Sachin Dabhade

Sachin Dabhade

Management & Corporate skill development Trainer & Consultant. providing training solution to Working professional, small scale industry. A Thinker, Debater, Presenter, Motivator, Excellent People Manager, an extraordinary communicator, Counselor, Management & Corporate trainer, Career Consultant are the major area of excellence in which Sachin Dabhade perform and serving organizations with full of Vision & planning.

Operating as usual

Photos from Sachin Dabhade's post 01/08/2021

औरंगाबाद येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ संतोष माद्रेवार यांच्या निमाई या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व एम्प्लॉयी साठी पूर्ण दिवसाचे वर्कशॉप आयोजित केले होते. येणाऱ्या काळात डॉ. संतोष माद्रेवार यांच्या व्हिजन मधून महाराष्ट्रातील सर्वात मोठे मल्टीस्पेशालिटी चाईल्ड हॉस्पिटल औरंगाबाद चिकलठाणा येथे उभे राहत आहे. हे 200 बेड कॅपेसिटी असलेले हॉस्पिटल, औरंगाबाद ची नवी ओळख असणार यात काही शंका नाही. या संबंधाने माद्रेवार सरांच्या टीमला कोच करतोय ही एक आनंदाची बाब माझ्यासाठी आहे. एकूणच प्रेरणादायी अनुभव.

सचिन दाभाडे.

'आळस', 'चालढकल' करण्याच्या सवयींवर आधारलेला महत्वपूर्ण सिद्धांत/Boiling Frog Syndrome/Sachin Dabhade 28/07/2021

'आळस', 'चालढकल' करण्याच्या सवयींवर आधारलेला महत्वपूर्ण सिद्धांत/Boiling Frog Syndrome/Sachin Dabhade

*बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम*

एखाद्या चुकीच्या समूहात सामील झाल्यावर किंवा चुकीच्या विचारात अडकल्यावर किंवा चुकीच्या करिअरमध्ये असताना आपल्याला जाणीव होऊनही आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाही, आपण हतबल होतो पण चुकीच्या असलेल्या सवयीतून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते. याचे कारण काय असते...? शाश्त्रज्ञांनी एका महत्वपूर्ण सिद्धांताच्या साहाय्याने यावर उत्तर शोधलेय.
असे आपल्यासोबत का होते ?आणि त्यावर उपाय काय हे नक्की पहा ..!

https://youtu.be/Z24nBBhs2c4

'आळस', 'चालढकल' करण्याच्या सवयींवर आधारलेला महत्वपूर्ण सिद्धांत/Boiling Frog Syndrome/Sachin Dabhade एखाद्या चुकीच्या समूहात सामील झाल्यावर किंवा चुकीच्या विचारात अडकल्यावर किंवा चुकीच्या करिअरमध्ये असताना आपल.....

[07/26/21]   आपण पुस्तके वाचतो पण वाचल्यानंतर आपल्यापैकी बहुतांश जणांना त्यातील काहीच आठवत नाही. नेमकं काय वाचलं हे ही नीटस सांगता येत नाही. याला कारण काय असावे ?. ज्ञानी समजल्या जाणारी, अभ्यासात ही पुढे असणारी, अफाट वाचन करून विचारवंत झालेली माणसे नेमकी कुठली स्ट्रॅटेजी वापरतात, कुठल्या पद्धतीचा वापर करतात जेणेकरून त्यांना पुस्तकाचे आकलन सामान्य वाचकांपेक्षा फार लवकर होते व लक्षातही राहते.

या व्हिडिओच्या माध्यमातून ही पद्धत समजून घ्या अतिशय सोप्या मार्गाने.

https://youtu.be/bkg6NGtgpaQ

तुमच्या व्यक्तिमत्व या दोन अभिवृत्ती पैकी कुठ्ल्याने प्रभावित आहे/Personality 2 side/ Sachin Dabhade 22/07/2021

तुमच्या व्यक्तिमत्व या दोन अभिवृत्ती पैकी कुठ्ल्याने प्रभावित आहे/Personality 2 side/ Sachin Dabhade

हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण काही वेळेला हट्टी असतो आणि काही वेळेला संकल्पी असतो. दोन्ही शब्दांचा अर्थ जरी वरवरून सारखा वाटत असला तरी दोन्हीच्या अर्थामध्ये मूलभूत फरक आहे तो फरक आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. याचा अर्थ जर सगळ्यांनी समजून घेतला तर अतिशय महत्वपूर्ण बाब आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येईल व त्याचा उपयोग आयुष्याची बिघडलेली घडी बसवण्यासाठी होऊ शकतो ...
बघुयात, समजून घेऊयात आणि आपल्या जवळच्या प्रत्येकाला शेअर करूया ही महत्वपूर्ण बाब.

