KMC Primary Education Committee
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर मधील सुरू असणारे विविध उपक्रम
16/03/2026
*मनपा.श्रीम.लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर*
*◆━━━━━★▣✦▣★━━━━━◆*
*लक्ष्मीबाई कृ.जरग विद्यामंदिरचे विद्यार्थी आता करणार हायटेक लर्निंग*
📡💻 ⌨️ *महाराष्ट्रातील महानगरपालिकेची पहिलीच हायटेक शाळा*
🖥️ 🖱️ *Futuristic Classroom Lab* *चे उपमहापौर श्री अक्षय जरगसो यांच्या हस्ते उद्घाटन*
*◆━━━━━★▣✦▣★━━━━━◆*
श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदीर ही शाळा शिक्षण, संस्कार आणि गुणवत्ता यांचा सुंदर संगम आहे. येत्या गुढीपाडव्याला शाळेला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रवासामध्ये शाळेने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आजपर्यंत शाळेचे 400 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी राज्यात प्रथम आले असून एक वेगळा इतिहास शाळेने घडवला आहे. *सर्वाधिक पटसंख्येची महाराष्ट्रातील शाळा* म्हणून शाळेने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. यासोबतच शाळेत डिजिटल क्रांती घडत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शालेय गुणवत्तेच्या आधारावर शाळेस या आयडियल सेंटरचे मानांकन मिळाले .त्यामुळे *अत्याधुनिक लॅब असणारी कोल्हापूर शहरातील पहिलीच शाळा ठरली आहे.*
विद्यार्थ्यांना *महत्वाच्या संकल्पना सहज व मूर्त स्वरुपात समजावून सांगण्यासाठी या लॅबचा वापर होणार आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्टुडन्ट ई-पोडियम ,टीचर्स ई-पोडियम, DLP अंतर्गत सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम आयडियल सेंटरमध्ये उपलब्ध आहे.*
या *Futuristic classroom* मध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण 24 स्वतंत्र हायटेक टचस्क्रीन प्लॅटफॉर्म आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र कंट्रोलिंग टचस्क्रीन प्लॅटफॉर्म सहित इंटरऍक्टिव्ह बोर्ड , उपलब्ध करून दिले आहेत. एकूणच हायटेक बैठकव्यवस्थेसह विद्यार्थी आता हायटेक लर्निंग करणार आहेत. याद्वारे विद्यार्थी कोणत्याही असाइनमेंट किंवा पेपर देखील सहज सोडवू शकणार आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थांना गुणवत्ता वाढीसाठी फायदा तर होणारच आहे. पण या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच आमचा विद्यार्थी गरुडझेप घेणार आहे.
आज कोल्हापूर नगरीचे उपमहापौर श्री. अक्षय जरगसो यांच्या शुभहस्ते या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सौ.सुषमा जरग, नगरसेवक श्री. दुर्वास बापू कदम, श्री. विजयसिंह खाडे पाटील, ॲड.मानसी लोळगे यांनी विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक लॅबच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देऊन सदैव शाळेच्या पाठीशी राहण्याबाबत आश्वस्त केले.
याप्रसंगी श्री संतोष जरग, श्री प्रशांत जरग,सौ वैभवी जरग, अर्जुन जरग, सतीश लोळगे, विमल गवळी, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे ,विजय माळी ,चंद्रकांत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीता ठोंबरे, उपमुख्याध्यापक श्री. शिवाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील व सदस्य , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी आर पिंपळकर व श्री सुभाष मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्री दत्तात्रय पाटील ,योगेश व्हटकर ,वैशाली शेलार यांनी केले.
💻 *दप्तराच्या ओझ्याकडून की-बोर्डच्या वेगाकडे...*
*मनपा शाळांची पावले आता डिजिटल युगाकडे!* 🚀
*कोल्हापूर महानगरपालिकेच्या 11 शाळांमध्ये अद्ययावत ICT संगणक लॅब्स कार्यरत आहेत, तर 7 शाळांमध्ये 'डी-मार्ट फाउंडेशन'च्या (D-Mart Foundation) विशेष सहकार्यातून अत्याधुनिक संगणक लॅब उभारण्यात आल्या आहेत!* 🖥️✨ 🖥️✨
आता आमचा मनपा शाळेतील विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवणार! 🎓🤝
चला, आपल्या पाल्याचे भविष्य 'हाय-टेक' बनवूया!
*आजच कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊया .*. 🏫🚩
*𝕍𝕚𝕕𝕖𝕠 ℂ𝕣𝕖𝕕𝕚𝕥𝕤* :
🎥 *ℂ𝕚𝕟𝕖𝕞𝕒𝕥𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪*: Sandip Jadhav
✂️ *𝔼𝕕𝕚𝕥𝕚𝕟𝕘*: Yuvraj Erudkar
*कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा: स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची नवी ओळख!* 🎓✨
इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 'के.टी.एस.' (KTS - Kolhapur Talent Search), प्रज्ञाशोध परीक्षा, राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती परीक्षा व इतर विशेष स्पर्धा परीक्षा, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि थेट 'इस्रो' (ISRO) सहलीची सुवर्णसंधी! 🚀📖
*अनुभवी शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची खात्री...* 🤝
चला, आपल्या पाल्याचे भविष्य घडवूया...
आजच कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊया ! 🏫🚩
📽️ Video by : Sandip Jadhav & Publicity Team
12/02/2026
Click here to claim your Sponsored Listing.