RC Fan Club
आमचा दादा रवि दादा ....!
08/06/2026
इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः॥
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमी संघर्षाची संकल्पपूर्ती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात आली. हा दिवस डोंबिवली शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
आपल्या भाजपा-महायुती सरकारने मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा नाममात्र दरात मंजूर केली. या निर्णयामुळे १४ वर्षांपासून सुरु असलेल्या प्रशासकीय व कायदेशीर संघर्षाची फलश्रुती झाली. भगवान महादेवाच्या कृपेने शिवभक्तांच्या श्रद्धेचा ऐतिहासिक विजय झाला. या आनंददायी पार्श्वभूमीवर भगवान महादेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
07/06/2026
आपल्या डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमी संघर्षाला ऐतिहासिक यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर ८ जून रोजी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते पिंपळेश्वर महादेव मंदिरात महापूजा संपन्न होणार आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
यावेळी माजी आमदार सुभाष भोईर, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते शशिकांत कांबळे, उल्हासनगर जिल्हा प्रभारी नाना सूर्यवंशी, नगरसेवक दीपेश म्हात्रे, ज्येष्ठ नेते संतोष केणे, संदिप माळी यांच्यासह इतर मान्यवर व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपळेश्वर महादेव मंदिर : एक संघर्ष
इतिहास… श्रद्धेचा, संघर्षाचा आणि डोंबिवलीच्या अस्मितेचा!
डोंबिवलीच्या भूमीत वसलेले श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर डोंबिवलीकरांच्या श्रद्धेचे, हिंदुत्वाच्या विचारांचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. अनेक दशकांपासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाने डोंबिवलीच्या इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
पण या पवित्र भूमीवर संकट आले…
सन २०१२ मध्ये मंदिर परिसरातील जागेवरून वाद निर्माण झाला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी मारी लू फर्नांडिस यांचे नाव या प्रकरणात पुढे आले आणि पिंपळेश्वर देवस्थानच्या जागेवर कब्जाचा आरोप होताच डोंबिवलीकरांच्या भावना तीव्र झाल्या.
हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांवर संघर्ष करण्याची वेळ आली...
संघर्ष… हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांचा!
हा संघर्ष केवळ जमिनीचा नव्हता…
हा संघर्ष होता श्रद्धेचा, हिंदुत्वाचा आणि डोंबिवलीच्या अस्मितेचा!
आ. रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, शहरातील मित्र मंडळ आणि असंख्य डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले. मंदिराच्या भूमीसाठी जनआंदोलन उभे राहिले.
त्या वेळी आमदार Ravindra Chavan यांनी या लढ्याला नेतृत्व दिले. या सर्वांची मोट बांधून 20 ऑगस्ट 2012 रोजी डोंबिवली बंद ची हाक दिली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्या दिवशी शहरात २०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले. कारण भावना तीव्र होत्या, पण लढा श्रद्धेचा होता. आ. रविंद्र चव्हाण तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. परंतु रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली बंदच्या हाकेला प्रतिसाद देत हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांनी शहर अक्षरशः बंद ठेवले.
दुकाने बंद…व्यवहार बंद…पण श्रद्धेचा संघर्ष सुरूच…
वर्षानुवर्षे चाललेल्या या संघर्षानंतर अखेर पिंपळेश्वर देवस्थानच्या न्यायाच्या लढ्याला यश मिळाले. डोंबिवलीकरांनी जपलेली श्रद्धा आणि हिंदुत्ववादी विचारांनी उभारलेला संघर्ष व्यर्थ गेला नाही.
आज तब्बल 14 वर्षाचा वनवास संपला, आणि 2026 मध्ये हिंदुहिताच रक्षण करणाऱ्या सरकार ने म्हणजेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या मंत्रिमंडळाने पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ला 4 एकर 25 गुंठे जागा देऊ केली.
