Kolhapur survey
Telling Kolhapur’s story & updates
Follow for a closer look at the city’s soul
👗 फॅशन | 👞 फुटवेअर | 👜 अॅक्सेसरीज | 🏡 होम डेकोर
फक्त २ दिवसांसाठी सायाजीमध्ये धम्माल Branded Sale! 🔥
📅 २० आणि २१ जून
⏰ सकाळी १० ते रात्री १०
📍 सायाजी हॉटेल, कोल्हापूर
🎟️ मोफत प्रवेश | 🚗 मोफत पार्किंग
👇 शॉपिंगला कोणाला घेऊन येणार आहात? कमेंटमध्ये टॅग करा!
16/06/2026
कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! नांदणी मठाची लाडकी माधुरी हत्तीण लवकरच पुन्हा आपल्या घरी परतण्याची शक्यता आहे. वनताराच्या पथकाने पुनर्वसन केंद्राची पाहणी पूर्ण केली असून महिन्याभरात तिच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो
16/06/2026
❤️ कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण!
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या नेतृत्वाखाली १७ तास चाललेली दुर्मिळ Brain Bypass Surgery यशस्वी झाली असून, या कामगिरीची जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे.
कोल्हापूर केवळ संस्कृती, खाद्यपरंपरा आणि इतिहासासाठीच नाही, तर आता जागतिक दर्जाच्या वैद्यकीय कामगिरीसाठीही ओळखलं जात आहे. 👏🌍
डॉ. मरजक्के आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! ❤️
15/06/2026
MH09 बाहेरील वाहनांवर प्रवेश कर (Entry Tax) लावण्याचा प्रस्ताव; तुमचं मत काय?
कोल्हापूर महानगरपालिकेकडून MH09 व्यतिरिक्त इतर वाहनांवर शहरात प्रवेश करताना Entry Tax आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या प्रस्तावामागील उद्देश 👇
✅ शहराच्या रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी निधी उभारणे
✅ शहरावरील वाढता ताण कमी करणे
✅ पायाभूत सुविधांचा विकास करणे
मात्र या प्रस्तावावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
❓ MH51 वाहनांचं काय?
इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ आणि परिसरातील हजारो नागरिक रोज काम, शिक्षण, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी कोल्हापूर शहरात ये-जा करतात. त्यांच्यावरही याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
⚠️ महत्त्वाचं : हा सध्या फक्त प्रस्ताव आहे. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
14/06/2026
🚱 कोल्हापूरची ‘थेट पाईपलाईन’ बंद! शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे संकट?
काळम्मावाडी धरणातील उपलब्ध पाणीसाठा संपल्याने कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा शिंगणापूर योजनेवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला आहे.
१९७४ पासून शाहूपुरीची ओळख असलेला कट्टा-
हॉटेल जनता भवन! 🕒 साधी जागा, बजेट-फ्रेंडली नाश्ता, पण वट असा की अख्ख्या चौकालाच यांचं नाव पडलंय!
इथला गरमागरम पुरी भाजी , कूर्मा पुरी आणि कडक चहा म्हणजे कोल्हापूरकरांचा जीव की प्राण! 🌶️☕
📍 पहिली गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर.
👇 तुमच्या नाश्त्याच्या गँगला आत्ताच टॅग करा!
11/06/2026
🙏 अंबाबाई मंदिरावर झळकणार नवीन सुवर्ण कळस! ✨
गोव्यातील एका भाविकाने अर्पण केलेला सुमारे ₹२.५ कोटी किमतीचा सुवर्ण कळस आता श्री अंबाबाई मंदिरावर विराजमान होणार आहे. या कळसाच्या निर्मितीसाठी सुमारे दीड किलो सोन्याचा वापर करण्यात आला असून, अधिक महिन्यानिमित्त उद्या (कलशारोहण सोहळा) पार पडणार आहे..
❤️ श्रद्धा, भक्ती आणि कोल्हापूरच्या वैभवाचा सुवर्ण क्षण!
#अंबाबाई #कोल्हापूर #महालक्ष्मीमंदिर
10/06/2026
विचार करा...
आपण ज्या शहरावर प्रेम करतो, ते शहर आपल्याला खरंच जगण्यालायक सुविधा देतंय का?
#कोल्हापूर
( kolhapur, petrol expense, petrol expense on vip convoy, vip, police convoy, police es**rt, kolhapur survey, maharashtra, narendra modi, modi, prime minister of India )
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Kolhapur
416012