Arjun Khotkar
MLA, Jalna Constituency and Ex-State Minister, Goverment Of Maharashtra | Shivsena
12/06/2026
माध्यमांची दखल..
12/06/2026
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, नाटककार आणि कलावंत पु.ल.देशपांडे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !
12/06/2026
जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री रामेश्वर लाहोटी व श्री नंदकिशोर लाहोटी यांच्या मातोश्री स्वर्गीय रुक्मिणीदेवी किसानलालजी लाहोटी यांचे वृद्धापकाळाने दि. 10 जून रोजी दुःखद निधन झाले.
आज दि. 12 जून रोजी जालना येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित उठावना कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून स्वर्गीय रुक्मिणीदेवी लाहोटी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी लाहोटी परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व दुःखाच्या या प्रसंगी आपण त्यांच्या परिवारासोबत असल्याची भावना व्यक्त केली.
स्वर्गीय रुक्मिणीदेवी लाहोटी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
12/06/2026
जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, उद्योगपती व समाजसेवक तसेच कालिका स्टीलचे संचालक श्री घनश्याम सेठ गोयल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांना भेट देऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुनील सेठ गोयल, गोपाल सेठ गोयल, डॉ. सुभाष अजमेरा, मेघराज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी श्री घनश्याम सेठ गोयल यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
11/06/2026
जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भव्य संवाद मेळावा उत्साहात संपन्न...
राज्यमंत्री आशीष जयस्वाल व आमदार अर्जुनराव खोतकर यांचे मार्गदर्शन संघटन बळकटीकरणासाठी ऊर्जावान ठरले
जालना, दि. ११ जून २०२६ : जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बूथप्रमुख, गटप्रमुख, बी.एल.ए आणि पदाधिकारी व शिवसैनिकांचा भव्य संवाद मेळावा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. श्री. आशीष जयस्वाल होते, तर शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि मतदार यादी पुनर्विलोकन (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सांगितले की, "मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागले पाहिजे. एकही पात्र मतदार वंचित राहता कामा नये, हीच आपली प्राथमिकता आहे."
यावेळी त्यांनी जालना जिल्ह्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात वरिष्ठ सदस्य अर्जुनराव खोतकर यांचे नेतृत्व लाभले असल्याचा अभिमान व्यक्त केला. "अर्जुनराव खोतकर हे माझे मोठे बंधू असून त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना कायम प्रेरणा मिळत आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत," असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली असून त्यांचे कार्य घराघरांपर्यंत पोहोचल्याचे सांगताना जयस्वाल म्हणाले की, "महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात एकनाथ शिंदे यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, प्रत्येक गाव आणि प्रत्येक घरापर्यंत पक्षाची विचारधारा आणि सरकारची विकासकामे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे."
शिवसैनिकांना अधिक बळकटी देणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि संघटना अधिक सक्षम करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, सूचना आणि प्रश्न समजून घेत पक्ष संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
मेळाव्यात आमदार अर्जुनराव खोतकर यांनी बूथ व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "बूथप्रमुख हा पक्ष संघटनेचा कणा आहे. प्रत्येक बूथ प्रमुख सक्षम असेल तरच निवडणुकीत विजय निश्चित होतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करत मतदार यादी अचूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा."
तसेच शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बी.एल.ए. आणि बूथप्रमुखांनी आपल्या मतदान केंद्राची मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, नावांमध्ये दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांची नोंद, दुबार व मयत मतदारांची नावे वगळणे यासह मतदार यादी शंभर टक्के अचूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
"एकही पात्र मतदार वंचित राहू नये, हीच आपली प्राथमिकता आहे. शिवसेना पक्षाच्या बूथप्रमुख व बी.एल.ए. यांनी आपल्या गावात घरोघरी जाऊन मतदार नोंदणी व पुनर्विलोकन मोहीम प्रभावीपणे राबवावी," असे आवाहन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी केले.
या मेळाव्यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरणार असल्याचा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे, माजी जि.प.अध्यक्ष, अनिरुद्ध खोतकर,अॅड. सुनील किनगावकर, फिरोजलाला, संतोषराव मोहिते, भुषण शर्मा, अॅड. भास्कर मगरे, रामेश्वर वाडेकर, विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त,दिनकर घेवंदे, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक -: अमोल ठाकूर, दिनेश भगत, योगेश भगत,दीपक राठोड, दुर्गेश काठोटीवाले,सगीर पहेलवान,अश्विन अंबेकर, किशोर पांगारकर, निखील पगारे,विजय जाधव,संजय डुकरे, युवासेना जिल्हाप्रमुख अजय कदम, उपजिल्हा प्रमुख गणेश मोहिते, पांडुरंग डोंगरे, सुधाकर वाडेकर, योगेश रत्नपारखे, राहुल गवारे, सविता केवंडे, कालिंदाताई ढगे, उज्वला फोपलिया, विजया चौधरी, गणेश सुपारकर, वसंतराजे जाधव, ता.प्रमुख भगवानराव अंभोरे, नानासाहेब वानखेडे, दत्ता भंगाळे, विशाल गाढे, गणेश पुंगळे अल्पसंख्यांक जि प्रमुख शेख जावेद भाई, उपजिल्हाप्रमुख नजीर भाई,शहर प्रमुख जफर खान,बबन मगरे शुभम टेकाळे,किरण सिरसाठ, सखाराम लंके, गोपी किशन गोगडे, शरद ढाकणे, सुशील भावसार,लखन कणसे, दीपक हलवावे, संतोष रासवे, विभाग प्रमुख काशिनाथ जाधव, बळीराम घुले,भागवत काळे सावळाराम गिराम, गणेश भुतेकर, आप्पासाहेब उगले, प्रमोद वाघमारे महिला आघाडीच्या पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य, विभागप्रमुख आणि विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृह शिवसेनामय झाले होते. या मेळाव्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#शिवसेना #जालना
06/06/2026
हिंदवी स्वराज्याची पताका डौलात फडकविणारे महापराक्रमी, आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा !
05/06/2026
आज स्व. श्रीमती कौशल्याबाई सुभाषराव पाटील जऱ्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ताई ही आईची सावली केवळ एक व्यक्ती नसते, ती संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असते. आपल्या प्रेमळ स्वभावाने, संस्कारांनी आणि मायेच्या छायेत अनेकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या कौशल्याबाईंच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत.
काळ पुढे सरकतो, पण आपल्या माणसांच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आणि ईश्वरचरणी त्यांना सद्गती लाभो हीच प्रार्थना.
॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥
05/06/2026
📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जालना
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित "बहुजन व्याख्यानमाला २०२६" या भव्य वैचारिक सोहळ्यात उपस्थित राहून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. श्री. रामजी शिंदे यांचे "मी कसा घडलो" या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार मा. अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आपल्या मनोगतात मा. रामजी शिंदे यांनी जीवनप्रवासातील अनेक प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसमोर मांडले. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना समाजकारणाची असलेली ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे प्राध्यापकाची नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणून जनसेवेचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
एका सामान्य कार्यकर्त्यापासून ग्रामपंचायतीचे सरपंच, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतीपदापर्यंतचा प्रवास हा जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची निष्ठा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि समाजसेवेच्या अखंड ध्यासातून घडल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्त्व हे न्यायप्रियता, लोककल्याण, सुशासन, दूरदृष्टी आणि स्त्री नेतृत्वाचा सर्वोच्च आदर्श असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी खासदार श्री. रामराव वडकुते, महापौर सौ. वंदना मगरे, उपमहापौर श्री. राजेश राऊत, एसटी आरक्षण आंदोलनाचे नेते श्री. दीपक बोऱ्हाडे, श्री. मनोज पांगरकर, माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्री. रामेश्वर भांडरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणारे श्री. पंडित तेडगावकर, सौ. सुनंदाताई बनसोडे तसेच व्याख्यानमाला समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #बहुजनव्याख्यानमाला2026 #मीकसाघडलो #वैचारिकजागर
05/06/2026
पर्यावरणाचे रक्षण हेच वसुंधरेचे संवर्धन...जागतिक पर्यावरण दिन !
05/06/2026
शिव उद्योग सहकार सेना जालना जिल्हा कार्यकारिणीची पदे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप
जालना : दर्शना बंगला, भाग्यनगर (जालना) येथे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या शिव उद्योग सहकार सेना जालना जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करून कार्यकारिणी प्रसिद्ध करण्यात आली.
शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष रामेश्वर प्रमाराव वाडेकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्रे जारी करण्यात आली. तसेच खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर संघटना अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खालीलप्रमाणे नाव, पद आणि कार्यक्षेत्राची यादी:
| क्र. | नाव | पद | कार्यक्षेत्र |
1 पांडुरंग तुळशीराम डोंगरे, जिल्हाध्यक्ष जालना जि. जालना
2 दत्ता चघनुज शिराळे, जिल्हाध्यक्ष जालना जि. जालना
3 प्रल्हादराव रेनाजी बोराडे कार्याध्यक्ष जालना. जि. जालना
4 शिवाजी लहानू मिरे उपाध्यक्ष जालना भोकरदन-जाफराबाद
5 सुधाकर पाटील वाडेकर उपाध्यक्ष जालना-बदनापूर
6 पंढरीनाथ (मामा) उगले उपाध्यक्ष घनसावंगी-अंबड
7 बाबू पाटील पायघणे, तालुकाध्यक्ष जालना
8 अशोक कासारसी हेंगळे, कार्याध्यक्ष जालना
9 केशव माणिकराव नवल तालुकाध्यक्ष भोकरदन
10 किरण बावस्कर कार्याध्यक्ष भोकरदन
11 विष्णु चव्हाण तालुकाध्यक्ष जाफराबाद
12 सुनील भोपळे कार्याध्यक्ष जाफराबाद
13 हरिचंद्र त्र्यंबकराव कापसे तालुकाध्यक्ष बदनापूर
14 संजय भगवान भुजाळ कार्याध्यक्ष बदनापूर
15 अर्जुन वायभारे तालुकाध्यक्ष घनसावंगी
16 सतीष देशमुख तालुकाध्यक्ष मंठा
17 विनोद खरात कार्याध्यक्ष मंठा
18 रवि नारायण खडुळे तालुकाध्यक्ष परतूर
19 राजेश परमेश्वर वामन कार्याध्यक्ष परतूर
20 शुभम अंबादास पवार कार्याध्यक्ष अंबड
जालना, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, मंठा, परतूर आणि अंबड या तालुक्यांमध्ये संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उद्योग, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सक्रियपणे कार्य करणे, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना संघटनवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून युवक, उद्योजक, शेतकरी व सहकार क्षेत्राशी संबंधित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या नियुक्त्यांमुळे जालना जिल्ह्यात शिव उद्योग सहकार सेनेचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून आगामी काळात संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Click here to claim your Sponsored Listing.