https://youtu.be/AGEcF6vXD0E

तुमच्या व्यक्तिमत्व या दोन अभिवृत्ती पैकी कुठ्ल्याने प्रभावित आहे/Personality 2 side/ Sachin Dabhade तुमच्या व्यक्तिमत्व या दोन अभिवृत्ती पैकी कुठ्ल्याने प्रभावित आहे/Personality 2 side/ Sachin Dabhadeकुठल्याही घटनेला आपण प्रतिसाद द....

Photos from Sachin Dabhade's post 12/07/2021

समूहात काम करताना सुद्धा लोक आपआपली गुणवैशिष्ट्य जपत आपले उद्दिष्टे साध्य करत असतात. कधी कधी टोकाच्या वैयक्तिक समजेतून संस्थेची सामूहिक पातळीवरील उद्दिष्टे साध्य होण्यास अडचणी उभ्या राहतात तर कधी कधी टोकाच्या सामूहिक उद्दिष्ट्य प्राप्तिसाठी वैयक्तिक गुणवैशिठ्यांच्या विकासाकडे ही दुर्लक्ष होत असते. या दोन्ही अपेक्षाच्या मध्यावर समतोल साधत उभ्या असलेल्या एम्प्लॉयीसाठी वेळेचे नियोजन, गोल सेटिंग, आणि प्रोड्यक्टिव्हिटी डेव्हेलपमेंट या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या बनून जातात. या संबंधाने आज Indian internet Solution या वाळूजस्थित IT कंपनीच्या एम्प्लॉयीसाठी वर्कशॉप घेतला.
सातत्यपूर्ण स्वतःच्या आणि संस्थेच्या स्किल्सला विकसित करणे, या अप्रोचला पर्याय यापूर्वीही नव्हता आणि भविष्यात ही राहणार नाही.

..................
सचिन दाभाडे

08/05/2021

फ्रांस आणि इंग्लंडच्या युद्धात अमेरिका तटस्थ राहिला म्हणून इंग्लंड ने अमेरिकेला फिनिश्ड गुडस चा पुरवठा बंद केला आणि अमेरिकेत इंडस्ट्रीलायझेशनची सुरवात झाली. काळ होता 19 व्या शतकाच्या सुरुवातीचा. इंग्लंडकडून आलेल्या या अचानक व्यापारबंदीच्या झटक्यानंतर अमेरिका अंतर्मुख झाली व इंग्लंडच्या भरवश्यावर उभे असलेले व्यापार धोरण फार काही काळ तग धरणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. यामुळेच; त्यावेळपासूनच स्वतःकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या व उद्योगासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनाकडे मग अमेरिकेने लक्ष देणे सुरू केले.
ऑइल, लोखंड, इमारतीचे लाकूड, कॉपर आणि कोळसा या मूलभूत साधनाचे भरपूर साठे असूनही इंग्लंडवर आपण अवलंबून का आहोत? याची अमेरिकेला जाणीव झाली. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जी कामे हाताने केली जायची ती यंत्राद्वारे करण्याची मोहीम हाती घेतली गेली. कॉर्पोरेट करार केले गेले. काही वर्षांपूर्वीच 90% इकॉनॉमी शेतीआधारित असतांना येणाऱ्या काही वर्षातच ती उद्योगाधारीत झाली. जेफर्सन आणि मॅडीसन हे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक बनले. ब्रिटन ने घातलेली बंदी पुढे चालून त्यांच्याच अंगावर आली, पण या बंदीच्या काळात अमेरिका मात्र खाडकन डोळे उघडून स्वतःच्या क्षमतेकडे पाहू लागला. अमेरिकेचे हे अंतर्मुख होणे इंग्लंडला काही वर्षांनी महागात पडणार होते. करण यानंतरच पोलादाचे भयंकर मोठे उद्योग अमेरिकेत उभे राहायला सुरू झाले. आणि हाच पोलाद व इतर उद्योग सगळ्या युरोपातील उद्योगधंद्यांना भविष्यात मुख्य पुरवठादार झाला.
बंदी, अडचणी ह्या आत्मनिर्भर होण्याच्या मार्गातील सर्वात मोठ्या संधी असतात, मग तो व्यक्ती असो किंवा देश ..!
.....................
सचिन दाभाडे

