Malhar Help Fair

Malhar Help Fair

Comments

मल्हार हेल्प फेअर 3 - मदतीचे हजारो हात thanks आनंद सर जी
Wow that's great but what about the individuals like us who support and help needy people

पहिल्यांदाच दाते’ आणि याचक’ एकाच छताखाली एकाच व्यासपीठावर ! व्यक्ती कुणीही असो, जगण्याचा संघर्ष ओघानं आलाच... या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी, माणसाला तगण्यातून जगण्याकडे’ नेण्यासाठी मदतीचा हात हा आवश्यक असतो. सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना।’ या उक्तीनुसार समाजातील उपेक्षीत, तळागाळातील वंचितांच्या उत्कर्षासाठी आपल्या भोवतालच्या विविध संस्था निस्पृह भावनेने अपार कष्ट करीत असतात. त्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम हेल्प-फेअरच्या माध्यमातून जळगाव नगरीत होणार आहे. माणसाच्या आर्थिक, मानसिक जडण घडणीच्या दृष्टीने उचललेले हे दमदार पाऊल होय.

हेल्प-फेअर हा उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी, वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक उपक्रम 19 ते 21 जानेवारी 2018 दरम्याने शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजला आहे. यामध्ये समाजोत्थानासाठी आत्मियतेने मदतीचे कार्य करणार्या व्यक्ती, समाजिक संस्था, एनजीओ, क़ॉर्पोरेटस् आणि सहकारी संस्था यांच्या कार्याचा जवळून परिचय होईल. व्यक्तिच्या समृद्दीसाठी अखंड वाटचाल करणार्या सेवाभावी संस्था, दानशूर दाते’ आणि मदतीची अपेक्षा बाळगणारे याचक’ यांना परस्पर पूरक ठरणारे, महत्त्वाचे दुवा जोडण्याचे काम या फेअरच्या माध्यमातून प्रभावीपणे होईत यात तीळमात्र शंका नाही.

पहिल्यांदाच दाते’ आणि याचक’ एकाच छताखाली एकाच व्यासपीठावर मल्हारच्या हेल्प गाईडचे प्रकाशन सेवामहर्षिंच्या अनुभवाचे बोल त्यांच्याच तोंडून.. उत्तर महाराष्ट्रात प्रथमच...

17/02/2020

Welcome Mai...

17/02/2020

मल्हार हेल्प फेअर 3 - मदतीचे हजारो हात पाहण्यासाठी आज शेवटची संधी... विशेष उपस्थिति आदरणीय माई डॉ सिंधुताई सपकाळ.

16/02/2020

Glimpse of inauguration of Malhar Help Fair 3

12/02/2020

मल्हार हेल्प फेअर - ३
दिनांक : १५ ते १७ फेब्रुवारी २०२०
स्थळ : सागर पार्क, जळगाव

08/02/2020
07/02/2020
06/02/2020
05/02/2020
03/02/2020
27/01/2020

***
***
मंदी के दौर में ...मल्हार हेल्प फेयर 3
फिर आ रहा है 15 से 17 फरवरी ,
सागर पार्क ,जलगाव में।
***
***

इस मंदी के दौर में,जहाँ हर कोई जूझ रहा है अपनी अपनी मुश्किलों से..वहीं एक बार फिर "लाईफ इस ब्यूटीफुल फाउंडेशन" अपनी हेल्प फेयर टीम और जलगांव वासियों के विश्वास के बल पर समाज में सकारात्मकता को, समाज की अच्छाई को फैलाने वाले, समाज की विषमता को कम या बैलेंस करने वाले अनोखे" हेल्प फेयर" प्रदर्शनी का लगातार तीसरी बार आयोजन कर रही है।

