Miraclesmastery

Miraclesmastery

Share

प्रत्येक जण वजन कमी करू शकतो
Extreme Fitness | Simple Diet
Certified Yoga & Nutrition Coach
Weight loss with Mind Programming

09/03/2026

High protein laddu

मखाना कोरड्या पॅनमध्ये 3–4 मिनिटे हलके भाजा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करा.
शेंगदाणे भाजून (टरफलं काढायची की नाही तुमच्यावर) जाडसर पावडर करा. खूप बारीक करू नका.
एका बाउलमध्ये शेंगदाणा पावडर + मखाना पावडर + ओट्स + राजगिरा मिसळा.
खजूर टाकून हलकं ब्लेंड करा. (गूळ वापरत असाल तर बारीक करून मिसळा.)
मिश्रण एकत्र करून लाडू वळा. शेंगदाण्यात नैसर्गिक तेल असल्यामुळे वेगळं तूप लागत नाही. जर मिश्रण कोरडं वाटलं तर 1–2 टीस्पून कोमट पाणी किंवा थोडंसं तूप घालू शकता.

01/03/2026

दोन्हीमध्ये प्रथिने आणि ओमेगा-3 असतात, पण काही महत्त्वाचे फरक आहेत:

* चीआ सीड्स: जास्त प्रथिने आणि फायबर, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत
* सब्जा सीड्स: लोह आणि व्हिटॅमिनचा चांगला स्रोत, उष्णतेपासून आराम देण्यासाठी उत्तम

वापर:
* पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी: चीआ सीड्स वापरा
* जास्त फायबरसाठी: चीआ सीड्स वापरा
* उष्णतेपासून आराम आणि फायबरसाठी: थोड्या प्रमाणात सब्जा वापरा

पाण्यात भिजणे:
* चीआ सीड्स: पूर्णपणे भिजण्यासाठी अर्धा ते 1 तास लागतो
* सब्जा सीड्स: 1 ते 2 मिनिटांत पूर्णपणे भिजून जातात

वेट लॉससाठी:
दोन्ही वेट लॉससाठी उपयुक्त आहेत. चीआ सीड्समध्ये थोडे जास्त चरबी असल्यामुळे, वेट लॉससाठी चीआ सीड्सला प्राधान्य देणे चांगले. उन्हाळ्यात थंडावा आणि हायड्रेशनसाठी सब्जा सीड्सचा वापर करा.

कसे घ्यायचे?
* दोन्ही सीड्स पाण्यात, स्मूदीमध्ये, दहीमध्ये किंवा सलादमध्ये घालून खाऊ शकता. सकाळी घेऊ शकता
* आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी न्यूट्रिशनिस्ट/dietitian चा सल्ला घ्या.

चीआ सीड्स आणि सब्जा सीड्स दोन्ही पोषक आणि वेट लॉससाठी उपयुक्त आहेत. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार योग्य निवड करा.

वेट लॉस कसा करायचा यासाठी वर्कशॉप आहे त्याची लिंक BIO मधे दिली आहे

28/02/2026

चहा चपाती ला पर्याय शोधा तुमच्या हेल्थ साठी

# marathivideo

07/02/2026

1. Carbs timing महत्त्वाचे आहे, carbs cut नाही
तुम्ही carbs कधी घेताय हे खूप महत्त्वाचं आहे.
Workout च्या आधी किंवा नंतर घेतलेले carbs तुमच्या body ला fuel देतात.
रात्री उशिरा heavy refined carbs घेणं avoid करा, पण दिवसभर carbs शहाणपणाने घ्या.

2. Simple carbs vs Complex carbs समजून घ्या
Sugar, biscuits, bakery items, cold drinks हे simple carbs आहेत.
Rice, roti, oats, fruits, vegetables, dal हे complex carbs आहेत.
Problem carbs नाहीत, problem आहे wrong carbs + excess quantity.

3. Zero-carb diet = water weight loss
सुरुवातीला वजन पटकन कमी झाल्यासारखं वाटतं कारण water loss होतो.
Fat loss होत नाही.
नंतर weakness, dizziness, irritability, cravings वाढतात आणि diet तुटते.

4. Low carbs घेतले तर body stress mode मध्ये जाते
Carbs खूप कमी केल्यावर body cortisol वाढवते.
यामुळे fat loss थांबतो, belly fat वाढते आणि metabolism slow होते.

5. Protein आणि carbs एकत्र घेतले तर fat loss सोपा होतो
Protein satiety देतं.
Carbs energy देतात.
दोन्ही balance मध्ये असतील तर भूक control होते आणि binge eating थांबतं.

