Project Officer Integrated Tribal Development Project Dhule
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Project Officer Integrated Tribal Development Project Dhule, Government Official, Dhule.
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन | आदिवासी जनहिताय
आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कटिबद्ध.
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य - प्रत्येक आदिवासी घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे हेच आमचे ध्येय.
📍 अधिकृत फेसबुक पेज
महाराष्ट्र शासन | आदिवासी विकास विभागएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे
"शासनाच्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हाच आमचा संकल्प!" — ना. श्री. जयकुमारजी रावलधुळे जिल्ह्यात आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ (१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर) संदर्भात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व शिष्टाचार मंत्री ना. श्री. जयकुमार रावल यांचे महत्त्वपूर्ण मनोगत! या अभियानांतर्गत समाजातील शेवटच्या आणि गरजू घटकांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ कसा पोहोचवला जात आहे, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरणासाठी शासन कशा प्रकारे कटिबद्ध आहे, याबाबत ना. जयकुमार रावल यांनी सविस्तर भूमिका मांडली.
संपूर्ण बाइट नक्की ऐका आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा!📍 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे #सेवा_संकल्प_अभियान #पालकमंत्री #धुळे #आदिवासी_विकास_विभाग #महाराष्ट्र_शासन
📍 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे
आज धुळे येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयास शिरपूरचे आमदार मा. श्री. काशीनाथ पावरा यांनी सदिच्छा भेट दिली.
महाराष्ट्र शासन | आदिवासी विकास विभागएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे जि. धुळे
"सेवा संकल्प अभियान – विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!"
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासकीय योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे विशेष ‘सेवा संकल्प अभियान’!
या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवणे, विविध कल्याणकारी उपक्रम राबवणे आणि समाजात व्यापक जनजागृती घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे.
अभियानाचा कालावधी: १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर
अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये:
शिक्षण व कौशल्य विकास: विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व स्पर्धा परीक्षा/शारीरिक चाचणी मार्गदर्शन.
आरोग्य व कल्याण: आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरे.
महिला सक्षमीकरण: महिलांसाठी स्वयंरोजगार व सक्षमीकरणाचे उपक्रम.
योजनांचा थेट लाभ: पात्र लाभार्थ्यांना शेती साहित्य, रोजगार साधने व विविध शासकीय योजनांचा थेट लाभ.
चला, या महाअभियानात सहभागी होऊया आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीला नवा वेग देऊया!
#सेवा_संकल्प_अभियान #आदिवासी_विकास_विभाग #महाराष्ट्र_शासन #धुळे #जनजागृती #आदिवासी_कल्याण #सक्षमीकरण #धुळे
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष (PM DA-JGUA) अभियान अंतर्गत धुळे जिल्ह्यातील २१३ अनुसूचित जमाती वास्तव्य असणाऱ्या गाव / पाडा / वस्ती / मध्ये आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून रस्ते,पक्की घरे, पाण्याची व्यवस्था , विद्युत पुरवठा ,अंगणवाडी केंद्र बांधणे,पोषण स्थिती सुधारणे, कोशल्य विकास प्रशिक्षण देणे , कृषी , मस्त्य , पर्यटनाचा विकास इत्यादी घटकांचा समावेश असून या योजनांच्या माध्यमातून गाव पाड्याचा विकास करण्याची कार्यवाही जिल्हास्तरीय यंत्रणे मार्फत करण्यात येत आहे. सदर योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना व्हावा यासाठी दिनांक १५ जून २०२५ ते ३० जुन २०२५ या कालावधीत Dharti Aaba Abhiyan Awareness and Benefit Saturation Camps चे नियोजन खालील आश्रमशाळा मध्ये करण्यात आलेले आहे.
1. दिनांक- 19.6.2025 सुकापूर ता साक्री व कोडीद ता. शिरपूर
2. दिनांक – 20.6.2025 उमरपाटा ता साक्री व लौकी ता. शिरपूर
3. दिनांक – 23.6.2025 बोपखेल ता साक्री व उमरदा ता. शिरपूर
4. दिनांक – 24.6.2025 शेवगे ता साक्री व जामन्यापाडा ता. शिरपूर
5. दिनांक – 25.6.2025 शिरसोले ता साक्री व हिवरखेडा ता. शिरपूर
6. दिनांक – 26.6.2025 रोहोड ता साक्री व अर्थे खुर्द(शिरपूर टोलनाका जवळ) ता. शिरपूर
7. दिनांक – 27.6.2025 नवापाडा ता साक्री / अक्कलकोस ता. शिंदखेडा
8. दिनांक – 30.6.2025 राईनपाडा ता साक्री व कुसुंबा ता. धुळे
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी सदर कॅम्प मध्ये उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी केले आहे
15/06/2025
आमचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान, मार्गदर्शक, मनमिळाऊ स्वभावाचे, अभ्यासू व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आदर्श व्यक्तिमत्व प्रकल्प अधिकारी श्री प्रमोदजी पाटील साहेब आपणांस जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐🎂🎂🎂
02/06/2025
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात लाभ देणेकरीता अनुसूचित जमातीच्या (आदिवासी ) बांधवांसाठी प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , धुळे या कार्यालयाच्या अधिनस्त असलेले धुळे,शिंदखेडा,साक्री व शिरपूर या तालुक्यातील लाभ घेणेसाठी इच्छुक असणाऱ्या आदिवासी बांधवांनी https://www.nbtribal.in या वेबसाईट वर दिनांक ०२ जून २०२५ ते १५ जुलै २०२५ या कालावधीत सायंकाळी ६:१५ पर्यंत Online पद्धतीने योजनेचे अर्ज भरावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Category
Website
Address
424001
Alerts
Be the first to know and let us send you an email when Project Officer Integrated Tribal Development Project Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.