01/06/2026
कल्याण-डोंबिवलीकरांच्या श्रद्धेची संकल्पपूर्ती
डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमी संघर्षाला ऐतिहासिक यश मिळाले. देवस्थान समिती, असंख्य भाविक आणि कल्याण-डोंबिवलीकरांच्या श्रद्धेचा विजय झाला. या आनंददायी पार्श्वभूमीवर भगवान महादेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी सपत्नीक संकल्पपूर्ती पूजा करण्यात केली.
तब्बल १४ वर्षांपासून प्रशासकीय व न्यायालयीन स्तरावर सुरु असणाऱ्या या लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबतच अनेक हिंदुत्ववादी संघटना, मंडळे आणि असंख्य नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेतला. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात या मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्यात आली. यामुळे मंदिरभूमी संघर्षाची पूर्णाहुती झाली. या आनंददायी पार्श्वभूमीवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
27/05/2026
पिंपळेश्वर महादेव मंदिर : एक संघर्ष
इतिहास… श्रद्धेचा, संघर्षाचा आणि डोंबिवलीच्या अस्मितेचा!
डोंबिवलीच्या भूमीत वसलेले श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर डोंबिवलीकरांच्या श्रद्धेचे, हिंदुत्वाच्या विचारांचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. अनेक दशकांपासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाने डोंबिवलीच्या इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
पण या पवित्र भूमीवर संकट आले…
सन २०१२ मध्ये मंदिर परिसरातील जागेवरून वाद निर्माण झाला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी मारी लू फर्नांडिस यांचे नाव या प्रकरणात पुढे आले आणि पिंपळेश्वर देवस्थानच्या जागेवर कब्जाचा आरोप होताच डोंबिवलीकरांच्या भावना तीव्र झाल्या.
हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांवर संघर्ष करण्याची वेळ आली...
संघर्ष… हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांचा!
हा संघर्ष केवळ जमिनीचा नव्हता…
हा संघर्ष होता श्रद्धेचा, हिंदुत्वाचा आणि डोंबिवलीच्या अस्मितेचा!
आ. रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, शहरातील मित्र मंडळ आणि असंख्य डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले. मंदिराच्या भूमीसाठी जनआंदोलन उभे राहिले.
त्या वेळी आमदार Ravindra Chavan यांनी या लढ्याला नेतृत्व दिले. या सर्वांची मोट बांधून 20 ऑगस्ट 2012 रोजी डोंबिवली बंद ची हाक दिली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्या दिवशी शहरात २०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले. कारण भावना तीव्र होत्या, पण लढा श्रद्धेचा होता. आ. रविंद्र चव्हाण तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. परंतु रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली बंदच्या हाकेला प्रतिसाद देत हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांनी शहर अक्षरशः बंद ठेवले.
दुकाने बंद…व्यवहार बंद…पण श्रद्धेचा संघर्ष सुरूच…
वर्षानुवर्षे चाललेल्या या संघर्षानंतर अखेर पिंपळेश्वर देवस्थानच्या न्यायाच्या लढ्याला यश मिळाले. डोंबिवलीकरांनी जपलेली श्रद्धा आणि हिंदुत्ववादी विचारांनी उभारलेला संघर्ष व्यर्थ गेला नाही.
आज तब्बल 14 वर्षाचा वनवास संपला, आणि 2026 मध्ये हिंदुहिताच रक्षण करणाऱ्या सरकार ने म्हणजेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या मंत्रिमंडळाने पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ला 4 एकर 25 गुंठे जागा देऊ केली.
या यशाच्या मागे असणारा संघर्ष सुद्धा प्रत्येकाने जाणणे हे गरजेचे आहे.
हा विजय आहे — डोंबिवलीच्या अस्मितेचा!
हा विजय आहे — पिंपळेश्वर महादेवाच्या भक्तांचा!
हा विजय आहे — हिंदुत्ववादी विचारांच्या संघर्षाचा!
हर हर महादेव 🙏🏻
26/05/2026
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर...... डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मौजे सागाव सोनारपाडा येथे असणारे हे शिवमंदिर म्हणजे कल्याण-डोंबिवलीतील हजारो शिवभक्तांचे परम श्रद्धास्थान ! पिंपळेश्वर महादेवाच्या चरणी लीन झाल्यावर एक विलक्षण आत्मिक ऊर्जा व शांतता मिळते, हा अनुभव अनेक वेळा आला आहे.
या देवस्थानाला हक्काची जागा असावी, ही इच्छा माझ्यासह अनेक शिवभक्तांच्या मनात होती. ही मागणी पूर्णत्वास जावी यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत होतो. महादेवाच्या आशीर्वादाने शिवभक्तांच्या प्रार्थनेला आणि शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं, हे सांगताना मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून आलं आहे.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यात येणार आहे. तसेच या जमिनीवरील देवस्थान ट्रस्टचा वापर नियमित करण्यास देखील भाजपा-महायुती सरकारने मंजुरी दिली आहे.
डोंबिवलीकरांची श्रद्धा लक्षात घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सर्व डोंबिवलीकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार !
[Shri Pimpaleshwar Mahadeo Mandir, Dombivli MIDC, Sagaon Sonarpada, BJP4Dombivli, BJP4KDMC, BJP4Maharashtra, Aapla Ravi ]
09/05/2026
डोंबिवलीच्या वीरपुत्रांना विनम्र अभिवादन!
सन १७३९. वसईच्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा जुलूम वाढला होता. सक्तीचे धर्मांतर आणि हिंदू धर्मावरील आघाताने सारा परिसर पेटून उठला होता. या परकीय आक्रमकांना धडा शिकवण्यासाठी नरवीर चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईला वेढा घातला.
वसईचा किल्ला म्हणजे एक अभेद्य दुर्ग! तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूला जमीन. तब्बल तीन महिने उलटले, पण पोर्तुगीज नमत नव्हते. अखेर एक धाडसी योजना आखली गेली... सॅबेस्टियन बुरुज सुरुंगाने उडवायचा!
ही योजना यशस्वी करण्यासाठी इतर मावळ्यांसोबत आपल्या डोंबिवलीचे आन ठाकूर आणि मान ठाकूर हे दोन मृत्युंजय वीर पुढे सरसावले. मृत्यूला समोर पाहूनही हे वीर डगमगले नाहीत. जीवाची बाजी लावून त्यांनी बुरुजाला सुरुंग लावला. प्रचंड स्फोट झाला, बुरुज ढासळला आणि मराठा सैन्य वादळासारखे किल्ल्यात घुसले. पोर्तुगीजांचा पराभव झाला, पण हा विजय रक्ताने लिहिला गेला होता. आपला स्वधर्म आणि संस्कृती वाचवण्यासाठी आन आणि मान ठाकूर यांनी याच रणसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिली.
ही केवळ लढाई नव्हती, तर आपल्या मातीसाठी आणि धर्मासाठी दिलेला तो सर्वोच्च लढा होता आणि हा लढा देणाऱ्या योद्ध्यांमध्ये आपल्या डोंबिवलीच्या दोन ‘मृत्युंजय’ वीरांचा समावेश होता, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
या विरांच्या चिरंतन स्मृती म्हणजे आपल्या डोंबिवली शहराला लाभलेला शौर्यशाली वारसा आहे. डोंबिवली पश्चिम येथे उभारलेले मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर शौर्यस्थळ हे या गौरवशाली वारशाचे ज्वलंत प्रतिक आहे. याठिकाणी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, इतिहास संकलन समिती कोकण प्रांत (कल्याण विभाग), मृत्युंजय आन ठाकूर आणि मृत्युंजय मान ठाकूर शौर्यदिन सोहळा संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शौर्यदिन सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून दोन्ही मृत्युंजय वीरांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी आदरणीय प्रल्हादजी शास्त्री महाराज, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मृत्युंजय वीर आन ठाकूर आणि मान ठाकूर यांचे वंशज शंकर ठाकूर, दीपक ठाकूर, श्रावण ठाकूर, इंद्रजीत ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
[ Dombivli, Vasai Fort, Veer Maratha, AanThakur, Man Thakur, Tribute To Heroes, Warriors Of Maharashtra, Veer Gatha, Pride Of Dombivli, Ravindra Chavan ]
Click here to claim your Sponsored Listing.