फ्रांस आणि इंग्लंडच्या युद्धात अमेरिका तटस्थ राहिला म्हणून इंग्लंड ने अमेरिकेला फिनिश्ड गुडस चा पुरवठा बंद केला आणि अमेरिकेत इंडस्ट्रीलायझेशनची सुरवात झाली. काळ होता 19 व्या शतकाच्या सुरुवातीचा. इंग्लंडकडून आलेल्या या अचानक व्यापारबंदीच्या झटक्यानंतर अमेरिका अंतर्मुख झाली व इंग्लंडच्या भरवश्यावर उभे असलेले व्यापार धोरण फार काही काळ तग धरणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. यामुळेच; त्यावेळपासूनच स्वतःकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या व उद्योगासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनाकडे मग अमेरिकेने लक्ष देणे सुरू केले.
ऑइल, लोखंड, इमारतीचे लाकूड, कॉपर आणि कोळसा या मूलभूत साधनाचे भरपूर साठे असूनही इंग्लंडवर आपण अवलंबून का आहोत? याची अमेरिकेला जाणीव झाली. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जी कामे हाताने केली जायची ती यंत्राद्वारे करण्याची मोहीम हाती घेतली गेली. कॉर्पोरेट करार केले गेले. काही वर्षांपूर्वीच 90% इकॉनॉमी शेतीआधारित असतांना येणाऱ्या काही वर्षातच ती उद्योगाधारीत झाली. जेफर्सन आणि मॅडीसन हे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक बनले. ब्रिटन ने घातलेली बंदी पुढे चालून त्यांच्याच अंगावर आली, पण या बंदीच्या काळात अमेरिका मात्र खाडकन डोळे उघडून स्वतःच्या क्षमतेकडे पाहू लागला. अमेरिकेचे हे अंतर्मुख होणे इंग्लंडला काही वर्षांनी महागात पडणार होते. करण यानंतरच पोलादाचे भयंकर मोठे उद्योग अमेरिकेत उभे राहायला सुरू झाले. आणि हाच पोलाद व इतर उद्योग सगळ्या युरोपातील उद्योगधंद्यांना भविष्यात मुख्य पुरवठादार झाला.
बंदी, अडचणी ह्या आत्मनिर्भर होण्याच्या मार्गातील सर्वात मोठ्या संधी असतात, मग तो व्यक्ती असो किंवा देश ..!
.....................
सचिन दाभाडे

[05/08/21]   2000 च्या आसपास चा काळ आठवून पहा..! कपडे घ्यायला गेलो तर तुमच्या तालुक्यातील एक किंवा दोनच अशी मोठी कापड दुकाने असायची आणि त्यातील एखाद्याच दुकानात दुसरा मजलाही भरलेला दिसायचा, बाकी सगळीकडे एकाच फ्लोरला सगळं मिळायचे. अगदी जिल्ह्याच्या ठिकाणीही दोन फ्लोरची मोठी कापड दुकाने थोडी जास्त पण अगदी मोजकीच, थोड्या फार फरकाने एखादं दोन ठिकाणी अपवाद असेल. दुकानाचे आकारमान मर्यादित, कपड्याचे सर्व प्रकार साधारणपणे एकाच ठिकाणी, आणि त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 3 ते 5 च्या घरात; एखाददोन मागेपुढे. काळ झपाट्याने बदलला. मागच्या 15 ते 20 वर्षात त्या साधारणतः सर्वच दुकानाचे दोन ते तीन फ्लोर झाले, लेडीज, जेन्ट्स आणि चाईल्डच नाही तर फक्त जेन्ट्स या एकाच प्रकारामध्येही वेगवेगळे सेगमेंट झाले. अगदी छोट्यातल्या छोट्या कापड दुकानाला ही दुसरा फ्लोर सहज आलाय आणि मोठ्या दुकानांनी अगदी मॉलला ही भारी भरेल एवढा पसारा उभा केला. या सगळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या एका दुकानात 25 ते 50 पासून 150 च्या घरात जाऊन पोहचली.
जास्त मॅनपॉवर ही जशी प्रगतीचे लक्षण आहे, तसे ती आपल्यासोबत काही आव्हाने पण घेऊन येते. आता हे कपड्याचे दुकान फक्त कपड्याचे दुकान राहिले नाही, कारण तिथे आता 40 ते 50 लोकांचा स्टाफ काम करतो. या पूर्वी जिथे एका कापड विकणाऱ्या दुकानदाराला फक्त कस्टमर कडे लक्ष द्यावे लागत, तिथे त्याला आता ग्राहक असो नसो हे 50 आणि त्यापुढेही जाऊन पोहचलेल्या पर्मनंट कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नियोजनाचे आव्हान आहे. या सर्वांचे योग्य नियोजन आणि त्यांच्या उर्जेला आवश्यक असणारी दिशा हाही आता या उद्योगात पूर्वीपासून काम करणाऱ्या व्यापारी व उद्योगीसाठी मुख्य विषय आहे.
या मोठ्या स्टाफ चे काय करायचे ? जुने होते तसे चालू द्यायचे की नवीन पद्धतीने या कर्मचाऱ्यांचे नियोजन करायचे. बाहेरील कस्टमर जेवढा महत्वाचा होता तेवढाच आता हा आतला कस्टमर उद्योजकासाठी महत्वाचा आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांना हे आव्हान म्हणून लक्षात जरी आलंय, तरी काहीजण वेळ काढताय, काही दुर्लक्ष करताय, काहींची चालढकल सुरुय, काही फक्त नाव मार्केट मध्ये असावे म्हणूनच अस्तित्वात आहे , टिकायचे असेल तर या आतल्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कास्टमरला तयार करावे लागेल..
हा बदल फक्त मान्य असणे पुरेसे नाही तर त्यासाठी तयारी करण्यास सगळ्यात पाहिले जे पुढे येतील ते त्या भागात मार्केटचे भविष्यातील फायदे घेतील..!
Regards
Sachin Dabhade

