुणी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली जाते. ही मानसिकता समाजासाठी धोकादायक आहे, कारण त्यामुळे सामाजिक नियंत्रण आणि परस्पर जबाबदारी कमी होत जाते.
निष्कर्ष
सरकार आणि कायदा आपले काम करतीलच, पण समाजानेही आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे.
अन्यायाविरोधात आवाज उठवणे
चुकीच्या गोष्टींना वेळेत रोखणे
समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे
ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
“मला काय त्याचं” ही भूमिका बदलून “हे आपल्या समाजाचं आहे” अशी भावना निर्माण झाली, तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.
आशा
Reflection
24/04/2026
बाल चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. खुल्या वातावरणात मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्याचा आनंद घेताना लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. चित्रपटातील संदेश, मनोरंजन आणि शिक्षण यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना भावला. कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखले गेले आणि सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. एकूणच, महोत्सवाची सुरुवात अत्यंत यशस्वी ठरली.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Pune
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |