Saket Book World

मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील महत्त्वाच्या पुस्तकांचे भव्य दालन

19/08/2021

महाराष्ट्राचे वाङ्मयमहर्षी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साकेत प्रकाशित सर्व पुस्तकांवर दि. २०/०८/२०२१ रोजी २५% भरघोस सूट.

Photos from Saket Book World's post 19/08/2021

सूक्ष्मजंतू - सूक्ष्मजीवांच्या उत्क्रांतीपासून ते कोव्हिडपर्यंतचा चित्तथरारक इतिहास आणि विज्ञान

‘सूक्ष्मजंतू’या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंड आहे. तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि
डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे. जीवाणू तसेच विषाणूंचा शोध, रोगजंतूंचे थैमान आणि त्यांचा मानवी इतिहास व संस्कृतीवर उमटलेला अमीट ठसा, याबद्दल अतिशय रसाळ भाषेतून वाचकांशी संवाद साधतानाच हे पुस्तक आपल्याला उपकारक सूक्ष्मजंतू आणि माणूस यांच्यामधल्या जनुकीय नात्याची सहज सुंदर ओळख करून देते. हे पुस्तक शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व वाचकांना अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे.

- डॉ. जगन्नाथ सातव, निवृत्त सायंटिफिक ऑफिसर, बीएआरसी, मुंबई

सूक्ष्मजीवसृष्टीची उत्पत्तीपासूनची समग्र गाथा ओघवत्या सहज शैलीतून विस्तारानं उलगडताना सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी लिहिलेलं ‘सूक्ष्मजंतू’ हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं. इतकंच नव्हे तर प्रायॉन्स, बॅक्टेरिओफेजेस आणि अलीकडे सापडलेले महाकाय विषाणू अशा नवनवीन शोधांची रंजक सफर घडवतं. केवळ शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे तर सर्व मराठी वाचकप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे.

-डॉ. राजीव ढेरे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे

सिद्धहस्त लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांचं ‘सूक्ष्मजंतू’ हे सर्वसामान्य वाचकालादेखील समजेल अशा सहज सोप्या शैलीमधून साकार झालेलं अतिशय सुंदर पुस्तक आहे. सूक्ष्मजंतूंचा इतिहास, विज्ञान आणि मानवी संस्कृतीवर पडलेला प्रभाव यांचा धांडोळा घेताना लेखकद्वयींनी अतिशय परिश्रम घेऊन प्राचीन काळापासून ते 21व्या शतकापर्यंतच्या जंतुविज्ञानाचा सखोल आढावा घेतला आहे. साथीच्या रोगांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्मजंतूंचा वेध घेणार्‍या, त्यावर लस शोधून काढणार्‍या शास्त्रज्ञांच्या चरित्रकथांनी नटलेलं हे पुस्तक वाचकाला गोष्टीचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतं.

- डॉ. वेदवती गुरुराज पुराणिक, माजी वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे

ओघवती सुगम भाषा, वैज्ञानिक संकल्पनांची, संशोधनाची केलेली अतिशय लक्षवेधी मांडणी आणि गोष्टीवेल्हाळ रूपानं केलेलं वैज्ञानिक कथन यांच्या मिलाफातून ‘सूक्ष्मजंतू’ हे देखणं पुस्तक साकार झालं आहे. या पुस्तकात सूक्ष्मजंतूंच्या अन्वेषणाच्या जोडीला संशोधनासाठी वापरलेल्या छोट्या छोट्या बारकाव्यांचं केलेलं रसाळ वर्णन लेखकांच्या ज्ञानाच्या उत्तुंगतेबद्दल खूप काही सांगून जाते. ‘तो मी नव्हेच’, ‘आपले आरोग्य आपल्या पोटात!’ ही प्रकरणे वाचकांना खिळवून ठेवणारी, नवी माहिती देणारी आहेत.

- डॉ. सौ. वर्षा परशरामी, माजी वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे

19/08/2021

लोकप्रिय लेखिका व प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. त्यांच्या सर्व पुस्तकांवर आज दि. १९/०८/२०२१ रोजी १५% सूट.

18/08/2021

लोकप्रिय लेखिका व प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सर्व पुस्तकांवर दि. १९/०८/२०२१ रोजी १५% सूट.

17/08/2021

भयकथासम्राट नारायण धारप यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या साकेत प्रकाशित सर्व पुस्तकांवर दि. १८/०८/२०२१ रोजी २५% भरघोस सूट.