इकोपॉइंट..! 08/05/2021

इकोपॉइंट..!

● इकोपॉइंट ..!
आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव यांचे निर्मिती केंद्र आहे. पर्वताच्या कड्यावर उभे राहून मोठ्याने ओरडला तर तोच ध्वनी पुन्हा परत आपल्या कानावर आदळतो. हा काही नवीन निर्माण झालेला ध्वनी नसतो. आपलं शरीर ही असेच इको पॉईंट बनलेला आहे का ?. इको पॉंइंट सारखेच आपण नेहमी कुणाच्यातरी इच्छा ध्येय आणि भावना यांना रिस्पॉन्स करत असतो. आपले शरीर हे याबाबतीत स्वतंत्र क्रिया करण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते व त्यालाच स्वतंत्र क्रिया समजत असते. हा गैरसमज लवकर दूर व्हायला हवा.
रशियन मानसशास्त्रज्ञ पावलाव्ह, या प्रतिक्रिया देण्याच्या माणसाच्या सवयीवर स्टीम्युलस (स्वतंत्र क्रिया) आणि रिस्पॉन्स (प्रतिक्रिया) ही पद्धत विकसित करतांना म्हणतो मनुष्याचे आयुष्य हे आपल्या शरीराबाहेर तयार झालेले घटनेला (स्टीम्युलस) ला प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) देण्यामध्ये खर्च होत असते. हे स्टीम्युलस म्हणजेच बाहेरील वातावरणात घडणाऱ्या मुख्य घटना असतात, ज्यात नैसर्गिक, मानवीय दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती याला आपल्या कृवतीप्रमाणे रिस्पॉन्स देत असतो. मानवाच्या या कुवतीवर त्याने भाष्य केले, यावरून मानवी वागणुकीची रीत एका नवीन अर्थाने जगासमोर आली.
पण त्याही पुढे जाऊन व्हिक्टर फ्रांकेल याने या बाहेरील प्रभावाला न जुमानता व्यक्ती आपल्या आतमध्ये निर्माण होणारा स्वतंत्र असा रिस्पॉन्स- (स्वतंत्र भाव) निर्माण करू शकतो जो या बाहेरील प्रभावातून मुक्त आहे. या स्वतंत्र भाव निर्माण करण्याच्या मनुष्याच्या शक्तीला फ्रांकेल त्याच्या Man's search for meaning मध्ये 'इंडिपेंडंट विल' असे म्हणतो. बाहेरील घटना किंवा क्रियांना रिस्पॉन्स देत असतांना घटनेच्या प्रभावात न येता स्वतःची एक स्वतंत्र विल प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते, जी कुठलाही प्रभावातून मुक्त असते. या विल (will) नुसार केलेली कृती मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक रिझल्ट देऊ शकते.
तुमचा आजचा विचार किंवा भाव हा पेपर मधील बातम्यांचा प्रभाव, टीव्हीवरील घटना, बातम्या व विभत्स्य व्हिडीओ, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप युट्युबद्वारे बघितलेल्या स्टिम्युलेट करणाऱ्या घटना व मेसेजेस यातून निर्माण झालाय की तो या पेक्षा स्वतंत्र आहे, वेगळा आहे, तुमचा आहे, की तो विचार तुम्ही या सगळ्या बाहेरील स्टीम्युलसला प्रतिक्रिया देण्यातुन निर्माण झालाय हे बघता आले पाहिजे.
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले किती विचार, घटना व भाव हे बाहेरून आलेले आहेत किंवा त्याला प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत व किती स्वतः मध्ये तयार झालेले आहेत. एका रकान्यात बाहेरून आलेले आणि दुसऱ्या रकान्यात आतून निर्माण झालेले (इंडिपेंडंट), असे दोन भागात वर्गीकरण करून लिहा. कुठले जास्त भरताय याचे रोज अवलोकन करून बघा. ही कृती प्रामाणिकपणे केली तर बरीच दृष्टी मिळेल.
हीच इंडिपेंडंट विल म्हणजे 'स्वतंत्र इच्छाशक्ती' सर्जनशीलतेची खरी आधारशीला आहे. ही तीच सर्जनशीलता जी जद्दु कृष्णमूर्तींनां अभिप्रेत आहे, जीला ते आपल्या शिक्षणविषयक सगळ्या विचारात प्रामुख्याने मांडतात. शासनाने मुलांना लहानपणापासूनच सर्जनशील आणि कृतीयुक्त बनवण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्राथमिक शिक्षणात समावेश केला परंतु तेवढ्याश्या प्रमाणात ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी रूढ होने बाकी आहे.
...............
साचीन दाभाडे
https://sachindabhade.blogspot.com/2021/04/blog-post_44.html?m=1&fbclid=IwAR2FfBZQ6ZUlBlOc7oIm6VmI58GMTLkuyZGJV06v8gApwlf6y_4PI6oNAW4