Photos from Miraclesmastery's post 04/02/2026

काही आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीत जेव्हा असे शब्द वाचायला मिळतात.
अनुभव १ :
गेल्या शनिवारी मी माझ्या पत्नीकरिता आमच्या फॅमिली होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे मी माझ्या सर्दी साठी ट्रीटमेंट घेत होतो. बेंगळुरूला आल्यापासून माझ्या आयुष्यात सर्दी हा जणू कायमचा पाहुणाच झाला होता. गेली दोन-तीन वर्षे नियमित होमिओपॅथिक उपचार सुरू होते, तरीही वातावरणातील बदल, धूळ आणि प्रदूषण यामुळे सर्दी पुन्हा पुन्हा होतच राहायची. तेव्हा वाटायचं, हे असंच आयुष्यभर चालणार का?
मे महिन्यात मी एमबीएम जॉईन केलं आणि हळूहळू माझं आयुष्य बदलू लागलं. नियमित व्यायाम, आहारातील शिस्त आणि स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. अवघ्या एक-दीड महिन्यातच मी होमिओपॅथिक औषधं थांबवली आणि आश्चर्य म्हणजे, जवळजवळ नऊ महिने झाले तरी सर्दीचा त्रास पुन्हा झाला नाही.
नऊ महिन्यांनंतर डॉक्टरांना भेटलो तेव्हा त्यांनी काळजीपूर्वक विचारलं, “इतकी महिने आलात नाहीत, आता काही त्रास होत नाही का? इतर काही ट्रीटमेंट घेत आहात का?” तेव्हा मी त्यांना एमबीएममधून मिळालेलं शिस्तबद्ध जीवन, केलेले आहारातील बदल आणि नियमित एक्सरसाइज याबद्दल सांगितलं.
माझं बोलणं ऐकून डॉक्टर खूप आनंदी झाल्या. त्यांनी सांगितलं की माझं शरीर आता पूर्वीपेक्षा अधिक सुदृढ आणि निरोगी दिसत आहे; मसल्सही स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो समाधानाचा भाव पाहून माझ्या डोळ्यांत समाधान आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली. तो क्षण मला आतून खूप काही देऊन गेला. आरोग्य म्हणजे खरंच आयुष्यातील सर्वात मोठं भांडवल आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा.
अनुभव २ :
हा अनुभव केवळ करिअरचा नाही, तर माझ्या मानसिक बदलाचा आणि आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा आहे, जो मला एमबीएममुळे मिळाला.
नोव्हेंबर महिन्यात माझ्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात जवळजवळ वीस वर्षांचा अनुभव असूनही, आणि गेली अकरा वर्षे एकाच कंपनीत एका विशिष्ट प्रॉडक्टवर काम करूनही, अचानक मला माझ्या सध्याच्या ग्रुपमधून पूर्णपणे नवीन ग्रुपमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. ज्या प्रॉडक्ट्सवर मी कधीच काम केलं नव्हतं, ज्या गोष्टी मला फक्त नावाने माहित होत्या , त्या सगळ्यांमध्ये काम करायचं होतं.
पूर्वीचा मी असतो, तर कदाचित घाबरलो असतो… नाराज झालो असतो… तक्रार करत बसलो असतो....प्रश्न विचारत बसलो असतो आणि सरते शेवटी“हे माझ्याच बाबतीत का?” असा विचार करत बसलो असतो. पण यावेळी काहीतरी वेगळंच घडलं.
नवीन मॅनेजमेंटने माझ्या नवीन जॉब रोलसाठी इंटरव्यू घेतला. एवढ्या वर्षांचा अनुभव आणि गेल्या नऊ-दहा महिन्यांत एमबीएममुळे तयार झालेला आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन आणि मानसिक स्थैर्य याच्या जोरावर मी तो इंटरव्यू पूर्ण विश्वासाने दिला. यावेळी मात्र मनात भीती नव्हती - फक्त शांतता होती.
आणि जे घडलं, ते माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. ३१ डिसेंबरला HR कडून फोन आला, नवीन जॉब रोल तर मिळालाच, पण प्रमोशनही झालं होतं. गेले अनेक वर्षे ज्या प्रमोशनची मी वाट पाहत होतो, ते एका अनपेक्षित इंटरव्यूबरोबर माझ्या आयुष्यात आलं. त्या क्षणी शब्दच कमी पडले.
माझ्यासोबत इतर काही जणांचीही जॉब फंक्शनॅलिटी बदलली; अनेकजण अजूनही त्याविरोधात बोलत आहेत, तक्रारी करत आहेत. पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच शांतता आहे. परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची ही ताकद कुठून आली, हे कळत नाही. पण मागे वळून पाहिल्यावर एकच उत्तर सापडतं - एमबीएम आणि सुशील सर.
त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे, सकारात्मक सेशन्समुळे आणि नेहमीच्या प्रोत्साहनामुळे ही मानसिकता हळूहळू, पण ठामपणे तयार झाली आहे. आज मला प्रत्यक्ष अनुभव येतोय की सातत्य आणि सकारात्मक विचार आयुष्याला किती वेगळं वळण देऊ शकतात.
वाईट परिस्थितीतही मार्ग कसा शोधायचा, आणि जे आहे त्यातही सकारात्मक राहून पुढचा विचार कसा करायचा हे सुशील सर आम्हाला फक्त शिकवत नाहीत, तर जगायला शिकवत आहेत.
मनापासून, पुन्हा एकदा सुशील सरांचे आणि एमबीएमचे आभार.

आज जो मी आहे, त्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे.

Opening Hours

Monday 09:00 - 22:00
Tuesday 09:00 - 22:00
Wednesday 09:00 - 22:00
Thursday 09:00 - 20:00
Friday 09:00 - 22:00
Saturday 09:00 - 20:00