इस प्रदर्शनी में जिले की चुनी हुई सेवा भावी संस्थाओंको ...जो गरीब, दिन दुःखी या पीड़ितों के चेहरे पर हँसी लानेका काम कर रही है फिर शिक्षा का क्षेत्र हो या वैद्यकीय , सामाजिक हो या पर्यावरण संबंधी... उन्हें वहाँ सन्मान पूर्वक आमंत्रित किया जाता है बगैर कोई मानधन, शुल्क लिए।

यहाँ संस्थाएं अपनी जानकारी समाज को देती है ताकि संवेदन शील लोग उनसे जुड़ सकें, तन मन धन से उनकी मदत कर सकें तथा उनके कार्य को आसान बना सकें।

थोड़ा सोचिये.. आज जब हमें अपना व्यवसाय करने में इतनी दिक्कत आ रही है तब ये सेवाभावी संस्थाओं को अपने सेवा कार्य करनेमें कितनी दिक्कत आ रही होगी? समाज से आर्थिक मदत मिलाने में कितनी मशक्कत करनी पड़ती होगी? इस प्रदर्शनी से निश्चित उनका यह काम आसान होता है। यह हमने देखा है पिछले दो प्रदर्शनी में।

इस प्रदर्शनी को लगने वाला पूरा खर्चा आप मित्र परिवारो की मदत और आप सभी के आर्थिक योगदान से ही सम्पन्न होता है।

आप सभीसे नम्र निवेदन है आप यथा शक्ति इसमें अपना योगदान दें। जलगाव के इस अनोखे विधायक प्रोजेक्ट को सफल बनावें। 11 हजार देकर आप एक संस्था को स्पॉन्सर कर सकते हो।

शायद मैं आपको इसके लिए फ़ोन भी करूं। फोन करने में संकोच भी होता है, बुरा भी लगता है, पर जब कारण सोचता हूँ, इससे संस्थाओं को होने वाला फायदा देखता हूँ तो हिम्मत आ जाती है.. ।

किसी दूसरे के फायदे के लिए
"याचना" या "हाथ फैलाने" भी पड़े तो क्या हर्ज है।

मेरे ससुर भी राजस्थान की एक जानी मानी शिक्षण संस्था के संचालक थे। उस संस्था को शायद 80 % सरकार से ऐड मिलती थी और बक़ाई 20 % के लिए वे पूरे भारत घूमते थे दानी सेठ लोगों से चंदा इक्कठा करने। जलगांव से भी वे स्व.भवरलालजी जैन, स्व भीकमचंदजी जैन, श्री रतनलाल बाफनाजी से चंदा लेकर गए थे । हँसते हँसते वे वो काम करते थे... कभी कभी हमें उनके मजेदार किस्से भी सुनाते।

किसीने मुझे कहा " आनंद, खुद की जेब में पैसे नहीं है तो क्यों सेवा का काम सोचता है?" पर मेरा मानना है पैसे होते और मैं करता तो क्या बडा काम करता, आज ताकत नहीं है फिरभी दोस्तों से माँगकर, लोगों को जोड़कर,उनके दातृत्व भाव को जगाकर यदि यह साकार कर पाता हूँ तो.. है जरूर बेहतर ।

लेकिन लाइफ है ब्यूटीफुल ।

आनंद मल्हारा
27 जनवरी 2020

25/01/2020

Press Conference News published in various newspaper.

25/01/2020

मल्हार हेल्प-फेअर ३ चे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगावात आयोजन,
या वर्षी असणार अनेक नव्या संकल्पनांचा समावेश

जळगाव - समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित वर्गासाठी कार्य करणाऱ्या किंबहुना त्यांच्यासाठी झिजणाऱ्या सामाजिक संस्था आणि सेवामहर्षींच्या प्रदर्शनीचे म्हणजेच हेल्प-फेअर ३, मदतीचे हजारो हातचे आयोजन १५ ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान सागर पार्क जळगाव येथे करण्यात आले आहे.

या संदर्भातील पत्रकार परिषद नुकतीच मल्हार कम्युनिकेशन्स येथे पार पडली.