इकोपॉइंट..! आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव ...

[05/08/21]   ■पुस्तकं, हेतू आणि स्मरणशक्ती ■
पुस्तक एकदा वाचल्यावर ते पूर्ण लक्षात राहते हे बऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा अभ्यासकांबद्दल आपण ऐकतो किंवा ऐकलेले असते. हे दुसरं तिसरं काही नसून पुस्तक लिहित असतांना लेखकाने कुठला विचार आधारासाठी योजला आहे ते लक्षात येणे होय. कुठलेही पुस्तक तुम्ही हातात घ्या त्यामध्ये लेखकाचा काही हेतू असतो. थोडं वैज्ञानिक पद्धतीत सांगायचं झालंच तर 'गृहीतक' असते. हे गृहीतक किंवा विचार व्यक्त करण्यासाठी पुस्तकांमध्ये वेगवेगळी उदाहरणें, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेली असतात. पुस्तकातील कथानक त्यातील पात्रे, मांडलेले विचार हे सगळे लेखकाच्या हेतू भोवती फिरत असतात. तो हेतू वाचन करत असतांना वाचकाला जसा जसा समजायला लागतो, तशी तशी पुस्तकातील मांडणी आपल्या स्मरणात अधिक पक्की होते. कधी कधी तर सुरवातीचे काही पाने वाचल्यावरच पुढे काय लिहले असेल याचा अंदाज येऊन जातो.
एकदा मुख्य विचार समजला की पुस्तकातील बाकी शब्दरचना त्या विचारासाठीच योजलेल्या आहेत हे ओघाने समजायला लागते, त्यामुळे पुस्तक वाचनाचा वेग आणि स्मरणक्षमता दोन्ही वाढतात. बऱ्याच वाचकांना पुस्तकातील मूळ विचार किंवा हेतू हे शेवटपर्यंत समजत नाही, त्यामुळे त्याला पुस्तकातील सगळे संदर्भ वेगवेगळ्या पातळीवर लक्षात ठेवावे लागतात जे समजायला व लक्षात ठेवायला अडचणीचे असते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील चौफेर वाचनातून हेतू समजण्याची आपली क्षमता ही विस्तारत जात असते, अर्थात ही हळू हळू होणारी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. तिला वाचनातून सतत बळ देत राहिलं पाहिजे, म्हणजे पुस्तकं वाचल्यावर लक्षात राहायला लागतात व त्यांचा आयुष्यात योग्य ठिकाणी उपयोग व्हायला लागतो.
........
सचिन दाभाडे