14/08/2021

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🙏

अत्यंत दु:खद बातमी. राजहंस प्रकाशनाचे आदरणीय श्याम देशपांडे यांचे निधन. आयुष्यभर ग्रंथांवर आणि माणसांवर भरभरून प्रेम करणारे, समर्पित भावाने ग्रंथसेवेत आयुष्य वेचणारे, श्याम देशपांडे असे अचानक निघून गेले... भावपूर्ण श्रद्धांजली.
तुम्ही कायम जिवंत असणार मना...मनांत.

Photos from Saket Book World's post 07/08/2021

वाचकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.

#discount #sale #promo #offer #deals #onlineshopping #shopping #sales #offers #discountcode #promotion #discounts #deal #coupon #instagood #free #shop #marathibooks #marathibook #englishbooks

29/07/2021

Today’s Maharshtra Times…

भारतीय मनाचा मानबिंदू

भारतीय मनाचा मानबिंदू ठरलेले; ‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ हे मूल्य प्रत्यक्ष जगलेले टाटासंस्कृतीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे जहांगीर रतन दादाभॉय टाटा.
संपादक म्हणून काम करताना तसं तर प्रत्येक पुस्तक महत्त्वाचं आणि समृद्ध करणारं ठरतं; पण जे.आर.डी. टाटांच्या बहुआयामी आयुष्याचे अनेकविध पैलू उलगडणारं चरित्र काढण्याची खूप दिवसांची इच्छा होती. मला नेहमीच सिनेमातल्या नटांपेक्षा समाजासाठी भरीव कामगिरी करणार्या, आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचं शिखर गाठणार्या व्यक्तींविषयी अपार आदर वाटतो; किंबहुना तेच खरे ‘सोशल हिरो’ वाटतात. त्यातून जे.आर.डीं.सारखी व्यक्ती म्हणजे नीतिमूल्यं, कर्तृत्व, माणुसकी, समाजहित या सर्वांचा परिपाकच!
दीडशे वर्षांपासून भारतीय मनावर अधिराज्य गाजवणार्या टाटांविषयी जास्तीत-जास्त समजून घेण्याची सर्व भारतीयांना इच्छा असते; तशीच ती माझीही होती. जेआरडी हे भारतीय औद्योगिक विश्वाची तसंच सामाजिक बांधिलकीची पायाभरणी करणारं अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून तर आपल्या सर्वांना परिचित आहेच; पण एक माणूस म्हणूनही सहृदयी, नितळ, नीतिमूल्यं जपत सचोटीच्या वाटेनं यशाची शिखरं सर करणार्या जेआरडींविषयी आजच्या पिढीने जास्तीत जास्त समजून घेणं गरजेचं वाटतं. स्टीलनिर्मिती, विमानवाहतूक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांपासून, अगदी पंचतारांकित हॉटेल्सच्या क्षेत्रातही भारतीयांना अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवणारे जेआरडी वंदनीय ठरतात ते कामातील गुणवत्तेसोबतच भारतात आरोग्य, शिक्षण, रोजगार, कला अशा सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या सामाजिक कार्यामुळे.
दीड शतकाचा संपन्न वारसा लाभलेला टाटा उद्योगसमूह ज्या नैतिकतेच्या पायावर उभा आहे, त्याची पायाभरणी भक्कम करत जे.आर.डीं.नी त्यातील अनेकविध संस्थांचं क्षितिज विस्तारलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला नवी ओळख देऊन त्यांनी देशातील उद्योगविश्वाला आकार दिला. आपल्या समूहासाठी कोणताही निर्णय घेताना आधी देशाचा विचार करण्याचा आदर्श त्यांनी कित्येक उद्योगपतींना आपल्या कृतीतून घालून दिला. कर्मचारी हे संस्थेचा अविभाज्य घटक असतात हे ओळखून जे.आर.डीं.नी ते आयुष्यात समाधानी असावेत यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. आपलं सामाजिक उत्तरदायित्व ओळखून त्यांनी समाजाला सढळ हातानं घेतलं त्याहून कित्येक पट परत दिलं.
या सर्वांसोबतच जे.आर.डीं.चं वेगळेपण होतं ते त्यांच्या संपर्कात येणार्यांसोबत जपलेल्या हव्याहव्याशा भावनिक ओलाव्यात. अनेक बलाढ्य व्यवसायसमूह सांभाळत असतानाही संवेदनशील मनाच्या जेआरडींनी माणसं जोडण्याला नेहमीच प्राधान्य दिलं. मोठ्या उद्योगपतींमध्ये हे संतुलन आढळणं तसं दुर्मीळ. म्हणूनच जे.आर.डीं.च्या व्यवस्थापकीय कौशल्यांचा पट, जीवनविषयक दृष्टिकोन सांगणारं, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व मांडणारं पुस्तक मराठीत प्रकाशित करणं महत्त्वाचं वाटत होतं. अर्थात ते तितकंसं सोपं नाही याचीही जाणीव होतीच.
टाटांवर लिहिण्यासाठी लेखकानं मुळातून टाटासंस्कृती समजून घेणं आवश्यक होतं. त्यामुळे मी अनेक वर्षांपासून जे.आर.डींच्या चरित्रलेखनासाठी योग्य लेखकाच्या शोधात होते. आमचे लेखक आदरणीय जयप्रकाश झेंडे म्हणजे मॅनेजमेंटमधील तज्ज्ञ ट्रेनर. त्यांच्या प्रशिक्षणानंतर संस्थेतील कार्यपद्धतींमध्ये किती आमूलाग्र बदल झाला याविषयी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या 50 वेगवेगळ्या उद्योगसमूहांतील तज्ज्ञांचे अभिप्राय एका क्वालिटी सर्कलच्या कार्यक्रमात मी स्वत: ऐकले. त्यांची याआधीची आम्ही प्रकाशित केलेली पाच पुस्तकं चांगलीच लोकप्रिय ठरलीत. त्यांनी स्वत: टाटा मोटर्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून तीस वर्षे काम केलं आहे. टाटांवरील प्रेमामुळेच की काय आज त्यांचा मुलगाही तिथे उच्चपदावर कार्यरत आहे. त्यामुुळे त्यांच्याशी होणार्या भेटींदरम्यान त्यांचं टाटाप्रेम आणि या संस्थेविषयी असलेलं समर्पण जाणवत होतं.
प्रत्यक्ष अनुभवातून टाटांना समजून घेतल्यामुळे श्री. जयप्रकाश झेंडे यांना टाटा, त्यांची कार्यसंस्कृती, मूल्यं याविषयी अढळ निष्ठा आहे. आम्ही भेटायचो तेव्हा कित्येकदा मूळ विषय बाजूला ठेवला जाऊन कितीतरी वेळ आम्ही जे.आर.डींच्या वेगवेगळ्या पैलूंविषयीच बोलायचो. एकदा मी त्यांच्यासमोर जे.आर.डीं.चं चरित्र लिहिण्याचा विषय काढताच त्यांनी तात्काळ होकार दिला. लेखक-प्रकाशक या दोघांच्याही जिव्हाळ्याच्या विषयातून तयार झालेले जे.आर.डीं.चे चरित्र वाचकांच्या हाती देताना विशेष समाधान वाटतंय. हे पुस्तक परिपूर्ण असल्याचा कुठलाही दावा नाही, तर देशाच्या विकासासाठी अविरतपणे झटणार्या उद्योजकाचा अल्पपरिचय करून देण्याची संधी म्हणजे हे पुस्तक, असे आम्ही समजतो. मूळ चरित्रनायकाचं प्रतिबिंब पानापानावर उमटलेलं हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखकाचे हार्दिक आभार. वाचक या पुस्तकाचं स्वागत करतील अशी आशा आहे.