सदर पत्रकार परिषदेस माध्यम क्षेत्रातील अनेक पत्रकारांसोबतच हेल्प-फेअर टीम मध्ये सहभागी झालेल्या अनेक संस्थांचे संचालक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी हेल्प-फेअरमुळे गेल्या दोन वर्षात त्यांना झालेल्या लाभाची माहिती दिली.''सामाजिक सहभाग मिळवून देण्यासाठी हेल्प-फेअर आम्हांस पूरक ठरले आहे. पहिल्या हेल्प-फेअर पासून आम्ही येथे सहभाग नोंदवत आहोत. हेल्प-फेअरचे आयोजन दरवर्षी केले पाहिजे'' अश्या भावना आनंदघरचे संचालक श्री. अद्वैत दंडवते यांनी बोलून दाखविल्या. दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. हर्षाली चौधरी यांनी हेल्प फेअर मधील सहभागाबद्दल सांगितले की, ''आधी दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा वा नकारात्मक होता. परंतु हेल्प-फेअरमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवल्या पासून समाजाचा या विद्यार्थ्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही प्रमाणात का असेना फरक पडला.'' एचआयव्ही बाधीत मुलांसाठी कार्य करणाऱ्या संजीवनी या संस्थेच्या सौ. वंदना पवार म्हणाल्या की, ''एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या न्यूट्रिशन स्पोर्टसाठी आधी मी मोजक्या दोन-चार मुलांना हे न्यूट्रिशन पुरवत असू, परंतु हेल्प-फेअरमध्ये सहभाग नोंदविल्यापासून ही संख्या आता पन्नास पर्यंत गेली आहे. कारण अनेक लोकांना आता हेल्प-फेअरच्या माध्यमातून या मुलांबद्दल माहित झाले.

गेल्या दोन वर्षांपासून मल्हार हेल्प फेअरचे आयोजन जळगावमध्ये करण्यात येत आहे. या दोन वर्षात हेल्प फेअरशी जिल्हा भरातील अनेक संस्था जुळलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षात लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्प-फेअरच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांना मदत मिळाली आहे.

हेल्प-फेअरमध्ये जिल्ह्याभरातील विधायक, अलौकिक व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांची निवड प्रक्रियेद्वारे निवड करून त्यांना या प्रदर्शनीत सहभागी केले जाते. ही निवड हेल्प -फेअर मधील कोअर कमिटीद्वारे केली जाते. निवड झाल्यानंतर सहभागी संस्थांना येथे स्टॉल दिले जातात आणि गॅलरीमध्ये सेवाव्रतींची देखील माहिती दिली जाते. या सर्वांचे नियोजन हेल्प - फेअर टीमकडूनच विनामूल्य केले जाते. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उभारणी लोकसहभागातून केली जाते.

या वर्षी होत असलेल्या हेल्प - फेअर ३ मध्ये अनेक नव्या संकल्पनांचा समावेश असणार आहे.

या असतील नव्या संकल्पना :

सेवाकार्या सोबतच समाज प्रबोधन आणि त्या सोबतच वंचित, गरजू घटकांना मदत करीत असतांनाच हेल्प-फेअर मध्ये आणखी काय वेगळे करता येईल याचा समावेश आजवर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगानेच या वर्षाच्या हेल्प-फेअर ३ मध्ये पुढील अभिनव संकल्पनांचा समावेश असणार आहे;

* सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना यामध्ये सहभागी तर होता येणारच आहे, त्या सोबतच एखादी अनोखी, अभिनव, समाजोपयोगी संकल्पना ज्यांच्याकडे आहे अशा व्यक्ती वा संस्थेला स्टार्ट-अप साठीसुद्धा सहभाग नोंदविता येणार आहे.