[05/08/21]   हट्ट आणि संकल्प यामध्ये मूलभूत फरक म्हणजे; हट्टीपणामध्ये स्वतःला काही मिळवण्यासाठी दुसऱ्याने आपल्यासाठी प्रयत्न करावे, हे अपेक्षित असते, तर संकल्पाचा भाव हा कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला त्या कामासाठी तयार करत असतो. वरवरून हट्टी व्यक्ती आणि संकल्पि व्यक्तीं दोघांनाही इच्छिलेले हवेच असते, पण काही कारणाने ते मिळणे बंद झाले तर संकल्पि व्यक्ती प्रयत्न करत राहतो, तर हट्टी प्रतिक्रियात्मक होऊन दोष देणे सुरू करतो व नकारात्मक ऊर्जेने भरत जातो. आपण हट्टी आहोत की संकल्पि हे वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे.

Sachin Dabhade - Management Coach and Consultant 08/05/2021

Sachin Dabhade - Management Coach and Consultant

बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मरून पाण्यावर तरंगायला लागतो.
या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की, तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले, तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.
हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर झालेल्या संशोधनातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!
आपल्या संस्थेला, कंपनीला, कुटुंबाला, सहकाऱ्याला, आपल्या टीमला आणि स्वतःला एखाद्या अनप्रॉडकटिव्ह (अनुत्पादक) प्रोजेक्ट मधून किंवा शक्य नसलेल्या मार्गावरून योग्य वेळी बाहेर काढायला तुम्हाला न जमणे किंवा ही योग्य वेळ ओळखता न येणे, हे स्वतःचा आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याच्या क्षमतेचा ऱ्हासाचे द्योतक आहे. आपण चुकीच्या फॉरमॅट मध्ये काम करतोय आणि नकळत त्यात आपण ट्रॅप होत जातोय हे समजायला बऱ्याचदा वेळ निघून जातो आणि जेंव्हा कळते की जे काही आपण केले ते अनुपयुक्त होते, तेंव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू होते. आपण आपल्या स्वतःला, टीमला, संस्थेला, कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू करतो पण असंख्य वेळेला ही धडपड व्यर्थ ठरते कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे धैर्य, हिंमत, प्रेरणा लागणार असते ती सर्व धडपड सध्या तुम्ही असलेल्या सिस्टीममध्ये आणि त्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी झिजवलेली असते. अशा वेळेला असह्यपणे जे होईल ते स्वतःसोबत होऊ देण्याची वेळ स्वतःवर येऊ देणे हेच बऱ्याच जणांना आयुष्याची आणि आपल्यात असलेल्या गुणांची फलश्रुती वाटायला लागते. ही फलश्रुती ध्येय न होऊ देण्याची जबाबदारी आपली आहे ..!
............................
सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com

Sachin Dabhade - Management Coach and Consultant Sachin Dabhade - Management Coach and Consultant, provider of Management and Corporate Coaching Solutions

Category

Telephone

Address


ASK Training Solution, Sheetal Capital, Office No.8, 2nd Floor, In Front Of YSK Hospital, Chistiya Chowk, Cidco.
Aurangabad
341001

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm
Other Coaches in Aurangabad (show all)
GATE coaching - Aurangabad GATE coaching - Aurangabad
Besides Institution Of Engineers , Next To Govt. Engg. College , Station Road, Aurangabad
Aurangabad, 431005

GATE coaching - The trusted name for Perfect & Focused Class room coaching for GATE .

Catalyst Professional Academy Catalyst Professional Academy
Catalyst Professional Academy, Above Royal Enfield, Raja Bansilal Market, Railway Station Road,
Aurangabad, 431005

A Premier Institute for imparting the Coaching of Commerce XI,XII, Chartered Accountancy and Company Secretary

SHODH Advanced Techonologies SHODH Advanced Techonologies
C-36/2, MIDC Industrial Area, Chilkalthana,
Aurangabad, 431006

Creating extraordinary experiences everyday for organisations and individuals through Learning Awareness!

Mushtaque Shaikh Mushtaque Shaikh
Aurangabad, 431001