Rohan Nirmal MNS

Rohan Nirmal MNS

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rohan Nirmal MNS, Politician, house No 143, Chawadi Lane, near Grampanchayat, Hamidwada, Kagal, Kolhapur.

13/05/2026

आमचे जिवलग मित्र श्री. उमेश डावरे यांचे भाचे चि. सौरभ पाडेकर यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या...
यावेळी विलासआण्णा जाधव , हमिदवाडा ग्रामपंचायत सदस्य दादासो सुळकुडे, नरसिंह भोसले, संदीप ठाणेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात हासोळे. विनायक सुळकुडे , प्रवीण गुरव उपस्थित होते.

Photos from Rohan Nirmal MNS's post 28/04/2026

लोकनाथ

Photos from Rohan Nirmal MNS's post 20/04/2026

🗓 १९ एप्रिल २०२६ | 📍 वरळी

जिद्द, निष्ठा आणि ऊर्जा… हाच आमचा “महायुवौत्सव” २०२६ !

युवासेनेचा महायुवौत्सव वरळीच्या एनएससीआय डोम मधील भव्य सभागृहात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. हे भव्य यश शक्य झालं ते फक्त आणि फक्त आपल्या जिद्दी, निष्ठावान आणि उत्साही युवासैनिकांमुळे. तुमच्या प्रत्येकाच्या मेहनतीला आणि समर्पणाला आमचा मानाचा मुजरा!

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या नेतृत्वात आयोजित या ऐतिहासिक महामेळाव्यातून युवासैनिकांना नवी ऊर्जा मिळाली. राज्यभर युवासेनेची संघटनात्मक वाढ अधिक भक्कम करण्यासाठी तसेच नव्या नेतृत्वाला संधी देत संघटनेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने युवासेनेचे हे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या महामेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य युवासैनिकांशी संवाद साधून अभिमान वाटला.

या दिमाखदार मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. याचवेळी त्यांच्या हस्ते युवासेनेच्या अधिकृत वेबसाइटचे अनावरण करण्यात आले तसेच सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, युवा स्क्वॉड आणि युवासेनेचे नवीन प्रेरणादायी गाणेही या मंचावरून प्रदर्शित करण्यात आले. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रभावी मार्गदर्शनातून युवाशक्तीची ताकद, जबाबदारी आणि भविष्यातील दिशा स्पष्ट झाली.

सर्व युवासैनिकांच्या वतीने श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही एक अनोखी भेट दिली. लोणावळ्याच्या प्रसिद्ध सुनील वॅक्स म्युझियमच्या माध्यमातून बनवण्यात आलेला शिंदे साहेबांचा मेणाचा पुतळा त्यांना समर्पित केला. हा पुतळा म्हणजे प्रत्येक युवासैनिकाची आपल्या मुख्य नेत्याचा प्रति असलेली श्रद्धा, कृतज्ञता आणि त्यांच्या उत्तुंग यशाचे कौतुक आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला असा हा भव्यदिव्य सोहळा शिवसेनेच्या विविध मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीने अधिक प्रेरणादायी ठरला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात जनसामान्यांसाठी संघर्ष करणाऱ्या तरुणांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही देखील अभिमानाची बाब आहे.

समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा या महायुवौत्सवातून प्रत्येक युवासैनिकाने घेतली. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रत्येक युवासैनिक कटिबद्ध असून जनसेवेचे व्रत अखंडपणे करत राहील.

01/03/2026

यमगे येथे डिजिटल रेशन कार्ड वितरण कार्यक्रम संपन्न...🚩
320 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला.🚩

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

House No 143, Chawadi Lane, Near Grampanchayat, Hamidwada, Kagal
Kolhapur
416235