* आजवर जळगाव जिल्ह्यातील संस्था किंवा सेवामहर्षींनाच यात सहभागी होता येत होते परंतु ज्या संस्था बाहेरील आहेत आणि त्या देत असलेली सेवा जळगाव जिल्ह्यात नसेल अशा संस्थांना देखील हेल्प-फेअर ३ मध्ये स्थान देण्यात येणार आहे.

* संपूर्ण हेल्प-फेअर पाहण्यास व अनुभवण्यास साधारणतः दोन ते तीन तास सहज लागतात. तदनंतर कडकडून भूक लागल्यावर हेल्प-फेअरला भेट देणाऱ्या खवैय्या खान्देशकरांची भूक शमविण्यासाठी जळगावमधील विविध बचत गटांचे खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल येथे असणार आहे. खवैय्या खान्देशकरांना या निमित्ताने खाद्य पदार्थांची मेजवानीच अनुभवता येणार आहे. महिला बचत गटांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून एकप्रकारे महिला सक्षमीकरणास हातभारच लागणार आहे.

* हेल्प फेअर ३ मध्ये आलेल्यांना विविध माहिती, मदत मिळण्यासोबतच करमणुकीच्या कार्यक्रमांचा देखील आस्वाद येथे घेता येणार आहे. या दरम्यान राष्ट्रभक्तीपर समूहगान व नृत्य स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय तसेच संस्थांना सहभागी होता येणार आहे.

* हेल्प फेअर हा प्रकल्प म्हणजे व्यवस्थापनाच्या व समाज महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यासाठीचे मोठे प्लॅटफॉर्म असणार आहे. यासाठी एमबीए, बीबीएम, एमएसडब्ल्यू आणि व्यवस्थापनाची आवड असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी येथे व्यवथापनाचे धडे प्रत्यक्षात गिरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना व्यवस्थापना सोबतच सोशल आंत्रप्रिनरशिप आणि मार्केटिंगचे देखील प्रॅक्टिकल नॉलेज येथून मिळविता येणार आहे. हेल्प फेअर ३ मध्ये सहभागी सर्व विद्यर्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील. त्यासाठी नाव नोंदविणे आवश्यक आहे.

या सोबतच सामाजिक संस्थांसाठी प्रशिक्षण वर्गांचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात येणार आहे. हेल्प फेअर ३ सर्व दृष्टीने अधिकाधिक चांगले व यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील घटकांनी आपला सहभाग नोंदवावा व या कामी तन-मन-धनाने आपले योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सदर पत्रकार परिषदेस विविध संस्थांचे संचालक, माध्यम क्षेत्रातील पत्रकार तसेच श्री. गनी मेनन, श्री. अमरभाई कुकरेजा, श्री. चंदू नेवे, व मल्हार कम्युनिकेशन्सचे श्री. आनंद मल्हारा यांची उपस्थिती होती. यावेळी दै. तरुण भारत तर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाभावे उजळो जीवन या पुस्तकाची प्रत श्री. मनोज बोरसे यांच्या हस्ते श्री. आनंद मल्हारा यांना भेट देण्यात आली.

अधिक माहितीसाठी ९३७०० ७७३११ व ८४४६१ ०१७५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

24/01/2020

#HelpFair #NGO #Jagaon #JalgaonEvents

19/01/2020

#HelpFair #NGO #Jagaon #JalgaonEvents

18/01/2020

#HelpFair #NGO #Jagaon #JalgaonEvents

17/01/2020

#HelpFair #NGO #Jagaon #JalgaonEvents

16/01/2020

#HelpFair #NGO #Jagaon #JalgaonEvents

01/03/2019

When we accept gratefully and give away cheerfully, everyone is blessed! - Maya Angelou

I experienced the joy of giving by sharing the lottery prize I received at Print Summit 2019 with a young upcoming entrepreneur who was present for the seminar, to encourage her skills and business. - Anand Malhara

19/02/2019
16/02/2019
05/02/2019

सेवाकार्याचा कुंभमेळा अर्थात ‘मल्हार हेल्प फेअर 2’ चा समारोप सेवामहर्षिंची व्याख्याने तसेच सेवामहर्षि व सेवाभगिरथी सन्मान सोहळ्याच्या वितरणाने उत्साहात संपन्न.