प्रतिमा-साकेत

13/06/2021

अष्टपैलू साहित्यिक, वृत्तपत्रकार, वक्ते व चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

06/06/2021

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

गुरुवर्य केळुसकर आणि त्यांचे शिवचरित्र

गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्य-व्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार व अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

02/06/2021

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत 'साकेत बुकवर्ल्ड' आजपासून वाचकांच्या सेवेसाठी खुले!!!

सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि भरपूर वाचन करा.

10/05/2021

असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व

मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसंच आपल्या मुलांबाबत येणार्‍या समस्या सोडवण्यासाठी किंबहुना फारशा समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून मुलांशी कसं वागावं, हे समजण्यासाठी पालकांना अत्यंत उपयुक्त व आवश्यक अशी माहिती या पुस्तकात दिलेली आहे.

पालकांचे मुलांशी वर्तन कसे असावे, त्यांच्यातील संवाद कसा असावा, मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासाच्या दिशा, मुलं आणि अभ्यासातील नियोजन कसे असावे, मुलांवर कुठलीही गोष्ट न लादता मनोरंजनातून मुलांचा व्यक्तिमत्त्वविकास व्हावा यासाठी काय मुलांची मानसिकता, मुलांबाबतच्या पालकांच्या समस्या व त्यावरील उपाय या विषयावरील हे पुस्तक एक प्रकारे समुपदेशाचे कार्य करील, हे वेगळे सांगायला नको.

मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला जीवनातल्या काही सहज प्रक्रियासुद्धा मुद्दाम शिकून घ्याव्या लागतात. संस्कारित कराव्या लागतात... माणसांची बौद्धिक आणि भावनिक क्षितिजं रुंदावत असल्यानं असेल कदाचित. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याची गरज फार जाणवते आहे.

दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटंबात राहणार्‍या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही. वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, ‘होमवर्क’चा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल.

भरभक्कम मानसशास्त्रीय बैठक अन् मुलं व पालक दोघांशीही संवाद साधण्याचा लेखिकेचा दैनंदिन अनुभव यावर आधारित हे पुस्तक संग्रही ठेवावं व मुलांशी वागताना वारंवार वाचावं असं आहे.

- या आवृत्तीत अधिक काय वाचाल?

- तणाव-हटाव मोहीम

- आपली मुलं-जबाबदारी की गुंतवणूक?

- मुलांचा भावनिक-सामाजिक बुद्ध्यांक वाढवा

- ओळख-आपुली आपणाशी!

अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या

- प्रकाशवाटा- मुलांची बौद्धिक कुंडली जाणून घ्या

- शोध व्यक्तिमत्त्वाचा- दिशा जीवनाची अर्थात करिअर मॅनेजमेंट

https://www.amazon.in/dp/8177867822/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_194XQ2QMD98ZWC209E3Z

Videos (show all)

Rang Sukhache by Dr. Rama Marathe
#stayhomestaysafe
Dashkriya Movie Official Trailer...बाबा भांड यांच्या "दशक्रिया" कादंबरी वर आधारित चित्रपट "दशक्रिया" १६ नोव्हेंबरला चित्...
रक्त
Happy Diwali

Category

Telephone

Address

Bhanusaheb Kabra Marg
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10:30am - 9:30pm
Tuesday 10:30am - 9:30pm
Wednesday 10:30am - 9:30pm
Thursday 10:30am - 9:30pm
Friday 10:30am - 9:30pm
Saturday 10:30am - 9:30pm
Sunday 10:30am - 9:30pm
Other Book Stores in Aurangabad (show all)
Literati Scientific and Publishers Pvt. Ltd. Literati Scientific and Publishers Pvt. Ltd.
Aurangabad, 431004

Welcome to Literati Publishers ! We are international publishers of journals, magazines, periodicals, online books dedicated to the global dissemination of information in the fields of Science, medicine and technology.

Islamic Book Centre - IBC (Aurangabad, India) Islamic Book Centre - IBC (Aurangabad, India)
# 1-23-100, Rohila Gali,
Aurangabad, 431001

We are dealer for Darussalam Publishers Saudi Arabia & Many other international publisers for Marathwada region, besides many local publishers.

Nivrutt mandkikar patil Nivrutt mandkikar patil
Saptshrungi Housing Socity N 7 Cidco Sambhajinagar
Aurangabad, 123

Niraj gift & stationary Niraj gift & stationary
Gulmohar Colony N-5Cidco
Aurangabad, 431003

झकं मारली आणि Diploma घेतला राव Aurangabad झकं मारली आणि Diploma घेतला राव Aurangabad
S
Aurangabad

उगाच "" Diploma ""घेतला राव..!!���� Only "Diploma & Engineer" Fan's ��� �1 Like � To Banta hai....."!!

Abhay Book Centre Abhay Book Centre
Aurangabad, 431001

Welcome to the official page of Abhay Book Centre. We encourage posts that represent the true spirit of Abhay Book Centre. Content that is deemed to be inappropriate/offensive will be removed. Thank you for understanding.

Shirdi Hotel Bookings Shirdi Hotel Bookings
88, Sindhi Colony, Jalna Road
Aurangabad, 431005

Are Bhai Are Bhai
Vip Road
Aurangabad, 431001

DILIP Stationers and GIFTS DILIP Stationers and GIFTS
SHOP NO -3 SHRADHA APARTMENT JAISINGHPURA BEGAMPURA
Aurangabad, 431001

Stationery,Toys,Gifts,Books,Register's & Note Books,Purse,Misc Products

U-Worm. (Bringing the books you need) U-Worm. (Bringing the books you need)
Disha Sanskruti Paithan Road
Aurangabad, 431001

U-Worm. Your favourite book rental service.

My Book Palace My Book Palace
93,Sr.23/24,Krishna Kunj Society ,Opposite Shri Shri Ravi Shankar School,N-4 ,Cidco
Aurangabad, 431003

My Book Palace is the ultimate destination for all your school and office needs offline and online at reasonable prices!!