#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

04/02/2019
03/02/2019
03/02/2019

Some glimpse of inauguration ceremony of Help Fair 2
#jalgaon #helpfair2 #socialwork

02/02/2019

हेल्प फेअर 2 रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेवाकार्याचा कुंभमेळा ‘मल्हार हेल्प फेअर 2’ च्या शुभारंभानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. सागर पार्क येथून रॅलीला सुरुवात झाली गांधी उद्यानाजवळ रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये कृती फाऊंडेशनतर्फे सादर करण्यात आलेल्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

02/02/2019

मल्हार हेल्प-फेअर - २ च्या तयारीला वेग
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

मा.श्री. प्रशांत वारके
गोदावरी स्कुल ऑफ मॅनेजमेंट, विभाग प्रमुख.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

सौ. नीलिमा चौधरी
मुख्याध्यापक, गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगाव.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

मा. श्री. चंद्रकांत डांगे
आयुक्त, जळगाव मनपा

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

मा. श्री. कैलासअप्पा सोनावणे
( स्वीकृत नगरसेवक, मनपा जळगाव ),

मा. श्री. विजय राजहंस
( मुख्य उपसंपादक, दै. दिव्यमराठी ) व सहकारी.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

श्री. सुनील गोराणे
ओ. एस., मनपा, जळगाव.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

प्रा. प्रसाद देसाई
समन्वयक वाणिज्य, स्वामी विवेकानंद जूनियर महविद्यालय, जळगाव.

सौ. स्वाती बऱ्हाटे
समन्वयक विज्ञान, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महविद्यालय, जळगाव.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

श्री. किशोर भुतडा
महिला व बालकल्याण अधीक्षक, मनपा जळगाव.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

01/02/2019

मल्हार हेल्प-फेअर - २ : सेवाकार्याचा कुंभमेळा
२ ते ४ फेब्रुवारी २०१९
स्थळ : कै. बॅरीस्टर निकम चौक जवळील मनपाचे मैदान, सागर पार्क, जळगाव.
आग्रहाचे निमंत्रण !

01/02/2019

प्रा. डॉ. यशवंतजी महाजन
प्र. प्राचार्य, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव.

मल्हार हेल्प-फेअर - २
२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव
#MalharHelpFair2 #Helpfair #NGO #SocialWork #Jalgaon

Videos (show all)

Category

Telephone

Address


Sagar Park
Jalgaon
Other Jalgaon event/venues (show all)
SunShine Audio SunShine Audio
Bank Street, Navi Peth
Jalgaon, 425001

Alll type of Sounds , DJ , Truss , Sharpy And lights

Om Sai Flower Decorators Om Sai Flower Decorators
Jalgaon, 425001

Flowers have played an important part in folk festivals, religious ceremonies, public celebrations of all kinds, and, of course, courtships.

Navkar Foundation Navkar Foundation
Muktainagar
Jalgaon

This foundation is estabilesd for poor people for ther education, for ther marriage planing, for medical charges, ther all types of facilites for peoples.

Imparavel Events & Entertainment - Jalgaon. Imparavel Events & Entertainment - Jalgaon.
'Shiva Archade' Dhake Colony
Jalgaon, 425001

Siddhi Events Siddhi Events
Jalgaon
Jalgaon, 425001

Har karya ki anupam Siddhi Attha se eti .....

समस्त लाड वंजारी समाज मंगल कार समस्त लाड वंजारी समाज मंगल कार
National Hiighway No. 6, Near Aakashwani Chowk, Jalgaon
Jalgaon, 425001

It Located in the heart of Jalgaon City. It is an ideal place for Wedding, Birthday parties, Get-togethers, Religious Discourses with 5 AC Rooms